Nagesh Mallikarjun Bidave

Nagesh Mallikarjun  Bidave Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nagesh Mallikarjun Bidave, Consulting Agency, Pune.

02/04/2023
29/03/2023

Most Maiden Overs in Test Cricket: रमेशचंद्र गंगाराम उर्फ बापू नाडकर्णी यांचा जन्म नाशिक येथे झाला. जागतिक क्रिकेटमध्ये बापूंच्या ना.....

23/03/2023

Union minister Anupriya Patel shares a heart-touching story of how PM Modi while attending an event, noticed the difficulties of the Gram Pradhan - a woman a...

18/03/2023
17/03/2023
17/03/2023

‼️ *देवाघरी जातांनाही हात रिकामा नको.* ‼️

*आयुष्याचा शेवटचा मुक्काम कुणीही पाहिलेला नाही पण असं म्हणतात की, हा शेवटचा मुक्काम देवाच्या घरी असतो.*
*ज्याला आपण कधीही पाहिलेलं नाही पण त्याच्यावर श्रद्धा मात्र असतेच. पाहुणा म्हणून कुणाच्याही घरी जाताना आपण रिकाम्या हाताने जात नाही मग, ज्याची पूजा आयुष्यभर केली, ज्याच्यावर श्रद्धा ठेवली, त्या देवाच्या घरी जाताना तरी मोकळ्या हातांनी कसे जाणार ?*
*म्हणून जमेल तेव्हा चांगले काम केलं पाहिजे म्हणजे देवाच्या घरी जाताना, त्याच सत्कर्माची शिदोरी घेऊन जाता येईल ना....!!*
*किती करशील भरवसा या सुंदर नरदेहाचा,अजून तुला कळला नाही फटका या यमाचा! मृत्यूची नोटीस नसते,समन्स नसतो तर डायरेक्ट पकड वाॅरंट असते.*
*तो कोणत्याही वयामध्ये ते येऊ शकते. मृत्यू राजा, रंक, लहान, थोर, स्त्री, पुरूष काहीही पहात नाही.यमदूत वाॅरंट घेऊन येतात तेंव्हा दुस-या कोणालाही त्यावर सही करून घेता येत नाही किंवा तो माणूस घरात नाही असे सांगताही येत नाही. कारण वाॅरंट रिसीव्ह करणे हा प्रश्नच नसतो तर डायरेक्ट बेड्या ठोकल्या जातात!* *(फास आवळला जातो)*
*यमस्य करूणा नास्ती:!*
*भूकेलेल्याला त्याच्या ताटावरून, तहानलेल्याला पाण्याचा ग्लास सोडून, शृंगारक्रीडा करणा-याला शयन मंदिरातून, शल्यकर्म चालू असता बेडवरून उचलले जाते. मृत्यूघटिका टळल्याचे आख्ख्या जगात एक उदाहरण नाही. मग आपल्याला नेतात कुठे? हा विचार करणारे फार थोडे.*
*लंडन, अमेरिकेला जाताना पौंड्स, डाॅलर्स इ.तिथल्या करन्सीची व्यवस्था केली जाते. पण मृत्यूनंतर आपण जेथे जाणार आहोत तेथील अज्ञात परलोकात "पुण्य करन्सी" महत्वाची असते ती जिवंतपणीच जमा करायची असते!*
*ही जाणीव वृद्धापकाळ आला तरी होत नाही.आपण अमरपट्टा घेऊन आल्याची गैरसमजूत असते.99 व्या वर्षी 99 वर्षाच्या कराराने जमीन खरेदी करतो आणि सही करतो तोच मृत्यू गाठतो. दागदागिने आणि कॅश लाॅकर मध्येच रहाते, गुरे गोठ्यात रहातात.बरोबर काहीच नेता येत नाही! तरी जीव नश्वराच्याच मागे लागतो!*
*अजगर बेडकाला गिळत असतो आणि बेडुक माशा पकडण्यात रंगून जातो. असेच आपले आहे. आपण प्रपंचीत मोहपाशात अडकून बसलेलो आहोत!*
*सहस्त्र चंद्रदर्शन झालेले राजकारणी पुढील गतीची तयारी न करता नवीन पक्ष काढून राजकारण खेळतात! कलावंत करोडो रुपये कमवूनही दहा मिनिटेही परमेश्वराला न देता पैशासाठी परदेश दौरे करतात. भक्ती बर्वे, पद्मा चव्हाण, मॅरिलीन मनरो, जयश्री गडकर, गणेश भालेराव यांची काय जाण्याची वये होती का? पण यमाग्रजाने वाॅरंटच काढले होते. आपल्या बरोबर फक्त शुभाशुभ कर्मेच येतात! या व्यस्त कलावंताना कुठे वेळ होता पुण्य संचयासाठी?*
*म्हणून श्रीगुरूचरित्र ग्रंथात महाराज सांगतात की वय तरूण असतानाच पुण्यसंचय करून ठेवा कारण जीविताचा भरवसा नाही!*
*ते मातुःश्रींना म्हणाले! "आई तू मला सांगतेस की अग्राह्यसंन्यास बालपणी घेऊ नको!वानप्रस्थाना नंतर संन्यास घ्यावा! पण आई मला तेवढे आयुष्य आहे याची खात्री तुला आहे का?*
*"मातुःश्री निरुत्तर झाल्या.*
*प्रपंचा बरोबरच आध्यात्मही जवळ केले म्हणजे तरच ज्ञान व सुरक्षितता लाभते! नाही भरवसा या घडीचा रे अभिमान धरीसी कोणाचा?*
*यासाठी भंगवताला प्रेम, भक्ती द्या. मग तो तुमच्या आवडीचा देव,संत कोणीही चालेल पण संत, गुरु, देव एकच पाहिजे! अनेक नकोत! तुमची श्रद्धा, भाव फक्त आणि फक्त त्या एकवरच पाहिजे!
*हरि नामाच्या बँकेमध्ये आपल्या आवडत्या देवाच्या नामाचे धन करा जमा...! तेच हरीनाम जमा शेवटी येईल तुमच्या कामा !*🚩
🌹🌹🌹

15/03/2023

#द्रौपदीला पाच पती का होते? #महाभारतातील कहाणी #मराठीstory‎ ...

13/03/2023

" एक रूम आई साठी
प्रत्येकानेच वाचावीच अशी पोस्ट”

साहेब ! कुरिअर आहे... नोकराने हातात कुरिअरचे लहान खोके दिले, त्याला रिसीट सही करून दिली... कोणाचे आहे रे कुरिअर, अंजली माझ्या पत्नीने हॉल मध्ये येत विचारले... बघतो... म्हणून कुरिअर उघडले... आत एक पॅक केलेला मोबाईल आणि ३पानी एक पत्र...
अरे ! हा तुझ्या आईचा मोबाईल आहे... इकडे कसा..? आणि पत्र कोणाचे आहे..?
मी मोबाईल मांडीवर ठेवूनच पत्र उघडले... अगं ! आईचे पत्र आहे... मग वाच ना.. ! बघतोस काय माझ्याकडे वेंधळ्या सारखा. वाच पत्र...
मी पत्र वाचायला सुरुवात केली...

प्रिय अजित,

अजूनही तू मला प्रिय आहेस, म्हणून प्रिय लिहिले आहे...
तुझा व्हॅट्स ऍप वर मातृदिना प्रित्यर्थ पाठविलेला संदेश मिळाला...
अजून आपली ओळख शिल्लक राहिली आहे, हे समजून बरे वाटले... नाळ पूर्णपणे तुटली नाही यातच समाधान...
फेसबुक/व्हाटसअपवर पण तुझे मातृदिनाचे सुंदर सुंदर संदेश वाचले... १०० च्या वर लाईक्स आणि कॉमेंट्स पण वाचल्या... पण मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही... न जाणो नावातील साधर्म्य पाहून, कोणी मी तुझी आई आहे का असे विचारले तर, तू उगाच कानकोंडा होणार, म्हणून टाळले...
पण बेटा ! हेच संदेश तू मला जवळ घेऊन दिले असतेस तर मला अधिक बरे वाटले असते... असो ! प्रत्येकाचे प्राक्तन म्हणायचे... कुठल्या तरी वृद्धाश्रमाला देणगी देतानाचा तुझ्या नवीन बंगल्यातील, तुझा व सुनेचा फोटो पण पहिला... खूप स्मार्ट आणि हँडसम झाला आहेस रे तू... सुनबाई पण सुंदर दिसते आहे अजून... बंगला पण छान बांधला आहेस...
कोणा त्रयस्थ वृद्धांची काळजी घेतोस हे पाहून खूप बरे वाटले... लहानपणी मला ताप आलेला असताना तू माझी घेतलेली काळजी आठवली... त्यावेळी खरंच वाटले नव्हते, कि तू आणि मी असे वेगळे वेगळे राहू... सर्वजण म्हणायचे, माई ! तुम्ही भाग्यवान आहात, तुमचा मुलगा आता तुमची एवढी काळजी घेतोय, मोठेपणी तर तुम्हाला सोडणार पण नाही... सुदैवाने असे म्हणणारे आता कोणी जिवंत नाही...
तुला खूप शिकविले, म्हणजे आम्ही फक्त पैसा पुरविला... तू तुझ्या हुशारीने शिकत गेलास... परदेशात जाऊन आलास, गलेलठ्ठ पगाराची चांगली नोकरी मिळाली... तुला आवडलेल्या मुलीशी, लग्न लावून दिले... सोन्या सारखी दोन नातवंडे मिळाली... तुझे बाबा गेल्यानंतर तुमच्यात रमून उरलेले आयुष्य काढून, आनंदाने डोळे मिटणार होते. पण ! अचानक या सर्वांना कुणाची तरी दृष्ट लागली...
परदेशात जावे लागणार म्हणून मला तू एका सुसज्ज वृद्धाश्रमात ठेवलेस, परत आलो की मी तुला घेऊन जाईन असे आश्वासन देऊन गेलास... पण तीच शेवटची भेट असेल असे मला वाटले नव्हते... परदेशातून परत आलेला मला, आमच्या संस्थापक बाई कडून समजले... आणि तू दिलेला १० लाखाचा चेक पण समजला... चार मायेच्या शब्दांनी विकल्या जाणाऱ्या तुझ्या आईची फार मोठी किंमत लावलीस रे बाळा..! पण बरोबर आहे ती माझी किंमत नव्हती तर तुझ्या स्टेटस ची होती...
मग मी सुद्धा, आता हेच आपले घर असे मानून सर्वांशी मैत्री केली...
एक सांगू राजा..! तू मला इथे ठेवून खरोखरच माझ्यावर फार मोठे उपकार केलेस... तुझ्या कडे राहिले असते, तर माझे विश्व फक्त तुझ्या बंगले वजा डबक्या पुरते मर्यादित राहिले असते... इथे मला खुप समवयस्कर, समदुःखी मित्र-मैत्रिणी मिळाले आहेत... मी आता एकदम मजेत आहे... तुझ्या १० लाखांनी माझी चांगली बडदास्त ठेवली आहे... मला आता तुमच्या घराची आठवण पण येत नाही... अधून मधून बंटी-बबली आठवतात... आता मोठे झाले असतील ना रे..! आजीला ओळखणार पण नाहीत... आणि तुही ओळख सांगू नकोस...
सुनबाई नोकरी करते का रे अजून... हं ! आता विचारून काय उपयोग म्हणा, आपली आता भेट होणे नाही...हे पत्र मिळेल तेव्हा मी या जगात नसेन... तू दिलेला मोबाईल पाठवीत आहे...
अरे..! आम्ही म्हातारी माणसे तुमच्या पैशाची किंवा किमती वस्तूंची भुकेलेले नसतो रे..! आम्हाला माया हवी असते... ज्या मुलांना आपण वाढविले, त्यांच्या मुलांशी खेळत, त्यांच्या बाललीला पाहत, सुनेचे कोड-कौतुक कर ... आपल्या मुलाच्या मांडीवर आम्हाला आमचा शेवटचा श्वास घ्यायची ईच्छा असते... पण हे तुम्हाला पैशाच्या मागे लागलेल्या मुलांना नाही समजणार...अरे ..! केवळ पैसा हेच सर्वस्व मानू नका... आपल्या साठी पैसा हवा, पैश्या साठी आपण नको...
आता वाटते की, माझेच संस्कार कुठे तरी कमी पडले, नाहीतर मुले हि मातीचा गोळा असतात, जसा आकार द्यावा तसा घेतात... त्यामुळे मी तुला किंवा सूनबाईला दोष देत नाही... तुम्ही सर्वजण सुखात रहा हीच अंतिम इच्छा... फक्त एकच प्रश्न विचारते, बघ जमल्यास उत्तर दे स्वतःलाच...

"नोकर माणसां साठी आणि कुत्र्यां साठी रूम बांधल्यास तुझ्या बंगल्यात, तशीच एक रूम आई साठी बांधता आली नाही का रे तुला...? 🙏🌹🙏

Address

Pune

Opening Hours

9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nagesh Mallikarjun Bidave posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share