02/08/2020
रक्षाबंधन :- मुहूर्त, विधी - पद्धती, परंपरा
नारळी (श्रावण) पोर्णिमा
ॐ येन बद्धो बली राजा, दानवेन्द्रो महाबलः |
तेन त्वामपी प्रति बध्दनामि रक्षे, माचल माचल ||
* मुहूर्त :-
दिनांक:- ३ऑगस्ट २०२० वार:- सोमवार
सकाळी ०९ .२७ ते रात्री ०९ . ११
यावेळेस राखी बांधण्यासाठी शुभ वेळ
( राहु काळ :- सकाळी ०७ .३० ते ०९ .०० या वेळेत शुभ कार्य वर्जित केले आहे. )
* विधी, पद्धती :-
* स्वच्छ अंघोळ करुन, घर स्वच्छ करावे.
* तांदुळ, सुती कापड, यासोबत पुजा थाळीत दिवा लावावा, मिठाई ठेवावी.
* भावाला आंब्याच्या लाकडी पाटावर पुर्वाभिमुख बसवावे.
* भावाला टिळा लावताना बहीणीचे तोंड पश्चिम दिशेकडे असावे .
* यानंतर भावाच्या कपाळी टिळा लावुन डाव्या हाताला रक्षासुत्र ( राखी ) बांधावी .
* राखी बांधताना शास्रानुसार पुढील मंत्रजाप केल्याने अधिक शुभफळ मिळते.
ॐ येन बद्धो बली राजा, दानवेन्द्रो महाबलः |
तेन त्वामपी प्रति बध्दनामि रक्षे, माचल माचल ||
* राखी बांधल्यावर बहिणींने भावाची आरती ओवाळून भावाला मिठाई भरवावी .
* बहीण भावापैक्षा मोठी असल्यास भावाला आशिर्वाद द्यावा आणि छोटि असल्यास प्रणाम करुन आशिर्वाद घ्यावा .
* परंपरा :-
१} राजा बळी आणि रक्षाबंधन :-
स्कंध पुर्ण, पद्मपुराण, श्रीमदभागवत मधे वामनावतार कथा संदर्भ आहे. दानशुर बळी राजाची परीक्षाहेतु भगवान विष्णूंनी वामनावतार घवुन ब्राम्हण वेशात तीन पाऊले जमीन भिक्षा मागीतले आणि तीन पाऊलात पृथ्वी, आकाश, पाताळ व्यापले राजा बळीने आपल्या भक्तीने भगवान रात्रंदिन समीप राहवे वचन मिळवले. भगवानांना परत आणण्यासाठी नारदाने लक्ष्मीला उपाय सांगितला त्यावरुन लक्ष्मी राजा बळी ला राखी बांधुन आपला भाऊ बनविले आणि पती भगवान विष्णुंना परत आपल्यासोबत आणले. त्या दिवशी श्रावण मासातील पोर्णिमेची तिथी होती.
२} राणी कर्णावती आणि रक्षाबंधन :-
मध्ययुगात चित्तोडची राजपूत विधवा राणी कर्णावती ने गुजरातचे सुलतान बहादुर शहा कडुन प्रजेचे रक्षण करण्यासाठी हुमायूला राखी पाठवली , हुमायूने कर्णावतीला बहीणीचा दर्जा देवुन रक्षण केले.
३} महाभारत आणि रक्षाबंधन :-
राजा शिसुपालाचा वध करताना युद्धात भगवान श्रीकृष्णाच्या डाव्या हाताच्या बोटातुन रक्त येवु लागल्याचे पाहुण द्रौपदीने साडीचा तुकडा फाडुन बोटावर बांधला ज्यामुळे रक्त येणे थांबले तेंव्हा पासुन भगवान श्रीकृष्णाने द्रोपदीचा बहीण म्हणुन स्विकार केला. यानंतर पांडव जुगारात द्रौपदीला हिरले. भर सभेत द्रोपदीचा कौरवांकडुन अपमान होत असताना भगवान श्रीकृष्णाने द्रोपदीचे लज्जारक्षण केले.