16/02/2023
आज मी घरून ऑफिसला येताना रस्त्यावर एक लहान मुलगा वासुदेव चा गणवेश घालून माझ्या गाडीच्या आडवा आला
मी त्याला विचारलं का रे बाबा का तू माझ्या गाडीच्या पुढे आला तर तो मला म्हणाला कोकण किंग पर्यंत सोडा मी त्याला गाडीमध्ये बसवलं आणि त्याला कोकण किंग पर्यंत सोडताना मी त्याला विचारलं तू शाळेत का नाही जात आणि हे असे काम का करतो तर त्याने मला सांगितलं वडिलांना काम मिळत नाही आई आजारी आसते परिस्थिती अशी असल्यामुळे मला वासुदेव चा गणवेश घालून कोकण किंग व इतर ठिकाणी जाऊन मी गाणी बोलून जे काय मिळतं त्याच्याने मी माझं घर आणि आईच औषधाचं बघतो ते ऐकून मी खूप भावुक झालो आणि माझ्या पद्धतीने मला जेवढं जमत होतं तेवढे मी त्याच्यासाठी केलं मला दुःख या गोष्टीचा वाटतं की आपल्या देशामध्ये अजून गरिबी संपलेली नाही आहे...
🙏 जनसेवा हीच ईश्वर सेवा 🙏