26/02/2026
#माहिती ग्रहणकाळात होलिका दहन
आणि धुळवड कधी साजरी करावी.
हिंदू धर्मशास्त्रानुसार, येत्या 2 तारखेला होळी (Holi 2026) असणार आहे. तर, 3 तारखेला धुळवड म्हणजेच धूलिवंदन असणार आहे. मात्र, यंदा 3 तारखेला चंद्रग्रहण देखील लागणार आहे. त्यामुळे धुलिंवदनाच्या दिवशी होळी साजरी करावी का? चंद्रग्रहणाचा सूतक काळ भारतात देखील असणार आहे. त्यामुळे भारतात होळी, तसेच, धुळवड नेमकी कधी साजरी करायची या संदर्भात पंचांगकर्ते मोहन दाते यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे
त्यांच्या म्हणण्यानुसार यावर्षी 2 मार्च 2026 रोजी सोमवारी भद्रा असताना प्रदोष काळात होलिका दहन करावे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्च 2026 रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण असून मंगळवारी सूर्योदयापासून वेधकाळ सुरु होणार आहे. वेधकाळात पौर्णिमेचा कुळधर्म, पूजा-अर्चा, अभिषेक करता येईल. देवाला नैवेद्य दाखविता येईल. वेधामध्ये पूजन निषेध नाही. वृद्ध, अशक्त, आजारी, गर्भवती यांना सकाळी 11 पर्यंत अन्नपदार्थ खाता येतील. गुरुजी किंवा सुवासिनी यांना कोरडा शिधा आणि दक्षिणा देऊन कुळधर्म करता येईल.
चंद्रग्रहणाचा सूतक काळ भारतात देखील असणार आहे.. वर्षातील पहिले पूर्ण चंद्रग्रहण फाल्गुन पौर्णिमेच्या शुभ प्रसंगी, धुलिवंदनच्या दिवशी होईल. हे चंद्रग्रहण 3 मार्च 2026 रोजी दुपारी 2:17 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 7:53 वाजता संपेल, जे कुंभ राशीत होईल. यावेळी ग्रहांची स्थिती काही राशींसाठी लाभदायी ठरु शकते. त्यामुळे 3 मार्च 2026 रोजी जरी चंद्रग्रहण असले तरी तुम्ही धुळवड खेळू शकता असे पंचांगकर्ते मोहन दाते सांगतात.
MADHURI’ ASTROLOGY.