Udyog Guruschool - Ecosystem

Udyog Guruschool - Ecosystem Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Udyog Guruschool - Ecosystem, Business Center, Pune.

६) कमी वेळ, कमी मेहनत, जास्त नफा! "मी ३ महिन्यातच बाळाला जन्म देणार आणि ते ही जुळ्या आणि ते ही वेदने विरहीत, कोणत्याही त...
09/08/2022

६) कमी वेळ, कमी मेहनत, जास्त नफा!
"मी ३ महिन्यातच बाळाला जन्म देणार आणि ते ही जुळ्या आणि ते ही वेदने विरहीत, कोणत्याही त्रासाशिवाय."
कधी कोणी ऐकले वा पाहिले आहे का की एखाद्या गर्भवती महिलेने हे विधान केलेले...
हसू आले ना.
मग उद्योग उभारणे हे एखाद्या बाळाला जन्म देण्यासारखेच नाही का?
त्यामुळे व्यवसायात कमी वेळेत वा कमी मेहनतीत जास्तीत जास्त नफा असे काही नसते.
तर निर्धारित वेळेत आणि योग्य मेहनतीत रास्त, शाश्वत नफा हे खरे सूत्र आहे.
कारण ज्या गोष्टीला जितका वेळ लागणार आहे, तितका वेळ लागणारच.
आणि मेहनतीला दुसरा पर्याय नसतोच मुळी.
नाहीतर बिल गेट्स वा तत्सम उद्योजकांना काय वेड लागले आहे का १८-१८ तास काम करायला?

बरेच जण यासाठी व्यवसायात येतात ते करोडपती होण्याचा राजमार्ग समजून.
हे खरे जरी असले तरी याचा अर्थ हा नाही की कमी वेळेत कमी मेहनतीत तुम्ही अंतिम रेषेपर्यंत पोहोचाल जिथे सर्व सुख, ऐश्वर्य तुमची वाट पाहत बसले आहे.
There is no short cut and short time to reach success.
तेव्हा घरबसल्या उद्योग करा, फक्त चारच तास काम करून करोडपती व्हा, असल्या भूलथापांना कृपया बळी पडू नका.
उद्योग करणे हे फुल टाईम वा पार्ट टाईम काम नसून ते लाईफ टाईम काम आहे.
ते हार्ड वर्क वा स्मार्ट वर्कच्या पलीकडचे "हार्ट वर्क" असते.

कारण उद्योगात तुम्ही येता तेव्हा कशाची तरी निर्मिती करत असता, - सिस्टिम्स, प्रोसेसेस, प्रोडक्ट्स, सर्व्हिसेस इ. ,
आणि यात पदोपदी धोके असतात.
ज्यातून पुढे जात तुम्हाला तुमचा उद्दयोग वाढवायचा असतो.
मग जर तुम्हाला कठोर परिश्रम करायला आवडत नसेल, ते जमत नसेल तर तुमची पत, तुमची धारच तुम्ही गमावून बसता.
आणि मग एक दिवस कोणीतरी येते आणि तुमची बाजारपेठच हस्तगत करते.
कारण तुम्ही निर्धास्त, बेसावध असता, आपली धार गमावून बसलेले असता.
आणि यातले बरेचसे हे आळसप्रिय प्राणी असतात. (उद्योजक आळशी असू शकतो का? यावर पुढील एखाद्या लेखात उपरोक्त माहिती दिली जाईल)

जर तुम्हाला जाणून घ्यायचे आहे की तुम्ही उद्दयोग करू शकता की नाही तर आधी हे जाणून घ्या की तुम्ही आठवड्याला कमीत कमी ८० तास काम करू शकता का नाही?
आणि जर करू शकत नसाल तर तुम्ही प्रगतीशील उद्योजक बनू शकत नाही.
जर तुम्ही फक्त ९ ते ५ वा १० ते ६ याच वेळेत काम करू शकता तर तुम्ही नोकरीच करावीत.
आणि जे नोकरी करत आहेत आणि व्यवसायात येऊ पाहत आहेत त्यांनी आधी आपल्या नोकरीच्या जागी आठवड्याला ८० तास काम करून पाहावे.
आणि मग बघा काय जादू होते ते!
पहिले तर तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता वधारते.
आणि तुमच्या C. E. O. वा Directors सोबत ओळख वाढते.
जेव्हा C. E. O. वा Directors तुम्हाला रोज रात्री उशीरापर्यंत काम करताना पाहतात.
त्यांच्या आधी आलेले पाहतात.
त्यांच्याही लक्षात येते की ही व्यक्ती प्रचंड मेहनती आहे.
ही इतरांपेक्षा वेगळी आहे.
कामाप्रती नैतिकता (WORK ETHICS) याच्यात आहे.
काय सांगो की एखाद्या नवीन प्रोजेक्टची जबाबादारी आणि त्यात भागीदारी तुम्हाला मिळो.
तर मग निदान पुढचे १२ ते २४ महिने आठवड्याला ८० तास काम करून पहा आणि बघा बदल्यात काय निर्माण होते - तुमच्या आत आणि व्यवसायात.

ज्यापद्धतीने आपण मागे आपल्या पैशाचा ताळेबंद लिहून काढला, त्याचपद्धतीने आपल्या वेळेचा जमाखर्च लिहून काढा.
पुढचे ३० दिवस check करा की तुमचा वेळ खालील पैकी कुठे गेला आणि काय तो productive होता?

1) Important (गरजेचे आणि महत्वाचे): Do it now
2) Desirable (हवेहवेसे आणि आवडीचे): Decide when to do it and do it at that time only
3) Not important and desirable (नकोसे): Delegate it
4) Time thief (वेळ चोर): Dump it

क्रमशः
उद्योगायण

उद्योगात (आ)राम भेटावा यासाठी आधी उद्योगाच्या, उद्योजकाच्या शत्रूचे हे दहा शीर कापावे लागतील.

याआधीचे 5 शीर आणि यापुढचे 4 शीर समजून घेण्यासाठी ह्या पेजला व्हिजिट करा आणि लाइक करा.

All rights are reserved. Violation of copyright will result in to legal action.

५) एकला चलो रे...‘झुंड मे तो सुअर आते है, शेर तो अकेला आता है...’ हे असले डायलॉग चित्रपटातच (रील लाईफ) चांगले वाटतात. प्...
30/07/2022

५) एकला चलो रे...

‘झुंड मे तो सुअर आते है, शेर तो अकेला आता है...’ हे असले डायलॉग चित्रपटातच (रील लाईफ) चांगले वाटतात.
प्रत्यक्ष आयुष्यात (रीअल लाईफ) मात्र वाट लावतात.
कारण मनुष्य हा समाजप्रिय आणि कळपातच राहणारा प्राणी आहे.
व्यावसायिक आयुष्यातले यश आणि वैयक्तिक आयुष्यातला आनंद हा प्रामुख्याने तुमचे संपर्क, नातेसंबंध यावर जास्त अवलंबून असतो.
Your Net-work decides your Net-worth.

तुम्ही कोणत्याही व्यवसायात वा क्षेत्रात असा आणि व्यवसायातील कोणत्याही टप्प्यावर/पायरीवर (व्यवसायातील विविध टप्पे / पायर्‍या यावर पुढील वेळेस विस्ताराने बोलू), - तुमची संपर्क यंत्रणा, तुमची ओळख यावर तुमची देखील पारख होत असते.
तेच तुमच्यासाठी सर्वात जास्त महत्वाचे आहे.
मी आणि माझे व्यावसायिक भागीदार , आमच्यात बर्‍याच वेळेस ही चर्चा होते, की कसे कोण कोण व्यक्ति आम्हाला भेटत गेल्या आणि त्यातून कशा, कोणत्या आणि किती संधी उभ्या राहिल्या.
आणि आम्हाला हे प्रकर्षाने जाणवले की आम्ही जी काही प्रगती केली त्यात आम्ही आधीपासून करत गेलेल्या ओळखी, जपलेली नाती, जोडलेले संपर्क यांचा महत्चाचा वाटा आहे.
(संपर्क कसे असावेत हे जाणण्यासाठी या लेखातील बिझनेस सारथीच्या उद्योग गुरुस्कुल पेजवरील ४ था शीर 'संगत' हा लेख वाचणे)

मला सांगायचे हे आहे की आपल्या ओळखी वाढवा, संपर्क जोडा, संपर्क यंत्रणेत सहभागी व्हा.
वेगवेगळे बिझनेस क्लब जॉईन करा.
आम्ही देखील ‘बिझनेस महारथी असोसिएशन’ हा व्यावसायिकांसाठी बिझनेस क्लब सुरु केलेला आहे.
जिथे आठवड्यातून एकदा वेगवेगळ्या क्षेत्रातले उद्योजक एकत्र येऊन विचारांची, ज्ञानाची, अनुभवांची तसेच आपापल्या संपर्काची देवाणघेवाण करतात.
आणि इथे बिझनेस सारथीच्या माध्यमातून उद्योग कौशल्यावर विविध मार्गदर्शन सत्र आयोजित केले जातात आणि ते ही पूर्णत: मोफत.
कारण अनुभवातून आम्ही हे निश्चित सांगू शकतो की तुमची कधी कोणाशी ओळख होईल आणि ती तुम्हाला वा तुमच्या उद्दयोगाला कुठल्या कुठे घेऊन जाईल हे सांगता देखील येणार नाही.

काही उद्योजक होऊ पाहणारे तरूण उत्साही मुले जेव्हा मला विचारतात की दादा, माझ्या व्यवसायात गुंतवणूक करेल असे गुंतवणूकदार (Venture capitalist, investors) कुठे आणि कसे शोधायचे?
आणि माझे उत्तर असते, एक यादी बनवा ज्यांना तुम्ही आज ओळखता त्यांची आणि माहिती काढा की ते कोणाकोणाला ओळखतात.
जर तुम्ही व्यवसायाची सुरुवात करत आहात तर उद्योग बांधायच्या, जोडायच्या आधी ओळखी, संपर्क जोडा.

तुमच्या ओळखीतील श्रीमंत लोकांची यादी
१)
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)

५ बिझनेस क्लब जे तुम्ही join करणार आहात
१)
२)
३)
४)
५)

उद्योगायण

उद्योगात (आ)राम भेटावा यासाठी आधी उद्योगाच्या, उद्योजकाच्या शत्रूचे हे दहा शीर कापावे लागतील.

याआधीचे 4 शीर आणि यापुढचे 5 शीर समजून घेण्यासाठी ह्या पेजला व्हिजिट करा आणि लाइक करा.

All rights are reserved. Violation of copyright will result in to legal action.

उद्योगायणउद्योगात (आ)राम भेटावा यासाठी आधी उद्योगाच्या, उद्योजकाच्या शत्रूचे हे दहा शीर कापावे लागतील.४) संगत जसा संग तश...
23/07/2022

उद्योगायण

उद्योगात (आ)राम भेटावा यासाठी आधी उद्योगाच्या, उद्योजकाच्या शत्रूचे हे दहा शीर कापावे लागतील.

४) संगत

जसा संग तशी गत, म्हणून तुमचे भविष्य ठरवते तुमची संगत.
असे म्हणतात की ‘you are the average of the person you spend time with’.

तुमचे उत्पन्न, तुमचा टर्न ओवर यावर सातत्याने तुमच्या आजुबाजुला असणार्‍या लोकांचा खूप प्रभाव पडत असतो.
त्यातल्या त्यात तुमचे जवळचे मित्र, उद्योग मित्र आणि तुमचे उद्दयोग प्रशिक्षक.
उद्योजकीय मानसिकता वा वैयक्तिक विकासासाठी जरी तुमच्या प्रशिक्षकाचे एक उत्तम प्रशिक्षक असणेच गरजेचे असले तरी ‘व्यावसायिक वा उद्योगातील प्रगतीसाठी तुमचा उद्योग प्रशिक्षक हा स्वतः उद्योजकच असणे क्रमप्राप्त आहे.’
त्यामुळे उद्योजकांबरोबर काम करा. CEO, MD सोबत वेळ घालवा. सावलीप्रमाणे त्यांचा पिच्छा पुरवा.
बघा ते काय करतात, त्यांच्यात काय वेगळेपण आहे.

मी त्या उद्योजकांबाबत बोलत आहे जे आजही जोमाने व्यवसायात कार्यरत आहेत.
फक्त ते उद्योजक नाही जे आधीच स्थिरस्थावर झालेले आहेत, प्रचंड पैसे कमवत आहेत, ज्यांनी आधीच आपले लक्ष्य साध्य केले आहे आणि काही निवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत वा दिवसातून फक्त दोनच तास काम करतात.
या उद्योजकांसोबतच किंबहुना त्याहुनही महत्वाचे, त्या उद्योजकांपासूनही शिकणे आवश्यक, अत्यावश्यक आहे...
‘ज्यांची भूक प्रचंड आहे. भव्य दिव्य स्वप्नं आहेत. जे मार्गस्थ आहेत. जे लक्ष्यपथिक आहेत.
जे आजही आठवड्याला ८० ते १०० तास काम करतात.
जे प्रवासात आहेत एक शोधक म्हणून.
कारण त्यांना माहित आहे ‘त्यांनी तसे नाही केले’ तर ते व्यवसायातून बाहेर फेकले जातील.’
तेव्हा अशा उद्योजकांपासूनच आपण जास्तीत जास्त शिकत असतो.

५ वर्षांपूर्वी माझ्या सेमिनार नंतर मला एका होतकरू, चाणाक्ष, उत्साही तरूणीचा फोन आला, तीने मला अशा ३ स्थिरस्थावर यशस्वी उद्योजकांविषयी सांगितले ज्यांना ती ओळखते. ज्यांना इंडस्ट्रीमध्ये ३० वर्षांपेक्षा जास्त अनुभव होता.
तीने मला विचारले, ‘दादा, तुम्हाला काय वाटते की. मी कोणासोबत काम करू?’ मी तीला उत्तर दिले, ‘माझ्यासोबत.’
तीने मला विचारले ‘दादा, तुम्हीच का?.’ मी म्हणालो ‘१००% मीच.’ तीने मला परत विचारले, ‘तुम्हीच का?’
मी तीला बोललो, ‘ तुला अशा लोकांसोबत काम करायचे आहे वा शिकायचे आहे, जे तुला ‘कथा’ सांगतील की ३० वर्षांपूर्वी ते जेव्हा काम करत होते तेव्हा ते काय करायचे? का अशा व्यक्तिंसोबत जे आजही आजच्या काळाच्या आव्हानांसोबत भिडत पुढे पुढे जात आहेत.
आम्ही त्या व्यक्ति आहोत.
तु तात्काळ आमच्यासोबतच काम केले पाहिजे.’
आठवड्यातच आमची मिटिंग झाली.
तीने माझ्या सोबत काम करायला सुरुवात केली. आणि आज ५ वर्षातच तीची स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरु झाली आहे.

तेव्हा उद्योजकांबरोबर काम करा.
उद्योजकतेचे धडे घ्या आता... उद्योजकांकडूनच.
अशा १० यशस्वी उद्योजकांची यादी बनवा ज्यांच्या संगतीत तुम्ही पुढच्या १२ महिन्यात जास्तीत जास्त काळ घालवणार आहात...
१)
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)

तुमचा
बिझनेस सारथी

क्रमशः

( उद्योजकांच्या शत्रूचे याआधीचे 3 शीर समजून घेण्यासाठी ह्या पेजला लाईक करा.)

All rights are reserved. Violation of copyright will result in to legal action.

३) स्वयंकेद्रीतएकदा एका प्रतिष्ठित MBA कालेजची मुले आमच्याकडे एका इव्हेंटसाठी स्पॉन्सरशीप संदर्भात भेटायला आली. अगदी टाप...
20/07/2022

३) स्वयंकेद्रीत

एकदा एका प्रतिष्ठित MBA कालेजची मुले आमच्याकडे एका इव्हेंटसाठी स्पॉन्सरशीप संदर्भात भेटायला आली.
अगदी टापटीप असणारी आणि उत्तम इंग्रजीतही बोलणारी ती मुलं, त्यांनी त्यांचा लॅपटॉप उघडला आणि आपल्या प्रपोजलचे सादरीकरण करत, पुढची साधारणतः २० मिनिटे तीच बोलत होती.
मी त्यांना काय म्हटले असेल?
मी त्यांना स्पष्ट बोललो ‘तुमची MBA ची दोन वर्षे फुकट गेली.’
ते म्हणाले ‘तुम्हाला नक्की म्हणायचे काय आहे?’ (What do you mean?)
मी म्हणालो, ‘गेली २० मिनिटे तुम्ही बोलत आहात, तुम्ही मला एकही प्रश्न विचारला नाहीत, मी समोर होतो तुमच्या, तरी देखील ऐकीव माहीतीवर अवलंबून, तुम्ही माझे, माझ्या कंपनीचे Need Analysis च केले नाहीत, तुम्ही फक्त बोलताय, बोलताय, बोलताय.
म्हणून तुमचा व्यवसाय चालणार नाही जर तुम्ही फक्त स्वतःचाच तुणतुणा वाजवत राहणार.

*जर तुम्हाला प्रश्न विचारता आले नाही, समोरच्या व्यक्तिवर, त्यांच्या अडचणींवर लक्ष केंद्रीत करता आले नाही तर तुमचे लक्ष्य साध्य होणार नाही.*
तुम्ही तो GAP भरू शकणार नाही.
आणि कोणत्याही व्यवसाय, उत्पादन वा सेवेची निर्मिती व वाढ ही GAP Analysis मधूनच होत असते.
आणि त्यासाठी गरज आहे *‘कसे प्रश्न विचारावे’ आणि ‘प्रश्न कसे विचारावेत’ हे शिकण्याची, विक्रीची कला शिकण्याची.’*

आज गरज आहे ‘आपल्या उत्पादन वा सेवा यांच्या फक्त प्रेमात न पडता,’ ते *उत्पादन वा सेवा ‘समोरच्याची अडचण कशी दूर करू शकतील,’ यावर लक्ष केंद्रीत करण्याची.*
आणि विक्री म्हणजे आपले प्रॉडक्ट, सर्व्हिसेस यांचे आपल्या ग्राहकाशी लग्न लावणे.
तेव्हा विक्री करण्यासाठी कोणत्या प्रकारचे, कसे प्रश्न विचारावेत यासाठी विक्रीवरची पुस्तके वाचा, सेमिनार्स, वर्कशॉप्स अटेंड करा.
*स्पिन सेलिंग, स्पॅन्को, आयडा, बी व्हिव्हिआयपी, चॅलेन्जर सेल्स* ह्या आणि अशा विविध सेल्स टेक्निक्स बदद्ल जाणून घ्या.
आपल्या कोर टिम ला याचे प्रशिक्षण द्या.
आणि त्याला त्याच्या हाताखालील लोकांना ते शिकवायला लावा.
आपल्या कंपनीत सेल्स ट्रेनिंग सिस्टिम्स सेट करा.
हा खूप मोठा गैरसमज आहे की फक्त सेल्स व मार्केटिंग डिपार्टमेंटच विक्री साठी जबाबदार आहे.
तुमच्या back office पासून सगळे department हे directly and indirectly विक्री साठी जबाबदार असतात.

तुमचे *customer हे तुमचे raving fan* कसे बनतील यासाठी (यावर एखादा आर्टिकल लवकरच...) सातत्याने आपल्या staff ला प्रशिक्षित करणे गरजेचे आहे.
या वर्षात आपण कोणती विक्रीवरची कोणती पुस्तके वाचणार आहात त्यांची यादी बनवा.
कमीतकमी १२ पुस्तके पुढील १२ महिन्यात , आणि QUARTERLY १ सेमिनार असे १२ महिन्यात 4 सेमिनार्स अटेंड करा.

कारण
*व्यवसाय वाढत नाही...*
*जोपर्यंत विक्री घडत नाही,*
*विक्रीत सातत्य असेल*
*तर व्यवसायिक रडत नाही.*
Because
nothing, nothing, nothing
happens in business until sales takes place.

पुस्तकांची यादी:
१)
२)
३)
४)
५)
६)
७)
८)
९)
१०)
११)
१२)
सेमिनार्स
१)
२)
३)
४)

तुमचा
बिझनेस सारथी

क्रमशः

*(मार्केटिंग आणि सेल्सवर आधारित सर्वोत्तम पुस्तकांची यादी आणि उत्तरोत्तर सल्ला, मार्गदर्शन हवे असल्यास ह्या पेजला लाईक करा आणि आपला इमेल आयडी कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा.)*

All rights are reserved. Violation of copyright will result in to legal action.

उद्योगायणउद्योगात (आ)राम भेटावा यासाठी आधी उद्योगाच्या, उद्योजकाच्या शत्रूचे हे दहा शीर कापावे लागतील.२) खर्च, खर्च , खर...
19/07/2022

उद्योगायण

उद्योगात (आ)राम भेटावा यासाठी आधी उद्योगाच्या, उद्योजकाच्या शत्रूचे हे दहा शीर कापावे लागतील.

२) खर्च, खर्च , खर्च
एक छोटे छिद्र देखील महाकाय जहाजाला बुडवू शकते.
भारतात आघाडीवर असणार्‍या एका बॅंकेच्या सर्वोच्च अधिकार्‍याला जेव्हा त्यांच्या यशाचे रहस्य विचारले गेले तेव्हा त्यांनी सांगितले की, ‘आम्ही घातलेला खर्चाला आळा हेच आमच्या यशाचे गुपीत आहे.
अगदी एक एक पैशाचा आम्ही हिषोब ठेवला.
विचार करा रोज जर एका कस्टमर मागे एका पैशाचा अपव्यय होत असेल असे संपूर्ण एक वर्ष म्हणजे ३६५ दिवस, ३६५ पैसे, असे दहा वर्षे, ३६५० पैसे. म्हणजेच ३६ रू. ५० पैसे. भारताच्या लोकसंख्येपैकी जर १ टक्का म्हणजेच १ करोड ग्राहकांमागे असाच जर अपव्यय होत असेल. तर जवळजवळ ३६ करोड ५० लाखाचा अपव्यय. आणि हेच पैसे जर वाचवले तर...’
बॅंक एक एक पैशाचा विचार करते म्हणूनच बॅंक श्रीमंत होत जाते आणि बॅंकेत पैसे ठेवून खर्चावरती दुर्लक्ष करणारे मात्र गरीब होत जातात.
म्हणून राऊंड फिगरच्या नादात न पडता खर्चावर आळा घाला आणि आपला एक एक पैसा वाचवा.
असे म्हटले जाते एक उत्तम CEO होण्यासाठी तुम्हाला balance sheet बनवता येणे गरजेचे नाही, पण जर तुम्हाला balance sheet वाचता पण येत नसेल तर तुम्ही फार काळ CEO या पदावर राहू शकत नाही.
मी बरेच असे उद्योजक पाहिले आहेत ज्यांना आकडे आवडत नाही, हिशोब, जमा खर्च शिल्लक या विषयांपासून ते दूर पळतात.
मला त्यातले काही कळत नाही ह्याचा नारा लावताना दिसतात.
पण "उद्योग म्हणजे आकडे."
तुमचे वैशिष्ट्य काहीही असो, तुमचे passion, skill set काहीही असो, उद्योगात आहात तर तुम्हाला आकड्यांची भाषा जमलीच पाहिजे.
त्यासाठी तुम्हाला accounting चा course करण्याची गरज नाही. खरे तर तुम्हाला फक्त financial statements वाचता आले पाहिजे.
Cash flow काय असतो आणि तो कसा आहे हे कळले पाहिजे, बस.
तुमचे input किती आहे, आणि output किती निघत आहे, निघाले पाहिजे, input मध्ये होणारा अपव्यय (खर्च) कुठे कुठे टाळता येईल, कमी करता येईल, आणि output हे input च्या तुलनेत जास्तीत जास्त कसे निघेल याची आकडेमोड आपल्याला जमली पाहिजे.
उद्योगातील खर्च हे दोन प्रकारात मोडतात. पहिला कायमस्वरूपी (fix cost) आणि दुसरा बदलत राहणारा(variable cost).
(तब्बल 20 प्रकारचे खर्च कोणत्याही व्यवसायात असतात. त्याबद्दल पण एखादी सविस्तर पोस्ट येईलच.)
पहिला खर्च हा तुमची विक्री हो अथवा ना हो, तुमचे मीटर चालू राहते.
दुसरा हा तुमची विक्री झाल्यानंतरचा खर्च. तुमचे दोन्ही प्रकारचे खर्च लिहून काढा.
कुठे कुठे बचत (cost cutting) करता येईल ते लिहून काढा.
त्याचबरोबर होणार्‍या खर्चाच्या बदल्यात तुमचे output चे target काय आहे ते लिहून काढा.
त्याचबरोबर २ वर्षाचा तुमच्या व्यवसायातील खर्च हा बाजूला पडला पाहिजे. तो हि लिहून काढा.
त्याला ६ महिन्यात विभागून पुढच्या ६ महिन्यातच तो बाजूला काढा आणि एका सेफ investment मध्ये (liquid assets) गुंतवून ठेवा.

Fix Itom cost cost cutting
1) Rent 1 lakh
2)
3)
4)
5)
Varibale Itom cost cost cutting
1) New year gifts 50,000/- 25,000/-
2)
3)
4)
5)

Total expense :---------------------------

Target amount :---------------------------

2 years expense amount :-------------------

All rights are reserved. Violation of copyright will result in to legal action.

उद्योगायणउद्योगात (आ)राम भेटावा यासाठी आधी उद्योगाच्या, उद्योजकाच्या शत्रूचे हे दहा शीर कापावे लागतील.१) शंका ‘हा व्यवसा...
17/07/2022

उद्योगायण

उद्योगात (आ)राम भेटावा यासाठी आधी उद्योगाच्या, उद्योजकाच्या शत्रूचे हे दहा शीर कापावे लागतील.

१) शंका
‘हा व्यवसाय चालेल का?
मंदीचा मलाही फटका तर बसणार नाही ना?
मी व्यवसायात उतरून चुक तर नाही ना केली?
स्पर्धेत माझा निभाव खरच लागेल का?’
वगैरे वगैरे असे शंका उपस्थित करणारे प्रश्न
जर सतत तुम्हाला पडत असतील,
तर माफ करा,
व्यवसायाचा मार्ग हा आपला मार्ग नाही.
असे म्हणतात की,
जेवढे काही यशस्वी उद्योजक झाले,
त्यांचा व्यवसाय सुरु करतानाचा ‘उत्साह आणि (आपल्या उत्पादन आणि सर्व्हिसेसवरचा, स्वतःवरचा) विश्वास’
हा व्यवसायाच्या वाटेवर चालताना, ह्या वाटेवरचे चढ आणि उतार दोन्ही पार करताना देखील तसूभरही कमी झाला नाही.
किंबहुना पडतीच्या, स्पर्धेच्या काळात तर त्यात उत्तरोत्तर वाढच होत गेली.
कारण व्यवसायाच्या जगात तुमच्या बरोबर फक्त तुमचा विश्वासच असतो.
प्रत्येक जण तुम्हाला येऊन सांगत नाही की, ‘तुम्ही, तुमची कल्पना किती जबरदस्त आहे.’
उलट लोक येऊन तुम्हाला ‘तुम्ही हे कसे करू शकणार नाही, तुमच्यात काय काय कमतरता आहेत,’ हेच पुढे पुढे येऊन सांगत राहतात.
क्षेत्र कोणतेही असो,
त्यातल्या त्यात व्यवसायाच्या क्षेत्रात,
जर तुम्ही प्रथमच उतरत आहात अथवा एखादी नवीन कल्पना प्रथमच अंमलात आणत आहात
तर लोक प्रथम शंकाच घेणार.
पण जर तुम्ही त्या ‘शंकेवरती विश्वास’ ठेवलात आणि स्वतःच्या ‘विश्वासावरती शंका’ घेतलीत,
तर तुम्ही आणि तुमचा उद्योग, बुडालाच म्हणून समजा.
व्यवसायाच्या समुद्रातील मोती तेव्हाच हाती लागतात जेव्हा तुम्ही लोकांच्या
‘शंकेवरेती शंका’
आणि स्वतःच्या
‘विश्वासावरती विश्वास’
ठेवाल.
आपला विश्वास म्हणजेच आपल्या समजुती.
आणि कोणतीही गोष्ट आपण साध्य करू शकतो की नाही हे आपल्या समजुतीच ठरवतात.
यशस्वी उद्योजकांना स्वतःबद्दलच्या व जगाबद्दलच्या त्यांच्या समजुती इतरांपेक्षा वेगळे ठरवितात.
ज्याप्रमाणे संगणकामध्ये windows ही operating system असते. त्याचप्रमाणे मेंदूची operating system ही समजुत असते.
आणि आपल्या समजुतीच ठरवतात आपल्याला स्वतःपासून काय अपेक्षा असल्या पाहिजेत व आपल्याला काय प्राप्त होईल?
आपल्या समजुती आपण जर बदलल्या तर आपल्याला हवंय ते नक्कीच आपण साध्य करू शकतो.
आत्तापर्यंतच्या समजुती आपल्याला तेच मिळवून देतील जे आत्तापर्यंत आपल्याला मिळतं होतं.
आधी कधीच न मिळालेलं मिळविण्यासाठी आपल्याला आपल्या समजुती बदलणे गरजेचे आहे.
स्वतःला प्रश्न विचारा
तुम्हाला जे हवे आहे ते साध्य करण्यासाठी कोणत्या समजुती आत्मसात करणे आवश्यक आहे?
ते लिहून काढा
यशस्वी उद्योजक होण्यासाठी आवश्यक सकारात्मक समजुती
: माझा जन्म यशस्वी उद्योजक होण्यासाठीच झाला आहे.
:---------------------------------------------------------------------
:---------------------------------------------------------------------
:---------------------------------------------------------------------
:---------------------------------------------------------------------
:---------------------------------------------------------------------
:---------------------------------------------------------------------
:---------------------------------------------------------------------
• ठरवलेल्या समजुतींचे सकारात्मक व वर्तमानकाळातेल वाक्य तयार करा
व ते लिहून काढा.
• सकारात्मक समजुतींची यादी बनवा.
• रोज सकारात्मक समजुतींचे वाचन करा.
• सकारात्मक समजुती वाचत असताना तीव्र भावनांनी त्या अनुभवा.

(क्रमशः....)

All rights are reserved. Violation of copyright will result in to legal action.

प्रिय उद्योजकहो,आपण दिलेल्या भरघोस प्रतीसाधाबद्दल धन्यवाद.ज्यांनी अजूनही नाव नोंदलेले नसेल त्यांनी कृपया खालील लिंक वर आ...
17/07/2022

प्रिय उद्योजकहो,
आपण दिलेल्या भरघोस प्रतीसाधाबद्दल धन्यवाद.
ज्यांनी अजूनही नाव नोंदलेले नसेल त्यांनी कृपया खालील लिंक वर आपले नाव नोंदवणे जरुरी आहे.

20@Chinchwad-Pune" rel="ugc" target="_blank">https://wa.me/+919307376325?text=Confirm%20My%20seat%20for%20*Business%20Manthan*%2024july2022%20Sunday%20Time-10amTo1pm%20@Chinchwad-Pune

Address

Pune
411041

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Udyog Guruschool - Ecosystem posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Udyog Guruschool - Ecosystem:

Share