5S GROUP

5S   GROUP providing Security Service and cleaning services in pune

माणसाच्या मूलभूत तीन गरजा आहेत त्यापैकी एक गरज निवारा ही आहे.वाढती लोकसंख्या आणि  उदरनिर्वाह यासाठी अपरिहार्य स्थलांतर य...
03/09/2023

माणसाच्या मूलभूत तीन गरजा आहेत त्यापैकी एक गरज निवारा ही आहे.वाढती लोकसंख्या आणि उदरनिर्वाह यासाठी अपरिहार्य स्थलांतर यासाठी नागरीकरणाची प्रक्रिया अत्यंत वेगाने होत चालली आहे.
वाढत्या नागरीकरणामुळे तिथे अर्थातच निवाऱ्यासाठी घरांची गरज सुध्दा झपाट्याने वाढली आहे
निवारा या संकल्पनेत अधिकाधिक सोयी सुविधान बरोबर आनंददायी आरोग्यदायी सुसंस्कृत स्वतंत्र तरीही एकत्र असल्याची जाणीव वृद्धिंगत करणाऱ्या वातावरणाची अपेक्षा सुध्दा समाविष्ट होताना दिसते.
ग्राहप्रकल्पचा जहिरतीकडे दृष्टिक्षेप टाकला असता हे सहज लक्षात येते पूर्वी आपण इतिहासाकडे डोकावले असता एकत्र कुटुंब पद्धती त्यातून होणारे कामाचे व्यवस्थापन, सणवार आजारपण, आनंदोत्सव याचे अप्रूप वाटते.
गृहनिर्माण प्रकल्प सहकारातील असा संस्था प्रकार आहे की तिथे संस्थेतील सभासद आपल्या कुटुंबासोबत अहोरात्र एकमेकाच्या निकट संपर्कात सहवासात असतात त्यामुळे गृहनिर्माण संस्थेच्या तक्रारी मानवी स्वभाव , वर्तन, राग ,लोभ, यातून सुध्दा उद्भवलेल्या असतात असे अनुभवास येते त्यामुळे या सोडवताना केवळ कायदा पोटनियम मधील तरतुदी याचीच माहिती न्हवे तर मानवी स्वभाव ,वर्तनाची माहिती असणे गरजेचे असते.
त्या अनुषंगाने वेळोवेळी गृहनिर्माण संस्थेचे प्रश्न व प्राप्त होणाऱ्या तक्रारीच्या स्वरूपाचा अभ्यास करून वेळोवेळी आदर्श उपविधी मध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत.
ग्रहानिर्मन संस्थेत सर्वजण एकत्र कुटुंबा प्रमाणेच राहत असतात परंतु सर्वच्या गरजा वेगवेगळ्या असतात. व त्याची पूर्तता करताना एकमेकांमध्ये समन्वय असणे गरजेचे असते
गृहनिर्माण संस्थेमध्ये असलेल्या सामाईक सोयी सुविधा याचीसुधा सर्वांनी एकत्रपणे देखभाल करणे गरजेचे असते
अशावेळी प्रत्येकाचे व्यस्त दिनक्रम, कामाचा व्याप यामुळे या सर्व सामाईक सुविधांची देखभाल करणे अवघड जाते.
याचबरोबर इमारतीचा भवती असलेली बालगोपालांसाठी खेळण्याची जागा त्याची स्वच्छ्ता व सुरक्षितता याकडे लक्ष देणे सुध्दा गरजेचे असते.
आपली गृहनिर्माण संस्था किंवा अपार्टमेंट याचे कामकाज आपल्यापैकी काही सभासद कोणतेही मानधन न घेता स्वयंस्फूर्तीने निस्वार्थी पणे करत असतात. अशा व्यवस्थापन समितीतील सदस्यांना सुध्दा स्वतःच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या व व्यावसायिक अडचणी असतात.त्यामुळे प्रत्येक वेळी इमारतीच्या कामासाठी त्या त्या क्षेत्रातील माणसे उपलब्ध करणे व त्याच्याकडून वाजवी किमतीत कामे करून घेणे शक्य होईलच असे नाही. त्यासाठी आम्ही एका छत्राखाली 5S FACILITY GROUP मार्फत गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट याचे स्वच्छ्ता व सुरक्षा करणे साठी आपल्यापर्यंत येत आहोत.

आमचे बंधू मित्र आनंदा माईंगडे यांच्या पहिल्या बॅच च्या घवघवीत  यशानंतर    जॉब एज्युकेशन संचालितनवजीवन करीअर अकॅडमी नवीन ...
01/09/2023

आमचे बंधू मित्र आनंदा माईंगडे यांच्या पहिल्या बॅच च्या घवघवीत यशानंतर जॉब एज्युकेशन संचालित
नवजीवन करीअर अकॅडमी नवीन बॅच सुरू होत आहे.
आनंदा सर आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐

अखंड भारतासाठी अविस्मरणीय क्षण...चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश.. #चंद्रयान-3 #..यशस्वी झाल्याबद्दल इ...
23/08/2023

अखंड भारतासाठी अविस्मरणीय क्षण...
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत पहिला देश..
#चंद्रयान-3 #..
यशस्वी झाल्याबद्दल इस्त्रो व सर्व भारतीयांचे मनःपुर्वक अभिनंदन 💐💐💐

पुणे, मुंबईप्रमाणेच महाराष्ट्रातील सर्व शहरांमधील सहकारी गृहनिर्माण संस्थांमधे २४ तास सुरक्षा व्यवस्था ही एक अनिवार्य बा...
16/08/2023

पुणे, मुंबईप्रमाणेच महाराष्ट्रातील सर्व शहरांमधील सहकारी गृहनिर्माण संस्थांमधे २४ तास सुरक्षा व्यवस्था ही एक अनिवार्य बाब बनली आहे. सद्यपरिस्थितीत थोड्याफार फरकाने या गृहनिर्माण संस्थांमधील सुरक्षारक्षक हे अभावानेच सुरक्षाकार्याचे प्रशिक्षण घेतलेले वा सुरक्षेच्या कामासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम आढळतात.
अपुरे काम आणि अपर्याप्त देखरेखीमुळे कामाच्या वेळात सुरक्षारक्षकांकडून दुर्लक्ष करण्याचे प्रकार खूपदा घडतात. त्याचप्रमाणे, मोबाइल फोनचा सतत आणि अनावश्यक वापर, वेळी-अवेळी चहा, खाण्यापिण्याच्या निमित्ताने जागा सोडून निघून जाणे, मित्रांबरोबर वा जवळपासच्या सुरक्षारक्षकांबरोबर जागेवर वा जागा सोडून गप्पा, कामाच्या वेळात सभासद वा इतरांची खासगी कामे करणे आणि त्याशिवाय वारंवार तंबी देऊनसुद्धा कामावर असताना झोपणे असे प्रकार सुरक्षारक्षकांकडून वारंवार घडत असल्याचे निदर्शनास येते. या आणि अशा निष्काळजी सुरक्षा व्यवस्थेवर वेळीच उपाययोजना न केल्यास सुरक्षारक्षकांची नेमणूक ही निव्वळ औपचारिकता ठरते. अशा अकार्यक्षम सुरक्षाव्यवस्थेमुळेच अनधिकृत व्यक्ती गृहसंस्थेच्या आवारात येतात, चोरांचे फावते, वाहनांची नासधूस, जाळपोळ यासारखे प्रकार होऊन संस्थेमधील रहिवाशांना, विशेषत: जेष्ठ नागरिकांना असुरक्षित वाटते. तसेच, सभासदांना त्यांच्या पैशाचा योग्य विनियोग होत नसल्याची भावना निर्माण होते. सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींमुळे पोलिस यंत्रणेवरचा वाढता ताणही कमी होत नाही.
म्हणूनच सर्वप्रथम सुरक्षारक्षाची नेमणुक खरोखर आवश्यक आहे का, याचा विचार करणे गरजेचे असते. सध्या असलेली सुरक्षाव्यवस्था कितपत परिणामकारक आहे? त्यामध्ये संस्थेतील इतर रहिवाशांसोबत चर्चा करून अधिक परिणामकता साधण्यासाठी वाव आहे का? या सर्वांचा वस्तुनिष्ठ विचार करून योग्य सुरक्षारक्षकाच्या पद्धतशीर निवड प्रक्रियेसाठी पुढीलप्रमाणे काही मूलभूत मार्गदर्शक तत्त्वे जाणून घेऊ या.

- सर्वप्रथम सुक्षारक्षकाकडून अपेक्षित असलेल्या सर्व कामांची जंत्री करून सर्वानुमते त्याची नेमणूक आवश्यक आहे का, याबाबत निर्णय घ्यावा. आवश्यक असल्यास सुरक्षाव्यवस्था पुरवणाऱ्या चार ते पाच संस्थांची माहिती एखाद्या निःपक्षपाती त्रयस्थांकडून मिळवावी.

- या सर्वांना लेखी आणि सविस्तर 'रिक्वेस्ट फॉर कोटेशन' (आरएफक्यू) एकाच वेळेला पाठवून निश्चित मुदतीमध्ये सीलबंद पाकिटाद्वारे निविदा मागविण्यात याव्या. या निविदा सर्व संबंधितांसमक्ष एकाच वेळेस उघडून त्यांची रितसर नोंद करावी.

- सर्व निविदातील नियम, अटी व आर्थिक मोबदल्याचा तुलनात्मक अभ्यास करून यातील किमान मोबदल्याच्या दोन संस्थांच्या इतर जागेवरच्या कामाची पाहणी (रियालिटी चेक) करावी. त्या संस्थांच्या इतर अशिलांचे मत मिळवावे व यानंतरच सर्वांत स्वस्त ठरलेल्या दोन संस्थांशी मोबदल्याविषयी कार्यकारिणीने बोलणी करावी.

- याप्रमाणे निश्चित झालेल्या संस्थेबरोबरच करार करावा व 'सर्व्हिस लेव्हल अॅग्रीमेंट' (एसएलए) करावे. जेणेकरून अपेक्षित व प्रत्यक्ष कामातील त्रुटी ठरावीक कालावधीत कळून येतात आणि त्रुटींसाठी दंडही वसूल करता येऊन अपेक्षित सुधारणा साधता येते.

- सुरक्षारक्षकांच्या कामाची वेळ १२ तासांहून जास्त नसावी; तसेच करारात उल्लेख नसल्यास त्याच्या निवाऱ्याची कोणतीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जबाबदारी गृहनिर्माण संस्थेची कदापि नसावी. परप्रांतियांबाबत ही शक्यता जास्त असते, जे दिवसभरात दोन जागी नोकरी करतात.

- सुरक्षारक्षक संस्थेवर सर्व सुरक्षारक्षकांची पॅन व आधार कार्ड व पोलिस व्हेरीफिकेशन रिपोर्ट नेमणुकीपूर्वी देणे बंधनकारक करावे व सुरक्षारक्षक ठरावीक कालांतराने बदलत राहावे.

- गृहनिर्माण संस्थेच्या आवारात येणाऱ्या प्रत्येक अरहिवासी व्यक्ती व वाहनाची नोंद करणे हे सुरक्षारक्षकाचे सर्वांत महत्त्वाचे काम असल्याने वॉचमन केबिन व बूम बॅरियर अत्यावश्यक आहे. त्याशिवाय संस्थेत सीसीटीव्ही बसवले असल्यास सुरक्षारक्षकाच्या हालचालीही त्यात दिसाव्यात.

वरील पारदर्शक पद्धतीचा काटेकोरपणे वापर झाल्यास गृहनिर्माण संस्थेच्या सुरक्षेवर होणारा खर्च वसूल होतो आणि सभासदांना सुरक्षित वाटते. पैशाचा अपव्यय टळतो. गृहसंस्थेच्या वार्षिक एक लाख रुपयांपुढील कोणत्याही खर्च वा करारासाठी वरील कार्यपद्धती अवलंबल्यामुळे सर्वच बाबतीत शिस्तबद्ध व पारदर्शक कारभाराची सवय लागते.

७६ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिना निमित्त उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सुरक्षा रक्षक यांना प्रशस्तीपत्र देऊन त्...
15/08/2023

७६ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव दिना निमित्त उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सुरक्षा रक्षक यांना प्रशस्तीपत्र देऊन त्याचा सन्मान करण्यात आला.🇮🇳🧡🤍💚

Sheee kedareshwar engineering Shirval
06/07/2023

Sheee kedareshwar engineering Shirval

Be secure with our safety.  services
29/01/2023

Be secure with our safety.
services

09/12/2022

Address

Ashtavinayak Society 2 , Near By Jagadguru Footboll Ground , Mauli Nivas , Lohegaon Pune
Pune
411047

Telephone

+919730926623

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when 5S GROUP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to 5S GROUP:

Share