मराठी स्टॉक

मराठी स्टॉक वित्तंबातमी, वित्तसाक्षरता !

ईपुस्तक: http://amzn.to/35Q24TW

ट्विटर: https://bit.ly/3i36EVp

10/03/2026

जाहिराती दाखवण्यासाठी पैसे द्या.

जाहिराती न दाखविण्यासाठी पैसे द्या.

'गिर्‍हाईक' दोन्हीकडे.

IT मधील सर्वोत्तम बिझनेस मॉडल हेच. 😎

10/03/2026

तुम्हाला माहीत आहे का?

श्रीलंकेत खासदारांची पेन्शन रद्द करण्यात आली आहे.

श्रीलंका सरकारने अलीकडेच कायदा करून खासदारांना मिळणारी पेन्शन योजना रद्द केली आहे.

10/03/2026

युद्धातुन आजच्या पिढीने काय घ्यावे?

✅ समाजात राहताना एकमेकांची गरज लागतेच, मग व्यक्ती असो, संस्था किंवा मग राष्ट्रे.

✅ नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर जबाबदारीने व्हावा.

स्वयंपूर्ण > सर्वशक्तिमान

01/03/2026

अनाहूत सल्ला

एखादी घटना घडताच त्वरित प्रतिक्रिया देऊ नका. थोडा वेळ द्या, कालांतराने परिस्थिती स्वतःच बरेच काही स्पष्ट करते.
कोणी विचारल्याशिवाय मत व्यक्त करू नये; शांत राहण्यातच खरे शहाणपण असते.

उस्फुर्त प्रतिक्रिया अनेकदा आपला मुर्खपणा उघड करते.

22/02/2026

तुम्हाला येणारा Incoming Call हा कुणासाठी तरी Outgoing Call असतो, म्हणजे तो कॉल करण्यासाठी कुणीतरी पैसे मोजलेले असतात.

मग कुणीतरी आधीच पैसे मोजून करत असलेला कॉल, एखाद्यापर्यंत केवळ त्याने मासिक रिचार्ज केला नाही म्हणून न पोचू देणं ही 'मक्तेदारी'तून निर्माण झालेली दादागिरी असते.

20/02/2026

भारतात सर्वाधिक पृथ्वीवरील दुर्मीळ खनीज साठे महाराष्ट्रात

अलीकडील सरकारी आकडेवारीनुसार, भारतात विद्यमान दुर्मिळ पृथ्वी घटकांचे (Rare Earth Elements) साठे सर्वाधिक महत्त्वाचे आणि सर्वात जास्त प्रमाणात महाराष्ट्रात आढळतात.
महाराष्ट्रात साधारण 12 लाख टनांपेक्षा जास्त साठा आहे जो भारतातील एकूण अंदाजित साठ्यांपैकी सुमारे 41% आहे.

दुर्मिळ पृथ्वी घटकांचा वापर इलेक्ट्रॉनिक्स, हरित ऊर्जा, संरक्षण आणि उच्च-तंत्रज्ञानाच्या उत्पादनांसाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे या साठ्यांचे स्थानिक संशोधन आणि विकास देशाच्या आर्थिक व धोरणात्मक गरजांसाठी आवश्यक आहे.

20/02/2026

करचुकवेगिरी: हैदराबादमधील बिर्याणी चेनवर कारवाई.

हैदराबादमधील बिर्याणी चेनवर आयकर विभागाने करचुकवेगिरी संदर्भात कारवाई केली आहे. तपासात 2019-20 पासून सुमारे ₹70 हजार कोटींची विक्री लपवल्याची शक्यता आहे.

देशभरातील बिलिंग सिस्टीममधील मोठा डेटा तपासल्यानंतर ही बाब समोर आली आहे.

19/02/2026

भारत एआयमध्ये अग्रणी ठरेल: मुकेश अंबानी

रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी एआय इम्पॅक्ट समिटमध्ये भारत एआय तंत्रज्ञानात प्रमुख खेळाडू बनेल, असा विश्वास व्यक्त केला.

19/02/2026

ESG रेटिंग चौकटीचा आढावा; सेबीकडून पॅनेल स्थापन

SEBI ने ESG (पर्यावरण, सामाजिक व सुशासन) रेटिंग प्रदात्यांच्या विद्यमान चौकटीचा आढावा घेण्यासाठी विशेष पॅनेल स्थापन केले आहे.

या पॅनेलमार्फत ESG रेटिंग प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, विश्वासार्हता आणि एकसंध निकष निश्चित केले जातील.

यांच्या समकक्ष कोणीही नाही.     #शिवजयंती
19/02/2026

यांच्या समकक्ष कोणीही नाही.


#शिवजयंती

18/02/2026

मान्य, हे क्रांतिकारक आहे. भविष्य व्यापणारे असेलच.
प्रत्येकाने जमेल तसं..शक्य होईल तेवढं ते जाणून समजून घ्यायलाच हवं.

पण गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून ची घाई करू नका, थोडं सांभाळून, डोळसपणे घ्या.

काल The Big Short पुन्हा पहिला आणि वाटलं ट्विट करूया. 😜

14/02/2026

जो तगणार, तोच जगणार !

आयटीसाठी आपलंच अपत्य असणारं हे संकट नसून एक संक्रमणाचा टप्पा आहे, ज्या कंपन्या हे स्वीकारून त्यानुसार स्वतःमध्ये बदल घडवतील त्याच पुढे राहतील.
आजच्या सगळ्या तगड्या कंपन्या उद्या तशाच राहतीलच असं नाही. काही राहतील, काही इतरांना खातील.

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when मराठी स्टॉक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to मराठी स्टॉक:

Share