Airoli Helpline

Airoli Helpline We want to create a platform where a complete home appliance repair or other local services can be f There are many such helpline available in India.

Today is the most important time in the life of a day in a runaway life. In order to avoid this important time, we will solve the problems of the customer by sending the same service provider to the same area, according to the client's problem, through the Airoli Helpline, and try to save time in vain. In this way we will make our customers' lives simple and easy, this is our main objective. Websi

tes of these services are overloaded with information that makes things more complicated. Information is given in an incomplete manner randomly. If there is a problem in the Airoli area, and if you ask for information to resolve it, then it also includes information about the service provider of different areas, which does not benefit the customer, but also important time is wasted. That's why we have decided to arrange the Airoli Helpline service. We want to create a platform where a complete home appliance repair or other local services can be found, such as carpenters, electricians, painters, pest control, plumbers, driver services, duplicate key makers, rope services, all domestic Equipment repair service, elevator repair service, computer repair, travels, tempo service, CCTV camera services, grocery service, decorators, rangoli makers, henna making, beautician, tiffin service, real estate agent, printing service, auto care, home decoration, Massage, water purifiers Keeping in mind the personal and abdominal care, health, insurance, sports and services, any problems will be resolved by the Airoli Helpline to solve the problem by sending the same service provider to the same area. The service provider trains its employees for customer satisfaction; we will be affiliated with the service provider, who provides reliable trained staff at reasonable rates.

23/07/2021

सर्वप्रथम ऐरोली ब्रेकिंग न्यूजच्या सर्व फॉलोवर्स, लाईक आणि शेअर करणाऱ्या सभासदांना गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!

आपले आवडते 'ऐरोली ब्रेकिंग न्यूज' ला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने आज गुरुपौर्णिमेच्या शुभ दिनी आपल्या 'ऐरोली ब्रेकिंग न्यूज' फेसबुक पेजचे दहा हजाराहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. आपल्या सर्वांचे मनापासून आभार !!!
असेच लक्ष, आशिर्वाद आणि प्रेम सदैव राहू दे !!!

- सुमेध वाघमारे

 #पावसाळ्यात_स्वतःची_काळजी_घ्या. #छत्रीचा_वापर_करून_सुरक्षित_अंतर_ठेवा.आपल्या  #कंपनी,  #व्यवसाय किंवा  #राजकीय_पक्षाचे_...
24/05/2021

#पावसाळ्यात_स्वतःची_काळजी_घ्या.
#छत्रीचा_वापर_करून_सुरक्षित_अंतर_ठेवा.

आपल्या #कंपनी, #व्यवसाय किंवा #राजकीय_पक्षाचे_ब्रँडिंग करून, अत्यंत कमी दरात, वाजवी भावात आणि उत्तम दर्जात #छत्र्या उपलब्ध.

14/05/2021

ऐरोली ब्रेकिंग न्यूज च्या बातमीचा परिणाम
#उपायुक्त_डॉ_अमरीश_पटनिगिरी_यांनी_केला_पाहणी_दौरा

ऐरोली ब्रेकिंग न्यूज ने प्रसिद्ध केलेली "ऐरोलीत रुग्णालयातील जैविक कचरा उघड्यावर" या बातमीची दखल नवी मुंबई महानगर पालिकेने घेतली असून, आज पालिका उपायुक्त डॉ. अमरीश पटनिगिरी यांनी या प्रकरणाबाबत ऐरोली दौरा केला असता सदर बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. यावेळी अशा लोकांवर दंड न करता सरळ सरळ कारवाई करण्याचे आदेश पालिका अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

साभार : ऐरोली वार्ता

14/05/2021

#स्वच्छ_सर्वेक्षणा_अंतर्गत_झालेल्या_निकृष्ट_दर्जाच्या_बोगस_कामाचा_आणखी_एक_नमुना
#केराची_टोपली_भर_रस्त्यात_उखडून_पडली
े_झाले_अजून_बसवली_नाही

ऐरोली ब्रेकिंग न्यूज

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नवी मुंबई मध्ये ठिकठिकाणी 'लिटर बिन' म्हणजेच केराची टोपली बसविणायचे काम करण्यात आले होते. परंतु हि केराची टोपली बसविताना त्याची योग्य प्रकारे सिमेंट काँक्रीटीकरण न केल्याने ऐरोलीतील केराची टोपली भर रस्त्यात उखडून पडली आज त्या बाबतची तक्रार करून २ आठवडे झाले परंतु अद्याप बसविण्यात आली नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. पालिका अभियंता विभागाने ताबडतोब बसविणायचे खोटे आश्वासन दिले असल्याचा त्यांचा खोटेपणा आता उघड झाला आहे. त्यामुळे "स्वच्छ सर्वेक्षणा" अंतर्गत झालेल्या निकृष्ट दर्जाच्या बोगस कामाचा आणखी एक नमुना नवी मुंबईकरांना बघायला मिळाला आहे.

साभार : ऐरोली वार्ता

07/05/2021
04/05/2021

ऐरोली सेक्टर ३ येथील सुप्रसिद्ध श्रीराम विद्यालयाला बहुतेक कोरोना महामारीचा विसर पडलेला दिसतोय. श्रीराम शाळेती...

02/05/2021

#तुम्हाला_काय_वाटते?

आज पश्चिम बंगाल निवडणुकीचा निकाल जाहीर होऊ शकतो. या निवडणुकीत तृणमूल अद्याप पर्यंत आघाडीवर आहे. पाठीमागे भाजपा आहे. सलग १० वर्षे पश्चिम बंगाल वर ममता बॅनर्जी यांनी आपला ठसा उमटविला आहे. परंतु यंदाची निवडणुक ही भाजपाच्या साठी प्रतिष्ठेची निवडणूक ठरली होती. जर या निवडणुकीत बनर्जींचा विजय झाल्यास मोदींच्या विरोधात एक नवा चेहरा समोर येण्याची शक्यता वळविण्यात येते. त्यामुळे पश्चिम बंगाल निवडणुकीत ममता बॅनर्जी हट्रिक मारतील का? आपले मतं स्वच्छ, स्पष्ट आणि सुंदर शब्दांत मांडा.

28/04/2021

#इको_फ्रेंडली_जॉगिंग_ट्रॅक_या_फुटपाथ_दुरुस्तीचे_निघाले_टेंडर
#ऐरोलीकरांमध्ये_संताप; #टेंडर_रद्द_करण्याची_मागणीला_जोर

ऐरोली ब्रेकिंग न्यूज -

ऐरोली येथील इच्छापूर्ती गणेश मंदिर ते लेकव्ह्यूव सोसायटी, सेक्टर-१४ येथील फुटपाथचे नव्याने टेंडर काढण्यात आले आहे. परंतु सदर फुटपाथ सुस्थितीत असून, कोरोनाच्या महामारीत अशा प्रकारच्या अत्यावश्यक नसलेल्या विकासकामांना स्थगिती देऊन नागरिकांना, रुग्णांना होणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयन्त करण्याची विनंती स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ऐरोली मतदार संघातील माजी आमदार संदीप नाईक व नवी मुंबई महानगर पालिकेच्या निधीतून बांधलेल्या ऐरोलीतील "इको फ्रेंडली जॉगिंग ट्रॅक" हि ऐरोली शहराची एक महत्वाची ओळख बनली आहे. जॉगिंग ट्रॅक व्यतिरिक्त, या बागेत वॉकवे आणि नागरिकांना विश्रांती करण्यासाठी बाकडे बसविण्यात आले आहेत. नवी मुंबईत दिसणार्‍या दुर्मिळ पक्ष्यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे योगा करण्याकरिता तशी सुविधा या बागेत करण्यात आली आहे. आजूबाजूला आणि फुटपाथवर संपूर्ण झाडांनी बहरलेले अशा या इको फ्रेंडली जॉगिंग ट्रॅकवर सकाळ संध्याकाळ सुमारे हजारो नागरिक व्यायाम अथवा टेहळणी करण्याकरता हजेरी लावत होते. विशेष म्हणजे ऐरोलीतील सर्व माजी नगरसेवक यांचा ग्रुप येथे जॉगिंगसाठी येत असल्याने ऐरोलीतील हा हॉटस्पॉट ठरत होता.

परंतु नवी मुंबई महानगर पालिका आयुक्तांनी ऐरोली सेक्टर १५ येथील इच्छापूर्ती गणेश मंदिर ते लेकव्ह्यूव सोसायटी, बर्न हॉस्पिटल, सेक्टर-१४ येथील फुटपाथच्या कामाच्या दुरुस्तीचे करोडो रुपयांचे टेंडर काढल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सदर फुटपाथ अजून सुस्थितीत असून कोणत्याही प्रकारचे काम करण्याची गरज नसल्याचे येथील स्थानिक नागरिक ॲड. दिपक गायकवाड यांचे म्हणणे आहे. तसेच या कोरोनाच्या महामारीत अशा प्रकारच्या विकासकामांना स्थगिती देऊन, नवी मुंबईकरांना सोयीसुविधांयुक्त हॉस्पिटल, औषधांचा योग्य पुरवठा, तज्ज्ञ डॉक्टर, वेळेवर उपलब्ध होणारी रुग्णवाहिका, कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत, औषधे उपलब्ध होत नाहीत, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, लसीकरण महत्वाच्या बाबींकडे लक्ष केंद्रित करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याची विनंती पालिका आयुक्तांना ॲड. दिपक गायकवाड यांनी केली आहे. त्यामुळे जॉगिंग करणाऱ्या नागरिकांनी या अत्यावश्यक नसलेल्या कामाविषयी संताप व्यक्त करत नागरिकांकडून सदर टेंडर रद्द करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

याबाबत नवी मुंबई महानगर पालिकेचे कार्यकारी अभियंता गिरीश गुमास्ते यांनी सांगितले कि, येथील होल्डिंग पॉन्ड मध्ये जेव्हा हायटाईड येते किंवा मुसळधार पाऊस होतो तेव्हा पाणी संपूर्ण रस्त्यावर येऊन जमा होते. सदर जागा हि खाडी लगत असून येथे ड्रेनेजची सुविधा नाही. या कामाद्वारे येथील फुटपाथच्या खाली ड्रेनेजची व्यवस्था केल्यास रस्त्यावर पाणी जमा होणार नाही. तसेच याबाबतचे सर्व कन्सल्टन्सी रिपोर्ट घेण्यात आले आहेत.

रस्त्यावर जमा होणारे पाणी रोखण्याकरिता, आमदार निधीतून करोडो रुपये खर्च करून सुस्तिथित असलेल्या "इको फ्रेंडली जॉगिंग ट्रॅक" चे दुरुस्ती करण्याची गरज आहे का? असा चिंतात्मक प्रश्न ऐरोलीकरांना पडला आहे.

Address

Navi Mumbai
400708

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Telephone

9152325111

Alerts

Be the first to know and let us send you an email when Airoli Helpline posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Airoli Helpline:

Share