12/07/2026
#क्षमासाधना होओपोनोपोनो
(सर्वांसाठी वयोगट 18 ते 55)
*कोर्स Online Zoom वर असेल.*
#अभ्यास
क्षमा करणं म्हणजे काय?
क्षमा साधना कशी सुरु करावी?
होओपोनोपोनो समजून घेऊया.
#प्रेग्नन्सी असेल तर प्रवेश नाही.
ट्रेनर कोच कंटेंट क्रिएटर असल्यास प्रवेश नाही.
#जुलै2026
#शनिरविबॅच
18 आणि 19 जुलै
एकूण 2 सेशन्स
4 तास प्रशिक्षण
सकाळी
🎯वेळ:10:00 am To 12:00 pm
फी: 2,000 रु.
https://wa.me/919689124376
©कांचन दीक्षित
https://whatsapp.com/channel/0029Vb82WMmBlHphJWHAIC11
#न्यायअन्याय
#क्षमासाधना
काल क्षमा साधना सेशनमध्ये एक प्रश्न होता, माफ करणं म्हणजे सोडून देणं,अन्याय सहन करणं किंवा न्यायाची अपेक्षा सोडून देणं असा होतो का?
याचं उत्तर हे आहे की,
आपण दोन वेगळ्या गोष्टींमधे गोंधळ करत आहोत,
clarity Is Power!
एक आहे या जगातलं कोर्ट जिथे खरं खोटं मांडलं जातं क्वचित प्रसंगी लाच/वशिला चालतो साक्षीदार बदलले जातात खटला वर्षानुवर्ष चालतो मग स्वतःची बाजू मांडावी लागते एक स्टोरी सांगितली जाते मग त्या स्टोरीच्या बदल्यात प्रति स्टोरी असते आपण अनेक सिनेमे पाहिलेले आहेत आणि वास्तवातही अन्याय होताना दिसतो मग न्यायासाठी लढावं लागतं त्यासाठी अनेक वर्ष खर्च होतात आयुष्याची होळी होते साधारणपणे या जगात न्याय मिळवण्यासाठी हा संघर्ष आहे.
आता युनिव्हर्सचं सुद्धा एक कोर्ट आहे जे दिसत नाही आणि कोर्ट म्हटलं की,आपल्याला वाटतं की जसं आपलं इथलं कोर्ट तसंच ते असेल म्हणजे तिथे पण हीच पद्धत असेल.
चूक!
'दृश्यम' सारखे सिनेमे मनोरंजनासाठी असतात किंवा या जगासाठी असतात,युनिवर्सच्या अदृश्य कोर्टात चालाकीला जागाच नाही.
युनिव्हर्सचं कोर्ट फास्ट ट्रॅक आहे,युनिव्हर्सला एवढा मोठा पसारा सांभाळायचा आहे की,त्याला प्रत्येकाच्या केसेस अशा पद्धतीनं सुट्या सुट्या सोडवत बसायला वेळ नाही,त्याला इतर बरीच कामं आहेत,
एवढा टाइमपास करायला माणसांसारखं ते रिकामटेकडं नाही.
तिथे सन्नी पाजी स्टाईलनं न्याय होतो,
आज आत्ता ताबडतोब!😀
कारण युनिव्हर्स सिस्टीम नं काम करतं तिथे पैसा चालत नाही हुशारी चालत नाही वशिलेबाजी चालत नाही तिथे एक शिस्तबद्ध सिस्टीम आहे तिथे कायदा चालतो फक्त कायदा आणि तो इतका ॲक्युरेट आहे की कुणीच वाचू शकत नाही!
कुणीच म्हणजे अगदी कुणीच आणि तिथे पळून जाण्याची सटकण्याची शक्यता शून्य आहे.
आता हे कोर्ट काम कसं करतं ते पाहू,हे कोर्ट प्रत्येक क्षणाला तिथल्या तिथे न्याय करतं,तिथल्या तिथे निकाल लावतं,शिक्षा सुनावतं.
तिथे कोर्ट आणि ती व्यक्ती या दोघांमधे तिसरं कोणी नसतं,बाजू ऐकून घेणं वगैरे टाइमपास नसतो गुन्हा आणि गुन्ह्याची शिक्षा असा फॉरमॅट असतो तुम्ही शाहिद कपूरची रिल पाहिली असेल,
'सबका आपना रजिस्टर खुलेगा' म्हणजे मी मारलं कारण त्यानं मारलं असा टाइमपास करायला,कपटी चतुर माणसांची लबाड बुद्धी आणि त्यांनी रचलेली गोष्ट ऐकायला माणसं थोडी बसली आहेत वर!
एनर्जीचं जग आहे आणि एनर्जी cause and effect या तत्त्वावर काम करते.
दोघांनी एकमेकांना मारलं म्हणजे फिट्टमफाट झाली 😀असा कायदा तिथे नाही!
तो पोरखेळ आपल्याकडे चालतो तिकडं नाही!😀
तिकडे 'जो मारेल त्याला शिक्षा' असा न्याय होतो,
सिस्टीम काम करते तिकडे स्टोरी नाही.
त्यामुळे प्रत्येक जण आपलं रजिस्टर घेऊन नोंदी करत फिरतो आहे!
मला हे रहस्य कळल्यावर मला आता कोणाचाही सूड घ्यावासा वाटत नाही कारण न्याय फिक्स आहे,होणारच आहे,मी वेगळा जोर लावायची गरज नाही मला त्यासाठी काहीही प्रयत्न करायचे नाहीयेत मला ज्यांनी दुःख दिलेलं आहे त्यांनी स्वतःचं दुःख स्वतः च त्यांच्या रजिस्टर मधे लिहून टाकलेलं आहे,
आता प्रश्न माझ्या रजिस्टर चा उरतो, आता मी काय करेन त्याचं फळ मला मिळेल आणि ते माझ्या हातात आहे ते मी वेगळं लिहू शकते ही आहे क्षमा साधना हे आहे सोडून देणं!
या जगाच्या कोर्टात सोडून द्या असं म्हणत नाहीये क्षमा साधना त्या युनिवर्सच्या कोर्टाचा विषय आहे, म्हणून गल्लत करू नका दोन वेगळे विषय आहेत माफ करायचं म्हणजे इकडच्या कोर्टातली केस मागे घ्यायची आणि शत्रूशी मैत्री करायची असा होत नाही!
इकडे चाललाय तो खेळ तसाच चालू द्यायचा पण युनिव्हर्सच्या कोर्टाचं पण भान ठेवायचं कारण एकाच वेळी दोन्हीकडे केस सुरू आहे.
तिकडची शिक्षा या जगात फलित व्हायला वेळ लागतो पण निकाल ताबडतोब लागलेला असतो.
इथे एका टाईमफ्रेम मधे आपण घटनाक्रम लावत असतो त्यामुळे आपल्याला न्याय आणि निकाल दिसतो पण त्या जगात टाईमफ्रेम नाहीये म्हणून आपल्याला अन्याय झाल्यासारखा वाटतो.
तिकडच्या जगाचे कायदे वेगळे आहेत तिकडे सिस्टीम वेगळी आहे,आपण कदाचित इथल्या जगात हारु पण तिकडे जिंकू!
✅️आपलं रजिस्टर सांभाळा.
✅️ न्याय होईल का नाही या संशयात वेळ वाया घालवू नका तो होणारच आहे.
✅️ दुःखाच्या बदल्यात समोरच्याला दुःख काय देऊ?कसं देऊ? यात स्वतःचं रजिस्टर भरून घेऊ नका.
✅️ पहिलं भरलेलं रजिस्टर घेऊन क्लियर करायला आलोय,अजून दुसरं कर्ज घेऊन जायचं नाहीये😀
✅️ तुम्ही मनानं क्षमा केल्यानंतर व्यक्ती सुटली असं नाही,युनिव्हर्स आणि ती व्यक्ती बघून घेईल.
✅️ या जगाची जी सिस्टीम आहे ती पाळा पण तो एक ड्रामा आहे एवढंच!
©कांचन दीक्षित