माऊली दारवटकर Mauli Darwatkar

  • Home
  • India
  • Pune
  • माऊली दारवटकर Mauli Darwatkar

माऊली दारवटकर Mauli Darwatkar संस्थापक अध्यक्ष राष्ट्रशक्ती संघटना
संस्थापक अध्यक्ष साईस्नेह सोहळा समिती
शिवापुरटोलविरोधीकृतीसमिती

13/01/2026

3.mp4

12/01/2026
12/01/2026

लोकशाही वाचवा..
योग्य उमेदवाराला मतदान करा..

11/01/2026

सर्व मतदारांना सामाजिक संस्था, संघटनांकडून
आवाहन !!
हा मतदारांचा जाहीरनामा असावा..

03/01/2026

"बिनविरोध" निवडणूक ही लोकशाहीचा गळा घोटत आहे.मतदारांचा मतदानाचा हक्क संपुष्टात येत आहे. बिनविरोध चा अर्थ धाक, दबाव किंवा पैशाच्या बळावर विरोधकाला थांबवणे होय!

उच्च न्यायालयात याचिका टिकेल!
कारण १) बॅलेट पेपरवर " नोटा "चिन्ह" आहे व सर्व उमेदवारांना नाकारण्याचा मतदारांचा घटनात्मक अधिकार आहे.
२) समोरच्या उमेदवारांनी परस्पर माघार घेऊन मतदारांचा विश्वासघात केला आहे. सबब विरोध न झाल्याने बिनविरोध लोकप्रतिनिधी निवडता येणार नाही तो लोकांचा प्रतिनिधी कसा ठरेल?? कारण लोकप्रतिनिधी लोकांनी निवडणे हा मतदारांचा मुलभूत हक्क आहे. तो डावलला गेला आहे.

वरील प्रकरणी विरोधातील राजकीय पक्ष काही करतील असे वाटत नाही. हा विषय तात्काळ ऊच्च न्यायालयात जायला हवा. त्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढे यावे. अन्यथा भविष्यात राजकीय पक्ष "सत्ता" आपापसात वाटून घेतील व मतदारांना निवडणूक प्रक्रियेतून हाकलून लावतील.

माउली दारवटकर
संस्थापक अध्यक्ष
राष्ट्रशक्ती संघटना

संस्थापक अध्यक्ष राष्ट्रशक्ती संघटना
संस्थापक अध्यक्ष साईस्नेह सोहळा समिती
शिवापुरटोलविरोधीकृतीसमिती

पाताळयंत्री "धेंडांच्या" नाना कळी!निष्ठावंतांच्या नशीबी रिकामी झोळी..सर्वच पक्षात अशा "धेंडांचा" वरचष्मा असतो! राज्याच्य...
02/01/2026

पाताळयंत्री "धेंडांच्या" नाना कळी!
निष्ठावंतांच्या नशीबी रिकामी झोळी..
सर्वच पक्षात अशा "धेंडांचा" वरचष्मा असतो! राज्याच्या नेत्यांचे ते 'खुषमस्करे हस्तक' असतात. ते इतके पाताळयंत्री असतात की, प्रभागातील तरूण कार्यकर्त्यांची फळी ते कधीही पुढे येऊन देत नाहीत.

ते निष्ठावंतांचे राजकीय भवितव्य संपवून टाकतात. अभ्यासू कार्यकर्ते ही त्यांची अडचण असते. "स्टेजवर नेत्यांच्या शेजारी बसून नेत्याच्या कानात कुजबूजण्याचा हक्क त्यांना गमवायचा नसतो,शहरातील पक्ष त्यांना एकाधिकारात चालवायचा असतो."

गेल्या दोन दिवस AB फार्म वाटपाच्या तमाशाने सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या भवितव्याची YZ झाली. मी सर्वपक्षीय माझ्या अनेक सहकाऱ्यांना फोन केले,धीर दिला. सर्वांचा रोष "धेंडां" विरूद्ध होता. खरोखरच कार्यकर्ते आयुष्यातील महत्वाचा काळ उद्ध्वस्त करून घेतात व फसतात. सर्व पक्षातील "धेंडांचे" हे दुष्टचक्र कसे संपवणार!

तुम्ही पक्षाशी एकनिष्ठ असता..
पक्ष तुमच्याशी एकनिष्ठ असतो का?
मग अशा एकतर्फी प्रेमात आत्महत्या होणारच...

उपाय... 😄

● तिन टर्म झालेल्या नगरसेवकाला कोणत्याही पक्षाने परत संधी दिली असेल तर त्याला निःसंकोचपणे पाडा! त्याशिवाय पक्षातील पुढच्या पिढीला संधी मिळणार नाही. तसेच पक्षाच्या नेत्यांना योग्य तो धडा मिळेल.

● अनेक वर्षे एखाद्या पक्षात काम करूनही कधीही निवडणूक लढण्याची संधी मिळाली नसेल तर अशा कार्यकर्त्यांचे पक्षांतर योग्यच आहे. मात्र २-३ टर्म नगरसेवक होऊनही पक्षाच्या वाईट काळात पक्षांतर करणाऱ्यांना प्राधान्याने पाडा! हे मतलबी कुणाचेच नसतात...

● महानगरपालिकेच्या अर्थकारणाचा कोणताही अभ्यास नसलेल्या व केवळ हंगामी यात्रे - जत्रेवर व पैशाच्या माजावर निवडणूक लढणाऱ्यांना प्रचंड बहुमताने पाडा.. कारण त्याशिवाय सामान्य कुटूंबातील अभ्यासू कार्यकर्त्यांना संधी मिळणार नाही.

अत्यंत महत्वाचे! शहरातील सर्वपक्षीय धेंडांना या निवडणूकीत रिटायर्ड करा तरच तुम्ही मोकळा श्वास घ्याल!
त्यांचा माज ४ चा प्रभाग झाल्याने वाढला आहे. त्यांना खात्री आहे, ४ च्या प्रभागात बंडखोरी टिकत नाही..

पुढील ५ वर्षे २ च्या प्रभाग रचणेसाठी आपापल्या पक्षांना धारेवर धरा.. बंडखोरी हा देखील लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. तो ४ च्या प्रभागाने संपुष्टात आणला आहे.
अन्यथा स्वतःला कार्यकर्ते नव्हे गुलाम किंवा चाकर समजा!

(मतदारांना फाट्यावर मारून "गुन्हेगारांना" तिकीट देणारे नेते काय लायकीचे असतील याची जाणिव कार्यकर्त्यांनी व मतदारांनी विधानसभेला ठेवावी.)

माउली दारवटकर
संस्थापक अध्यक्ष
राष्ट्रशक्ती संघटना

सत्तेच्या म्हसोबाला कार्यकर्त्यांचा बळी... प्रभाग पद्धती मागे "पक्षीय टोळधाड"..!!स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक हा क...
19/12/2025

सत्तेच्या म्हसोबाला कार्यकर्त्यांचा बळी...
प्रभाग पद्धती मागे "पक्षीय टोळधाड"..!!

स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक हा कार्यकर्त्यांचा आत्मा असतो. जनतेचा सर्वात जवळचा व हक्काचा लोकप्रतिनिधी स्थानिक नगरसेवक हाच असतो. पुर्वी तो सांगेल तिथेच लोकसभा,विधानसभेचे मतदान व्हायचे. सबब आमदार व मंत्र्यांना देखील नगरसेवकांची भुमिका विचारात घ्यायला लागायची व हिच खरी लोकशाही होती.

मात्र राज्य पातळीवरील सर्वपक्षीय नेत्यांना नगरसेवकांची जनतेची जोडलेली नाळ ही डोकेदुखी वाटायची. ही नाळ तोडून स्वतःकडे एकाधिकारशाही त्यांना हवी होती. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीत मतदार पक्षावर नव्हे उमेदवारावर मतदान ठरवायचा ! हेच राजकीय नेत्यांना नको होते.

याच नालायक वृत्तीने "प्रभाग पद्धतीला" जन्म दिला. आधी २ चा प्रभाग केला तरीही कार्यकर्त्यांनीच बाजी मारली! मग नेत्यांनी ३ चा प्रभाग केला, कार्यक्षेत्र वाढल्याने कार्यकर्त्यांची दमछाक होऊ लागली व नेत्यांच्या चेहर्‍यावर आसुरी आनंद ओसंडून वाहू लागला. शेवटी स्थानिक कार्यकर्त्यांचा बळी देणारा ४ चा प्रभाग करण्यात आला ... आणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या लोकशाहीचा अधिकृत अंत झाला!!

मित्रांनो ६० ते ७० हजार मतदारांमधे सातत्य ठेऊन ५ वर्षे काम करणे सामान्य कुटूंबातील कार्यकर्त्याला अशक्य असते. मग निवडणूक आपोआप पक्षावर जाते.पंतप्रधांच्या नावावर महानगरपालीकेचे देखील मत मागता येते. नेत्यांना उमेदवारी देताना "सांगकामे" निवडता येतात व निवडूनही आणता येतात. हजारो कोटींच्या शहरातील कामांची सुत्रे राज्याच्या नेत्यांच्या हातात राहतात व निवडून आलेले "सांगकामे" हतबलपणे हुजरेगिरी करण्यात धन्यता मानतात.

सत्तेच्या म्हसोबाला कार्यकर्त्यांचा बळी दिला की, तो म्हसोबा राज्य ही चालवतो व महानगरपालिका देखील चालवतो. त्याशिवाय तो शांत होत नाही.

४ च्या प्रभागाची रचना तरी कायम राहते का? ती प्रत्येक निवडणूकीत बदलण्याचा मान हा सत्तेतील "म्हसोबाचा" ...

तरूण मित्रांनो, या राजकीय भांडवलशाही विरोधात उठाव करण्याची वेळ आली आहे. कारण न्यायपालीका आंधळी आहे. पत्रकारिता थंड आहे. मतदार हंगामी जत्रे - यात्रेत दंग आहेत.

अन्यथा "ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान"

माउली दारवटकर
संस्थापक अध्यक्ष
राष्ट्रशक्ती संघटना

हगवणे कुटुंब हा 'मराठा समाजाचा चेहरा' का बनवता?(माझ्या लेखणीतून.. )हुंडाबळी सारखा प्रकार जेव्हा कोणत्याही समाजात घडतो ते...
08/06/2025

हगवणे कुटुंब हा 'मराठा समाजाचा चेहरा' का बनवता?
(माझ्या लेखणीतून.. )

हुंडाबळी सारखा प्रकार जेव्हा कोणत्याही समाजात घडतो तेव्हा तो निंदनीयच असतो. परंतु लग्न सोहळ्यां मधिल अनावश्यक डामडौल हा जणूकाही काही समस्त मराठा समाजालाच जडलेला रोग आहे असे भासवले जात आहे.

बोटावर मोजण्याइतकेच गुंठा मंत्री, खोट्या राजकीय प्रतिष्ठेला जपणारे तथाकथित पुढारी व वाम मार्गाने तुंबड्या भरून प्रतिष्ठा मिरवणारे महाभाग सोडले तर आजही बहुसंख्य मराठा समाज हा गावातल्या मंदीरा बाहेर मांडव टाकुन, वरण भातावरच लग्नाच्या पंगती उठवत आहे.
अर्थात मुठभर धनदांडग्यांचा माज हा सकल मराठा समाजाशी जोडणे गैर आहे.

वास्तविकतेपासून आम्ही कायम लांब राहतो. खरी समस्या ही आहे की, अशा भव्य दिव्य लग्न सोहळ्यांना राजकारणीच प्रतिष्ठा देतात. एखाद्या गावातल्या मंदिरा बाहेरील साध्या लग्न सोहळ्यात राज्यातील किती नेते हजेरी लावतात? अर्थात खोटी प्रतिष्ठा व मोठेपणा या मानसिक रोगाला खतपाणी कोण घालत?

त्यातच एक "श्रीमंत - अतिभिकारी" वर्ग तयार झाला आहे. ही मंडळी वरकरणी धनाढ्य असली तरीही ईतकी भिकारी असतात की,त्यांची हुंड्याची व इतरांच्या शोषणाची भुक कधीच भागत नाही. त्यातच ते पशू हिंसक होतात. पण हे काही एका समाजात होते का? नाही.. तर हा रोग सर्व व्यापक आहे. त्या रोगाचे मुळ हे पैशाचा लोभ, खोटी प्रतिष्ठा हाच आहे.

असो मुद्दा एकच, बांधावर गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमधे बहूसंख्य मराठा आहे! बळीराजा बनून अन्न धान्य पिकवणारा देखील बहूसंख्य मराठा आहे!!
तेव्हा गुंठ्याच्या पैशांवर माजलेल्या भुतावळीचा आमचा समंध नाही व तो मराठा समाजाचा चेहरा देखील नाही.

सबब प्रबोधन करून,चुकीच्या रूढी परंपरा बंद करणे ही समज मराठा समाजाला नक्कीच येईल. पण पैशासाठी पिसाळलेल्या जनावरांवर याचा फार परिणाम होणार नाही हे मात्र नक्कीच!!

माउली दारवटकर
राष्ट्रशक्ती संघटना
पुणे.

Address

Nirmal Park, Padmavati
Pune
411043

Alerts

Be the first to know and let us send you an email when माऊली दारवटकर Mauli Darwatkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to माऊली दारवटकर Mauli Darwatkar:

Share