आम्ही जगताप बंधू, मुळचे आम्ही सासवडचे. गेली १२० वर्षापासून आमचा परिवार पुणे शहरामध्ये शिक्षण आणि व्यवसाय याच्या निमित्ताने स्थायिक झाला. एकत्र कुटुंब, परस्पर सहकार्य आणि एकमेकांबद्दलच्या एकोप्यामुळे अल्पावधीतच आमच कुटुंब पुण्यामध्ये स्थिरावलं.
१९८० साली आमचे वडील बंधू श्री. अरुण(दादा) मारुती जगताप यांनी विजय पान मर्चंट च्या निमित्ताने आमच्या कुटुंबाचे व्यवसायाशी नाते जोडले. तत्पूर्वी आमचे संपूर्ण
कुटुंब नोकरीत गुंतलेले होते, १९८० च्या दशकात आमच्या कुटुंबातील सदस्य शरदराव जगताप, संजयराव जगताप, विजयराव जगताप आणि आमचे पिताश्री मारुतीराव(नानासाहेब) जगताप यांच्या मदतीने एकेक व्यवसाय सुरु करू लागलो. यातच वर्ष सौंफ या बडीशेप चा व्यवसाय अमृता इडली सेंटर, सिताली स्टेशनरस, हॉटेल अमृता – अमृतुल्य आणि अमृता डायनिंग हॉल अशा प्रकारचे अनेक उद्योग आमच्या परिवाराने वाढवले. हे करत असताना १९८० साला पासून प्रत्येक वर्षी आम्ही गणपती विक्रीचा व्यवसाय करत आहोत, दिवाळीत आकाश-कंदील, फटाके, किल्ले, चित्र असे नाना तरेचे व्यवसाय करत आहोत. गेली ३५ वर्षे स्वामींच्या कृपेने आणि तुमच्या सारख्या मायबाप ग्राहकांच्या मदतीने गणपती विक्रीचा व्यवसाय चालू आहे आणि तो असाच चालत राहो... हीच श्री चरणी प्रार्थना,
गेल्या १५ वर्षापासून गणेश मूर्ती विक्री आणि फटका विक्रीची दुसरी शाखा(श्री स्वामी समर्थ गणेश मूर्ती विक्री केंद्र) आमचे बंधू अरुणराव जगताप आणि संजयराव जगताप आपल्या कुटुंबाच्या मदतीने, श्रीकांत जगताप अनिकेत जगताप, अथर्व जगताप या आमच्या तिसऱ्या पिठीच्या मदतीने यशस्वी परीने चालवत आहे.
आपल्या सारख्या मान्यवर ग्राहकांचे सहकार्य लाभले आणि ते इथून पुढेही अशाच प्रकारे लाभो हीच आपणास नम्रविनंत्ती.