10/06/2022
उद्योजकता विजडम
कारले प्रक्रिया व्यवसाय
सध्याच्या सामान्य जीवनशैलीतील बहुतांश लोक कुठल्या ना कुठल्या आजाराने त्रस्त असतात. आज काल मधुमेही व्यक्तीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एका सर्वेनुसार १९८२ साली जगात एकूण डायबेटीस रुग्णांची संख्या सुमारे १०.८ कोटी होती. परंतु या संख्येत झपाट्याने वाढ होऊन २०१४ पर्यंत ही संख्या ४२.२ कोटी झाली. १८ वर्षांवरील व्यक्तींमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्याचे यातून स्पष्ट होते. सध्या एकट्या भारतातच अंदाजे १.९ कोटी व्यक्ती डायबेटीस पासून त्रस्त आहेत. मध्यम व कमी उत्पन्न गटातील देशात, विकसनशील देशात देशात हा विकार वेगाने पसरत आहे. या विकारामुळे अंधपणा, किडनी विकार, हार्ट अॅटॅक चा झटका येणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. २०१५ मध्ये डायबेटीसमुळे जगात सुमारे १.६ कोटी लोकांचा मृत्यू झाला तर इतर २.२ कोटी व्यक्ती उच्च रक्तशर्करा प्रमाणामुळे मृत्यूमुखी पडल्या. (२०१२मध्ये) ७० वया अगोदर होणार्या मृत व्यक्तींच्या रक्तात शर्करा प्रमाण अतिजास्त असल्याचे आढळून आले. डब्लुएचओ (जागतिक आरोग्य संघटना) च्या मते, डायबेटीस हे बहुतांश लोकांच्या मृत्यूमागे एक महत्वाचे कारण असणार आहे. यावरून या विकाराची गंभीरता लक्षात येईल. या विकारातून बाहेर पडण्यासाठी चांगला आहार, दैनिक शारीरिक कसरत संतुलित वजन तसेच तंबाखूसारख्या व्यसनांपासून दूर राहणे असे बरेच मार्ग आहेत. या बाबत जनजागृती ही केली जात आहे, सध्या अनेक व्यक्ती रोजच्या आहारात कारल्याचा रस मोठ्या प्रमाणावर वापरू लागले आहेत. यावर आधारित आजची व्यवसाय संकल्पना आहे. ती म्हणजे कारले प्रक्रिया व्यवसाय.
डायबेटीस पासून वाचण्यासाठी आहारात कारल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कारले चिवडा, कारले पापड, कारले लॊणचे, कारले टॅबलेट्स, कारले चहा, कारले वेफर्स, कारलं ज्यूस इत्यादी उत्पादनांचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसत आहे. या उत्पादनांना बाजारात देखील मोठी मागणी आहे. कारले अर्क ची बाजारात किंमत ५०० रुपये ते ७०० रुपये प्रतिकिलो आहे.
भारतात कारल्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. कारल्यात कार्बोहायड्रेटस, प्रोटीन, विटामीन, मिनरल्स, तसेच इतर अनेक पोषक मूल्ये असतात. तसेच रक्त शर्करा कमी करण्याची क्षमता त्यामध्ये असते. त्यामुळे औषध शास्त्रात कारल्याला महत्वपूर्ण स्थान आहे. कारले पावडर पासून सूप, विविध आयुर्वेदिक औषधे तसेच सौंदर्य प्रसाधने ही बनवली जातात. त्यामुळे आयुर्वेदिक औषध कंपन्यांमध्ये याची मागणी वाढत आहे. कारल्याच्या बियांचा उपयोग स्तन कॅन्सर उपचार पध्दतीमध्येही केला जातो.
त्यामुळे कारल्याचे पीक हे केवळ भाजी म्हणून पाहण्यापेक्षा त्याच्या इतर आयुर्वेदिक गुणधर्मांकडे लक्ष दिल्यास हे एक चांगले नफा देणारे पीक ठरू शकते. कारले पीक हे आपल्याला एक चांगला रोजगार व पैसे मिळवून देण्याचे साधन बनू शकते.
तुम्हालाही कारले प्रक्रिया व्यवसाय करायचा आहे का ? कारले प्रक्रिया व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती हवी आहे का ?या व्यवसायामध्ये रुची असलेल्या सर्व व्यवसायिकांनी आणि नव व्यवसायिकांनी अधिक माहिती आणि मार्गदर्शक तत्वांसाठी आमच्याकडे संपर्क साधावा. याबद्दल आम्ही नक्कीच तुम्हाला मदत आणि मार्गदर्शन करू. तुम्ही एक पाऊल पुढे या. अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा. खालील क्रमांकावर कॉल किंवा व्हाट्सअप करा. अपॉइंटमेंट निश्चित करा.
संपर्क -
व्हाट्सअप: +९१ ८६५२८४७३७८
संपर्काची वेळ :- सोमवार ते शनिवार सकाळी १०. ते सायं ६.०० वा. पर्यंत.
जो चूक करतो तो माणूस... तीच तीच चूक परत करतो तो वेडा माणूस... जो दुसऱ्याच्या चुकापासून शिकतो तो शहाणा माणूस... ज्याला आपण विजडम (Wisdom) प्राप्त होणे असे म्हणतो. या लेख मालिकेद्वारे आपणास विजडम प्राप्त होण्यास मदत होईल.
वाचक मित्रहो, आमचे लेख आवडल्यास लाईक व कमेंट करा. आपले प्रश्न, प्रतिक्रिया यांचे आम्ही जरूर स्वागत करतो.
नियमित आमचे लेख मिळवण्यासाठी ८६५२८४७३७८ हा नंबर तुमच्या व्यावसायिक व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा
© प्रकाश भोसले
ISBN 978-81-929682-0-12