उद्योगमित्र

उद्योगमित्र "Empowering entrepreneurs with insights, strategies, and support for business growth, branding, and marketing excellence."

मोठे ब्रँड एका दिवसात मोठे झाले नाहीत.आज 'Nike, Starbucks, Apple किंवा Coca-Cola' यांची ओळख पाहताना आपल्याला त्यांचे यश ...
21/08/2026

मोठे ब्रँड एका दिवसात मोठे झाले नाहीत.

आज 'Nike, Starbucks, Apple किंवा Coca-Cola' यांची ओळख पाहताना आपल्याला त्यांचे यश दिसते…
पण त्या यशामागचा संघर्ष, संयम, छोटी सुरुवात आणि अनेक वर्षांची सातत्यपूर्ण मेहनत दिसत नाही.

उद्योजकतेत सुरुवातीला
ग्राहक कमी असतात.
कमाई कमी असते.
ओळख नसते.
कधी कधी स्वतःवरचा विश्वासही डळमळतो.

पण याच टप्प्यावर एक गोष्ट ठरते 'तुम्ही थांबणार की टिकून राहणार ?'

कारण व्यवसायात प्रत्येक दिवस हा यशाचा दिवस नसतो ;
काही दिवस शिकण्याचे, काही चुका सुधारण्याचे, आणि काही दिवस फक्त पुढे चालत राहण्याचे असतात.

👉 लहान सुरुवात ही कमजोरी नाही.
👉 हळू वाढणे म्हणजे अपयश नाही.
👉 परिणाम उशिरा मिळणे म्हणजे प्रयत्न वाया जाणे नाही.

वेळ लागतो… पण योग्य दिशेने केलेली सातत्यपूर्ण मेहनत एक दिवस ओळख निर्माण करते.

आज तुम्ही जिथे आहात, तिथून सुरुवात करा ; Perfect वेळेची वाट पाहू नका. तुमची वेळ तुम्हीच तयार करा.

उद्योगमित्र - उद्योजकतेच्या प्रवासात विचार, दिशा आणि मार्गदर्शन देणारा साथीदार.

#उद्योगमित्र

🇮🇳 स्वातंत्र्य फक्त मिळवायचं नसतं… ते पुढच्या पिढीसाठी अधिक सक्षम बनवायचं असतं.ज्या देशाने आपल्याला स्वप्न पाहण्याचं स्व...
15/08/2026

🇮🇳 स्वातंत्र्य फक्त मिळवायचं नसतं… ते पुढच्या पिढीसाठी अधिक सक्षम बनवायचं असतं.

ज्या देशाने आपल्याला स्वप्न पाहण्याचं स्वातंत्र्य दिलं,
त्या भारताच्या 'उद्योग, नवकल्पना आणि विकासाच्या प्रवासात आपलं योगदान देणं' हीच खरी जबाबदारी.

'स्वतंत्र विचार • सक्षम उद्योग • विकसित भारत'

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

#उद्योगमित्र
…

Entrepreneurship Udyogmitra ViksitBharat StartupIndia

🇮🇳 स्वातंत्र्य फक्त मिळवायचं नसतं… ते पुढच्या पिढीसाठी अधिक सक्षम बनवायचं असतं.ज्या देशाने आपल्याला स्वप्न पाहण्याचं स्व...
15/08/2026

🇮🇳 स्वातंत्र्य फक्त मिळवायचं नसतं… ते पुढच्या पिढीसाठी अधिक सक्षम बनवायचं असतं.

ज्या देशाने आपल्याला स्वप्न पाहण्याचं स्वातंत्र्य दिलं,
त्या भारताच्या 'उद्योग, नवकल्पना आणि विकासाच्या प्रवासात आपलं योगदान देणं' हीच खरी जबाबदारी.

'स्वतंत्र विचार • सक्षम उद्योग • विकसित भारत'

🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

#उद्योगमित्र
…

साखर उद्योग, फाऊंड्री, ऑटोमोबाईल घटक आणि वस्त्रोद्योगासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरची आता डीप टेक स्टार्टअप हब म्हणून ...
05/07/2026

साखर उद्योग, फाऊंड्री, ऑटोमोबाईल घटक आणि वस्त्रोद्योगासाठी ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरची आता डीप टेक स्टार्टअप हब म्हणून नवी ओळख निर्माण होत आहे. उद्योग व अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाच्या (डीपीआयआयटी) मान्यतेनुसार जिल्ह्यात १ हजार १९ स्टार्टअप्सची नोंदणी झाली असून त्यामध्ये एरोस्पेस व संरक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), रोबोटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, नॅनोटेक्नॉलॉजी, इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), ग्रीन टेक्नॉलॉजी, संशोधनाधारित उद्योग आणि प्रगत अभियांत्रिकीसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांतील स्टार्टअप्सचा समावेश आहे. कोल्‍हापूर मेट्रो सिटीच्‍या बरोबरीने स्‍टार्टअपच्‍या यादीत ‘टॉप १०’मध्‍ये आले आहे.

टेक क्षेत्रात स्टार्टअप्स उद्योग शेती, आरोग्य, शिक्षण आणि उत्पादन प्रक्रियेसाठी आधुनिक तांत्रिक उपाय विकसित करत आहेत. ग्रीन टेक्नॉलॉजी, नवीकरणीय ऊर्जा आणि कचरा व्यवस्थापन क्षेत्रातील स्टार्टअप्स शाश्वत विकासावर भर देत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारने नुकतीच ‘स्टार्टअप इंडिया फंड ऑफ फंडस्‌ २.०’ योजना अधिसूचित केली आहे. यासाठी देशभरातील स्टार्टअप्ससाठी १० हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूरमधील एआय, एरोस्पेस, रोबोटिक्स, बायोटेक्नॉलॉजी, ग्रीन टेक्नॉलॉजी, आयओटी आणि प्रगत उत्पादन क्षेत्रातील स्टार्टअप्सनाही भविष्यात या निधीचा लाभ मिळेल.

‘या’ क्षेत्रांत स्टार्टअप्सची झेप

कोल्हापुरात कृषी व अ‍ॅग्रीटेक, आयटी सेवा, कृत्रिम बुद्धिमत्ता, हेल्थकेअर व लाईफ सायन्सेस, फूड अँड बेव्हरेजेस, नवीकरणीय ऊर्जा, ग्रीन टेक्नॉलॉजी, कचरा व्यवस्थापन, ऑटोमोबाईल, एडटेक, फिनटेक, टेक्नॉलॉजी हार्डवेअर, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज, एरोस्पेस व संरक्षण, बायोटेक्नॉलॉजी, केमिकल्स, बांधकाम, लॉजिस्टिक्स, फॅशन, जाहिरात, पर्यटन, स्पोर्टस्‌ मॅनेजमेंट, नॅनोटेक्नॉलॉजी, सोशल इम्पॅक्ट आणि एआर/व्हीआरसारख्या विविध क्षेत्रांतील स्टार्टअप्स कार्यरत आहेत.

डीप टेक म्हणजे मूलभूत विज्ञान, संशोधन आणि प्रगत अभियांत्रिकीत नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करणारे स्टार्टअप्स. हे स्टार्टअप्स केवळ सॉफ्टवेअर किंवा मोबाईल ॲप तयार करत नाहीत, तर कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, एरोस्पेस, बायोटेक्नॉलॉजी, नॅनोटेक्नॉलॉजी, इंटरनेट ऑफ थिंग्ज, सेमीकंडक्टर, क्वांटम तंत्रज्ञान आणि प्रगत उत्पादन क्षेत्रात संशोधनाधारित उत्पादने व उपाय विकसित करतात.

🚀 Applications Open for Cohort 14 under PM-RKVY for *Grant in aid support upto 25 Lakh*🌱Greetings from IEF of CCS NIAM!W...
03/07/2026

🚀 Applications Open for Cohort 14 under PM-RKVY for *Grant in aid support upto 25 Lakh*🌱

Greetings from IEF of CCS NIAM!

We are inviting applications from Agri-Startups, aspiring entrepreneurs, students, ikinnovators, and agribusiness enthusiasts across India for Cohort 14 under the Innovation and Agri-Entrepreneurship Programme (PM-RKVY).

Benefits:
✅ Expert Mentorship
✅ Incubation Support
✅ Business Development Guidance
✅ Networking Opportunities
✅ Access to the Agri-Startup Ecosystem

📅 Last Date to Apply: 31 July 2026

🔗 Apply Here: https://ccsniam.accubate.app/ext/form/23711/1/apply

If you have an innovative idea or startup in agriculture and allied sectors, don't miss this opportunity to accelerate your entrepreneurial journey.

अनिश्चिततेचा काळ, थंड पडलेलं मार्केट, उद्योजकांची ढासळलेली मानसिकता या सर्व गोष्टींचा परिणाम उद्योग व्यवसायाच्या उतरत्या...
25/05/2026

अनिश्चिततेचा काळ, थंड पडलेलं मार्केट, उद्योजकांची ढासळलेली मानसिकता या सर्व गोष्टींचा परिणाम उद्योग व्यवसायाच्या उतरत्या ग्राफमध्ये दिसून येत आहे.
सध्याच्या परिस्थितीत उद्योजकांनी फक्त “व्यवसाय चालू ठेवणे” पुरेसं नाही, तर स्वतःला सतत अपडेट ठेवणं खूप गरजेचं आहे. विशेषतः स्पर्धा, ऑनलाइन मार्केट, ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा आणि कॅश फ्लोच्या समस्यांमध्ये टिकून राहण्यासाठी काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

1. Cash Flow ला सर्वात जास्त प्राधान्य द्या :-
नफा नंतर येतो, आधी व्यवसाय जिवंत राहणं महत्त्वाचं असतं.
उधारी कमी ठेवा, रोजचा खर्च ट्रॅक करा आणि unnecessary खर्च बंद करा.

2. Branding वर सातत्याने काम करा :-
आज ग्राहक फक्त service विकत घेत नाही, तो trust विकत घेतो.
सोशल मीडिया, Google reviews, professional presentation आणि customer experience यावर भर द्या.

3. Digital Presence मजबूत करा :-
Instagram, Facebook, WhatsApp Business, Google Business Profile यांचा योग्य वापर करा.
कारण आज “जो दिखता है वही बिकता है.” हे लक्षात ठेवा.

4. Customer Retention वर लक्ष द्या :-
नवीन ग्राहक आणण्यापेक्षा जुना ग्राहक टिकवणं स्वस्त आणि फायदेशीर असतं.
Follow-up, loyalty offers, polite communication आणि quality service यामुळे repeat customers वाढतात.

5. स्वतःचं Skill Upgrade करत रहा :-
Market रोज बदलतोय.
Sales, marketing, negotiation, AI tools, finance management या गोष्टी शिकणं आता luxury नाही तर necessity आहे.

6. छोट्या टीमला मजबूत बनवा :-
विश्वासू आणि trained staff व्यवसायाचं backbone असतात.
Team ला respect, training आणि clear system द्या.

7. Multiple Income Sources तयार करा :-
एकाच उत्पन्नावर अवलंबून राहू नका.
जसं service सोबत products, franchise, online selling किंवा subscription model तयार करता येईल.

8. Networking वाढवा :-
इतर उद्योजक, local businesses, suppliers आणि customers सोबत strong relation ठेवा.
कधी कोणती opportunity कुठून येईल सांगता येत नाही.

9. Patience आणि Consistency ठेवा :-
आज अनेक लोक ६ महिन्यात मोठं यश अपेक्षित ठेवतात ; पण खरं business foundation तयार व्हायला वेळ लागतो.

10. संकटात घाबरू नका :- System तयार करा
व्यवसाय मालकावर चालत असेल तर तो job आहे. System वर चालायला लागला की तो business बनतो.

उद्योजकासाठी आजची सर्वात मोठी ताकद म्हणजे :
वेळेप्रमाणे बदलण्याची तयारी आणि हार न मानण्याची मानसिकता !

service-based business मध्ये तर customer trust, presentation आणि consistency हेच future growth चे मोठे pillars आहेत.

✍️ विजय गोपाळराव पवार

एक काळ होता, बाजारपेठेला सकाळी उठल्यावर एक ठराविक लय असायची.दुकानांची शटर उघडायची, कारखान्यांच्या सायरन वाजायच्या, ट्रक ...
19/05/2026

एक काळ होता, बाजारपेठेला सकाळी उठल्यावर एक ठराविक लय असायची.
दुकानांची शटर उघडायची, कारखान्यांच्या सायरन वाजायच्या, ट्रक रस्त्यावर धावायचे आणि शहरांच्या नसा जणू व्यापाराच्या गतीनं धडधडायच्या. माणूस भविष्याची स्वप्नं पाहत होता, उद्योग विस्तारत होते आणि “उद्याचा दिवस आजपेक्षा चांगला असेल” हा विश्वास अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी होता. पण गेल्या काही वर्षांत जगाने अशी वळणं घेतली की स्थैर्य हा शब्दच दुर्मिळ वाटू लागला.
एका अदृश्य विषाणूनं संपूर्ण व्यवस्थेला गुडघ्यावर आणलं. त्यानंतर युद्धं, इंधन दरवाढ, पुरवठा साखळीतील अडथळे, बदलती सरकारी धोरणं, वाढती महागाई आणि बाजारातील अनिश्चितता या सगळ्यांनी आर्थिक व्यवस्थेचा चेहरामोहराच बदलून टाकला. आज परिस्थिती अशी आहे की, मेहनत असूनही हमखास यशाची खात्री उरलेली नाही आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करणारा माणूसच सर्वाधिक असुरक्षित वाटू लागला आहे.
भारतीय समाजात उद्योजकाला नेहमी “धाडसी माणूस” म्हणून पाहिलं गेलं.
कारण नोकरी करणारा माणूस स्वतःचं आयुष्य सांभाळतो; पण उद्योजक स्वतःसोबत अनेक कुटुंबांची जबाबदारी उचलत असतो. त्याच्या निर्णयांवर कामगारांच्या चुली पेटतात, बाजारपेठा चालतात आणि शहरांच्या अर्थव्यवस्थेला गती मिळते.

मात्र आज हाच उद्योजक एका अभूतपूर्व वादळाच्या मध्यभागी उभा आहे. समस्या फक्त मंदीची नाही, तर अनिश्चिततेची आहे. कोणता निर्णय उद्या फायद्याचा ठरेल आणि कोणता व्यवसाय एका रात्रीत संकटात येईल, याचा अंदाज कुणालाच लागत नाही. बाजारात पैसा फिरतोय, पण विश्वास फिरताना दिसत नाही. व्यवहार सुरू आहेत, पण स्थैर्य हरवलं आहे. आणि म्हणूनच आजचा काळ हा केवळ आर्थिक संकटाचा नाही, तर उद्योजकांच्या सहनशक्तीची, मानसिक ताकदीची आणि अस्तित्व टिकवण्याच्या संघर्षाची कठीण परीक्षा ठरत आहे.

आजचा उद्योजक एका विचित्र वळणावर उभा आहे.
समोर बाजार आहे, पण ग्राहकांचा आत्मविश्वास हरवलेला आहे.
हातात व्यवसाय आहे, पण भविष्याचा नेमका अंदाज लागत नाही.
मेहनत आहे, जिद्द आहे, अनुभव आहे… पण परिस्थिती मात्र रोज नवा घाव घालत आहे.

कोव्हीडनंतर जग पूर्ववत झालं, असं वरवर वाटत असलं तरी अर्थव्यवस्थेच्या आत खोलवर अनेक जखमा अजूनही भरलेल्या नाहीत. कोविड काळात अनेक उद्योग बंद पडले, लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, ग्राहकांची खरेदी क्षमता कमी झाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजारातील “विश्वास” हादरला. व्यवसाय हा केवळ पैशावर चालत नाही; तो विश्वासावर चालतो. आणि हाच विश्वास आज सर्वाधिक डळमळीत झालेला दिसतो.

आज महाराष्ट्रातील लहान आणि मध्यम उद्योजक सर्वात मोठ्या संकटात आहेत. मोठ्या कंपन्यांकडे भांडवल आहे, बँकांची साथ आहे, तंत्रज्ञान आहे, सरकारपर्यंत पोहोच आहे. पण छोटा उद्योजक ? तो आजही EMI, दुकानभाडं, वीजबिल, GST, कामगारांचा पगार आणि रोजच्या खर्चाच्या चक्रात अडकलेला आहे.
त्याला बाजारात टिकण्यासाठी रोज स्वतःशीच युद्ध करावं लागत आहे.

गेल्या काही वर्षांत इंधन दरवाढीनं वाहतूक खर्च प्रचंड वाढवला. गॅस टंचाईमुळे उत्पादन क्षेत्राला मोठा फटका बसला. कच्चा माल महाग झाला. ग्राहक मात्र अजूनही “जुने दर” अपेक्षित धरून बसले आहेत. परिणामी उद्योजक नफा कमावणं तर दूरच, पण व्यवसाय टिकवण्यासाठी धडपड करताना दिसतो आहे.

याहून मोठी समस्या म्हणजे सरकारी धोरणांतील सततची अनिश्चितता. आज एखाद्या नियमात बदल होतो, उद्या नवीन कर येतो, परवा नवीन परवाना लागू होतो. छोटा व्यावसायिक नियम समजून घेण्यातच थकून जातो. सरकारी कार्यालयांच्या फेऱ्या, ऑनलाईन प्रक्रियेतील गुंतागुंत, वाढती कागदपत्रं आणि त्यातून निर्माण होणारा मानसिक ताण हा आजच्या उद्योजकाचा न बोलला जाणारा संघर्ष आहे.

एकेकाळी व्यवसाय म्हणजे स्थैर्य मानलं जायचं.
आज व्यवसाय म्हणजे अनिश्चिततेशी रोजचा सामना झाला आहे.

ग्राहकांचं वर्तनही बदललं आहे.
लोक आता खर्च करण्याआधी दहा वेळा विचार करतात. आवश्यक गोष्टींवरच पैसे खर्च होतात. लक्झरी, ब्रँड, प्रतिष्ठा यापेक्षा “गरज” महत्त्वाची झाली आहे. ऑनलाईन मार्केटनं स्थानिक बाजारपेठेवर प्रचंड दबाव निर्माण केला आहे. मोठ्या ई-कॉमर्स कंपन्या सवलतींचा पाऊस पाडतात आणि छोटा दुकानदार त्यांच्यासमोर असहाय्य ठरतो.

या सगळ्यात सर्वाधिक दुर्लक्षित घटक कोणता असेल तर तो म्हणजे उद्योजकाची मानसिक अवस्था !

कारखाना बंद झाला तर मशीन दिसतात. दुकान बंद झालं तर शटर दिसतं पण आतून तुटलेला उद्योजक कुणालाच दिसत नाही.

रात्रभर जागून आकडे मांडणारा, कामगारांचा पगार वेळेवर व्हावा म्हणून स्वतःच्या गरजा थांबवणारा, कर्ज फेडण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावणारा उद्योजक आज मानसिकदृष्ट्या थकलेला आहे. समाजाला त्याची उलाढाल दिसते ; पण त्यामागची घालमेल दिसत नाही.

आजच्या काळात उद्योजकाला फक्त आर्थिक मदतीची गरज नाही, तर स्थिर धोरणांची, विश्वासार्ह बाजारपेठेची आणि सामाजिक समजुतीची गरज आहे. उद्योग हा केवळ पैसा कमावण्याचा मार्ग नाही; तो रोजगार निर्माण करतो, कुटुंबं उभी करतो, शहरं चालवतो आणि अर्थव्यवस्थेला गती देतो.

उद्योजक वाचला तरच बाजार वाचेल, बाजार वाचला तरच रोजगार वाचेल, आणि रोजगार वाचला तरच देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहील ; पण या अंधारातही एक गोष्ट आशादायक आहे ती म्हणजे भारतीय उद्योजकाची जिद्द.

हा माणूस पडतो, तोटा सहन करतो, फसतो, कर्जबाजारी होतो… पण पुन्हा उभा राहण्याचं धैर्य सोडत नाही. कारण उद्योजकता ही फक्त व्यवसाय नसते; ती जगण्याची वृत्ती असते.

आजचा काळ कठीण आहे, हे वास्तव आहे ; पण प्रत्येक संकट एक नवीन अर्थव्यवस्था जन्माला घालत असतं. जग बदलत आहे. बाजार बदलत आहे. ग्राहक बदलत आहेत. या बदलात जो स्वतःला बदलायला तयार असेल, तोच उद्याचा खरा उद्योजक ठरेल.

उद्योजकांनी आता फक्त नफ्याचा विचार करून चालणार नाही. तंत्रज्ञान, डिजिटल उपस्थिती, ग्राहकांशी नातं, दर्जा, विश्वास आणि नवकल्पना या गोष्टी भविष्यातील व्यवसायाचा पाया ठरणार आहेत.

हा काळ कदाचित इतिहासात “अनिश्चिततेचा काळ” म्हणून ओळखला जाईल.
पण कदाचित हाच काळ नव्या भारतातील सर्वात जिद्दी उद्योजक घडवणारा काळही ठरेल.

✍️ विजय गोपाळराव पवार
लेखक- बाराखडी उद्योजकतेची

13/05/2026

Second hand Laptop 💻, Computers 🖥️ साठी भारतभर सेवा पुरविणारं विश्वासू नाव शिवटेक कॉम्प्युटर्स धायरी , पुणे.
सेल्स, सर्विस आणि ऍक्सेसरीज तसेच रिपेअर !

Shivtech Computers
Shop no. 06, 1st floor
Ramesh sankul, abasaheb raikar nagar, Near Lane Number 19B, dhayari Pune-411041
Shop time -10am-9pm

Contact - 7058541693

पुण्यातील Unicorn कंपन्या ! पोस्ट आभार - पैसापाणी
16/04/2026

पुण्यातील Unicorn कंपन्या !

पोस्ट आभार - पैसापाणी

Address

Office No 211, Zen Business Centre
Pune
411001

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+919130042020

Alerts

Be the first to know and let us send you an email when उद्योगमित्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to उद्योगमित्र:

Shortcuts

Share