आमची वसई उद्योजक

आमची वसई उद्योजक आमची वसई ने उद्योजकाना प्रोत्साहनपर ?

14/09/2021

*आज पासून ऊधारी बंद करा* 🚀

भारतातील जवळ जवळ ३६% लहान व्यवसाय उधारीमुळे बंद पडतात, यात मुख्यत्वेकरून किराणा दुकान, बिल्डिंग मटेरियल, कृषी खते व औषधे इत्यादी अनेक प्रकारचे लहान मोठे व्यवसाय येतात. उधारीची सुरवात ही अगदी लहान प्रमाणात व वैयक्तिक ओळखीमुळे होते. व्यवसाय वाढावा म्हणून दुकानदार उधार देतो व शेवटी उधारी वसूल न झाल्यामुळेच व्यवसाय बंद करायची वेळ येते. या विषयावर काही मार्गदर्शक तत्त्वे व्यावसायिकांनी घालून घेतली पाहिजेत.*

*१)* वैयक्तिक ओळख व घसट करू नका. 'घोडा घाससे दोस्ती करेगा तो खायेगा क्या?' व्यवसाय करत असताना ग्राहकांशी वैयक्तिक व खाजगी व्यवहार, बोलणे चालणे टाळा. तुम्ही व्यवसाय करण्यास बसला आहात, हे ओळखी व मैत्री वाढवायचे माध्यम नव्हे. पैसा हाच तुमचा मित्र हे लक्षात ठेवा.

*२)* कामाशिवाय बसू नये, व्यवसायाच्या ठिकाणी हा नियम तुम्ही लावा. ग्राहकांना त्यांच्या खरेदी व व्यवसायाव्यतिरिक्त बिनकामाचे फार वेळ बसू देऊ नये. यातूनच उधारीला सुरुवात होते.

*३)* स्पष्टवक्तेतपणा ठेवा. 'विनंती केली आहे. आम्ही काय पळून जातो का? ऐवढा विश्वास नाही का?' नम्रपणे हात जोडा व सांगा, 'दोस्ती मेरे से करो, धंदे से नही. उधार मागू नका, मित्र म्हणून मी एक काय दोन वेळा चहा पाजतो.'

*४)* काही प्रमाणात व काही दिवसासाठी काही व्यवसायात उधारी द्यावीच लागते. उदा. कंपनीचे टेंडर, दुधाचा व्यवसाय, पेपर दूध इत्यादी. अशा उधारीचे प्रमाण एकूण व्यवसायाच्या उलाढालीच्या २५% हून अधिक नसावे म्हणजे काही प्रमाणात उधारी उशिरा वसूल झाली तर फारसा फरक पडणार नाही

*५)* वह्या भरलेल्या व गल्ला मोकळा. काही जणांची मी हास्यास्पद परिस्थिती पाहतो. उधारीच्या वह्या भरलेल्या, एकूण १० लाख येणे आहे पण आज गल्ल्यात ५ हजारही नाहीत. खेळता पैसा नसल्यामुळे धंदा ठप्प झालेला असतो.

*६)* प्रत्येक ग्राहकाची उधारी पेलण्याची ऐपत लक्षात ठेवून उधारी द्या. एखाद्याच्या दोन महिन्याच्या कमाईपेक्षा जास्त उधार देऊ नका. पहिली उधारी दिली नसेल, तर इथून पुढे रोखीने व मागची उधारी घ्या. त्याला २ ते ३ टप्पे करा.

*७)* कोणत्याही सबब पुराव्याशिवाय उधार देऊ नका. उदा. पी.डी.सी चेक, कायमचा पत्ता, नोकरीचे ठिकाण इत्यादी. स्वत:कडे जेवढे भांडवल असेल तेवढ्याचीच उधारी करा, बाजारातील उचललेल्या मालावर उधारीचा धंदा करू नका, नाहीतर दोन्हीकडची पण जाईल. उधारीची भीड चेपत नसेल, तर धंदाच करू नका; कारण तो निश्चित नुकसानीचा मार्ग आहे.

27/08/2021

हे अवश्य वाचा
आपल्या घरात काम करणाऱ्या मावशी, ड्रायव्हर, वॉचमन, झाडूवाले, आपल्या परिसरातील हातगाडीवाले, गृहा उद्योजिका यांच्यापर्यंत हा मेसेज नक्की पोहोचवा.
सरकारने असंघटित कामगारांचे रजिस्ट्रेशन करण्याची प्रक्रिया सुरुवात केली आहे, ह्या रजिस्ट्रेशनची माहिती त्यांच्यापर्यंत पोचवून त्यांना आपण अधिक मदत करू शकतो. वय १६ ते ५६ वर्षे येताना त्याने आधारकार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक व आधारकार्डला जोडलेला मोबाईल नंबर सोबत आणावा अधिक माहिती करिता भेटा: सेटकॉम इन्फोनेट CSC सेंटर, नीलकंठ शैनेश्वर अपार्टमेंट, भंडारी हॉलच्या बाजूला, पारनाका, वसईगाव, वसई (पश्चिम)
मो. 9890945898

21/08/2021

स्टेला येथे रेस्टॉरंट साठी कुक हवे आहे कोणी इंटरेस्ट असेल तर त्यांनी संपर्क साधावे.9321464721

30/04/2021

सहकार नेते श्री नितिन म्हात्रे साहेब यांच्या ६१ व्या वाढदिवसा निमित्त सामाजिक बांधिलकी म्हणून,वसईचा राजा गणेशो.....

03/04/2021

Create a new survey on your own or with others at the same time. Choose from a variety of survey types and analyze results in Google Forms. Free from Google.

आपले वसई तील रहिवाशी सुनील जोशी यांचे सॅनिटरी प्रॉडक्ट विक्री केंद्र आज रमेदी दत्त मंदिर येथे सुरू आहे.
25/03/2021

आपले वसई तील रहिवाशी सुनील जोशी यांचे सॅनिटरी प्रॉडक्ट विक्री केंद्र आज रमेदी दत्त मंदिर येथे सुरू आहे.

05/03/2021

WhatsApp Group Invite

Address

Mumbai

Opening Hours

Monday 6am - 10:30pm
Tuesday 6am - 10:30pm
Wednesday 6am - 10:30pm
Thursday 6am - 10:30pm
Friday 6am - 10:30pm
Saturday 6am - 10:30pm
Sunday 6am - 10:30pm

Telephone

+919112058222

Alerts

Be the first to know and let us send you an email when आमची वसई उद्योजक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share