29/08/2024
गोमय गणपती
नमस्कार आम्ही गोधन गणपती कला केंद्र आपल्याला विनंती करीत आहोत. यंदाच्या गणेशोत्सवात आपण इकोफ्रेंडली गोमय गणपती घरी आणून गोसेवेला हातभार लावावेत हे एक पुण्याचे काम ठरेल . देशी गोवंश वाढीसाठी आपली मदत मोलाची आहे.
🪴हा गोमय गणपती वजनाने हलका असतो.
🪴पाण्यात तासाभरात विरघळतो. घरगुती विसर्जन केल्यास आपल्याला पाणी तासाभराने हाताने ढवळावे लागेल
🪴हे विसर्जन जल व शेण झाडांना उत्तम खत म्हणून उपयोगात येते.
🪴तलावात विसर्जन केल्यास जलचराना खाद्य म्हणून उपयोगात येते.
🪴वाहत्या पाण्यात गोमय गणपती चे विसर्जन करू नये , गणपती हलका असल्याने थोडा वेळ पाण्यावर तरंगत राहतो. थोड्या वेळाने तो बुडतो.
🪴गोमय गणपती देशी गायीच्या शेणाचा असतो त्यामुळे पीओपी प्रमाणे फिनिशिंग ची अपेक्षा करू नये. तरीही तो दिसायला सुंदर असतो.
🪴गणपती ओलसर जागी ठेवू नये.
🪴आपण गोमय गणपती निवडावा व तसे इतरांनाही सांगावे व गोसेवेस हातभार लावावा. देशी गोवंश वाढवण्यास मदत करावी🪴
धन्यवाद
🪴गोधन गणपती 🪴
मुंबई 9819106503/ 9819413270