15/11/2018
#मसालेभात
काय मग कशी झाली दिवाळी? फराळाचं करून आणि खाऊन दमला असाल ना? 😉 आजची रेसीपी तशी सगळ्यांकडे केली जाणारी आणि आवडणारी आहे. आपल्या प्रियजनांना नवनवीन रेसीपीज खिलवायला आपल्या अंगी भारी उत्साह संचारतो नै. तर आज पाडव्यानिमित्त केलेला नि आमच्या नवरोबांच्या पसंतीचा मसालेभात आणलाय फक्त तुमच्यासाठी
Masala Bhat Receipe
साहित्य: Ingredients:
1. मसाले भाताला लागणारा मसाला
(Sabut masale for masale Bhat)
१/२ वाटी धणे (1/2 bowl sabut coriander seeds)
१/४ वाटी जिरे (1/4 bowl cumin seeds)
१/४ वाटी तीळ(1/4 bowl sesame)
१/४ वाटी सुके खोबरे(1/4 bowl dry coconut)
७-८ लवंगा(7-8 cloves)
७-८ मिरे(7-8 black paper)
२ मसाला वेलची(2 masala cardamoms)
२ दालचिनी(2 cinnamon)
१/४ टी स्पून ओवा व बडीशेप(1/4 teaspoon carom seeds n saunf)
२-३ तमालपत्र(2-3 bayleaf)
१ टीस्पून दगडफूल(1 teaspoon black stone flower n Aniseed)
तीळ व खोबरे मंद आचेवर नीट भाजून घ्या व उरलेले मसाले तसेच घेऊन मिक्सरवर बारीक करून घ्या. माझ्याकडे हा मसाला तयारच असतो.😀
( dry roast sesame n coconut on slow flame and take other masala ingredients as it and grind them to make fine powder)
2. हिरवा मसाला
(2. Green Masala)
१/४ वाटी खोवलेलं खोबरं (निम्मं वापरा)
(1/4 bowl grated coconut- use half)
१/४ गड्डी कोथिंबीर (निम्मी वापरा)
(1/4 bunch coriander leaves-use half)
बोटभर आलं (1 n 1/2 inch ginger)
२-३ हिरव्या मिरच्या(2-3 green chillies)
हे सर्व वाटून हिरवा मसाला तयार करा.
(Grind all ingredients n prepare green masala)
(उरलेलं ओलं खोबरं व कोथिंबीर मसाले भातावर वाढण्यासाठी ठेवा.)
( for garnishing masale Bhat keep some coconut n coriander leaves aside)
3. उर्वरीत साहित्य :
(3. Remaining ingredients)
१ वाटी आंबेमोहोर तांदूळ.
(1 bowl ambemohor rice- u can easily get in grocery shop)
१ चमचा गोडा मसाला.
(1 teaspoon goda/kala masala - u can use homemade Sunni or curry masala)
१ चमचा म. भा. चा मसाला
(1 teaspoon masala Bhat masala- look above (1)
५-६ उभी चिरून तोंडली
(5-6 ivy gourd)
१/४ वाटी सोललेले मटार
(1/4 bowl green peas)
एक चमचा सायीचं घट्ट दही
(1 spoon curd)
मीठ व किंचित गूळ चवीनुसार
(As per taste Salt n a little bit jaggery)
कढीपत्ता चार पाच पाने
(4-5 curry leaves)
७-८ काजू तळून
(7-8 cashew nuts fried)
फोडणीचं साहित्य(तेल, तूप, मोहरी, जिरे, हिंग, हळद)
(Tadaka ingredients : oil, ghee, mustard, sabut jeera, asafoetida n turmeric powder)
कृती : Process
1. तांदूळ धुऊन निथळत ठेवायचा साधारण १/२तास. ( wash rice n keep it aside for some time)
2. तोंडली, गाजर, कोथिंबीर चिरून, मटार सोलून, काजू काप तळून, ओलं खोबरं खोवून, हिरवं वाटण व मसालेभाताचा मसाला तयार करून घ्यायचा.(cur ivy gourd, carrot. Peel green peas. Fry cashews. Grate coconut. Prepare green masala(2) n masala Bhat masala(1).
3. गरम पाणी तापवून घ्यायचं.(boil 2 n 1/2 water to boil)
4. एकीकडे फोडणी करून त्यात जिरं, मोहरी हिंग हळद घालून कढीपत्ता घालायचा. तोंडलं, गाजर, मटार किंवा आवडीच्या भाज्या घालायच्या. मीठ घालून एक वाफ आणायची. तोंडली शिजली कि त्यात हिरवा मसाला घालून परतायचं. (In a pan, for tadaka, add mustard, cumin, asafoetida, turmeric n curry leaves. Add all vegetables n salt. Stir it. Allow to steam a while. Add green masala when ivy gourd is cooked n again stir fry it.)
5. आता धुतलेला तांदूळ घालून एकजीव करून घ्यायचं. एक वाटीला २ n १/२ वाट्या ह्या प्रमाणात आधण (गरम पाणी) त्यात घालायचं. ( Add rice. Stir fry. Add 2 n 1/2 boiled water in it.)
6. त्यात गोडा मसाला, मसालेभाताचा मसाला, मीठ आणि किंचितसा गूळ घालायचा आणि झाकण ठेवून वाफ आणायची.(add goda masala, salt as per taste as we used some salt above, a little bit jaggery and cover pan and allow it to cook for some time)
7. भात अर्धा कच्चा रटरटत असताना त्यात दही घालून मिश्रण ढवळून घ्यायचं.(add curd when rice is half done)
8. नंतर थोडं साजूक तूप घालायचं अन् झाकण ठेवून भात शिजवून घ्यायचा.( Add ghee n put cover to steam rice)
9. कोथिंबीर अन् ओलं खोबरं घालून सर्व्ह करायचा आणि.. आणि... आता सगळंच कसं सांगू... लग्गेच गट्टम करायचा.(Garnish with coconut n coriander)