06/08/2025
मुलांचा पहिला फोन 📱
हल्लीच्या डिजिटल युगात मोबाईल म्हणजे एक अवयवच जणू असे झाले आहे.
तंत्रज्ञानाची ही क्रांती एक व्यसन होऊ पाहतीये !
तरीही आमच्या संस्थेतील बारावी पर्यंतची मुलं नो मोबाईल झोन मधे असतात.
पण मोबाईलशी संबंधित त्यांची जी काही कामं असतील, उदाहरणार्थ त्यांच्या शाळा/कॉलेज मधील काही महत्वाचे फॉर्म भरणे असो त्यासंबंधित OTP असो अशा कामांसाठी संस्थेचे फोन वापरले जातात.
संस्थेची कॉम्पुटर लॅब सुद्धा आहे तिथूनही स्टाफच्या मदतीने मुलांची ही कामे केली जातात.
मुलांच्या कळत्या वयात मोबाईल त्यांच्या हातात जावा.
जेणेकरून चूक काय बरोबर काय हे त्यांना कळावं.
हा उद्देश त्यामागे असतो.
त्यामुळे संस्थेतील मुलांना बारावी पास झाल्यानंतरच आपण मोबाईल देतो.
त्या नियमानुसार ह्या वर्षी आमचा पवन बारावी पास झालाय.
त्याला आज आम्ही सरप्राईज दिलं.
ताईने जेव्हा त्याला ऑफिस मध्ये बोलवून मोबाईलचा बॉक्स त्याच्या हातावर ठेवला त्यावेळी पवनच्या चेहऱ्या वरचा आनंद पाहून आपण त्याच्या भावना समजू शकतो.
काही गोष्टी शब्दात मांडणं अवघड असतं.
पण व्हिडीओ सगळं काही सांगून जातोय.
आजकाल मोबाईल मुळे मुलं भरकटतात.
अभ्यासा कडे दुर्लक्ष करून पर्यायाने त्यांच्या एकंदर प्रगतीवर सुद्धा त्याचा वाईट परिणाम होतो.
त्यामुळे लाडकोड एका बाजूला.
आणि शिस्त म्हणजे शिस्त त्यात हयगय नाही हा ताईचा शिरस्ता असल्यामुळे मोबाईल बारावी नंतरच हा नियम ठरलेला आहे.
आजकालच्या तरुणाईला फार विचारपूर्वक सांभाळावं लागतं.
शेवटी पिढी घडवणे ही सोपी गोष्ट नाही.
अधिक माहिती साठी संपर्क
+919370726424