22/09/2022
"कुणीतरी पाहिजे "
जिवंत आहोत तो पर्यंत
कुणीतरी आपले जवळ पाहिजे
विचारपूस करणारे आपले
चार मित्र जवळ पाहिजे !
येतील जीवनात सुख दुःख
त्यावेळी कुणीतरी आपले पाहिजे
संकटाच्या वेळी आपल्यासोबत
कुणीतरी धावून जाणारे पाहिजे !
नको उंच इमारती अन बंगले
झोपडीत सोबत राहणारे पाहिजे
भलेही नको पैशासाठी सोबत
पाठीवर हात ठेवणारा पाहिजे !
नात्यात नको आता दुरावा
कुणीतरी समजून घेणारा पाहिजे
कधीतरी जायचे आहे ना
मागे कुणीतरी रडणारा पाहिजे !
सतीश कलंत्री मालेगाव