Shree trading

Shree trading paper plate, Dona, thali, cup, making , semi & fully automatic machinery & raw material all size sup

31/12/2024
Started your new business with shree trading company
01/06/2022

Started your new business with shree trading company

नमस्कार,   🙏                      जेव्हा कधी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या विचार येतो तेव्हा आपल्या समोर अनेक समस्या उ...
20/03/2022

नमस्कार, 🙏 जेव्हा कधी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याच्या विचार येतो तेव्हा आपल्या समोर अनेक समस्या उभ्या राहतात जसे- शहरातील रहदारी असलेल्या ठिकाणी दुकान भाड्याने घेणे, खूप सारे पैसे गुंतवून माल विकत आणणे, अनेक कर्मचारी कामावर ठेवणे इत्यादी. आणि हा खर्चीक विचार करूनच अनेक लोक स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय फेटाळून लावता.
परंतु देशातील वाढत्या गृह उद्योगांमुळे अनेक लोक आता आपल्या घरूनच कमीत कमी भांडवलात व्यवसाय सुरू करून त्यांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवीत आहेत. आजच्या आधुनिक युगात पेपर प्लेट ,द्रोन ,पत्रावळी, नाष्टा प्लेट ,केळी पान, अगरबत्ती मेणबत्ती ,भांडी घासणी इत्यादी गृहउद्योग कमीत कमी भांडवलात घरच्या घरी सुरू करणे अधिकच सोपे झाले आहे. इंटरनेटच्या मदतीने तुम्ही घरबसल्या आपल्या वस्तूंची जाहिरात देखील करू शकता.

Mr. SHANKAR M. HALDEKAR (OWNER)

व्यवसाय सोपा नसतोच व्यवसाय बिलकुल सोपा नसतो. तो सोपा असता तर प्रत्येकानेच केला असता. तो सोपा बिलकुल नाही. मोटिव्हेशनल ले...
29/12/2021

व्यवसाय सोपा नसतोच

व्यवसाय बिलकुल सोपा नसतो. तो सोपा असता तर प्रत्येकानेच केला असता. तो सोपा बिलकुल नाही. मोटिव्हेशनल लेक्चर ऐकून व्यवसाय सोपा आहे असा समज होऊ शकतो, पण असा समज करून व्यवसायात कधीच यायचं नसतं. व्यवसाय अवघड आहे, अशक्यच आहे असे बिलुकलु नाही, पण तो सोपा बिलकुल नाही हे मी लाख वेळा सांगेन. याचं कारण एवढंच आहे कि व्यवसाय सोपा आहे, पैसा ओतून निवांत ऑफिसमधल्या खुर्चीवर बसून राहिलं तरी आपोआपच पैसा मिळत जातो असा समज झालेले बहुतेक सगळेच जण दोन तीन वर्षात सगळं चंबूगबाळ यावरून आपल्या मूळ मार्गावर परत जातात. आणि मला यांचं अपयशी होणं, (अपयशी होण्यापेक्षाही ) यांच्या वडिलांचे कष्टाने कमावलेले पैसे असे वाया जाताना बघवत नाही. म्हणून हा खटाटोप आहे. म्हणूनच व्यवसायात काय आवश्यक आहे हे पाहतानाच काय नकोय हेही पाहणं मला आवश्यक वाटतं.

खूप समर्पण लागतं व्यवसायात यशस्वी होण्यासाठी. प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीसाठी मानसिक तयारी लागते. सततच्या अपेक्षाभंगासाठी तयार राहावं लागतं. भविष्याला शून्यात पाहण्याची सुद्धा मानसिकता लागते. मी स्वतः अकरा वर्षांपासून व्यवसायात आहे, आणि अजूनही कित्येक गोष्टी अशा आहेत ज्या पाच वर्षात साध्य होतील असे मी ठामपणे म्हणायचो, आणि अजून त्या दृष्टीपथातही नाहीत. इतक्या गोष्टी मागे पडल्या आहेत कि नैराश्याने सगळं सोडून देण्याची इच्छा व्हावी, पण मी व्यवसाय जगतो, माझ्यासाठी तेच माझं आयुष्य आहे, त्यामुळे हे अपेक्षाभंग मला माझ्या व्यावसायिक आयुष्याचे भागच वाटतात, मला त्याने नैराश्य येत नाही. असे कितीतरी अपेक्षाभंग व्यवसायात सोबत घेऊनच चालावं लागतं.
व्यवसायात सातत्य लागतं. धरसोड वृत्ती चालत नाही. सतत निर्णय बदलून जमत नाही. निर्णयात ठामपणा लागतो.
चंचल वृत्ती तर बिलकुलच चालत नाही. आज एक विचार तर उद्या दुसराच. एखादं काम सुरु करायचं अचानक बंद करून दुसरीकडे वळायचं, कधी इथे तर कधी तिथे असले प्रकार चालतच नाहीत.
कितीतरी आघाड्यांवर एकाच वेळी लढावं लागतं. आर्थिक धोके असतात, फॅमिलीच टेन्शन असतं, वेळेच्या नियोजनाचं टेन्शन असतं, कामगारांचं टेन्शन असतं, कितीतरी गोष्टी एकट्यानेच हाताळाव्या लागतात, ठरलेले प्लॅन मागे पडताना बघावं लागतं, कधी अचानक उद्भवणाऱ्या संकटांना धैर्याने सामोरे जावं लागतं, कधी आपला व्यवसाय अपयशी होतानाही बघावं लागतं आणि अशा सगळ्यासाठी प्रचंड मानसिक स्थैर्य लागतं.
व्यवसायात सतत कार्यमग्न असणे आवश्यक असते. बघतो-करतो, असले प्रकार चालत नाही. आपल्या वैयक्तिक टाईमपास साठी व्यवसायाकडे दुर्लक्ष करून चालत नाही. आपलं आपल्या व्यवसायावर कितीही प्रेम असलं तरी आपल्या व्यवसायाचं आपल्यावर बिलकुल प्रेम नसतं. त्यामुळे त्याकडे सतत लक्ष द्यावेच लागते. त्याकडे थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी तो आपल्याला झटका द्यायला कमी करत नाही. आणि तो झटका असा असतो कि त्यापुढे ४४० व्होल्ट चा झटका सामान्य वाटावा.

या क्षेत्रात खूप विचारपूर्वक आणि ठाम निश्चय करूनच उतरावं. व्यवसाय सोपा नसला तरी अभ्यासपूर्वक आणि विचारपूर्वक पावले टाकली तर व्यवसाय नक्कीच सोपा वाटतो. आणि त्यात जर आपण पूर्णपणे सामावून गेलो तर तो अगदीच हाताचा मळ वाटतो. पण यासाठी भरपूर अभ्यास लागतो, शिकण्याची वृत्ती लागते, वेळ द्यावा लागतो, व्यवसायातले बारकावे माहित करून घ्यावे लागतात, व्यवसाय कसा करायचा हे शिकावं लागतं, लोकांना हाताळण्याचं कौशल्य शिकून घ्यावं लागतं, तणाव हाताळण्याचे कौशल्य शिकावे लागते, खूप साऱ्या गोष्टी आहेत. एका वाक्यात व्यवसाय समजावून सांगावा इतकं ते लहान क्षेत्र नाही.

इथे मनोरंजनासाठी, टाईमपास करण्यासाठी, लोकांना दाखवण्यासाठी, सोशल मीडियावर बायोमधे Entrepreneur किंवा युवा उद्योजक लिहिण्यासाठी येऊ नका, हे फार सिरीयस प्रोफेशन आहे. एखादा शस्त्रज्ञ जसं एखाद्या गोष्टीसाठीसुद्धा आपलं संपूर्ण आयुष्य घालवतो तसं या क्षेत्रासाठी पूर्णपणे वाहून घ्यावं लागतं. कधी लवकर रिझल्ट मिळेल, कधी उशीर होईल, पण एकनिष्ठेने जर व्यवसाय केला तर तो आपल्याला यश नक्कीच देतो.

व्यवसाय खूपच सोपा आहे, यात आलं कि हेलिकॉप्टर विकत घेता येतं, पॅलेस बांधता येतो असले विचार करून यात येऊ नका. खरंच काहीतरी नाविन्यपूर्ण करायचं असेल तरच व्यवसायाचा विचार करा. या क्षेत्रात अपघाताने आलेले, परिस्थितीच्या रेट्यामुळे आलेले पूर्णपणे वेगळे आहेत. ते इतक्या अडचणींना सामोरे जाऊन यात स्थिरस्थावर होतात कि त्यांना यशस्वी होण्यासाठी कुणाच्याही मार्गदर्शनाची गरकज पडत नाही. पण जे ठरवून या क्षेत्रात येत आहेत त्यांनी मात्र फार गांभीर्याने यात प्रवेश करणे आवश्यक आहे. या क्षेत्राला सोपं समजू नका. या क्षेत्राला कठीण आव्हान समजूनच चला. हे आव्हान पार करण्याची मानसिकता ठेवली तरच यात टिकून रहाल

व्यवसाय साक्षर व्हा...

Shree Trading is a top and well known Candle Making Machines and Moulds Dealer, Dhoop And Agarbatti Making Machine Manufacturer, Disposable Product Making Machines Dealer and Disposable Products Wholesale Supplier in Latur MIDC, Latur and also known for Industrial Machinery and Equipments, Agarbatti...

06/07/2021

Address

Nanded
431709

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Telephone

09960140400

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree trading posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shree trading:

Share