Catering Consultancy Services

Catering Consultancy Services Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Catering Consultancy Services, In-Home Service, Mayuresh B/55 Rajarshi Shahu Society, Pune-Satara Road, Pune.

भाकरी मिसळआता हे काय आणि नवं????सहजच सुचलेली ही रेसिपी खाताना मात्र 'याड लागलं याड लागलं रं'करून गेली.संध्याकाळचं वन डिश...
01/05/2025

भाकरी मिसळ

आता हे काय आणि नवं????

सहजच सुचलेली ही रेसिपी खाताना मात्र 'याड लागलं याड लागलं रं'करून गेली.संध्याकाळचं वन डिश मिल.
गार भाकरी म्हणजे माझा विक पॉईंट.ती तशीच खाण्या ऐवजी जरा वेगळा प्रकार करून पहावा म्हणलं.लै भारी झाली ना राव.अशी मिसळ कुठेही मिळत नाही बरं का!
फोडणीमध्ये कांदा,कढीपत्ता टोमॅटो,आलं,मिरची,हळद,हिंग,तिखट आणि थोडासा गोडा मसाला,तळलेले दाणे,चवीप्रमाणे मीठ घालून थोडासा पाण्याचा हबका मारून मऊसर फोडणीची भाकरी करून त्यावर बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर.हा झाला मिसळीचा बेस.

तुरीच्या वरणाचे अगदी सरसरीत तर्रीबाज सॅम्पल,तेसुद्धा कोल्हापुरी कांदालसूण चटणी(मी फक्त रुचिराची वापरतो,फक्त कोल्हापूरला मिळते)वापरून केलेले.त्यावर थोडी कोथिंबीर.
तयार भाकरीवर लिंबू पिळून वर फक्त शेव घालायची आणि तर्रीबाज सॅम्पल त्याच्या बाजूला.
दनकुन हानायचं बगा.

19/09/2024

पहिलाच प्रयत्न तुमच्यापर्यंत येण्याचा.

05/08/2024
लडाख मधील वैशिट्यपूर्ण झाड स्पेता.या झाडाचे वैशिष्ठय म्हणजे याचे खोड कापले तरी त्याला पुन्हा कापलेल्या ठिकाणी  पालवी येत...
05/08/2024

लडाख मधील वैशिट्यपूर्ण झाड स्पेता.

या झाडाचे वैशिष्ठय म्हणजे याचे खोड कापले तरी त्याला पुन्हा कापलेल्या ठिकाणी पालवी येते आणि ते नव्याने वाढते.या झाडाचे नाव स्पेता आहे लडाखमध्ये घराला छताचे वासे करण्यासाठी याचा उपयोग करतात.या झाडाचा पुन्हा पुन्हा उपयोग करता येऊ शकतो.अशा झाडांमुळे वनराई टिकून राहते.आपल्याकडे आपल्या हवामानात येऊ शकली तर या झाडांची लागवड करायला हवी.

केटरिंग कन्सल्टन्सी सर्व्हिसेस,पुणे9158798340मिसळीचा मी तयार केलेला इन्स्टंट ओला मसाला वापरून केलेली ही "सेमी ड्राय मिसळ...
10/10/2023

केटरिंग कन्सल्टन्सी सर्व्हिसेस,पुणे
9158798340

मिसळीचा मी तयार केलेला इन्स्टंट ओला मसाला वापरून केलेली ही "सेमी ड्राय मिसळ".याच तयार मसाल्यात पाहिजे तितकेच पाणी घालून सॅम्पल सुद्धा करता येते बरं का!पण ब्रेड नको असेल तर अशी सेमी ड्राय मिसळ फार जड होत नाही.या साठी फक्त हा मसाला,शिजवलेल्या भाज्या,पोह्यांचा लाईट चिवडा,बारीक शेव,कांदा, कोथिंबीर आणि लिंबू.बस्स फक्त इतकेच.

केटरिंग कन्सल्टन्सी सर्व्हिसेस,पुणे9158798340इन्स्टंट मिसळ मिक्सआठवड्यातून,पंधरा दिवसातून रविवारी ब्रेकफास्टला मिसळ असेल...
29/09/2023

केटरिंग कन्सल्टन्सी सर्व्हिसेस,पुणे
9158798340

इन्स्टंट मिसळ मिक्स

आठवड्यातून,पंधरा दिवसातून रविवारी ब्रेकफास्टला मिसळ असेल तर मिसळप्रेमींना नक्कीच आवडेल. पण.........हा पणच नडतो ना प्रत्येक वेळी!! कारण असं आहे की त्या ठराविक क्षेत्रात आंबट,तिखट,गोड चवीची मिसळ खायची तर त्यासाठी अर्धा ते पाऊण तास थांबायचं,मग स्वतःच्याच हाताने मिसळप्लेट घेऊन यायचं आणि कसं तरी दाटीवाटीने बसून मिसळ खायची.
त्यापेक्षा यासाठी लागणाऱ्या 2/3 भाज्या बारीक चिरून आपल्याला जितके सॅम्पल हवे तेवढे पाणी(सढळ हाताने)घालून चांगल्या उकळायच्या, भाज्या अगदी मऊ शिजल्यावर हा मसाला आपल्याला हवा तितका घालायचा.एक उकळी आली की मिसळीचा स्टार आयटम तयार.
एक मुख्य वेळखाऊ पदार्थ तयार असल्यावर बाकी पदार्थ झटकन होतात,फार वेळ जात नाही आणि चव मात्र कायम तीच.
शिकण्यासाठी जरूर संपर्क करा.

माझी आजची क्लायंट,वैष्णवी काळे.सध्या सौ चारुकडे व्हायोलिन शिकते.रेसिपीज शिकायची सुद्धा आवड आहे.आज तिच्या आवडीची पावभाजी ...
11/09/2023

माझी आजची क्लायंट,वैष्णवी काळे.सध्या सौ चारुकडे व्हायोलिन शिकते.रेसिपीज शिकायची सुद्धा आवड आहे.आज तिच्या आवडीची पावभाजी आणि क्लब सँडविच शिकवले.अशी पावभाजी आमची कधीच होत नाही आणि कोणत्याही हॉटेलमध्ये सुद्धा इतकी टेस्टी पावभाजी खाल्ली नाही अशी तिची प्रतिक्रिया होती.क्लब सँडविच सुद्धा खूपच आवडले.तिला मनःपूर्वक शुभेच्छा.

22/08/2023

केटरिंग कन्सल्टन्सी सर्व्हिसेस पुणे 🍳🍜🍛🌯🍜🍳

आवड म्हणून हल्ली अनेकजण केटरिंगच्या व्यवसायात येऊ इच्छित आहेत.अनेकजण पूर्वीपासूनच खाद्यव्यवसायत आहेत.चालू व्यवसायात ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही,अशीसुद्धा काहीजणांची तक्रार असते.

आपण करून विकत असलेल्या पदार्थांच्या चवीत काही बदल आवश्यक आहेत का,त्यांच्या सादरीकरणात काही बदल हवे आहेत का,याबाबत तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी येऊन मार्गदर्शन करता येईल.त्याचा निश्चितच फायदा होईल.
,🍳🍲🌯🍱🍜🍝🍛
🍜🍛🍳🍲🍤🍡🍦🍝🍠

खवैय्यांना हमखास आवडेल अशीच टेस्ट देण्यासाठी अनेक पदार्थ तुमच्या/आमच्या किचनमध्ये अगदी सोप्या पद्धतीने आम्ही शिकवतो.🍌🍜🍲🍛🍝🍠🍢🍡🍤🍤🌯🌮

पारंपरिक महाराष्ट्रीयन स्नॅक्स,या व्यतिरिक्त झुणका,खर्डा,मटारउसळ,वालाचीउसळ,कोल्हापुरी अक्खा मसूर.
कोल्हापुरी मिसळ,पुणेरी मिसळ(2 प्रकार) बटाटे वडा(2 प्रकार),कोथिंबीर वडी,कटलेट,आणि अनेक नाविन्यपूर्ण पदार्थ सुचवून त्याबद्दल मार्गदर्शन करता येईल.

ओली भेळ करण्यासाठी चिंचपाणी, पाणीपुरी साठी मसाला,रगडा पॅटिस साठीचे पॅटिस,पावभाजी,तवा पुलाव.🍉🍊🍑🍐

हे सर्व सर्वांच्याच आवडीचे पदार्थ आहेत,या व्यतिरिक्त तुम्हाला काही शिकायचे असल्यास त्याबद्दलसुद्धा विचार करता येईल.

अवश्य संपर्क करा.🎂🍨🍲🍛🌮🍉🍑🍐🍊

9158798340(कॉल आणि व्हाट्सअप)

सध्या फक्त पुण्यातच मार्गदर्शन मिळेल.

केटरिंग कन्सल्टन्सी सर्व्हिसेसरोस्टेड मसाला पापड,हा काही रेसिपी टाकायचा प्रकार नक्कीच नाही.पण काही ठिकाणी हा प्रकार खाल्...
21/10/2022

केटरिंग कन्सल्टन्सी सर्व्हिसेस

रोस्टेड मसाला पापड,हा काही रेसिपी टाकायचा प्रकार नक्कीच नाही.पण काही ठिकाणी हा प्रकार खाल्ल्यावर कळते की याची सुद्धा रेसिपी सांगायची गरज आहे.खाद्य व्यवसाय सुरू करताना हॉटेल मॅनेजमेंट वगैरे पुस्तकी अभ्यासक्रम करून अनेकजण स्वतःचा व्यवसाय सुरू करतात.परंतु जे पदार्थ आपण ग्राहकांना सादर करतो ते नेमके काय चवीचे आणि कसे असायला हवे आणि दिसायला हवे याचा गंध त्यांना नसतो.मसाला पापडाला मोठा चिरलेला कांदा घातला की त्याचा लूक एकदम गावठी होतो.बाकी चव वाढवणाऱ्या ingredients बद्दल तर न बोललेले बरे.
माझ्या सर्व पोस्ट्स मध्ये मी नेहमी सांगत असतो की व्यवसाय सुरू करण्यापूर्वीच आपण देणार असलेल्या पदार्थांच्या चवीबद्दल योग्य सल्ला घ्यावा.तुम्ही जर चुकत चुकत शिकणार असाल तर त्यामध्ये व्यवसायाचा बहुमोल वेळ वाया तर जातोच आणि पाहिजे तशी चव न मिळाल्यामुळे ग्राहकही तुटतात.

खाद्य व्यवसायात नव्याने येणाऱ्या लोकांनी याची जरूर दखल घ्यावी.

केटरिंग कन्सल्टन्सी सर्व्हिसेस  पुणे 🍳🍜🍛🌯🍜🍳खाद्य सेवा आता पूर्ववत झाली आहे.आपण हेही पाहतो वाढत्या महागाईमुळे हॉटेलमधील प...
06/07/2022

केटरिंग कन्सल्टन्सी सर्व्हिसेस पुणे 🍳🍜🍛🌯🍜🍳

खाद्य सेवा आता पूर्ववत झाली आहे.आपण हेही पाहतो वाढत्या महागाईमुळे हॉटेलमधील पदार्थसुद्धा महाग झाले आहेत.आपल्याकडे पाक कौशल्य आहे पण त्याचा अर्थार्जनासाठी उपयोग होत नाही.दुसरीकडे कुठे काम करून आपले पाककौशल्य दाखवण्याऐवजी आपल्या कौशल्याचा आपल्याच व्यवसायासाठी उपयोग करून स्वतःचा आणि पर्यायाने आपल्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचावायची ही एक संधी आहे.
,🍳🍲🌯🍱🍜🍝🍛

म्हणूनच खाद्य पदार्थाचा व्यवसाय सुरू करतेवेळीच योग्य सल्ला घेतला,योग्य चवीचे पदार्थ शिकून घेतले तर त्याचा निश्चितच फायदा होतो.🍜🍛🍳🍲🍤🍡🍦🍝🍠
खवैय्यांना हमखास आवडेल अशीच टेस्ट देण्यासाठी हे पदार्थ तुमच्या किंवा आमच्या किचनमध्ये अगदी सोप्या पद्धतीने आम्ही शिकवतो.🍌🍜🍲🍛🍝🍠🍢🍡🍤🍤🌯🌮

पारंपरिक महाराष्ट्रीयन स्नॅक्स, झुणका,खर्डा,कोल्हापुरी अक्खा मसूर,व्हेज बिर्याणी,मश्रुम बिर्याणी🍳🍿🍱🍲🍜🍛🍚🌯🍦
,🍉🍊🍐🍑🍒🌰🍓🍞🍓🍅

कोल्हापुरी मिसळ,पुणेरी मिसळ(2 प्रकार)गावरान मिसळ,अख्खा मसूर मिसळ, बटाटे वडा(2 प्रकार),कोथिंबीर वडी,कटलेट.

मटकी भेळ,ओली भेळ,फरसाण भेळ,भेळपुरी,पाणीपुरी,रगडा पुरी,रगडा पॅटिस,शेव बटाटापुरी,SPDP, मसाला पुरी,पापडीचाट,स्पे.पापडीचाट,झटपट टेस्टी पावभाजी, साऊथ इंडियन स्नॅक्स.🍉🍊🍑🍐

हे नेहमी चांगले जाणारे पदार्थ आणि शिवाय अनेक पदार्थ तुमच्या किंवा आमच्या किचनमध्ये शिकवले जातील.

सर्व पदार्थांची चव एकदम सर्वांना आवडेल अशीच.......
अवश्य संपर्क करा.🎂🍨🍲🍛🌮🍉🍑🍐🍊

9158798340(कॉल आणि व्हाट्सअप)

मी पुण्यात आणि पुण्याबाहेरही कन्सल्टेशन देतो


अनेक रेसिपीज पैकी काही माहिती साठी शेअर करत आहे.

33 new items · Album by Rajay Gosavi

Address

Mayuresh B/55 Rajarshi Shahu Society, Pune-Satara Road
Pune
411037

Telephone

02024230060

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Catering Consultancy Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share