13/08/2020
*नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (महाबँक-आरसेटी) नाशिक यांच्या मार्फत मोफत प्रशिक्षण*
नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण,तरुणी , महिला बचत गट सदस्य यांना स्वतःचा उद्योग सुरु करता यावा यासाठी महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (महाबँक-आरसेटी) नाशिक यांच्या मार्फत कौशल्य विकास योजना मधून केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासन अंतर्गत विविध व्यवसायांवरील मोफत प्रशिक्षण देण्यात येतात.
या प्रशिक्षणात कौशल्य आधारित प्रशिक्षण तसेच उद्योजकता विकासासाठी बाजार सर्वेक्षण , संवाद कौशल्य , बँकेचे व्यवहार, बँक कर्जा संबंधी मार्गदर्शन सर्वांचे अद्ययावत ज्ञान ह्या सर्वांचे संपूर्ण मार्गदर्शन केले जाते.
सदर प्रशिक्षण विनामूल्य असून, प्रशिक्षणात लागणारे प्रशिक्षण साहित्य विनामूल्य पुरविण्यात येते.
कोरोना विषाणूच्या प्रसार होऊ नये यासाठी महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (महाबँक-आरसेटी) नाशिक यांनी गावात किंवा तालुकाच्या ठिकणी जावून स्वयंरोजगारचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे.
तरी नाशिक जिल्ह्यातील तरुण,तरुणी , महिला बचत गट सदस्य यांना उद्योग व्यवसाय सुरु करायचा आहे त्यांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
*प्रशिक्षणासाठी पात्रता
१. प्रशिक्षणार्थी ग्रामीण भागातील हवा व वय वर्ष १८ ते ४५ दरम्यान असावे
२. दारिद्र्य रेषेखालील किंवा बचत गटातील सदस्य किंवा SC/ST प्रवर्गातील असावा*
प्रशिक्षण कमीत कमी ६ दिवसांचे असेल.ज्या गावात २० पेक्षा अधिक पात्र प्रशिक्षणार्थी / महिला बचत गट सदस्य इच्छुक असतील त्यांना त्याच गावात प्रशिक्षण देण्याचा विचार करण्यात येईल.प्रशिक्षणात खालीलपैकी १ कोर्स शिकवला जातील.
* ५-६ प्रकारचे मास्क बनविणे * फिनाईल व लिक्विड साबण बनविणे * भांडे व कपडे धुण्याचा साबण व पावडर बनविणे * सर्व प्रकारचे क्लीनर्स बनविणे *आंघोळीचा साबण आणि शांपू बनविणे * पेपर बॅग, कागदी पाकीट बनविणे * फळ आणि धान्य प्रक्रिया करणे * सर्व प्रकारचे मसाले तयार करणे ई.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यवसाय सुरू करण्यास पात्र लाभार्थ्यास कर्ज पुरवठा(नियमानुसार) उपलब्ध करण्यात येईल.
नाव नोंदणीसाठी संपर्क:
राजेंद्र पवार : प्रशिक्षक :
मो क्रं 9890383894
- Plz Referance From: Nagesh