VaastuRaksha वास्तुरक्षा

VaastuRaksha वास्तुरक्षा We are here to suggest you remedies and solutions for your Vastudosh, Vastuvisits and consultation.

22/12/2025

वास्तुमधील नकारात्मक शक्ती म्हणजे दरखेपेस एखादा अशुभ आत्मा/भुतबाधा असेलच असे नाही...

👉🏻 एखादी वास्तु निगेटिव्ह आहे किंवा तिथे तीव्र नकारात्मकता आहे याचा अर्थ तिथे नेहमीच आत्मा, भुतबाधा असते असं अजिबात नाही. निसर्ग हा असंख्य शुभाशुभ स्पंदनांनी व्यक्त होत असतो. अशी कित्येक स्पंदने अस्तित्वात असतात की जी मानवी प्रकट मनाला असह्य होतात. त्या विशिष्ट परिघात गेल्यावर डोकं जड होणे, नैराश्य येणे, सतत चुकीचे विचार येणे, अचानक तब्येत बिघडणे असे विचित्र अनुभव येतात त्यामागे फक्त स्पंदने किंवा कंपने असू शकतात. ही स्पंदने कधीकधी तात्पुरती किंवा कायमस्वरूपी असू शकतात. अनेकांना हा एखाद्या आत्म्याचे प्रताप वाटतात पण तसंच नसतं. ही स्पंदने काही वेळा स्वयंभू असतात. विशेषतः जिथे बराचकाळ माणसांचं येणं जाणं नसतं अशा निर्जन स्थळी ती असू शकतात. जिथे प्रकाश (light) नसतो तिथे अशी स्पंदने असू शकतात. कधीकधी एखाद्या वास्तुत वेदनामय किंवा अनैसर्गिक मृत्यू घडलेले असतात तिथे तो विशिष्ट आत्मा पुढच्या प्रवासाला निघून जातो पण तिथे Residual vibrations राहून जातात. त्याचं रिडिंग अतिशय काळजीपूर्वक करावं लागतं.

काही ठिकाणी पंचमहाभूतांची जडत्वकारक कंपने असतात, काही ठिकाणी तत्वातिरेक होतो. म्हणजे एक किंवा दोन तत्वांचं अनैसर्गिक कॉम्बिनेशन होऊन तो भूभाग निगेटिव्ह होतो. असे अनुभव ओपन प्लॉटमधे, शेतीवाडीत येतात. जिथे पंचमहाभूते, प्रकाश आणि स्वच्छता यांचा समतोल असतो तिथे ही स्पंदने रहात नाहीत. आपली वास्तू नेहमी आटोपशीर ठेवून त्यातील अनावश्यक वस्तू काढून नष्ट कराव्यात ते यासाठीच. अन्यथा त्या निर्जीव वस्तू तुमचं ऊर्जाशोषण सुरु करतात.

अशा दुषित स्पंदनांच्या वास्तुचे शास्त्रोक्त पद्धतीने शुध्दीकरण करावे लागते. विशिष्ट अभिमंत्रित यंत्रांची स्थापना करुन शिवाय तिथे त्या जागेवर काही वैदिक संस्कार, धार्मिक विधी करायला लागतात. त्या शुध्दीकरणानंतर हळूहळू ती स्पंदने विरत जातात... नष्ट होतात. दरखेपेस एखाद्या बाधेचा आणि आत्म्याचाच त्रास असेल असं नाही. आपले घर, बंगला, प्लॉट, इंडस्ट्री, शेतीसाठी यांची वास्तुव्हिजिट, परिक्षण आणि तत्सम शंकानिरसनासाठी [email protected] वर ईमेल पाठवा. ज्या समस्यांना गुरुआज्ञा येईल त्यांनाच रिप्लाय दिला जातो याची नोंद घ्यावी.

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

वास्तुपरिक्षण करताना ईशान्येला देवघर, उत्तरेला तिजोरी आणि आग्नेयेला स्वयंपाकघर हे रिडिंग करुन सजेशन देणं वेगळं पण वास्तु...
11/08/2024

वास्तुपरिक्षण करताना ईशान्येला देवघर, उत्तरेला तिजोरी आणि आग्नेयेला स्वयंपाकघर हे रिडिंग करुन सजेशन देणं वेगळं पण वास्तु/प्लॉट/घर/फॅक्टरी/फार्महाऊसवर प्रवेश करताचक्षणी पातंजल योगसुत्रांमधील #संयम या संकल्पनेवर आधारित अत्यंत तीव्र ध्यान-धारणा-समाधीच्या एकत्रीकरणातून त्या वास्तुच्या स्पंदनांशी एकरुपता साधून वास्तुची गुणवत्ता ओळखून त्याबरहुकूम सजेशन्स देणे आणि उपाययोजना करणे ही बाब अत्यंत कठीण, किचकट आणि अपारंपरिक असून तीच मी अवलंबितो....

या पध्दतीने वास्तुची खरी नाडी ओळखता येते. वास्तुचे tantrums समजतात आणि त्या वास्तुमधील समस्यांवर बिनतोड उपाययोजना मिळतात. अत्यंत सुक्ष्म पातळीवर काही अशुभ स्पंदने, नकारात्मक ऊर्जा असते जी पीडा देत असते तिचाही मागमूस लागतो. आणि त्यानुसार विशिष्ट यंत्रस्थापना, धार्मिक संस्कार यानुसार समस्येवर कायमस्वरूपी इलाज केले जातात.

तुमची कोणतीही वास्तु/घर/कार्यालय/व्यावसायिक जागा/शेतीवाडी/फॅक्टरी/वाडा अशा कोणत्याही वास्तुचे परिक्षण आणि उपाययोजना हवी असेल तर [email protected] या ईमेलवर मेल करा. संबंधित वास्तुचे फोटो असतील तर ते ॲटॅच्ड करुन पाठवा. श्रीगुरुंनी परिक्षणाची आज्ञा दिली की तुम्हाला रिप्लाय देऊन पुढची प्रोसिजर आपण सुरु करतो याची नोंद घ्यावी.

मला मेडिटेशनमधे श्रीगुरुंची आज्ञा असेल तर आणि तरच मी वास्तुव्हिजिट करतो. अन्यथा करत नाही. सबंध महाराष्ट्रात, देशाच्या कानाकोपऱ्यात आणि जगाच्या पाठीवर कुठेही वास्तुव्हिजिट आणि परिक्षणासाठी मी जातो.... फक्त सद्गुरु आज्ञा असेल तरच. त्यामुळे ईमेल पाठवून जर माझा रिप्लाय आला नाही याचा अर्थ आज्ञा अजूनपर्यंत मिळालेली नाही असा समजावा. धन्यवाद.

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

09/07/2023

एक अत्यंत महत्त्वपूर्ण लक्ष्मीदायक काहीतरी 👉🏻👉🏻👉🏻

सचिन मधुकर परांजपे (पालघर)

ज्यांना आयुष्यात अनंत आर्थिक अडचणी आहेत. कर्ज घेतले आहे आणि परतफेड होत नाही, सतत पैशाची चणचण जाणवते अशांसाठी आज श्रीबाबाजींच्या आदेशानुसार एक श्लोक देतो आहे. हा श्लोक श्रीमहालक्ष्मीचा #दशनमस्कार श्लोक मंत्र म्हणून गुप्ततंत्रात आहे. कारण यात लक्ष्मीमातेला दहा वेळा नमस्कार सांगितला आहे. हा श्लोक अडीअडचणीच्या तीव्रतेनुसार तुम्ही रोज एका बैठकीत एक, तीन, आठ किंवा अकरा वेळा म्हणू शकता. या श्लोकमंत्र पठणाची वेळ ही पहाटे ४ ते सकाळी ८ आणि संध्याकाळी ६ ते रात्री ८ इतकीच आहे. इतरवेळी म्हणता येईल पण त्याला तांत्रिक महत्त्व नाही. “आपली सांपत्तिक स्थिती सुधारुन, कर्जमुक्त व्हावे” अशी कळकळीची प्रार्थना रोज करुन मग श्लोकमंत्र पठण करावे. रोजच्या देवपूजेच्या सर्वात शेवटी तुम्ही हे करु शकता. पूजाअर्चा करत नसाल तर घरात बेडरुम सोडून कुठेही पूर्वाभिमुख बसून श्लोकमंत्र वाचू शकता. त्याआधी आर्थिक परिस्थिती सुधारण्याची प्रार्थना मनापासून करावी. (सचिन मधुकर परांजपे)

हा श्लोकमंत्र कोणीही करु शकतो. स्त्रीपुरूष, तृतीयपंथी, दिव्यांग, १२ वर्षे वयानंतरचे कोणीही करु शकतो. मासिक पाळीचे पाच दिवस, सोयरसुतकाचे दहा दिवस करु नये. मद्यधुंद नशेच्या अवस्थेत करु नये. मांसाहारबंधन नसले तरी मांसाहार केल्या केल्या मुद्दामहून जप करु नये. अकरा पेक्षा जास्त श्लोकमंत्र पठण करावे वाटले तर १०८ करावे. शक्यतो रोजच्या पठणाची संख्या ठराविकच हवी. बदल केलाच तर तो २१ दिवस ठेवावा. सुरुवात शक्यतो अमावस्या, पौर्णिमा किंवा कोणत्याही शुक्रवारपासून करावी.... (सचिन मधुकर परांजपे)

श्लोकमंत्र 👉🏻

महालक्ष्मि नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं सुरेश्वरि ।
हरिप्रिये नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं दयानिधे ॥
रक्ष त्वं देवदेवेशि देवदेवस्य वल्लभे ।
दरिद्रात्त्राहि मां लक्ष्मि कृपां कुरु ममोपरि ॥
विष्णुप्रिये नमस्तुभ्यं नमस्तुभ्यं जगद्धिते । आर्तहन्त्रि नमस्तुभ्यं समृद्धिं कुरु मे सदा ॥
नमस्तुभ्यं जगद्धात्रि नमस्तुभ्यं नमो नमः ।
धर्माधारे नमस्तुभ्यं नमः सम्पत्तिदायिनी ॥..........

यात “नमस्तुभ्यं” हा शब्द दहा वेळा आला आहे म्हणून यास #दशनमस्कार_ श्लोकमंत्र म्हणतात. लेखकाच्या नावासह पोस्ट फॉरवर्ड करा. तुम्ही नाव बदलून खोडून फॉरवर्ड केलीत तर मूळ स्त्रोतांची नाराजी ओढवून घेऊ नये. माझ्या वैयक्तिक ध्यानातून मिळालेले लोकोपयोगी मंत्र इतरांना पोहोचविण्याची जबाबदारी माझी आहे. काही शंका प्रश्न असतील तर विचारा मी सवडीने शंकानिरसन करेन.

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

घर, फ्लॅट, इंडस्ट्री, शेतीवाडी व तत्सम सर्व वास्तुव्हिजिट्स साठी आता जुलै २०२३ हा महिन्याचे बुकिंग सुरु आहे. वरील वास्तु...
10/06/2023

घर, फ्लॅट, इंडस्ट्री, शेतीवाडी व तत्सम सर्व वास्तुव्हिजिट्स साठी आता जुलै २०२३ हा महिन्याचे बुकिंग सुरु आहे. वरील वास्तुंपैकी कोणत्या समस्यांच्या दोषनिवारणासाठी [email protected] या ईमेलवर संपर्क साधावा. आपल्या फक्त #वास्तुविषयक समस्येचे सविस्तर स्वरुप, त्या वास्तुचे निरनिराळ्या ॲंगलने किमान ५ फोटो, संबंधित व्यक्ती/कुटुंब सदस्यांचा फोटो, संपूर्ण सविस्तर पत्ता, मोबाईल क्रमांक या गोष्टी ईमेलमधे असणे आवश्यक आहे.

वास्तुव्हिजिटसाठी मेडिटेशनमधून गुरुआज्ञा आली तरच मी रिप्लाय देतो. महिनाभर रिप्लाय आला नाही याचा अर्थ गुरुआज्ञा सकारात्मक नाही असे समजावे.

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

16/05/2023

घर, इंडस्ट्री, ऑफिस, शेतजमीन किंवा कोणत्याही commercial or non commercial वास्तुव्हिजिट, रिडिंगसाठी संपर्क साधावा.

[email protected]

ईमेलमधे वास्तुचे स्वरुप, एकंदरीत समस्या अडचणी काही असतील, बरेवाईट अनुभव, वास्तुचा सविस्तर पत्ता आणि विवीध ॲंगलने घेतलेले किमान सहा सात फोटो, तुमचे संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक आणि तुमचा फोटो या गोष्टी असणे क्रमप्राप्त आहे.

ईमेल मिळाल्यावर गुरुआज्ञा झाली तरच पुढे रिप्लाय दिला जातो. अन्यथा नाही. जोपर्यंत रिप्लाय येत नाही तोपर्यंत तुमचे काम पेंडिग आहे किंवा अजून आज्ञा दिली गेली नाही असे समजावे......

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

अत्याधिक लोकाग्रहास्तव यंदाचे दिवाळी (लक्ष्मीपूजनासाठी) श्रीपारदेश्वरी लक्ष्मीच्या फक्त २५ मूर्तीच्या ऑर्डर्स साठी आजपास...
03/09/2021

अत्याधिक लोकाग्रहास्तव यंदाचे दिवाळी (लक्ष्मीपूजनासाठी) श्रीपारदेश्वरी लक्ष्मीच्या फक्त २५ मूर्तीच्या ऑर्डर्स साठी आजपासून बुकिंग सुरु करत आहोत. मर्यादित मूर्तींचे बुकिंग असल्याने, तुम्हाला मूर्ती हवी असेल तर तातडीने 9823124242 क्रमांकावर व्हॉटसअप किंवा प्रत्यक्ष संपर्क (सकाळी ११ ते संध्याकाळी ६) करावा. पारदेश्वरी लक्ष्मीच्या अधिक माहितीसाठी पहिल्या कमेंटमधे दिलेल्या लिंक्स पहा

सुप्रभात. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी घटस्थापना असून १५ ऑक्टोबर २०२१ रोजी दसरा आहे. नवरात्रीचे हे ९ दिवस देवी/शक्तीसाधकांसाठी अत...
02/09/2021

सुप्रभात. ७ ऑक्टोबर २०२१ रोजी घटस्थापना असून १५ ऑक्टोबर २०२१ रोजी दसरा आहे. नवरात्रीचे हे ९ दिवस देवी/शक्तीसाधकांसाठी अतिशय महत्त्वाचे असतात.

#सिध्द_नऊमुखी_रुद्राक्ष हा प्रत्येक देवि किंवा कुलस्वामिनी उपासकांना वरदानस्वरुप मानला जातो. घटस्थापनेपासून ते पंचमीपर्यंत आपण नैसर्गिक आणि सर्टिफाईड नऊमुखी रुद्राक्षावर विविध स्वरुपाचे तंत्रोक्त शाक्तसंस्कार, देविकवच आणि लक्ष्मीतंत्राचे संस्कार करुन हे रुद्राक्ष त्याच दिवशी सायंकाळी साधकांच्या पत्त्यावर कुरिअर करणार आहोत. तो रुद्राक्ष धारण करण्याचा मुहूर्त हा २० ऑक्टोबर (कोजागिरी पौर्णिमेचा दुसरा दिवस) रेवती नक्षत्रावर आहे. नऊमुखी रुद्राक्षांच्या ऑर्डर्स या केवळ महाराष्ट्र प्रांतातील साधकांपुरत्याच घेतल्या जातील (कारण वेळेत कुरिअर पोहोचणे आवश्यक आहे) ज्यांना तरीही रुद्राक्ष हवाच आहे अशांनी २० तारखेच्या आत स्वतः प्रत्यक्ष कार्यालयात येऊन समक्ष स्वहस्ते रुद्राक्ष घेणे क्रमप्राप्त आहे. २० ऑक्टोबर हाच मुहूर्त पर्वणीचा आहे.

अत्यंत धनकारक, पत्रिकेतील नवम स्थान शुध्दीकारक म्हणजे भाग्योदयकारक, परदेशगमनासाठी सहाय्यक आणि अत्यंत लाभदायक असा हा रुद्राक्ष कोणत्याही स्त्रीपुरूषांसाठी, वयवर्षे ८ ते ८० वयोगटासाठी अत्यंत लाभदायक आहे. आरोग्याच् दृष्टीने हा संधीवात, अशांत मनःस्थिती, तणाव, पायांची दुखणी आणि आत्मविश्वासाची कमतरता असणाऱ्यांना हा रुद्राक्ष अतिशय शुभ आहे.

* मद्यपान कटाक्षाने वर्ज्य
* परपुरुष-परस्त्रीसंबंध कटाक्षाने वर्ज्य
* सरकारमान्य नसणारा कोणताही जुगार कटाक्षाने वर्ज्य (शेअर ट्रेडिंग चालेल)

(नऊमुखी रुद्राक्ष मर्यादित संख्येत उपलब्ध करुन देऊ शकत असल्याने आजच 9823124242 क्रमांकावर व्हॉटसअप मेसेज करुन ठेवा. किंमत आणि इतर बाबींची माहिती दिली जाईल)

लक्षात ठेवा.... नैसर्गिक, सर्टिफाईड आणि सुसंस्कारीत रुद्राक्षांसाठी फक्त आम्हीच.

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

19/08/2021

रुद्राक्ष निवड (भाग दुसरा) -

१) नोकरी करणारी मंडळी, क्लेरिकल जॉब, HR, Logistics क्षेत्रात नोकरी करणारी मंडळी 👉🏻 एकमुखी आणि दहामुखी रुद्राक्ष अतिशय लाभदायक ठरेल.

२) फायनान्स, इन्शुरन्स, आर्थिक देवाणघेवाण किंवा सर्व प्रकारच्या बँकिंग क्षेत्रात काम करणारी मंडळी, सरकारी नोकरी, उच्चपदस्थ अधिकारी, ॲडमिनिस्ट्रेशन क्षेत्रात कार्यरत असलेल्या मंडळींना 👉🏻 एकमुखी, अकरामुखी आणि चौदामुखी रुद्राक्ष अतिशय लाभदायक ठरेल.

३) संगीत आणि नृत्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळींना (Performing Arts) मी एक सुंदर कॉम्बिनेशन देतो ज्याला मी नाव दिलंय #गंधर्व_रुद्राक्ष 👉🏻 यात मधोमध एक सुंदर नऊमुखी रुद्राक्ष आणि त्याच्या दोन्ही बाजूला दोन चारमुखी रुद्राक्ष असं धारण करावं. या कॉम्बिनेशनमुळे कलाकार मंडळींना एकाचवेळी कलाक्षेत्र आणि आर्थिक लाभ व्हायला मदत होते.

४) वैद्यकीय क्षेत्रात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काम करणारी सर्व मंडळी म्हणजे डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, टेक्निशियन किंवा मानवी आरोग्याशी संबंधित क्षेत्रातील सर्व मंडळींनी 👉🏻 एकमुखी आणि बारामुखी रुद्राक्ष धारण करावा.

(क्रमशः)

नैसर्गिक, सुसंस्कारीत आणि सर्टिफाईड रुद्राक्षांसाठी फक्त आम्हीच... रुद्राक्षविषयक चौकशी, दरपत्रक आणि ऑर्डर नोंदणीसाठी 9823124242 क्रमांकावर व्हॉटसअप मेसेज करुन ठेवा.

जगात सर्वोत्कृष्ट रुद्राक्ष मिळण्याची ठिकाणे दोनच. एक #रुद्राक्षाचा_वृक्ष आणि दुसरे #सचिन_मधुकर_परांजपे

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

18/08/2021

रुद्राक्ष निवड -

१) विद्यार्थी, Intellectuals, शिक्षक आणि शिक्षणक्षेत्रातील मंडळी 👉🏻 एकमुखी, आठमुखी आणि अकरामुखी रुद्राक्ष अतिशय लाभदायक. वयाच्या आठव्या वर्षानंतर कोणीही विद्यार्थी मुलगा मुलगी आठमुखी रुद्राक्ष धारण करु शकतात.

२) ट्रॅव्हलिंग, ट्रान्सपोर्ट, वाहतूक दळणवळण, प्रवासी, सर्व्हिस इंडस्ट्री, फिरते एजंट्स, सेल्स मार्केटिंग क्षेत्रातील मंडळी 👉🏻 एकमुखी आणि नऊमुखी रुद्राक्ष अतिशय लाभदायक.

३) सर्व एकंदरीत व्यावसायिक, दुकानदार, इंडस्ट्रीएलिस्ट, उद्योजक, शेअर ट्रेडर्स, ब्रोकर्स, कमिशन एजंट्स 👉🏻 एकमुखी, अकरामुखी, बारामुखी आणि चौदामुखी रुद्राक्ष अतिशय लाभदायक.

४) अभिनेते, अभिनेत्री, कलाक्षेत्रात काम करणारी, कला हेच उदरनिर्वाहाचं साधन असणारी मंडळी, क्रिएटिव्ह आर्टिस्ट, टेलरिंग किंवा कापडक्षेत्रात काम करणारे 👉🏻 एकमुखी, बारामुखी रुद्राक्ष अतिशय लाभदायक.

५) फूड इंडस्ट्री, किराणामाल, हॉटेल व्यावसायिक, शेतकरी, यांना 👉🏻 एकमुखी, चौदामुखी, तेरामुखी अतिशय लाभदायक.

**एकमुखी रुद्राक्ष, दहामुखी रुद्राक्ष आणि अकरामुखी रुद्राक्ष हे इन जनरल लाभदायक ठरतातच. मद्यविक्री/दोन नंबर व्यावसायिकांनी रुद्राक्ष धारण न करता पत्रिकेनुसार सुयोग्य भाग्यरत्न धारण करावं. रुद्राक्ष धारणकर्त्यास मद्यप्राशन न करणे, परस्त्रीगमन व अनैतिक शारिरीक संबंध न ठेवणे आणि जुगार न खेळणे ही बंधने कटाक्षाने पाळावीच लागतात.

रुद्राक्ष हा पुरुष, स्त्री व तृतीयपंथी सर्वांनाच लाभदायक आहे. स्त्रीने मासिक पाळीच्या चार दिवसात रुद्राक्ष धारण करु नये हे उत्तम. केल्यासही हरकत नाही पण रुद्राक्षास अशौच नको ही भावना असावी....

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

अधिक माहितीसाठी 9823124242 क्रमांकावर त्वरीत एक चौकशीचा व्हॉटसअप मेसेज करुन ठेवा. सुसंस्कारीत, नैसर्गिक रुद्राक्षांसाठीही कधीही संपर्क साधावा.

(लक्षात ठेवा... जगात सर्वोत्कृष्ट रुद्राक्ष मिळण्याची ठिकाणे दोनच. एक #रुद्राक्षाचा_वृक्ष आणि दुसरे #सचिन_मधुकर_परांजपे)

रोगनाश, शत्रूपीडानाश आणि दारिद्र्यनाशक. श्रीहनुमंतांच्याकडे असणाऱ्या सर्व श्रेष्ठ गुणांनी युक्त असणारा “चौदामुखी रुद्राक...
09/08/2021

रोगनाश, शत्रूपीडानाश आणि दारिद्र्यनाशक. श्रीहनुमंतांच्याकडे असणाऱ्या सर्व श्रेष्ठ गुणांनी युक्त असणारा “चौदामुखी रुद्राक्ष”

चौदामुखी रुद्राक्ष काही “विशेष संस्कारांमुळे” पितृपक्षानंतरच पाठविण्यात येतील. पण बुकिंग लवकरच करावे ही नम्र विनंती आहे.

अस्सल, नैसर्गिक, सर्टिफाईड आणि मुख्य म्हणजे रुद्रयामल तंत्रानुसार सुसंस्कारीत रुद्राक्ष उपलब्ध असण्याचा एकमेव पर्याय म्हणजे “सचिन मधुकर परांजपे (पालघर)”

वरील रुद्राक्षाचे शुध्द चांदीत पेंडंट बनवून, त्यावर शिवतंत्रानुसार व विशिष्ट मंत्रांनी अभिमंत्रित व सुसंस्कार करुन आमचेतर्फे दिले जाईल. कुरिअरने रुद्राक्ष पोहोचविण्याची सोयही उपलब्ध्द आहे. अस्सल, ओरिजिनल, पूर्णत: निर्दोष आणि सुसंस्कारित रुद्राक्षांसाठी संपर्क साधावा....

९८२३१२४२४२...धंदेवाईकपणाऐवजी शुध्द व्यावसायिक निकषांवर अधिकाधिक उत्तम दर्जाचे रुद्राक्ष, लॅबोरेटरी सर्टिफिकेशन व क्षकिरण (X Ray) यांच्यासह अतिशय शुध्द सुसंस्कारांसह मिळण्याचे एकमेव ठिकाण....(लॅब सर्टिफिकेशनची व X Ray Report ची सोय केवळ आठमुखी रुद्राक्षांपासुन पुढे उपलब्ध्द आहे)

WhatsApp 09823124242




विशेष सूचना :- रुद्राक्ष धारणकर्त्यास मद्यपान न करणे, परस्त्रीगमन व अनैतिक शारिरीक संबंध न ठेवणे आणि जुगार न खेळणे ही बंधने कटाक्षाने पाळावीच लागतात....

Address

Palghar

Alerts

Be the first to know and let us send you an email when VaastuRaksha वास्तुरक्षा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share