अक्राणी महाल - किल्ला

अक्राणी महाल - किल्ला अक्का राणीचा किल्ला (अक्राणी महाल ) हे ?

06/04/2025

सातपुडा मधील दळणवळ चा प्रमुख कना -- जीबडो

ए.सी. च्या आधुनिक युगात काही वर्षानंतर कोणाला सांगीतले की एक अशी गाडी होती जीच्या पाच उघड्या गेटमधून भर्र हवा खात लोक प्रवास करायचे. कोणाला खरे वाटणार नाही.
ख-या अर्थाने ग्रामिण भारत डोळ्यासमोर ठेऊन महींद्रा कंपनीने बनवीलेली कमांडर गाडी ग्रामिण भारताचा श्वास होती.
2000 सी सी चे दमदार DI इंजीन 62 हॉर्सपॉवर ची शक्ती अशा आयुधांनी सज्ज हे वाहन ऑफरोडवर एखाद्या अजेय योद्ध्याप्रमाणे होते.
नदी नाले असो डोंगर द-या असो , रस्ता असो की नसो कमांडरला कोणतीच अडचण रोखु शकत नसे. एखाद्या वेळी बंद पडली तरी इंजिन स्ट्रक्चर एवढे सोपे की कोणताही रोडसाईड मेकैनिक समस्या दुर करुन टाकायचा.
अगोदर रीवर्स सहीत चार गीअरची कमांडर पुढे पाच गीअरची झाली. कमांडरच्या ड्रायव्हरची बैठक अशी होती की ड्रायव्हर तीरपा बसायचा. बाहेरुन पाहील्यावर स्टेअरींगच्या मागे ड्रायव्हर कधीच बसलेला दीसत नसे . उजव्या बाजूने थोडासा पेंदा बाहेर काढुन हात तीरपे करुन कमांडरच्या ड्रायव्हींग सीटवर माणुस एकदा बसला की साक्षात सारथी बनल्याची फीलिंग यायची. या तीरप्या बसण्याचा एक फायदा अजुन होता, ड्रायव्हरच्या बाजुच्या सीटवर कमितकमी चारजण अजुन बसवता यायचे. दुरुन पाहील्यावर समोर बसलेल्या पाच जणांपैकी गाडी नेमका कोण चालवतोय हे कमांडर बनवीणारा इंजिनीअरही ओळखु शकत नव्हता.
गाडीची सीटिंग कैपिसिटी दहा सीट्सची असली तरी, फक्त दहा सीट्स बसविणे म्हणजे गाडीचा अवमान असायचा.
मी सांगतो तुम्ही हीशोब लावा..
समोरच्या सीटवर ड्रायव्हरसहित पाच, मधल्या सीटवर सहा, मागच्या डाल्यातल्या समोरासमोरच्या सीटवर तीन इकडुन तीन तीकडुन, त्याच सीटच्या ग्यापीत एखादी बारीक बुढी कींवा दोन बारकी खोसायची. समोरच्या भागात असलेल्या स्टेपनीवर एक.. हुश्श..!! कीती झाले ? टोटल एकोणवीस, मागे लटकणारे उत्साही पोरं सोडुन द्या.. कंडक्टर गाडीच्या खालुनच ड्रायव्हरला चलो.. अशी हाळी द्यायचा आणी चालत्या गाडीत असा काही शीताफीने गाडीला लटकायचा की अहाहा..!! सारे प्रवासी एकदम इम्प्रेस.लहान पोट्टे बाट्टे त आपण पुढे चालून कंडक्टरच बनायचं हे ठरवून घ्यायचे. जवान पोरगी सोरगी अशा कौतुकाने कंडक्टरकडे पहायची जणु काही सुपरमैन होय..
खरी मजा तर इकडे कॉकपीटमध्ये यायची. ड्रावरसाहेब झोकात स्टेअरींग फीरवत आणी पैसेंजरच्या टांगीखालून हात घालून खपाखप गेर मारत साक्षात सुखोई 2000 चा आनंद घ्यायचे.
एखादा पैसेंजर ड्रायव्हरशी सलगी दाखवत, आपलं गाडीच्या बा-यातलं ज्ञान पाजळत म्हणायचा,
" क्यों ड्राव्हरसाब, गाडी भोत कन्हार रई ?"

ड्रायव्हर त्याच्याकडे न पाहता उत्तर द्यायचा,
हौ साला, पम का काम करना पडता."

पैसेंजर नोबेल जींकल्याच्या अविर्भावात आजुबाजुच्या पैसेंजरकडे तुच्छतेने पहायचा..

कमांडर अशी खरी लेकुरवाळी गाडी, ग्रामिण भारताचे हीमोग्लोबीन. काळाच्या ओघात आता गडप होत चाललेली कमांडर एखाद्या थकलेल्या जीवट व्रुद्धाप्रमाणे खेड्यापाड्यात आपले अस्तीत्व टीकवत तग धरुन आहे. भवीष्यात पुढच्या पीढीला एक दुर्मीळ वाहन म्हणुन संग्रहालयात कमांडर पहायला मीळेल..

लेखकाचे नाव माहित असल्यास कळवावे,लेख कॉपी केला आहे

✍ इंजि. प्रविण चिमा पावरा Er PRAVIN Chima Pawara 🙏

सातपुडा पर्यटन.....कृपया शेअर करा लाईक करा
22/08/2021

सातपुडा पर्यटन.....
कृपया शेअर करा लाईक करा

02/09/2020

अक्राणी महाल या पेज ला खूप जणांनी प्रतिसाद दिला ,या पेज चा चेक इन साठी वापर करून अक्राणी महाल घराघरात पोहचवला या बद्दल खूप खूप धन्यवाद ............पण या आपल्या महाल ची अवस्था बिकट आहे तया साठी येणाऱ्या पिढी साठी महाल ची संवर्धनाची गरज आहे त्या साठी पेज मार्फत लवकरच दुर्ग संवर्धन ची मोहीम हातात घेणार आहोत ,या साठी सर्वांची मदतीची आवश्यकता आहे.लवकरच दुर्ग संवर्धन कार्यक्रम घोषित करण्यात येईल

Admin
अक्राणी महाल

03/08/2018

दुर्ग भरारी टीम खूप सारे धन्यवाद आमच्या अक्राणी महाल ला भेट दिल्या बद्दल अतिदुर्गम भागातील भुईकोट श्रेणीतील या किल्याला इतिहास आभ्यास्कारांकडून कायम कानाडोळा करण्यात आला पान तुमच्या भेटीमुळे नक्कीच किल्ल्या साठी काही तरी विशेष घडेल अशी आम्ही सर्व अक्राणी वासी आस बाळगून आहोत

इंजि.प्रवीण चिमा पावरा


IDEA OF THIS GROUP IS TO SHARE THE BASIC INFORMATION & PHOTOGRAPHS OF MAXIMUM FORTS TO VISIT WITH ITS HISTORICAL IMPORTANCE !!!!!!!!!!!!

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻धडगाव तालुक्यातील सर्व आदिवासी आणि बिगर आदिवासी , विद्यार्थी व विद्यार्थिनी , तसेच सर्व बांधवांना सूचित कर...
30/11/2016

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻धडगाव तालुक्यातील सर्व आदिवासी आणि बिगर आदिवासी , विद्यार्थी व विद्यार्थिनी , तसेच सर्व बांधवांना सूचित करण्यात येत आहे कि , आदिवासी एकता परिषदकडून दर वर्षी एक थीम घोषित करण्यात येते तसेच आपल्या माहिती साठी म्हणजेच गेल्या २४ वर्षापासुन आदिवासी एकता परिषद देशासह जगातील आदिवासी अस्मिता , स्वालंबन , अस्तित्त्व आणि निसर्ग संरक्षण असे अनेक विषयवार आदिवासी आणि बिगर आदिवासी समाजात वैचारिक चळवळ चालवत आहे . या वर्षी आदिवासी एकता परिषदकडून महिला आणि बाल सन्मान हि कल्पना आहे ..... आपण सर्वाना ठावूकच आहे , महिला व बाल्य अवस्थेतील मुला मुलीच्या समस्या आणि दुर्दशा ,तीन चार वर्षाच्या बालिकापासून ते ८० वर्षांच्या होणाऱ्या अत्याचार , बाल म्रुत्यु ,स्रिभ्रुण हत्या ,कुपोषित बालक ,शिक्षणाच्या नावाखाली होणारे आश्रम शाळेतील अत्याचार , विकासाच्या नावावरून होणारी लूटमार , स्थलांतर ,अशा बऱ्याच समस्या सोडविण्यासाठी व संवेदनशील क्रुती कार्यक्रमाची गरज आहे . त्यामुळे आदिवासी एकता परिषदेच्या महिला प्रकोष्ठ आणि आदिवासी एकता परिषदेच्या समन्वये सहकार्याने आदिवासी विभिन्न क्षेत्रातून १० राज्यातून २३ आँक्टोबर २०१६ पासून महिला आणि बाल सन्मान यात्रा काढण्यात आली आहे .यात्रा दरम्यान जागोजागी सभा , मेळावा आयोजित करून महिला व मुलीची परिस्थिती ,आदिवासी समाजातील रूढी परंपरा संवेदानिक व्यवस्था याबाबत विचार विनिमय चर्चा करण्यात येते . तसेच आपणांस कळविण्यात येत आहे कि , महिला व बाल सन्मान यात्रा हि आपल्या धडगाव तालुक्यात दि. ०४\१२\२०१६ रोजी शहादाहून - काकळदा येथे महिला आणि बाल सन्मान यांचे स्वागत आणि सभा चे आयोजन असेल आणि संध्याकाळी मुंगबारी येथे मुक्कामी असतील ...... दि.०५\१२\२०१६ रोजी सकाळी ८:०० वाजता तहसील कार्यालय येथून rally चे आयोजन आहे आणि पंचायत समिती धडगाव इथे rally समाप्त होईल आणि सभा घेण्यात येईल व कार्यक्रम संपन्न होईल.... .................. आपण सर्वांना विनंती आहे की, आपल्या परिवारा सोबत तसेच आपल्या गावातील महिला व बाल आणि नागरिकांना हि सुचना देवुन आपण सर्वानी उपस्थित रहावे ..............................

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻आपकी जय जय आदिवासी 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

आदिवासी एकता परिषद धडगाव.
आदिवासी विध्यार्थी एकता परिषद धडगाव.
आदिवासी युवा एकता परिषद धडगाव
भिलीस्थान टायगर सेना........ तसेच सर्व संलग्न संघटना

Astamba coming soon...........
26/10/2016

Astamba coming soon...........

Dhadgaon talukyat nuksan bharpai , p*k vima lavkar manjur karnyat yave  n survani matdar yaadit anya khatik mahnun matda...
12/10/2016

Dhadgaon talukyat nuksan bharpai , p*k vima lavkar manjur karnyat yave n survani matdar yaadit anya khatik mahnun matdar yanche nav kontya prakare samvisht karnyat aale ya sathi dhadgaon tahsil yethe nevidan denyat aale....

03/08/2016



03/08/2016

भारतवर्ष आणि ब्रिटिश काळाच्या पूर्वीपासून थेट राजस्थानपर्यंत पाचशे वर्षांच्या इतिहासाचा बुलंद साक्षीदार असलेला ‘अक्राणी महल’ हा निश्चितच आगळा आहे. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यात असलेला अक्राणी महल त्याच्या अंगावर, कुण्या ‘अक्काराणी’ नामक स्वामीनिष्ठ राजपूत सुभेदारणीच्या वास्तव्य खुणांची अद्यापही अस्फुट बोलकी करणारी सुबक, आकर्षक आणि नक्षीदार ‘देवळी’ (राणी काजल मंदिर) अजूनही मिरवत आहे.
मात्र सातपुड्याच्या अजस्र पर्वतरांगानी भक्कम मजबुती प्रदान केलेल्या आणि महाराणा प्रतापच्या राजवंशाशी असलेली नाळ सांगणा-या पुण्यपावन असलेल्या, अक्राणी महलचा इतिहास हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. नुकताच डॉ. नरसिंह परदेशी यांचा ‘खान्देशातील राजपुतांचा इतिहास’ हा संशोधन ग्रंथ प्रसिद्ध झाला त्यातही ‘अक्राणी महल’चा ओझरता उल्लेख झाला आहे. निवृत्तीनंतर 2006 पासून या महालावर संशोधन करणारे शहाद्याचे साहित्यिक (जि.नंदुरबार) प्रा. दत्ता वाघ यांच्यासोबत नुकताच हा महाल पाहायचा योग आला.
हळदी घाटाच्या युद्धात राणा प्रतापचा पराभव झाला. त्या वेळी मुस्लिमांच्या आक्रमणापासून बचाव करण्यासाठी महाराणा प्रतापांची बहीण ‘अक्काराणी’सह काही स्वामीनिष्ठ राजपुतांनी आपला वंश, धर्म सुरक्षित ठेवण्यासाठी सातपुड्यातील या भागाचा आश्रय घेतल्याचे प्रसिद्ध इतिहास संशोधक एल. के. भारतीया यांनी त्यांच्या शोधनिबंधात सातपुड्याच्या या संस्थांनबद्दल लिहिले आहे. ‘महाराष्ट्र ज्ञानकोश खंड-6’ मध्ये 17 व्या शतकात राणा गुमानसिंग याने अक्राणीचा किल्ला बांधल्याचा उल्लेख आहे. हे राणा गुमानसिंग काठीचे संस्थानिक होते. तर आर. ई. एन्थोव्हेन यांच्या मतानुसार उदयपूरच्या राणाने तेथून काही राजपुतांना हाकलून लावले, त्या राजपुतांनी पावागडचा आश्रय घेतला, कालांतराने तेथून ते जंगलाच्या आश्रयाने अक्राणी परिसरात आले व तेथेच रहिवास करू लागल्याचे नमूद केले आहे.
धडगावपासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात या महालाचे अवशेष दृष्टीस पडतात. डॉ. नरसिंह परदेशी यांच्या मते या महालाचे बांधकाम सुमारे पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात झाले असण्याची शक्यता आहे. किंबहुना अक्काराणीच्या नावानेच या परिसराचे नाव अक्राणी महाल पडले आहे, अशी या भागातील लोकांची मनोधारणा आहे. तथापि, अक्काराणी नामक खरोखरच राणा प्रतापांची बहीण होती का? व अक्राणी महाल हे नाव या परिसराला तिच्याच नावावरून पडले का? हा संशोधनाचा विषय असल्याचेही ते नमूद करतात. तत्कालीन भिल्ल लोकांच्या आक्रमणापासून तळोद्यासह सुलतानपूर व इतर जिल्ह्यांना संरक्षण द्यावे, या अटीवर राणा कुटुंबाचे मूळ संस्थापक प्रतापसिंग यांना औरंगजेबाने अक्राणी महल परगणा दिल्याचीही शक्यता गॅझेटमध्ये वर्तवली आहे. अक्राणी हे संस्थान असून महल म्हणजे सुभा किंवा प्रांत. महलचा दुसरा अर्थ तालुक्याचा पोटभाग असाही होतो. धुळे जिल्हा गॅझेटप्रमाणे 1634 मध्ये शहाजहानने खान्देशातील सुलतानपूर आणि नंदुरबार हे जिल्हे माळवा प्रांताला जोडले आणि त्यांचे मुख्य केंद्र ब-हाणपूर ठेवले होते.
भग्नावस्थेत संपूर्ण विटांमध्ये बांधलेल्या या महालाचा बुरुज, प्रवेशद्वार ब-यापैकी सुस्थितीत असल्यासारखे आहेत. महालाच्या दक्षिण, पूर्व व पश्चिम दिशेच्या भिंती उभ्या आहेत. कुठे-कुठे पडझड झाली असली तरीही हे अवशेष तेथील राजेशाही थाट, त्यांचा डामडौल याची साक्ष देतात. या महालात एक भुयार आहे ते कोठे निघते याची माहिती अद्यापही उपलब्ध नाही. जुन्या काळातील दगडात घडवलेल्या फुटलेल्या वस्तू आज तेथे दिसतात. डॉ. नरसिंह परदेशी यांना या महालाच्या अवशेषांमध्ये उदयपूर, मेवाड संस्थानच्या मुद्रा (नाणी), राजस्थानी बनावटीच्या वास्तूचे अवशेष आढळले आहेत, तर तेथील आदिवासींना चांदीची, तांब्याची नाणी सापडली आहेत. आदिवासींनी दिलेल्या जुजबी माहितीवरून प्रतापपूर, गोपाळपूरचा उल्लेख आला. त्याचा धागा पकडून सध्या गुजरातच्या नवसारी येथे स्थायिक झालेले प्रतापपूरच्या राणांचे तरुण वारसदार राणा यज्ञदेवसिंग यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी या भेटीत सादर केलेल्या कागदपत्रांवरून तेच या किल्ल्याचे खरे वंशज असून ब्रिटिशांनीच त्यांच्या पूर्वजांना ‘राणा’ ही पदवी आणि इनामात प्रतापपूर, गोपाळपूर ही दोन गावे दिली होती. या सर्व कागदपत्रांवरून अक्राणीचा सारा इतिहास समोर येतो. यज्ञदेवसिंग यांच्या मातोश्री हर्षेद्रकुमारीजी यांच्या म्हणण्यानुसार तर ‘हमारे खांदान मे अक्कारणी नामकी कोई राणी नहीं थी.’
खान्देशात महंमदी सत्ता असताना त्यात धडगांवचाही समावेश होता. त्या वेळी प्रत्येक भाग स्थानिक मुख्य माणसांच्या ताब्यात असायचा. तेच तेथील कारभार बघत असत. परंतु इ.स. 1700मध्ये महंमदी ºहास झाल्यानंतर या परगण्यास कुणी वारस राहिला नाही. त्यानंतर नर्मदेपलीकडील धुश्वयी येथील छावजी राणा यांनी या संस्थानचा ताबा घेतला. आपण मूळचे धार येथील ‘पवार’ असल्याचे राणा यज्ञदेवसिंग सांगतात. धार येथील पवार घराण्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. तेथील आनंदराव पवार यांनी दौलतराव शिंदे यांना अप्रत्यक्ष मदत केल्याचा इतिहास आहे. छावजी राणा यांच्या मृत्यूनंतर अक्राणी हा सुभा त्यांचा मुलगा राणा गुमानसिंग यांच्याकडे वंशपरंपरेने आला. त्यांनीच हा महालवजा किल्ला बांधला व परिसरात शांतता प्रस्थापित केली. त्यांच्यानंतर त्यांचे सुपुत्र हिम्मतसिंग यांनी अक्राणी येथे 28 वर्षे राज्य केले. हिम्मतसिंग यांना राणाबाबू व गुमानसिंग हे दोन पुत्र होते. त्यातील राणाबाबूचा वडलांच्या अगोदर मृत्यू झाला. त्यामुळे गुमानसिंग हा वारस ठरला. त्याने अक्राणीवर 12 वर्षे राज्य केले. गुमानसिंगनंतर कुणीही वारस नसल्याने तेथे अराजकता माजली. त्यामुळे तेथील सैन्य व नातेवाईक छोटा उदयपूरला निघून गेले.
पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असलेल्या आणि असणा-या गड-किल्ल्यांसोबतच इतर सर्व वास्तूंजवळ विभागाच्या मालकीचा ठरावीक आकाराचा आणि ठरावीक मजकूर लिहिलेला एक लाल-निळ्या रंगसंगतीत फलक असतो. खूप शोध घेऊनही तो फलक अक्राणी महलावर दिसून येत नाही. त्यामुळे वैभवशाली इतिहास आपल्या भूतकाळाच्या उदरात साचवून बसलेला अक्राणी-महल तसा अस्पर्शित राहिला आहे. या ठिकाणी राणांच्या पूर्वजांच्या समाध्याही आहेत. पुरातन बारव, अत्यंत घोटीव, घडीव दगडात साकारलेले एक सुंदर छोटसे मंदिर आहे. प्रवेशद्वारावर श्रीगणेशाची मूर्ती आहे. मंदिराखालून अखंड पाण्याचा झरा आहे. जो उन्हाळ्यातही या परिसराची तृष्णा भागवतो. हे पाणीच इथल्या आदिवासींचे जीवन आहे. या मंदिरावर ठळक अक्षरात लिहिले आहे ‘राणी काजल मंदिर’. तेथील आदिवासी मात्र ते ‘राणी का जल-मंदिर’ असल्याचे सांगतात. तर यज्ञदेवसिंग मात्र हे मंदिर त्यांची कुलदेवता कालिकामातेचे असल्याचे सांगतात व तेथे असलेल्या समाध्याही त्यांच्याच पूर्वजांच्या आहेत, याला ते दुजोरा देतात. मध्य प्रदेशमधील धर्मराय येथील सोलंकी कुटुंबाची अक्राणीला ‘खिमज माता’ ही कुलदेवता आहे. खिम म्हणजे क्षेम. परंतु तेथील मूर्ती चोरीस गेल्याचे सांगितले जाते.
अक्राणी महलात तेथील आदिवासी बांधवांना सापडलेल्या एका नाण्यावर ‘शाह’ तर दुस-यावर ‘कुतबद्दिन’ असा उल्लेख दिसून येतो. त्यावरील सन, वर्ष कापले गेले आहे. तर डॉ. नरसिंग परदेशी यांना राजस्थानातील चितोडगडच्याही अगोदरच्या आहड संस्कृतीतील एक खापराचे नाणे व दुसरे 17व्या शतकातील मेवाड संस्थानचे तांब्याचे नाणे सापडले आहे. या महलापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर शिन्दाई टेकडी आहे. या टेकडीवरून शहादा, तळोदा, नंदुरबार, अक्कलकुवा परिसराचे लोभस दर्शन होते. ही अतिउंच टेकडी म्हणजे त्या काळातील टेहळणीसाठीचा बुरुज असावा. तेथे खापराची एक चौकी असून त्यातच ‘शिन्दाई देवी’ची स्थापना केली गेली आहे. या परिसरात सध्या अस्तित्वात असलेल्या अवशेषांचे व्यापक संशोधन झाल्यास इतिहासाने दखल न घेतलेल्या महान वारशाची माहिती जगासमोर येईल. अक्राणी-महलला जाण्यासाठी तीन रस्ते आहेत. त्यातील पहिला तळोदा तालुक्यातील बोरद मार्गे 18 किलोमीटर अंतर आहे. दुसरा बंदरामार्गे जातो. हे दोन्ही रस्ते खडतर आहेत. तिसरा रस्ता धडगाव तालुक्यातील काकडदा जवळील खामला गावापासून जातो. हा रस्ता नुकताच तयार झाल्यामुळे कोणत्याही वाहनाने अक्राणी-महलला भेट देता येते. पूर्वी हा परिसर अत्यंत घनदाट जंगलांनी वेढलेला होता. फक्त घोड्यावरूनच या परिसरात दळणवळण करता येत होते. अशा या दुर्गम भागातील ही वास्तू म्हणजे एक निबिड अरण्यातील आश्चर्यच म्हणावे लागेल. परंतु पाचशे वर्षांच्या या सा-या आठवणी आपल्या अंगाखांद्यावर जोपासत बेवारस स्थितीत डोळे मिटून पडलेला अक्राणी-महल राणांच्या तीन पिढ्यांच्या शौर्यकथांची उजळणी, कुण्या राजपूत सुभेदारणीच्या स्वामीनिष्ठेचा अस्पष्ट इतिहास, अशा अनेक गोष्टी अद्यापही आपल्या काळजाच्या काजळी कोप-यात सांभाळून उभा आहे.

Address

Dhadgaon
Nandurbar
425414

Telephone

9405967566

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अक्राणी महाल - किल्ला posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to अक्राणी महाल - किल्ला:

Share