13/07/2026
असे कोणते काम आहे जे कोणत्याही परिस्थितीत सुरू राहील? ते करतांना आनंद मिळेल आणि लोकांचा फायदा होईल आणि सोबतच मला सुद्धा पैसे मिळतील?
असा प्रश्न काही वर्षापूर्वी मला पडला होता आणि त्यातून इतरांना शिकवायची सुरुवात झाली.
ऑनलाइन काय असते कसे असते हे बिल्कुल माहिती नव्हते ऑफलाइन प्रोग्राम करण्यासाठी पैसे नव्हते..
पण covid काळामध्ये ऑनलाइन फार सुरू झाले आणि काही गुरु च्या माध्यामातून काही गोष्टी शिकायला मिळाल्या..
बर्याच लोकांना वाटते मी covid मध्ये शिकवायची सुरुवात केली पण ते अर्ध सत्य आहे, मी 2011 पासून ऑनलाइन वीडियो बनवत होतो, छोटे मोठे 30-50-70 लोकांचे प्रोग्राम घेत होतो फक्त फारसे पैसे त्यातून मिळत नव्हते म्हणुन मी साइड बाय साइड जॉब करून घर चालवत होतो.. मला अगदीच कल्पना नव्हती की कधी मी पूर्ण पणे कोचिंग ला माझे आयुष्य बनवेल..
2020 तो सुवर्ण वेळ होता अस मला वाटते, प्रत्येकाच्या जीवनात ती योग्य वेळ येते आणि आपण त्या योग्य वेळेसाठी तयार असले पाहिजे.. म्हणुन काम सुरू ठेवा, जे आवडते ते करत रहा..
काही मदत हवी असल्यास DM करा आम्ही paid consultation करतो..
आज मी हजारो लोकांना शिकवू शकत आहे ऑनलाईन च्या माध्यामातून भारताबाहेर 20 देशा मध्ये आमचे विद्यार्थी आहेत..
तुम्ही सुद्धा हे करू शकता, ज्यांना गरज आहे त्यांना हा मेसेज शेअर करा..
धन्यावाद..