International Human Rights Associates

Directions Website

International Human Rights Associates IHRA works for protection of Human rights, environment protection,legal Aid child labour,domestic vi

🌹 वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 🌹*आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. भरतजी चवरे साहे...
23/09/2026

🌹 वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 🌹

*आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. भरतजी चवरे साहेब* यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🎂

मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी, सामाजिक न्यायासाठी आणि समाजहितासाठी आपण करत असलेले कार्य सदैव प्रेरणादायी आहे. आपल्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स अधिक व्यापक व प्रभावीपणे कार्य करत राहो, हीच सदिच्छा.

💐 आपणांस उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी व यश लाभो आणि आपल्या हातून समाजसेवेचे कार्य अखंडपणे घडत राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना! 🙏

🎉 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भरतजी! 🎉

शुभेच्छुक:
*ॲड. विक्रांत सिद्धेश्वर वाघचौरे साहेब*
संस्थापक अध्यक्ष
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार ईन्टरनेशनल ह्युमन राईट्स असोसिएट्स

*🇮🇳🌱 ‘हर घर तिरंगा – स्वच्छ भारत अभियान’ 🌱♻️**⚖️ संविधान • मानवाधिकार • पर्यावरण • प्लास्टिक रिसायकलिंग**आंतरराष्ट्रीय म...
21/08/2026

*🇮🇳🌱 ‘हर घर तिरंगा – स्वच्छ भारत अभियान’ 🌱♻️*

*⚖️ संविधान • मानवाधिकार • पर्यावरण • प्लास्टिक रिसायकलिंग*

*आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स (Human Rights Associates – IHRA), पर्यावरण संवर्धन विभाग, मुंबई* यांच्या वतीने *‘हर घर तिरंगा – स्वच्छ भारत अभियान’* अंतर्गत भारतीय संविधान, मानवाधिकार, पर्यावरण सुरक्षा व प्लास्टिक रिसायकलिंग या विषयांवर विशेष मार्गदर्शन, प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याबाबतचे विनंतीपत्र नालंदा लॉ कॉलेजचे प्राचार्य मा. श्री. मिलिंद गजाधने सर यांना प्रदान करण्यात आले.

यावेळी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे In-Charge मा. श्री. सुखधाने सर तसेच पोलीस अधिकारी मा. श्री. कांबळे दादा यांची प्रमुख उपस्थिती होती.

🌿 International Human Rights Associates (IHRA) – Mumbai
President – Environment Cell, मा. श्री. श्रीकांत कांबळे यांनी प्राचार्य मा. श्री. मिलिंद गजाधने सर यांना पर्यावरण संवर्धनाचे प्रतीक म्हणून झाडाचे रोप भेट देऊन सत्कार केला आणि नालंदा लॉ कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी सदर जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्याबाबत विनंती केली.

📚 कार्यक्रमातील प्रमुख विषय

⚖️ भारतीय संविधान व संविधानिक मूल्ये
🕊️ मानवाधिकार व नागरिकांचे मूलभूत अधिकार
📜 नागरिकांची कर्तव्ये व सामाजिक जबाबदारी
🌿 पर्यावरण कायदा व पर्यावरण संरक्षण
🧹 स्वच्छ भारत अभियान व स्वच्छता जनजागृती
♻️ प्लास्टिक कचरा व्यवस्थापन व Plastic Recycling Project
🚯 सिंगल-यूज प्लास्टिक कमी करण्याबाबत जनजागृती
🌱 शाश्वत पर्यावरण व हरित भविष्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग

शाळा व महाविद्यालयांमध्ये *“लॉ की बात”*, संविधान व मूलभूत अधिकार, पर्यावरण कायदा, स्वच्छ भारत अभियान तसेच Plastic Recycling Project याबाबत जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मान्यवरांना आयोजनाचे विनंतीपत्र प्रदान करण्यात आले.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये संविधानिक जाणीव, कायदेविषयक प्राथमिक ज्ञान, मानवाधिकारांची जाणीव, पर्यावरण संवर्धन तसेच प्लास्टिक कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन व पुनर्वापर (Recycling) याबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे.

♻️ “Plastic Waste to Resource”
🌱 “Clean Environment – Green Environment”

🇮🇳 संविधानाचा सन्मान • मानवाधिकारांचे संरक्षण •

*🇮🇳🌱15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण सत्र 🌱🇮🇳*‘हर घर तिरंगा – स्व...
17/08/2026

*🇮🇳🌱15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण सत्र 🌱🇮🇳*

‘हर घर तिरंगा – स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत संविधान व पर्यावरण सुरक्षा या विषयावर विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन Holy Angels High School, Malvani, Mumbai येथे करण्यात आले होते
हा उपक्रम आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विक्रांत वाघचौरे साहेब व राष्ट्रीय अध्यक्ष श्री. भरत चवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
सदर उपक्रमास मा तहसीलदार साहेब बोरिवली मुंबई यांनी माहिती घेऊन. शुभेच्छा दिल्या,

या कार्यक्रमास Holy Angels High School चे प्रिन्सिपल सिम्पसेन सर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला सेल च्या मालाड तालुका अध्यक्ष सौ.भारती ताई जाधव, शाळेतील सर्व प्राध्यापकवृंद,कर्मचारी, शिक्षक, सर्व विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील मूलभूत मूल्ये, नागरिकांची कर्तव्ये, पर्यावरण संरक्षण व सुरक्षा, प्लास्टिकमुक्ती, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले.

विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संरक्षण, संविधानाचा सन्मान आणि जबाबदार नागरिकत्वाचा संकल्प केला.

🌿 पर्यावरण वाचवा — भविष्य सुरक्षित करा!
⚖️ संविधानाचा सन्मान — देशाचा अभिमान!
🇮🇳 स्वच्छ भारत — सुंदर भारत!

━━━━━━━━━━━━━━━

आयोजक

International Human Rights Associates (IHRA INDIA)
&
Progressive Mind Opportunity Consultant Services (PMO)

श्री. श्रीकांत कांबळे साहेब
मुंबई शहर अध्यक्ष – पर्यावरण विभाग
International Human Rights Associates

🇮🇳 जय हिंद! जय भारत! 🇮🇳

🇮🇳🌱 विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण सत्र 🌱🇮🇳‘हर घर तिरंगा – स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत संविधान व पर्यावर...
13/08/2026

🇮🇳🌱 विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण सत्र 🌱🇮🇳

‘हर घर तिरंगा – स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत संविधान व पर्यावरण सुरक्षा या विषयावर विशेष मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन माउंट मेरी हायस्कूल, मालवणी, मालाड (पश्चिम), मुंबई येथे करण्यात आले.

हा उपक्रम आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स चे संस्थापक अध्यक्ष ॲड. विक्रांत वाघचौरे साहेब, व राष्ट्रीय अध्यक्ष भरत चवरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय मानावाधिकार असोसिएट्स चे मुंबई शहर अध्यक्ष पर्यावरण विभाग श्री. श्रीकांत कांबळे साहेब यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी शाळेतील प्राध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्त सहभाग घेतला.

विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील मूलभूत मूल्ये, नागरिकांची कर्तव्ये, पर्यावरण संरक्षण व सुरक्षा, प्लास्टिकमुक्ती, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छतेचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले.

विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे संरक्षण, संविधानाचा सन्मान आणि जबाबदार नागरिकत्व यासाठी सकारात्मक सहभाग नोंदविला.

🌿 पर्यावरण वाचवा — भविष्य सुरक्षित करा!
⚖️ संविधानाचा सन्मान — देशाचा अभिमान!
🇮🇳 स्वच्छ भारत — सुंदर भारत!

आयोजक :
International Human Rights Associates (IHRA INDIA)
&
Progressive Mind Opportunity Consultant Services (PMO)

मार्गदर्शन :
ॲड. विक्रांत सिद्धेश्वर वाघचौरे
संस्थापक व अध्यक्ष
International Human Rights Associates

विशेष उपस्थिती :
श्री. श्रीकांत कांबळे साहेब
अध्यक्ष, पर्यावरण संवर्धन सेल
International Human Rights Associates

*🌿 हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा! 🌿*आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सच्या *मुंबई पर्यावरण सेल याविभागाच्या अध्यक...
10/08/2026

*🌿 हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा! 🌿*

आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स
च्या *मुंबई पर्यावरण सेल याविभागाच्या अध्यक्षपदी*
*मा. श्री. श्रीकांतजी कांबळे साहेब*
यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या नियुक्तीबद्दल आपले मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन! 💐

पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी आणि मानवाधिकारांच्या क्षेत्रात आपल्या नेतृत्वाखाली मुंबई पर्यावरण सेल याविभागाची उल्लेखनीय वाटचाल होवो, तसेच आपल्या पुढील कार्यास यश, कीर्ती आणि उत्तम आरोग्य लाभो, ही मनःपूर्वक शुभेच्छा!

*🌿 आपल्या पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा! 🌿*

शुभेच्छुक
*ॲड. विक्रांत सि. वाघचौरे*
संस्थापक अध्यक्ष
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स

⚖️ महिलांचे कायदेशीर हक्क आणि संरक्षणअन्यायाविरुद्ध आवाज उठा – कायदा तुमच्या सोबत आहे!आजही अनेक महिला मानसिक, शारीरिक, आ...
28/07/2026

⚖️ महिलांचे कायदेशीर हक्क आणि संरक्षण

अन्यायाविरुद्ध आवाज उठा – कायदा तुमच्या सोबत आहे!

आजही अनेक महिला मानसिक, शारीरिक, आर्थिक किंवा भावनिक छळ सहन करत आहेत. समाजाची भीती, कुटुंबाची प्रतिष्ठा किंवा मुलांच्या भविष्यासाठी अनेकदा त्या गप्प राहतात. पण लक्षात ठेवा—

गप्प राहणे म्हणजे अन्यायाला संमती देणे नाही. प्रत्येक महिलेला सन्मानाने जगण्याचा आणि कायद्याचे संरक्षण मिळविण्याचा पूर्ण अधिकार आहे.

महिलांना उपलब्ध प्रमुख कायदेशीर संरक्षण: ✔️ घरगुती हिंसा प्रतिबंधक कायदा, 2005
✔️ भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 कलम 85 (वैवाहिक क्रूरता)
✔️ हुंडा प्रतिबंधक कायदा, 1961
✔️ BNS कलम 80 (लग्नाचे खोटे आश्वासन देऊन फसवणूक)
✔️ स्त्रीधन (Stridhan) परत मिळविण्याचा अधिकार
✔️ पोटगी, मुलांचा ताबा, घटस्फोट व इतर कायदेशीर दिलासे

छळ होत असल्यास काय कराल? 📌 पुरावे जतन करा.
📌 विश्वासू व्यक्तीशी चर्चा करा.
📌 महिला सेल किंवा पोलीस ठाण्यात तक्रार करा.
📌 आवश्यक असल्यास न्यायालयाचा दरवाजा ठोठावा.
📌 अनुभवी वकिलाचा सल्ला घ्या.

महत्त्वाचे हेल्पलाईन क्रमांक 📞 महिला हेल्पलाईन – 181
📞 आपत्कालीन सेवा – 112
📞 महिला व बाल विकास हेल्पलाईन – 1098

संदेश:
कायदा महिलांच्या संरक्षणासाठी आहे; परंतु प्रत्येक नात्यात प्रेम, विश्वास, परस्पर सन्मान आणि संवादही तितकाच महत्त्वाचा आहे. शक्य तिथे संवादातून वाद मिटवा, पण अन्याय सहन करू नका.

"महिलांचा सन्मान, समाजाचा अभिमान – न्यायासाठी कायदेशीर मार्ग निवडा."

— ॲड. विक्रांत सि. वाघचौरे
ॲडव्होकेट अँड नोटरी, भारत सरकार
मुंबई उच्च न्यायालय, मुंबई
संस्थापक अध्यक्ष
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स (IHRA)

📞 8446736021
✉️ [email protected]

*इंटरनॅशनल ह्यूमन राईट्स असोसिएट्स संस्थेचे अधिकृत सदस्य व पदाधिकारी होण्याकरिता खालील लिंक वर आपला अर्ज दाखल करावा**INT...
05/07/2026

*इंटरनॅशनल ह्यूमन राईट्स असोसिएट्स संस्थेचे अधिकृत सदस्य व पदाधिकारी होण्याकरिता खालील लिंक वर आपला अर्ज दाखल करावा*

*INTERNATIONAL HUMAN RIGHTS ASSOCIATES*

*FOR MEMBERSHIP CLICK BELOW LINK*

https://forms.gle/GDy9p5YNESPhwvN3A

*Membership form of IHRA India,*

*Become a member of International Human Rights Associates India.*

*FOR MORE INFORMATION :*

*Email :-* [email protected]

*Contact us :-*

*Adv Vikrant S Waghchoure ,*
(Founder and President of International Human Rights Associates.)

Mob No. 8446736021, 9011642020

🏆 राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार 2026 🏆🌹 हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा! 🌹सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभु...
30/06/2026

🏆 राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार 2026 🏆

🌹 हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा! 🌹

सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्सचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष श्री. नागनाथ जंगलू धोत्रे यांना महालक्ष्मी आधार फाउंडेशन आयोजित भारतीय संविधान जनजागृती अभियान अंतर्गत प्रदान करण्यात येणाऱ्या "राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार 2026" या मानाच्या पुरस्काराबद्दल हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

मानवाधिकार संरक्षण, सामाजिक न्याय, संविधान जनजागृती तसेच समाजातील वंचित, गरजू आणि पीडित नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण केलेले सातत्यपूर्ण कार्य अत्यंत प्रेरणादायी व समाजहिताचे आहे. आपल्या सेवाभावी वृत्ती, कर्तव्यनिष्ठा आणि प्रभावी नेतृत्वामुळे आपण समाजासाठी एक आदर्श व्यक्तिमत्त्व ठरला आहात.

आपल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याचा गौरव म्हणून मिळालेला हा सन्मान आपल्या कार्याची पोचपावती आहे. भविष्यातही आपल्या हातून समाजहिताची अशीच प्रेरणादायी सेवा घडत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

🌹 हार्दिक अभिनंदन व उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌹💐

शुभेच्छुक
ॲड. विक्रांत सिद्धेश्वर वाघचौरे
संस्थापक अध्यक्ष
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स

#राष्ट्रीय_समाज_भूषण_पुरस्कार_2026 #हार्दिक_अभिनंदन

*आंबोलीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर*दिनांक ०६.०६.२०२६ शनिवार,*आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मानवधिकार असोसीएट्स चे संस्थापक ...
06/06/2026

*आंबोलीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर*
दिनांक ०६.०६.२०२६ शनिवार,*आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मानवधिकार असोसीएट्स चे संस्थापक अध्यक्ष ॲड. विक्रांत वाघचौरे तसेच राष्ट्रीय अध्यक्ष भरतशेठ चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट्स, सिंधुदुर्ग जिल्हा, लोकमान्य मल्टीस्टेट को ऑ सोसायटी आणि लोककला फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्राथमिक आरोग्य केंद्र , आंबोली आरोग्य केंद्र येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमचे उद्धाटन *आंबोली सरपंच सौ.सावित्री पालेकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले,या वेळी मानवाधिकार संघटनेचे जनसंपर्क अधिकारी विवेक साळवी, जिल्हा अध्यक्ष विष्णू चव्हाण, उपाध्यक्ष मोहन पाटणेकर, सचिव राकेश केसरकर, लोकमान्य को, बँकेच्या प्रतिनिधि गौरी जुवेकर संघटनेचे व्यापारी सेलचे सदस्य बाळकृष्ण शंकर गावडे, कायदेविषयक सल्लागार आसलम कमानदार,गोवा राज्य चे अध्यक्ष विश्राम गराड,आंबोलीचे गांवकर शशिकांत गावडे, संतोष पालेकर. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.गव्हाणे उपस्थित होते*. मान्यवरांचे स्वागत आणि आभार व्यक्त करून शिबिराला सुरुवात झाली.
सदर शिबिराला डॉ ललित विठ्लानी , डॉ राजेंद्र पाटील, (बाईसाहेब सावंत आयुर्वेदिक महाविद्यालय ) ,या तज्ञ डॉक्टराने तपासणी केली.
सदर शिबिराला ५५ नागरिकांनी उपस्थिती दाखवून शिबिराचा लाभ घेतला.

*सस्नेह निमंत्रण*आपणास कळविण्यास आम्हास आनंद होत आहे की,*आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट सिंधुदुर्ग जिल्हा* ही संस्थापा...
23/03/2026

*सस्नेह निमंत्रण*
आपणास कळविण्यास आम्हास आनंद होत आहे की,
*आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएट सिंधुदुर्ग जिल्हा* ही संस्था
पाचव्या वर्षात पदार्पण करीत आहे, याचे औचित्य साधून ही
संस्था सामाजिक बांधिलकी जपत सावंतवाडी तालुक्यातील,
आंबोली कार्यक्षेत्रातील कार्यरत अधिकारी,
सामाजिक कार्यक्षेत्र, लोक कलेतील कलाकार,
पत्रकारिता या सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या
*माननीय व्यक्तींच्या सत्कार समारंभ सोहळा*
दि. २८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वा.
आयोजित केला आहे.
या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे..
जिल्हाअध्यक्ष
श्री. विष्णु धोंडी चव्हाण
उपाध्यक्ष
ॲड. श्री. मोहन कलराज पाटणकर
महिला अध्यक्ष
सौ. दर्शना राकेश केसरकर
सचिव
श्री. राकेश किसनदास केसरकर
संचालक
श्री. यशवंत वाळकृष्ण कोंगांवकर
कायदे विषयक सल्लागार
ॲड. श्री. ए. ए. मकानदार
स्थळ : आंबोली हायस्कूल, सांस्कृतिक हॉल आंबोली.
वेळ : दि. २८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.३० वा.

Address

Shirdi
Mumbai
423109

Alerts

Be the first to know and let us send you an email when International Human Rights Associates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share