The Success Foundation

The Success Foundation Organisation engaged in Management Consultancy, Soft skill Training, Life Coaching.

ट्रंप यांनी रिलायन्स रिफायनरीची निवड का केली?भारताची रिलायन्स इंडस्ट्रीज अमेरिकेत 300 बिलियन डाॅलर्सची गुंतवणूक करून नवी...
13/03/2026

ट्रंप यांनी रिलायन्स रिफायनरीची निवड का केली?

भारताची रिलायन्स इंडस्ट्रीज अमेरिकेत 300 बिलियन डाॅलर्सची गुंतवणूक करून नवी रिफायनरी उभारत आहे. पन्नास वर्षांनंतर अमेरिकेत नवी रिफायनरी उभी राहात आहे आणि ती एक भारतीय कंपनी उभारत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. ट्र॔प यांनी स्वतः ही घोषणा करून भारताचे व रिलायन्सचे आभार मानले. यावरून अमेरिकेत कोणी 'ट्रंप यांनी अंबानींना देश विकला' अशी टीका केली नसावी. कारण मोठे उद्योग उभे करणाऱ्या उद्योगपतींना जगभर मान दिला जातो आणि हे उद्योग त्यांच्या देशाच्या भूराजकीय व्यूहरचनेत महत्वाची भूमिका पार पाडतात. भारतात मात्र अंबानी-अडानी हे दरोडेखोर असल्याचा आभास निर्माण केला जातो आणि पदोपदी देश विकल्याची बाष्कळ बडबड केली जाते.

रिलायन्सचं रिफायनरी क्षेत्रात पदार्पण कसं झालं यामागची कहाणी अमेरिकेतील रिलायन्सच्या गुंतवणुकीशी निगडित आहे. रिलायन्सने पेट्रोलियम क्षेत्रात पदार्पण करून जामनगर येथे रिफायनरी उभारायचं ठरवलं. त्यानुसार त्यांनी या क्षेत्रातील अनेक तज्ञांना कंपनीत घेऊन त्यांना या प्रकल्पाचा अहवाल बनवायला सांगितला. त्यांनी खूप मेहनत करून अहवाल बनवला आणि त्यांचं सादरीकरण धीरुभाई अंबानी यांच्यासमोर करायचं ठरलं. धीरुभाईंसमोर सादरीकरण करायला संपूर्ण टीम सज्ज झाली.

सादरीकरणादरम्यान कच्च्या तेलाचा भाव त्यांनी काय गृहित धरला आहे ही स्लाईड समोर आल्यावर धीरूभाईंनी सादरीकरण थांबवलं आणि सांगितलं की आपल्याला इतरांपेक्षा कमी दरात तेल मिळायला हवं. हे ऐकल्यावर रिफायनिंगमधले सगळे अतिरथी-महारथी एकमेकांकडे बघू लागले. शेवटी कोणीतरी म्हटलं, तेल असं स्वस्त मिळत नाही. ते बाजारभावाप्रमाणेच घ्यावं लागतं. त्यावर धीरुभाई सांगितलं, "मग हा प्रकल्प बंद करा." नुकताच जाॅइन झालेला एक तरूण इंजीनिअर, ज्याला बहुदा स्लाईड्स बदलण्यासाठी तिथे बोलावलं असावं, तो काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे असं पाहून ज्येष्ठ मंडळींनी त्याला गप्प बसवलं. पण धीरूभाईंनी सांगितलं त्याला बोलू द्या. तो म्हणाला कमी दर्जाचं मानलं जाणारं, सल्फरची मात्रा जास्त असलेलं तेल स्वस्त दरात मिळू शकतं. त्यावर धीरूभाईंनी क्षणार्धात निर्णय घेतला आणि सांगितलं की हे स्वस्त तेल गृहित धरून नवा प्रकल्प अहवाल बनवा. अनुभवी मंडळींनी त्यांना सांगितलं, हे तेल रिफाईन करण्यासाठी अत्यंत काॅप्लेक्स प्रोसेस असलेली रिफायनरी लागते आणि त्यासाठी साध्या रिफायनरीपेक्षा जवळपास चौपट गुंतवणूक करावी लागते. त्यावर धीरूभाई म्हणाले, ही गुंतवणूक एकदा करावी लागेल पण स्वस्त तेलाचा लाभ आपल्याला वर्षानुवर्षे मिळत राहील. त्यामुळे हाच अंतिमतः फायद्याचा सौदा ठरेल. यानंतर त्यांनी जामनगरची रिफायनरी विक्रमी वेळेत उभी केली आणि पेट्रोलियम क्षेत्रात अक्षरशः हनुमान उडी घेतली. कुठलाही उद्योगपती धीरूभाईंसारखा मोठा होतो, तो केवळ लांड्यालबाड्या करून नव्हे तर त्यासाठी त्याच्याकडे असावी लागते व्यवसायातील खाचाखोचांची सखोल जाण ( Business acumen ).

आज रिलायन्सची जामनगर रिफायनरी, जगातल्या काॅम्प्लेक्स रिफायनरीजपैकी एक मानली जाते. व्हेनेझुएलात मिळणारं तेल असंच सल्फरमिश्रित असतं, ज्याच्या रिफायनिंगसाठी अशीच काॅम्प्लेक्स रिफायनरी लागते. अमेरिकेने रिलायन्ससाठी पायघड्या घातल्या त्या उगीच नव्हे.

म्हणूनच महाराष्ट्रातल्या तरुणांनी अदानी-अंबानींचा द्वेष करण्यापेक्षा त्यांच्याकडून 'बिझिनेस ॲक्युमेन' शिकून घ्यायला हवा. तरच मराठी माणूस उद्योगधंद्यातही सगळ्यांच्या पुढे राहील.

अभिजित जोग

04/06/2025
निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू।अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंतयोगी।।हिंदवी स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ...
19/02/2025

निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू।
अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंतयोगी।।

हिंदवी स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा!🚩

हा फोटो आहे एका टोमॅटोच्या झाडाचा. कदाचित एखाद्या प्रवासी यात्रेकरूंने टोमॅटोचे बी धावत्या रेल्वेतून फेकले असेल. हे झाड ...
20/01/2025

हा फोटो आहे एका टोमॅटोच्या झाडाचा.

कदाचित एखाद्या प्रवासी यात्रेकरूंने टोमॅटोचे बी धावत्या रेल्वेतून फेकले असेल. हे झाड मातीशिवाय, काळ्या पाषाणातून रुजले आणि वाढले. लहान असताना शताब्दी किंवा राजधानी एक्सप्रेससारख्या जलद गाड्या याच्या अगदी जवळून जात असतील, कर्कश आवाज याला हादरवत असतील. अस्तित्व संपण्याची भिती होती, पण झाडाने संघर्ष करत स्वतःला जिवंत ठेवले.

ना पाणी, ना खत, ना माती, ना संगोपन—असल्या प्रतिकूल परिस्थितीतही या झाडाने फळ दिले. त्याचा उद्देश एकच होता—फळ देणे, आणि संघर्षातून तो उद्देश पूर्ण केला.

समाजात बऱ्याच जणांना वाटते की, "आपण अपयशी ठरलो, आपले जीवन निरर्थक झाले." परंतु त्यांनी या टोमॅटोच्या झाडापासून शिकायला हवे. परिस्थिती कितीही कठीण असो, संघर्ष करत राहणे आणि ध्येय गाठणे हेच जीवनाचे खरे यश आहे.

बोध:
परिस्थिती प्रतिकूल असली तरी निराश होऊ नका. संघर्ष करा, कारण यश तुमचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तुमची वाट पाहत असते.

मुलगा चौथीत शिकत होता, तेव्हा शिक्षकाने वडिलांना सांगितले की, तुमचा मुलगा बुद्धिबळ खूप चांगला खेळतो.  जर त्याला तुम्ही स...
14/12/2024

मुलगा चौथीत शिकत होता, तेव्हा शिक्षकाने वडिलांना सांगितले की, तुमचा मुलगा बुद्धिबळ खूप चांगला खेळतो. जर त्याला तुम्ही सपोर्ट केलात तर तो खूप पुढे जाईल ...

वडील उत्तम डॉक्टर होते, आईही डॉक्टर होती. आपल्या समाजात अशी जोडपी मुलाच्या जन्माआधीच ठरवतात की मूल डॉक्टर होणार. पण त्या वडिलांनी एक जोखीम घेतली. मुलाला बुद्धिबळ खेळण्यात मजा वाटायची, त्यामुळे त्याच्याकडे फक्त बुद्धिबळ खेळण्याचं काम उरलं होतं. अर्थ कळला का?

मुलाने चौथीच्या पुढे शिक्षण घेतलेले नाही. आपल्या आजूबाजूला पहा, आपल्या मुलाला अभ्यास सोडून खेळायला लावणारा कोणी सुशिक्षित बाप दिसतो का? मिळणार देखील नाही. का? कारण मूल कुठेतरी शिकून कुठेतरी नोकरीला लागावं हाच आमचा उद्देश असतो. यापलीकडे आपण विचार करू शकत नाही...

होय, वडिलांनी मुलाला अभ्यास सोडायला लावला. मुलगा चांगला खेळत होता त्यामुळे तोही खेळायला जाऊ लागला. आता लहान मुलाला एकट्याला कुठेही पाठवता येत नाही, म्हणून आईने तिची नोकरी सोडली. ती सावलीसारखी त्याच्या मागे असायची, त्याच्या जेवणाची आणि सुखसोयींची, त्याच्या आवडीनिवडीची काळजी घेतली...

2017 मध्ये एका पत्रकाराने त्या अकरा वर्षाच्या मुलाला विचारले – तुला पुढे काय करायचे आहे? तो मुलगा बिनदिक्कत म्हणाला – मला सर्वात तरुण ग्रँडमास्टर व्हायचे आहे. मला सर्वात तरुण जगज्जेता बनायचे आहे. काल ते मूल सर्वात तरुण जगज्जेता बनले.

त्याची प्रतिभा, त्याचे समर्पण, त्याला मिळालेल्या सुविधा यांचा या यशात मोठा वाटा आहे, परंतु सर्वात मोठी भूमिका म्हणजे त्याचे वडील डॉ. रजनीकांत यांनी घेतलेली जोखीम त्याने चौथीच्या वर्गात शिकत असताना सोडली. जो धोका पत्करतो तोच राजा होतो...गुकेश यांचे खूप खूप अभिनंदन... 💯🔥

शाब्बास!सिंगापूर इथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या १८ वर्षीय गुकेश डी. याने विश्वविजेतेपदाच...
13/12/2024

शाब्बास!

सिंगापूर इथे सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या १८ वर्षीय गुकेश डी. याने विश्वविजेतेपदाच्या मुकुटावर आपलं नाव कोरलं.

गुकेश डी. च्या या विश्वविक्रमी कामगिरीचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो. या यशाबद्दल त्याचं मनःपूर्वक अभिनंदन !!!

#बुद्धिबळ #गुकेश_डी

फळ विक्रेता ते ४०० कोटींचा मालक, आईस्क्रीम मॅन ऑफ इंडियाची संघर्षगाथाफळ विक्रेत्याचा मुलगा ते ४०० कोटी रुपयांचा आईस्क्री...
05/11/2024

फळ विक्रेता ते ४०० कोटींचा मालक, आईस्क्रीम मॅन ऑफ इंडियाची संघर्षगाथा

फळ विक्रेत्याचा मुलगा ते ४०० कोटी रुपयांचा आईस्क्रीमचा व्यवसाय (Ice cream business) असा थक्क करणार प्रवास आहे. रघुनंदन श्रीनिवास कामथ असं त्या यशस्वी उद्योजकाचं नाव आहे.

इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर सामान्य माणूस देखील यशाच्या शिखरावर पोहोचतो. कोणताही व्यवसाय, उद्योग किंवा नोकरी असो, या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी प्रत्येकालाच संघर्ष कारावा लागतो. संघर्षातूनच जडणघडण होत असते. फळ विक्रेत्याचा मुलगा ते ४०० कोटी रुपयांचा आईस्क्रीमचा व्यवसाय असा थक्क करणारा प्रवास आहे. रघुनंदन श्रीनिवास कामथ असं त्या यशस्वी उद्योजकाचं नाव आहे.

मुंबईतील जुहू परिसरात तुम्हाला नॅचरल्स आईस्क्रीमचे दुकान दिसेल. या दुकानातून दररोज मोठ्या प्रमाणात व्यवसाय होतो. आज हा व्यवसाय ४०० कोटी रुपयांचा आहे. नॅचरल्स आईस्क्रीमची स्थापना रघुनंदन श्रीनिवास कामथ यांनी केली होती. त्यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी निधन झाले आहे. रघुनंदन यांचे वडील कर्नाटकचे असून ते फळे विक्रीचा व्यवसाय करत होते. रघुनंदन अभ्यासात हुशार नव्हते. त्यांनी वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी मुंबईतील त्यांच्या भावाच्या दक्षिण भारतीय रेस्टॉरंटमध्ये काम करण्यास सुरुवात केली. येथूनच त्यांच्या उद्योजक बनण्याचा मार्ग सुरु झाला. आज ते एक मोठे यशस्वी उद्योजक म्हणून ओळखले जातात.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, रघुनंदन यांनी वडिलांसोबत बराच काळ फळे विकण्याचे काम देखील केलं होतं. त्यामुळे फळांबद्दलची त्यांची समज चांगली होती. कोणत्या फळाच्या चवीचा समतोल साधावा हे त्याला माहीत होते. नॅचरल्स आईस्क्रीमची ही समज फळांच्या मूळ चवशी निगडीत राहिली. जुहू येथील त्याच्या कॉर्नर शॉपवर त्याचे आईस्क्रीम लोकांना आवडू लागले. सुरुवातीला त्याच्या दुकानात फक्त १२ फ्लेवर्स उपलब्ध होत्या. या व्यवसायातून पहिल्या वर्षी त्यांनी तब्बल ५ लाख रुपयांची उलाढाल केली. यातूनच त्यांना आपला व्यवसाय वाढवण्याचा मार्ग मिळत गेला.

नॅचरल्स आईस्क्रीम हे त्याच्या चवीमुळं प्रसिद्ध आहे. देशभरातील शंभरहून अधिक स्टोअर्स असलेला हा देशातील सर्वात मोठा आइस्क्रीम ब्रँड आहे.
नॅचरल्स आईस्क्रीम मधील सर्वात प्रसिद्ध आइस्क्रीम म्हणजे टेंडर कोकोनट. कच्च्या नारळाचे दूध आणि साखर मिसळून, रघुनंदन श्रीनिवास कामथ यांनी एक चव विकसित केली आहे. त्यांच्यापूर्वी कोणीही असे आईस्क्रीम तयार केले नव्हते. 'बास्किन रॉबिन'ने जे पश्चिमेत केले ते रघुनंदनने भारतात केले. आज त्यांना ‘आईस्क्रीम मॅन ऑफ इंडिया’ म्हटले जाते.

विश्वेश्वरैयांचे वंशजआज अभियंता दिनाच्या निम्मिताने आपण भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया याचं स्मरण करतो.  या निम्मितान...
15/09/2024

विश्वेश्वरैयांचे वंशज

आज अभियंता दिनाच्या निम्मिताने आपण भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरैया याचं स्मरण करतो. या निम्मिताने विश्वेश्वरैयांच्या काही खास अशा वंशजांची ओळख करून देत आहे.

१. २०१६ साली कोल्हापुरात डॉ डी. वाय. पाटील यांना भेटायला एक VIP व्यक्ती हेलिकॉप्टरने आली होती. भेट झाल्यावर निघतांना हेलिकॉप्टर काही सुरु होईना. पायलट हेलिकॉप्टर कंपनीच्या टेक्निकल टीमशी बोलले पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्या VIP नां तत्काळ पुढे निघायचं होतं, त्यात कंपनीच्या टेक्निकल टीमला दुरुस्तीसाठी जागेवर यायला ३ दिवसांचा वेळ लागेल असं कळवलं.
परिसरात दुसरं हेलिकॉप्टरसुद्धा उपलब्ध नव्हतं. मग डी. वाय. पाटील यांचे चिरंजीव श्री संजय पाटील यानी कोल्हापुरातील एका कार मिस्त्रीला तिथं बोलावलं.
या मिस्त्रीने आयुष्यात कधी हेलिकॉप्टरला हातही लावला नव्हता पण त्या अवलियाने अर्ध्या तासात हेलिकॉप्टरमध्ये झालेला बिघाड दुरुस्त केला. पायलटने खात्री केल्यावर आलेली VIP मंडळी सुखरूपपणे आपल्या गंतव्यस्थानी पोहोचली. गंमत म्हणजे बेकायदा हेलिकॉप्टर दुरुस्ती केली म्हणून नागरी उड्डयन मंत्रालयाने या मिस्त्रीची चौकशी लावली होती. याच मिस्त्रीने २००६ साली भंगारात गेलेल्या एका कारमध्ये बदल करून ती कोल्हापुरात रंकाळ्याच्या पाण्यावर चालवून दाखविली होती.
फिरोज मोमीन हा तो अवलिया.

२. विजार-शर्टातला ITI शिकलेला इचलकरंजीमधला एक तरुण ५० वर्षापूर्वी ४ सीटर इलेक्ट्रिक कार तयार करून शहरातून चालवत होता. सर्वजण कुतूहलाने पहात असतांना "ही कार खंडाळ्याचा घाट चढणार का असा टोमणा त्यातील एकाने मारला" . त्या तरूणाने कार चार्ज केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती कार मुंबईत मंत्रालयासमोर उभी केली. पुढे त्यांनी किमान ५० एक नवे शोध लावले, प्रत्येकाची एक इंडस्ट्री उभी केली, त्यातील काही कंपन्या जागतिक पातळीवर सुद्धा गेल्या. १९७६ साली एका प्रख्यात जापनीज कंपनीला आपल्या एका प्रोडक्टच्या निर्मितीसाठी २० सेकंद लागणारं Cycle Time यांने इचलकरंजीमध्ये ते १२ सेकंदात बसवून दाखवलं.

जगप्रसिद्ध फाय गृपचे संस्थापक श्री पंडितराव कुलकर्णी हे या अभियंत्याचं नाव .

३. युरोप मध्ये फिरता रंगमंच पाहून “तो मी नव्हेच” या नाटकासाठी ते महाराष्ट्रात बनवायचं स्वप्न घेवून नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर आले होते. बऱ्याच अभियंत्यांना, रचनाकारांना आणि कंपन्यांना भेटून सुद्धा त्यांना हवं तसं डिझाईन मिळत नव्हतं. कोल्हापुरात एकदा प्रयोग संपल्यावर त्यांच्या एका मित्राने पणशीकरानां एका लोहाराच्या पालावर घेवून गेले. पणशीकरांनी अगदी अनिछेने आपली संकल्पना त्याला समजावून सांगितली. त्या लोहाराने दुसऱ्या दिवशी कुंभाराच्या फिरत्या चाकावर पुली आणि लिव्हर गिअर वापरून फिरता बहुमजली रंगमंचाचा मॉडेल चालवून दाखविला जो पुढे पणशीकर आणि इतर सर्वच नाटककारांनी आपल्या वापरता आणला.

किर्लोस्करांनी डीझेलवर चालणारा जनरेटर मार्केटमध्ये आणला तेव्हां या लोहाराने कोळश्यावर चालणारा जनरेटर बनवला जो डीझेल जनरेटरच्या दुप्पट कार्यक्षमतेने चालणारा आणि फक्त ३० % किमतीती बनवला होता. ही असामी म्हणजे इयत्ता दुसरी शिकलेले म्हादबा मिस्त्री अर्थात महादेव शेळके.

४. उद्योगाची आणि अभियांत्रिकी शिक्षणाची कुठलीही पार्श्वभूमी नसलेला पाथरवट (वडार समाजातील एक उपजात) समाजातील एका तरुण दगड फोडता-फोडता, धरणाच्या कालवा खुदाईची कंत्राटे घेऊ लागला. पुढे बंधारे, धरण, रस्ते, पाईपलाईनची कामे घेत वस्त्रोद्योग, उर्जा, महामार्ग, बांधकाम सारख्या क्षेत्रात आपला उद्योगविस्तार १००० कोटींच्याही पुढे नेला. कित्येक उच्चशिक्षित अभियंत्याना घडवणारा बंडी, धोतर, गांधीटोपी वेशातला हा अशिक्षित पण विद्वान अभियंता म्हणजे रामचंद्र मारुती मोहिते

५. सांगली जिल्ह्याच्या पेड गावातील चांभार कुटुंबातील एक युवक मुंबईतील माझगाव डॉक वर वेल्डरचं काम करणाऱ्या आपल्या मोठ्या भावासोबत शिकाऊ उमेदवार म्हणून रुजू झाला. तिथे काम करता-करता इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. देश-विदेशात काम करून व्यावसाईक अनुभव मिळवला. पुढे स्वतःची कंपनी सुरु केली (त्या कंपनीच्या नावात आपल्या सर्व भावांच्या नावाचा समावेश आहे) जिथे ४५०० लोक काम करतात आणि आजचा टर्नओवर ५०० करोड आहे.
२०१४ ला आपल्या भावाला मिरजेचा आमदार बनवला. बालपणी जाती-व्यवस्थेचे चटके खात ज्या गाव-विहिरीच्या पाण्याला स्पर्श करायला मनाई होती त्याच गावात त्यांनी सार्वजनिक विहीर खोदून दिली.
हे आहेत मुंबईतील DAS Offshore चे श्री अशोक खाडे
आणि DAS चा फुल्लफॉर्म आहे - दत्ता, अशोक, सुरेश.

६. टाटा मोटर्स मध्ये काम करणाऱ्या एका इंजिनीअरने टाटा इस्टीम या गाडीच्या निर्मिती प्रक्रीयेमध्ये आपलं कौशल्य वापरून कंपनीचे २.५ करोड रुपये वाचविले. त्याच्या बक्षीसापोटी मिळणारं प्रमोशन नाकारून आपल्या गावाकडच्या अल्पशिक्षित तरुण मित्रांना कंपनीत नोकरी देण्यासाठी विनंती केली.
टाटा मोटर्सने ती आनंदाने मान्य केली आणि अल्पावधीत याद्वारे ३०० तरुणांना रोजगार मिळाला. यातूनच २००१ साली सेवा क्षेत्रातील एका नव्या व्यवसायाचा उदय झाला ज्याची मजल आज ७५,००० लोकांच्या रोजगारापर्यंत येऊन पोचली आहे. पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवन, संसद भवन, सुप्रीमे कोर्ट, १०० एक महत्वाच्या खाजगी कंपन्या, १५ महत्वाची विमानतळे, ५० महत्वाची मंदिरे आणि अजून बरंच काही...
२२ राज्यातील ७० शहरात कार्यालये उघडली. सोबत शेती, Life Science, महाराष्ट्र आणि जम्मू मधील १०८ Emergency Medical Service , मेगा फूड पार्क, न्यूक्लिअर सायन्सचे Peace Applications, शहरी कचरा व्यवस्थापन या आणि अशा अजून बऱ्याच क्षेत्रात भरीव कामगिरी करून दाखवली.
आपल्या वयाच्या १९ व्या वर्षी या युवकाने आपल्या देशाच्या विकासाच स्वप्नं पाहून त्याच नावाने कंपनी स्थापन केली होती. आज याची वार्षिक उलाढाल २००० कोटींच्या पुढे आहे.
महाराष्ट्राच्या आजवरच्या प्रगतीत गेल्या ६० वर्षात महत्वाच योगदान दिलेल्या (हयात असलेल्या) ६० व्यक्तींमध्ये यांचं नाव अग्रक्रमावर येतं.

आपल्या व्यवसायामुळे १० कोटी लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडले पाहिजेत, १० लाख लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि आपली कंपनी १०० देशात कार्यरत असली पाहिजे या दिव्य स्वप्नपूर्तीसाठी अहोरात्र झटणारे, मानवता जपणारे आणि जगणारे, अत्यंत संवेदनशील आणि सदैव हसतमुख असणारे, मुळचे रहिमतपूरचे आणि VIT कॉलेजचे Electronics इंजिनीअर असणारे BVG म्हणजेच भारत विकास ग्रुपचे संस्थापक श्री हणमंतराव गायकवाड

या सगळ्यांनी आम्हांला प्रेरणा दिली, आमचं जीवन सुखकर केलं आणि देशाच्या निर्मितीत भरीव योगदान दिलं.

माहिती असलेल्या, नसलेल्या अशा सर्वच विश्वेश्वरैयांच्या खऱ्याखुऱ्या वंशजांना अभियंता दिनाच्या निमित्ताने मानाचा सलाम !🙏

Thought for today
12/09/2024

Thought for today

केसर शेतीतून महिन्याला ३.५ लाख रुपयांची कमाई......रमेश गेरा (६५) यांनी नोएडामधील त्यांच्या घराच्या एका छोट्या खोलीत काश्...
05/09/2024

केसर शेतीतून महिन्याला ३.५ लाख रुपयांची कमाई......

रमेश गेरा (६५) यांनी नोएडामधील त्यांच्या घराच्या एका छोट्या खोलीत काश्मिरी केसराची शेती सुरू केली. ते दर महिन्याला ३.५ लाख रुपये कमावतात.
या कामात सुमारे ४ लाखांचा खर्च आला आणि रमेश यांनी काश्मीरमधून २ लाखांचे बियाणे मागवले. त्यांनी सांगितले, "भारतामध्ये केसराची जितकी मागणी आहे, त्यातील केवळ ३०% भाग काश्मीरमधून येतो, उर्वरित ७०% केसर इराणमधून आयात केला जातो. ही जी मागणी आणि पुरवठा यांच्यामधील तफावत आहे, तीच स्वतःमध्ये एक खूप मोठी बाजारपेठ आहे."

केसराच्या शेतीत फार जास्त लोकांची गरज नसते, घरातील कुणीही सदस्य हा व्यवसाय सहज सांभाळू शकतो. रमेश गेरा यांनी सांगितले, "यामध्ये वीजेच्या बिलाशिवाय इतर कोणताही मासिक खर्च नाही, फक्त ४ महिने आम्ही सिस्टम चालू ठेवतो, त्यावेळी सुमारे ४ ते ४.५ हजार रुपये महिना वीज बिल येते. त्यानंतर आम्ही ते बंद करून टाकतो."

पुढे त्यांनी सांगितले, "केसर खूपच चांगल्या दराने विकला जातो, जर तुम्ही होलसेलमध्ये विक्री करू इच्छित असाल, तर २.५ लाख रुपये/किलो दराने तुम्ही ते सहज विकू शकता, रिटेलमध्ये १ ग्रॅम, २ ग्रॅम, ५ ग्रॅमच्या पॅकेट्समध्ये विकल्यास ३.५० लाख रुपये/किलो, आणि जर निर्यात केली तर ६ लाख रुपये/किलोपर्यंतही कमाई होऊ शकते."

रमेश नोएडामध्येच 'आकर्षक सेफ्रॉन इन्स्टिट्यूट' नावाने एक प्रशिक्षण केंद्र चालवतात आणि आतापर्यंत १०५ लोकांना केसर उगवण्याची ही तंत्रज्ञान शिकवले आहे.

(Credit : The Better India दि बेटर इंडिया)

Address

Nashik
422011

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Success Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to The Success Foundation:

Share