30/07/2026
झाडावरून पडल्याने वयाच्या ५ व्या वर्षी एक हात गमावला... परिस्थिती इतकी गरिबीची की नीट जेवणही मिळायचं नाही. पण जिद्द हरली नाही! 👑
नाशिकच्या तोरण डोंगारी गावच्या मातीतून थेट ग्लासगो (स्कॉटलंड) पर्यंत मजल मारत दिलीप महादू गावीतने २०२६ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (Commonwealth Games) सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे! 🥇
१०.७१ सेकंदाचा नवा रेकॉर्ड करत पॅरा ॲथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा दिलीप हा भारताचा पहिला पुरुष खेळाडू ठरलाय. 🇮🇳
गरिबी आणि अपंगत्वावर मात करून जग जिंकणाऱ्या नाशिकच्या या वाघाला कडक सॅल्युट! 🫡❤️
नाशिकच्या तरुणाचा पुन्हा एकदा मानाचा तुरा! 🚩
Inspiration GoldMedalist NashikKar NeverGiveUp JaiHind
Video credit.
Sony Sports Network