AgriYouth

AgriYouth Agri Youth खास तरुण शेतकरी मित्रांसाठी नवनवीन माहीती तसेच कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन कस घेता येईल व

पपई ला फळ सेटींगसाठी फ्रूट अप 30 ग्रॅम + झुमग्रो 30 ग्रॅम प्रति पंप फवारणी चा अप्रतिम रिझल्ट मिळाला आहे
31/07/2021

पपई ला फळ सेटींगसाठी फ्रूट अप 30 ग्रॅम + झुमग्रो 30 ग्रॅम प्रति पंप फवारणी चा अप्रतिम रिझल्ट मिळाला आहे

*XPLORER PLUS*  *[एक्सप्लोर प्लस*] 🔄  *झायटेक्स बायटेक, मुंबई चे नाविन्यपूर्ण जैव पोषक* *प्रमुख घटक :- मायकोरायझल कनसाॅश...
11/07/2021

*XPLORER PLUS* *[एक्सप्लोर प्लस*] 🔄
*झायटेक्स बायटेक, मुंबई चे नाविन्यपूर्ण जैव पोषक*

*प्रमुख घटक :- मायकोरायझल कनसाॅशिया वाढ प्रवर्तक आणि नैसर्गिक खनिजा सह*

*मुख्य लाभ :-

1️⃣ *मुळांच्या प्रसाराला गती देते पिकांना जमिनी मधून अधिक पोषकद्रव्ये शोषून घेण्यास मदत करते*

2️⃣ *पिकांची जोमदार वाढ आणि दर्जेदार उत्पादन*

3️⃣ *जमिनीची सुपीकता वाढवते आणि पिकांना लवकर पोषक तत्व व अमिनो आम्ल प्रदान करते*

4️⃣ *फुलोरा वाढविते, फुलांची गळ रोखून फळांची संख्या वाढते*

5️⃣ *मातीची झीज कमी करते*

6️⃣ *फुलोरा आणि फळ लागणे वृद्धिंगत करते*

*शिफारस :- सर्व फळ व भाजीपाला पिके,कापूस ,मका,सोयाबीन,उडीद, मुग ई.*

*प्रमाण:-* *4 किलो/प्रती एकर*
*(खता सोबत मिसळून वापर करू शकतात)*

05/07/2021
🌱नमस्कार शेतकरी बांधवांनो🌱• पपई, केळी,मिरची ई. पिकात *Plantbiotix* कंपनी घेऊन आली आहे नवीन उत्पादन *ईको एक्सीड (Eco Acid...
18/05/2021

🌱नमस्कार शेतकरी बांधवांनो🌱
• पपई, केळी,मिरची ई. पिकात *Plantbiotix* कंपनी घेऊन आली आहे नवीन उत्पादन *ईको एक्सीड (Eco Acid )*

*इको एक्सीड मध्ये 78% ऑरगॅनिक अँसिड (Organic Acid) हा सक्रिय घटक असून* हे पूर्णतः जैविक उत्पादन आहे..

↪️ इको एक्सीड हे शेती व्यवसायात वापरण्यात येणाऱ्या प्रमुख रासायनिक खते आणि किटकनाशक च्या बरोबर मिश्रणशील आहे.तथापि याच्या आम्ल स्वभावामुळे आम्ही कीटकनाशकाची सुसंगतता तपासण्याची शिफारस करतो.

➡️ *मुख्य लाभ* :-

1️⃣ सिंचनाच्या पाण्यास क्षारमुक्त करून क्षारीय जमिनीतून पाणी, पोषणद्रव्ये पिकास उपलब्ध करून देते

2️⃣ धनभारित आयनकणांची विनिमय क्षमता वाढवुन जमिनीचा ( ई.सी ) कमी करते.

3️⃣ PH कमी करण्यास मदत करून जमिनीतील सुक्ष्म जीवाणू साठी चांगले पोषक वातावरण निर्माण करते.

4️⃣ कॅल्शिअम आणि सेंद्रिय गंधकाची उपलब्धता वाढविते.

5️⃣ पिकांमधील अविद्राव्य स्फुरद ची उपलब्धता वाढविते त्यामुळे पेशी विभाजन, पेशींचा विकास आणि DNA निर्मितीत चालना मिळते.

6️⃣ सिंचन ओळी ( ड्रीप लाईन ) मधील कार्बोनेट आणि बायकार्बोनेट क्षार विरघळून सिंचन ओळी ( ड्रीप लाईन ) ,ड्रीपर, ई स्वच्छ करते.

प्रमाण :-

✅ ठिंबक सिंचन व्दारे :- 2 लिटर / प्रती एकर

✅ ड्रेचिंग साठी :- 2 लिटर ईको एक्सीड ला 200 लिटर पाण्यात मिसळून / झांडांची संख्या मोजून त्यानुसार प्रती झाड द्यावे

उदा पपई पिकासाठी प्रती झाड 200 मिली द्रावण द्यावे

अधिक माहितीसाठी संपर्क
कल्याणसिंह राजपूत
83800 79942
उमाकांत पाटील
7972141573

18/04/2020

पोस्ट नं.1
(AgriYouth कृषी समुह, शहादा)

🌱पपई लागवड करण्यापूर्वी करायची कामे🌱

🌱खोल नांगरट करून कमीत कमी 15 ते 20 दिवस उन्हात तापू द्यावी

🌱त्यानंतर 4 ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत टाकून सम प्रमाणात पसरून द्यावे नंतर रोटाव्हेटर करून शेत भुसभुशीत करावी

🌱जर पपई बेड वर लावायची असेल तर बेड 2 फूट चे करावे

🌱पपई लागवड करण्या अगोदर 5 ते 7 दिवस शेत ओल करावं कारण जमिनीतील सगळी `हिट'(तापलेली जमीन थंड होऊन जाईल) निघेल.गरम वाफेमुळे सुरुवातीला झाड जेव्हा सेट होते नेमक तेव्हाच आपण जेव्हा ड्रिप पाणी देत असतो तेव्हा पाणी दिल्यानंतर जमिनीतून गरम वाफ निघत असते त्यामुळे बऱ्याच झाडांना वाफेचा शॉक बसतो काही झाड मरून जातात काहींना विल्टींग येते त्यामुळे मर मोठ्याप्रमात होते.. कृपया लागवड अगोदर पाणी द्याच.🙏
🌱 नर्सरी रोप आल्यानंतर त्याला झाडाचा सावलीत 2 ते 3 दिवस ठेवावे कारण झाडा ची वाढ नर्सरी च्या वातावरणात झालेली असते असं केल्याने झाड मुख्य वातावरणात येऊन ते शेतात लवकर सेट होते

🌱पपई लागवड करायची अंतर वेगवेगळी आहेत तरी पण साधारण महाराष्ट्र 8*6,9*6,10*5 हे अंतर उत्कृष्ट समजले जाते त्यानुसार लागवड करावी.लागवड करत असतात Zigzag करावी कारण झाड जेव्हा मोठं होत तेव्हा त्याच पाने एकमेकांना स्पर्श नाही करत त्यामुळे Downey mildey, लाल कोळी,व्हायरस याचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात येतो.झाडाचा कॅनोपी चांगल्या प्रकारे कव्हर होतो त्याचा फायदा उत्पादन वाढी साठी होत असतो

🌱पपई लागवड झाल्यानंतर फक्त अर्धा तास पाणी द्यावे त्यानंतर दुसऱ्या दिवशी बायर कंपनी चे Alliete + हुमिक एसिड ची ड्रे चिंग करावी
(टीप. Alliete आणि हुमिक एसिड 200 लिटर पाणी मध्ये मिसळून प्रती झाड 200 मिली द्रावण द्यावे)

🌱दुसऱ्या दिवशी फक्त अर्धा तास पाणी द्यावे.

🌱पपई च्या झाडाला क्रॉप कव्हर नक्की लावा

उमाकांत पाटील
मो.नं 9637486049
(AgriYouth कृषी समुह, शहादा)

(कृपया सदर पोस्ट मध्ये कुणीही कॉपी, केव्हा एडिट करू नये)

20/01/2019

केळीच्या घडावर किती फण्या ठेवाव्यात याचे एक सर्वसाधारण सूत्र =
झाडाच्या बुंधा/ पेंधा चा खालून गुठलीच्या वर घेर मोजणे( इंचामध्ये).म्हणजे जमिनीपासून साधारण ५ -७ सेमी उंचीवर किती इंचाचा घेर/जाडी आहे, त्याला ४ ने भाग घ्यायचा, जेवढे उत्तर येईल तेवढया फण्या ठेवाव्यात.
उदा. बुंध्याचा घेर= ४o इंच असेल तर ४o ÷ ४= १o फण्या ठेवणे.याप्रमाणे बारीक झाड २४ इंचाचे असेल तर ६ फण्या ठेवणे.
यामुळे संपूर्ण घडाचे आकारमान, केळ्यांची साईज, वजन एकसारखे येते.
🙏🙏

12/01/2019

नायट्रोजन
जमीनीत जर नायट्रोजन जास्त झाल्यास बोरॉन , कॉपर , पोटॅश
हे घटक उचलले जात नाही..
आणि
जमीनीत नायट्रोजन वाढल्यास "मॅग्नेशियम" उचलले जाते.

फॉस्फरस
जमीनीत फॉस्फरस वाढल्यास कॉपर , कॅल्शियम , पोटॅश , फेरस , झिंक हे घटक उचलले जात नाही.
आणि
जमीनीत फॉस्फरस वाढल्यास "मॅग्नेशियम" उचलले जाते.

पोटॅश
जमीनीत पोटॅश जास्त झाल्यास "बोरॉन , मॅग्नेशियम" हे घटक उचलले जात नाही.
आणि
जमीनीत पोटॅश जास्त झाल्यास "मॅंगनीज , फेरस" उचललेली जाते.

कॅल्शियम
कॅल्शियम जमीनीत जास्त झाल्यास फॉस्फरस,पोटॅश,मॅग्नेशियम,मॅंगनीज,झिंक,फेरस,बोरॉन,नायट्रोजन हे घटक उचलले जात नाही. चुनखडीयुक्त जमीनीत किंवा मुक्त चुन्याचे प्रमाण जास्त असलेल्या जमीनीत अशी स्थिती येउ शकते.

मॉलिब्डेनम
मॉलिब्डेनम वाढल्यास कोणतेच घटक कमी होत नाही
पण मॉलिब्डेनम वाढल्यास कॉपर व नायट्रोजन वेली कडून जास्त प्रमाणात उचलल्या जातात

कॉपर
कॉपर वाढल्यास फेरस व मॅंगनीज जमिनीत असूनही वेलीला घेता येत नाही
आणि कॉपर वाढल्यास कोणतेच घटक वाढत नाही किंवा वेलीला उचलण्यास मदत होत नाही

मँगनीज
मँगनीज वाढल्यास जमिनीत फेरस असूनही वेलीला घेता येत नाही
आणि मॅंगनीज वाढल्यास कोणतेच घटक वाढत नाही किंवा वेलीला उचलण्यास मदत होत नाही

फेरस
फेरस वाढल्यास फॉस्फरस आणि झिंक जमिनीत असूनही वेलीला घेता येत नाही
आणि फेरस वाढल्यास कोणतेच घटक वाढत नाही किंवा उचलण्यास मदत होत नाही

झिंक
झिंक वाढल्यास फेरस जमिनीत असूनही उचलल्या जात नाही
आणि झिंक वाढल्यास कोणतेच घटक वाढत नाही किंवा उचलण्यास मदत होत नाही

🍁 बोरॉन
बोरॉन वाढल्यास कोणत्याच घटकावर परिणाम होत नाही किंवा कोणताही घटक जास्तीचा उचलल्या जात नाही
आणि बोरॉन वाढल्यास कॅल्शियम जमिनीमधून उचलले जाते

मॅग्नेशियम
मॅग्नेशियम वाढल्यास जमिनीत पोटॅश असून देखील वेलीला घेता येत नाही.
आणि मॅग्नेशियम वाढल्यास फॉस्फरस जमिनीतून उचलले जाते.

11/01/2019

Vacancies with Limagrain Seeds Ltd world largest 4 th No Seeds Company In Field Crop , Previously Known As Seedtech urgently Required for the post of sales Coordinator In Chalisgaon or Pachora H.Q .
Experience Minimum 2 years in Agri Input Same H.Q
Interested candidate can send resume to ....
[email protected] Or Contact 8407989888

Address

Shahada
Nandurbar
425409

Telephone

7972142573

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when AgriYouth posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to AgriYouth:

Share