30/04/2023
या लेखातील मुद्दे गांभीर्याने घेऊन योग्य पाऊल उचलले जावे...
*प्रदूषण आणि दिशाभूल करणाऱ्या आंब्याच्या बागा.*
प्रा. भूषण भोईर.
*नुकताच एक मराठी पेज वरती जामनगर येथील रिफायनरी क्षेत्रात तब्बल दीड लाख आंब्याची आमराई रिफायनरी ने फुलवली आहे, तिथे आंब्याचे भरघोस उत्पन्न कंपनी घेत असून जामनगर येथील रिफायनरी मधून कुठल्याही प्रकारच्या प्रदूषणाचा आमराई वर जराही परिणाम होत नाही किंबहुना रिफायनरी अजिबात प्रदूषण करणाऱ्या नसतात असे भासविण्याचा प्रयत्न लेखातून होतो आहे अशी शंका आली. सदर लेखात येथील रिफायनरी ने अगदी विपरीत परिस्थितीत शेती करून दाखवली आहे जिथे प्यायला पाणी नाही तिथे एवढ्या मोठ्या आमराई साठी पाणी कुठून आणायचं म्हणून कंपनी ने समुद्राचे पाणी निक्षरिकरण करून (desalination) आमराई वाढवली आहे. आणि प्रदूषण करी कंपनी आणि तिथेच शेती ह्या दोन टोकाच्या गोष्टी सहज शक्य आहेत असे भासाविण्याचा प्रयत्न केला आहे.*
*त्या मागचं सत्य काय आहे हे आता समजून घेऊ. हे खरं आहे की सदर रिफायनरीच्या अगदी जवळ तब्बल दीड लाख आंब्याची झाडे कंपनी न लावली आहेत पण त्यावर प्रदूषणाचा काहीच परिणाम होत नाही हे म्हणणे अगदी खोटं ठरेल. कारण ही आमराई रिफायनरी च्याचीमणी पासून सात किमी उत्तरे जवळ बनवण्यात आली आहे. इथेच फार मोठी गोम आहे. कारण कोणत्याही प्रदूषणकारी प्रकल्पाचा प्रभाव चिमणीच्या अगदी जवळ म्हणजे पाच ते सात किमी अंतरावर होतच नाही*
*कारण चिमणी मधून निघणारे घातक वायू जे तुलनेने खूपच हलके असतात ते कधीच चिमणीच्या खाली वसलेल्या क्षेत्रावर पडत नाहीत ते उंचावर फेकले जातात. आणि उंचावरून वाहणारी हवा त्यांना दूर घेऊन जाते आणि रिफायनरी क्षेत्रात कुठेच प्रदूषणाचा परिणाम दिसत नाही परंतु रिफायनरी क्षेत्रा पासून वीस ते पन्नास किमी अंतरावर त्याचा खूप वाईट परिणाम दिसून येतो.*
*आत्ता आणखी एक महत्वाची गोष्ट कंपनीने केली आहे ती म्हणजे चिमणी पासून आमराई ही तब्बल सात किमी उत्तरेला आहे. (ही बाब ज्या लेखाचा मी उल्लेख करत आहे त्यात खोटी लिहिली असून सदर बागायत रिफायनरीच्या पश्चीम दिशेला आहे असे लिहिलं आहे.) समुद्राजवळ हवा रात्री जमिनी कडून समुद्रा कडे आणि सकाळी समुद्राकडून जमिनी कडे वाहते. म्हणजेच पूर्व पश्चीम असा हवेचा प्रवास आहे. त्या मुळे चिमणी पासून उत्तरेला असलेल्या आमराई कडे चीमणीतून निघालेला धूर पोहोचतच नाही तो आमराई च्यामागील बाजूस पूर्व आणि पश्चिम असा प्रवास करतो.*
तसेच, ऋतू बदल झाल्यावर देखील उन्हाळी मान्सून वारे पश्चिम निरुत्ये कडून पूर्व ईशान्य दिशेला वाहतात तर हिवाळी मान्सून (परतीचा पाऊस) हा ईशान्य कडून पाच्चीम नैऋत्य दिशेला प्रवास करतो. त्या मुळे रिफायनरी मधून निघणारा धूर कधीच ह्या आमराई मधे जातच नाही कारण तो नेहमी आमराईच्याविरुद्ध दिशेला जातो आणि अश्या रीतीने ही आमराई रिफायनरी क्षेत्रात असून देखील तिच्यावर प्रदूषणाचा अजिबात परिणाम होत नाही.
*सदर बाब ठाम पणाने मंडण्या साठी ह्या लेखा सोबत सदर आमराई आणि चिमणीची दिशा दर्शवणारा गुगल फोटो जोडत आहे. ज्यात रिफायनरी च्याचीमनी मधून निघालेले धुराचे लोट देखील उपग्रहांने टिपले असून रिफायनरी मधून उपग्रहवारून देखील प्रदूषण दिसते आहे. तसेच धुराचे लोट आमराईच्या विरुद्ध दिशेला जाताना दिसत आहेत. तसेच मान्सून वारे कश्या प्रकारे वाहतात ते दर्शवणारा फोटो देखील शेयर करत आहे.*
आता आणखीन एक बाब इथे नमूद करावी असं मला वाटतं ती म्हणजे सदर *लेखात आमराई साठी समुद्राचे पाणी निक्षारीकरण करून वापरले जाते असं सांगितलं आहे आणि समुद्राचे पाणी निक्षारिकरण करणे कित्ती सोप्पे आणि फायदेशीर असल्याचे गळी उतरविण्याचा प्रयत्न केला जातो आहे. परंतु असे करत असताना जेवढे समुद्राचे पाणी निक्षारी करन केलं जातं त्याच्या दीडपटीने अतिशय क्षार युक्त(hyper saline brine) पाणी तयार होत ज्या सोबत घातक असे क्लोरीन आणि कॉपर युक्त विषारी द्रव्ये देखील तयार होतात जी थेट समुद्रात सोडावी लागतात ज्या मुळे समुद्रातील जीवसृष्टीचा विनाश होतो.*
*आता वर उल्लेख केल्या प्रमाणे जर १.५ लाख आंब्याच्या झाडांना निक्षरी करन केलेलं पाणी दररोज दिलं जात असेल तर त्याचा हिशोब मांडल्यास एकट्या आंब्याच्या झाडाला दिवसाला १५० लिटर इतक पाणी लागत. त्या हिशोबाने १.५ लाख आंब्याच्या झाडांना दररोज १५ दशलक्ष लिटर पाणी द्यावं लागेल. आणि हे पाणी जर नीक्षारी करन केलेलं आहे असं पकडलं तर त्याच्या दीड पटीने अतिशय क्षार युक्त आणि विषारी द्रव्ये तयार झालेलं पाणी जे जवळपास २२.५ दशलक्ष लिटर घातक असे अतिक्षार युक्त पाणी दररोज कुठे टाकले जात असावे हा संशोधनाचा विषय असायला हवा.*
तर सांगायचं तात्पर्य हेच की अश्या दिशाभूल करणाऱ्या आमराई पासून आणि अश्या प्रकल्पा पासून आपण सावधच राहिलेलं बरं.
राहिली गोष्ट सदर मराठी पेज ने छापून आणलेल्या लेखाचा दाखला देऊन जर कोणी कोकणात रिफायनरीच समर्थन करीत असेल तर इथे आणखीन एक अति महत्वाची बाब मांडावी असं वाटतं. ती म्हणजे *कोकणात सह्याद्रीच्या पश्चिम दिशेला जिथून मान्सून येतो त्या बाजूस रिफायनरी ऊभी केली तर तिचा खूप वाईट परिणाम संपूर्ण सह्याद्री वरती होईल रिफायनरी तून निघालेले धुराचे लोट दररोज सकाळी पश्चिम दिशे कडून पूर्वेस वाहणाऱ्या हवे मुळे पूर्वे जवळ असणाऱ्या डोंगराळ भागात जातील. (जामनगर येथे भूभाग डोंगराळ नाही त्या मुळे धुराचे लोट डोंगराळ भागात अडले जात नाहीत. ) त्या मुळे पूर्व नियोजित नाणार येथे किव्वा बारसू सोलगाव येथे जर रिफायनरी उभी राहिली तर त्याच्या दक्षिण आणि पूर्व भागात असलेल्या डोंगराळ भागातील जंगल आणि गावं रिफायनरी मधून आलेल्या प्रदूषणाला बळी पडणार हे निश्चित. तसेच मान्सून वेळी, पश्चीम नैऋत्य दिशेने वाहणाऱ्या वाऱ्या मुळे रिफायनरी मधून निघालेले धुराचे लोट कित्तेक किलोमिटर उत्तर पूर्व दिशेला असलेल्या गावांमध्ये आणि समुद्राच्या पूर्वेला उभ्या असलेल्या सह्याद्री पर्वतावर जातील ज्या मुळे त्यावर उभ्या असलेल्या वनराजाला आणि त्यात राहत असलेल्या माणसा सहित कित्तेक जीवांना त्याची भयंकर किंमत मोजावी लागेल. त्याच सोबत जेव्हा मान्सून येईल तेव्हा ढगांच्या सोबत वाफे मधे रिफायनरी मधून निघालेल्या विषारी वायू चे लोट यांचे संयुग होऊन पावसा सोबत खाली येतील आणि मग कोकणातील सर्व जमीन आणि नद्या देखील त्याची किंमत मोजतील आणि विषाक्त होऊन माणसाला त्याच्या करणीचे फळ देतील.
तरी उध्वस्त झालेल्या उत्तर कोकणातील एक भूमिपुत्र आणि पर्यावरण अभ्यासक म्हणून सदर माहिती मांडणे माझे कर्तव्य होते जे मी पूर्ण केले आता पुढे काय करायचं ते तुम्ही ठरवा.
धन्यवाद.
प्रा. भूषण भोईर,
M. Sc. Zoology