Bhagyank Jyotish V Vastushastra Salla Kendra

Bhagyank Jyotish V Vastushastra Salla Kendra Astrology, Gemology & Vastushastra We are consulting in different branches of Astrology & Vastushastra. I have achieved Pandit in Horashastra & Palmistry.

नमस्कार

भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्राची स्थापना २००९ मध्ये ऋषिपंचमीच्या दिवशी झाली. अंकशास्त्र, रमलशास्त्र, होराशास्त्र, हस्तसामुद्रिकशास्त्र व वास्तुशास्त्र या विषयांवर इथे मार्गदर्शन केले जाते.

या सर्व विषयांमध्ये मी विशारद पदवी संपादित केली असुन होराशास्त्र व हस्तसामुद्रिकशास्त्र या विषयात पंडित पदवी मिळवली आहे.

आमच्या कार्यालयाला ISO 9001:2015 चे मानांकन मिळालेले आहे.

े Page सुरु करण्यापाठीमागचा मुख्य उद्देश ज्योतिष व वास्तुशास्त्रातील माहिती विविध लेखांद्वारे आपल्या पर्यंत पोहचवणे आहे.

तसेच आमच्या विविध उपक्रमांची माहितीही याद्वारे आपल्या पर्यंत पोहचवण्याचा उद्देश आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------
Hi,

“Bhagyank Jyotish V Vastushastra Salla Kendra” established in 2009 on RushiPanchami. I have achieved Visharad in Numerology, Palmistry, Ramalashastra, Horashastra & Vastushastra. My consultancy has received ISO 9001:2015 Certification. Purpose behind starting this Page is to facilitate you with information of Astrology & Vastushastra by way of articles. Also to give you information about events organized by me.

--------------------------------------------------------------------------------------------------------

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे २७
An ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५ ३१२ ०५९ । +९१ २० २७२८ ०८३७ | [email protected]

सकाळ वृत्तपत्रामध्ये मध्ये आलेले प्रा. रमणलाल शहा यांचे दैनंदिन भविष्य.
27/08/2026

सकाळ वृत्तपत्रामध्ये मध्ये आलेले प्रा. रमणलाल शहा यांचे दैनंदिन भविष्य.

🚩भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र🚩 #प्रश्नांवर_आधारित  #अभ्यासपूर्ण_मार्गदर्शनआम्ही करतो अभ्यासआपल्या  #जन्...
26/08/2026

🚩भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र🚩
#प्रश्नांवर_आधारित #अभ्यासपूर्ण_मार्गदर्शन

आम्ही करतो अभ्यास
आपल्या #जन्म_कुंडलीचा, #चंद्र_कुंडलीचा, #नवमांश_कुंडलीचा व प्रश्नाच्या अनुषंगाने #षडवर्ग_कुंडल्यांचा

आम्ही करतो अभ्यास
आपल्या प्रश्नाच्या वेळेच्या #प्रश्न_कुंडली चा

आम्ही करतो अभ्यास
आपल्या #जन्मस्थ_ग्रहांचा व #गोचर_ग्रहांचा
#कारक_ग्रहाच्या जन्मस्थ व गोचर स्थितीचा

आम्ही करतो अभ्यास
#महादशा, #अंतर्दशा व #विदशांचा

"तकदीर उनकी भी होती है, जिनकी जनम कुंडली नहीं होती|"
होय, कारण आपल्याकडे मार्गदर्शन केले जाते #हस्तरेषांचा_अभ्यास करून.
जिथे किमान जन्म तारीख आहे, तिथे #अंकशास्त्रावरून.
जिथे काहीच साधनसूची नाही, तिथे #रमलशास्त्राच्या_माध्यमातून.

एकदा आपण स्वतः #अनुभव_घ्या आणि मग इतरांनाही आपला #अनुभव_सांगा.

- होरापंडीत मयुरेश देशपांडे
अंकशास्त्र | वास्तुशास्त्र | रमलशास्त्र | होराशास्त्र | हस्तसामुद्रिकशास्त्र
भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र, जुनी सांगवी पुणे ४११०२७
AN ISO 9001:2015 Certified Consultancy
+९१ ८९७५३ १२०५९ | +९१ २० २७२८ ०८३७ |
[email protected]
Https://www.facebook.com/BhagyankClientFeedback/

*सकाळ वृत्तपत्रामध्ये आलेले गुरुवर्य श्रीराम भट लिखित साप्ताहिक भविष्य*२३ ऑगस्ट २०२६ ते २९ ऑगस्ट २०२६मेष : सप्ताहाचा आरं...
23/08/2026

*सकाळ वृत्तपत्रामध्ये आलेले गुरुवर्य श्रीराम भट लिखित साप्ताहिक भविष्य*

२३ ऑगस्ट २०२६ ते २९ ऑगस्ट २०२६

मेष : सप्ताहाचा आरंभ एकादशीने होत आहे. विशिष्ट घरगुती कार्ये ठरवाल. आजची सकाळ मनपसंत गाठीभेटीची. अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह कलागुणांतून उत्सव-समारंभ गाजवेल. ता. २६ चा बुधवार एक उत्तम शुभ मुहूर्त राहील. तरुणांच्या नोकरीविषयक मुलाखती यशस्वी होतील. व्यावसायिक उत्सव-प्रदर्शन उठाव घेतीलच. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील ग्रहमान सार्वजनिक बाबींतून जपण्याचे. कोणत्याही राजकारणात पडू नका. घरातील वृद्धांच्या आरोग्याची काळजी घ्या. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार विचित्र धावपळीचा राहील.

वृषभ : सप्ताहात खरेदी-विक्रीत फसू नका. संमोहने टाळा. स्त्रीवर्गाशी थट्टामस्करी टाळा. बाकी ता. २६ व २७ हे दिवस मोठे भावरम्य राहतील. काहींचे विशिष्ट आदरसत्कार होतील. रोहिणी आणि मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट शुक्र भ्रमणाच्या पॅकेजमधूनच बोलतील. प्रेमिकांना सप्ताह पर्वणीचा. पौर्णिमेजवळ चैनी-करमणुकींवर खर्च कराल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा शेवट कर्तृत्वाला उजाळाच देणारा. थोरामोठ्यांच्या गाठीभेटींतून लाभ होतील. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी पौर्णिमेजवळ धावपळीचे प्रवास करू नयेत. उत्सव-समारंभातून बेरंगाचे प्रसंग. वादविवाद टाळा.

मिथुन: पौर्णिमेकडे झुकणारा सप्ताह शुभ ग्रहांची स्पंदने खेचून घेईल. उमलत्या तरुणाईला सप्ताह मोठा भावरम्यच राहील. सप्ताह विवाहविषयक गाठीभेटी अंतिम टप्प्यात आणेल. सप्ताहाचा शेवट आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरी-व्यावसायिक घडामोडींतून निश्चितच मोठे भाग्यसंकेत देईल. मात्र सप्ताहात संशयास्पद क्रिया-प्रतिक्रिया टाळाच. पौर्णिमेच्या प्रभावक्षेत्रात द्वाड मित्रसंगत टाळा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींनी पैशाचे पाकीट सांभाळावे. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहातील पौर्णिमेच्या प्रभावातील शुक्र भ्रमण घरात कायें ठरवणारेच राहील. अचानक धनलाभाची परंपरा राहील.

कर्क: राशीतील गुरु भ्रमण पौर्णिमेच्या प्रभावात आपला अधिकार गाजवणारच आहे. विशिष्ट सरकारी कामांतून फलद्रूप होणाराच सप्ताह. विशिष्ट व्यावसायिक येणी येतील. पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीच्या मुलाखती यशस्वी होतील. ता. २६ व २७ हे दिवस आपल्या राशीस मोठी नावीन्यपूर्ण फळे देतील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना विशिष्ट नुकसानीची गुप्तचिंता निघून जाईल. काहींचे हरवलेले गवसेल. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचा सप्ताह एकूणच परिस्थितीजन्य लाभ देईल. ता. २७चा गुरुवार सकाळच्या सूर्योदयी गुरुच्या होऱ्यात दैवी प्रचिती दिल्याशिवाय राहणार नाही. पती वा पत्नीचा सांपत्तिक उत्कर्ष होईल.

सिंह : सप्ताहातील शुभ ग्रहांचे होणारे योग पौर्णिमेच्या प्रभावात उत्तम साथ देतील. मात्र ग्रहणयुक्त पौर्णिमेच्या प्रभावात आरोग्यविषयक पथ्ये पाळा. घाईगर्दीचे प्रवास टाळा किंवा प्रवासात काळजी घ्या. बाकी सप्ताह उमलत्या तरुणाईला छान साथ देईल. कलाकारांना सूर गवसून देणाराच सप्ताह. परदेशस्थ तरुणांना वाव देणाराच सप्ताह. मात्र तरुण-तरुणींनी कुसंगत टाळावी. विशेषतः मघा नक्षत्राच्या व्यक्तींनी सार्वजनिक जीवनात पथ्ये पाळावीत. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात व्यावसायिक उत्सव-प्रदर्शन मोठा लाभ करून देतील. उत्तरा नक्षत्राने पौर्णिमेजवळ खरेदीत फसू नये.

कन्या : सप्ताहातील पौर्णिमेजवळचे ग्रहांचे फिल्ड संमिश्र स्वरूपात बोलू शकते. उतावीळपणा टाळा. गर्भवती महिलांनी दक्षता बाळगावी. बाकी ता. २६ व २७ हे दिवस नोकरी-व्यावसायिक बाबींतून उत्तम फलदायी होतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना महत्त्वाच्या गाठीभेटी, सरकारी कामे, विशिष्ट करारमदार इत्यादींतून हे दिवस मोठे प्रवाही राहतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या प्रभाव क्षेत्रातील शुक्र भ्रमण व्यावसायिक उत्सव-प्रदर्शनांतून लाभ देईल. रक्षाबंधनाचा दिवस घरात प्रिय व्यक्तींबरोबर छान साजरा कराल. उत्तरा नक्षत्रच्या व्यक्तींनी सप्ताहात विसरभोळेपणापासून सावध राहावे.

तूळ : सप्ताहातील पौर्णिमेची स्पंदने तरुणांना अनुकूल राहतील. सप्ताहात ऑनलाइन कनेक्टिव्हिटीतून लाभहोतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरींच्या मुलाखती यशस्वी होतील. नोकरीची निश्चिती होईल. नव्या मित्रमंडळींकडून लाभ होतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेचे प्रभावक्षेत्र अतिशय हृद्य राहील. प्रसन्न गाठीभेटी घडतील. उत्सव-समारंभांतून मिरवाल. विवाहेच्छूना विवाहस्थळे चालून येतील. नोकरीतील बढतीची लक्षणे जाणवतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह नव्या करारमदारांतून नवी व्यावसायिक दिशा देणारा. सरकारी माध्यमे साथ देतील.

वृश्चिक : राशींच्या एक्स्चेंजमध्ये पौर्णिमा छान देवघेवीचे व्यवहार करेल. ता. २६ व २७ हे दिवस शुभग्रहांचेच पॅकेज राबवतील. उमलत्या तरुणाईला फुलवणाराच सप्ताह आहे. जीवनात नवनवीन संधी येतील. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना परिस्थितीजन्य मोठे लाभ होतील. पौर्णिमेचे क्षेत्र मोठ्या सुवार्ताचा ओघ ठेवेल. सप्ताह कलाकारांना वलयांकित करणारा. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहात पौर्णिमेचा एक फास्ट ट्रॅकच राहील. अर्थातच सतत ग्रीन सिग्नलच मिळतील. नारळी पौर्णिमेचा गुरुवार यातूनच मोठ्या यशाची नोंद करेल. परदेशस्थ पुत्रपौत्रांचे भाग्योदय होतील.

धनु : पौर्णिमा आत्मिक बळ वाढवणारीच ठरणार आहे. तरुणांना निश्चित मार्ग उपलब्ध होतील. उद्याचा सोमवार विशिष्ट यशाची ग्वाही देईल. मूळ नक्षत्रास ता. २६ ते २८ ऑगस्ट २०२६ हे दिवस पर्वणीसारखेच. सप्ताहात नोकरीतील मानांकन वाढेल. नोकरीतून परदेशगमनाचे योग येतील. पूर्वाषाढा नक्षत्रास सप्ताह एकूणच व्यावसायिक तेजीच ठेवेल. मात्र सप्ताहात बेकायदेशीर जुगारसदृश व्यवहार टाळा. सप्ताहात पौर्णिमेजवळ सार्वजनिक उपक्रमांतून सहभाग होऊन प्रसिद्धीचे योग. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताह उत्तम नोकरीचे योग आणेल. काहींना कॅम्ससमधून उत्तम नोकरी मिळेल. पती वा पत्नीचे नोकरीविषयक प्रश्न सुटतील.

मकर : सप्ताहातील ग्रहमान थोडे परस्परविरोधी राहील. सप्ताहात हवापाण्यातील संसर्गापासून त्रास होईल. ग्रहणयुक्त पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर जपलेच पाहिजे. घरात विशिष्ट मातृचिंता सतावू शकते. बाकी सप्ताहात ता. २६ ते २८ हे दिवस श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्र भ्रमणातून छान कनेक्टिव्हिटी ठेवतील. विवाहेच्छूचे नैराश्य जाईल. विवाहाचे निर्णय घेतले जातील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीत वरिष्ठांकडून उत्तम साथ मिळेल. नारळी पौर्णिमेचा गुरुवारचा सूर्योदय विशिष्ट सुवार्तातून धन्य करणारा. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना पौर्णिमेच्या प्रभावात दुखापतींपासून जपावे. घरातील द्वाड लहान मुलांकडे लक्ष द्यावे.

कुंभ : सप्ताहातील ग्रहणयुक्त पौर्णिमा आजूबाजूचे भावनिक पर्यावरण बिघडवू शकते. पती वा पत्नीचे आजारपण चिंता निर्माण करू शकते. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींनी सरकारी नियमांचे काटेकोर पालन करावे. घरात नातेवाइकांशी वाद टाळा. वृद्धांनी घरातील तरुणांची मने जपावी. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात व्यावसायिक उलाढाली यशस्वी करणारी. प्रवासातील महत्त्वाची कामे होतील. विशिष्ट नुकसानभरपाई होईल. मात्र सप्ताहात रोख पैसे जपा. पूर्वा-भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या आरंभी विशिष्ट खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून लाभ होतील.

मीन : सप्ताहातील ग्रहमान शुभग्रहांचा अंडरकरंट ठेवेलच. त्यांचा कौशल्याने लाभ घ्याच. सप्ताहातील पौर्णिमेची ग्रहणयुक्त पार्श्वभूमी विचित्र दुखापतीचे प्रसंग आणू शकते. वृद्धांनी प्रवासात सावध राहावेच. तरुणांनी सहली-करमणुकींचे प्रसंग सावधतेने पार पाडून न्यावे. प्रवासात भांडणे टाळा. बाकी सप्ताहाचा आरंभशुक्र भ्रमणातून वैवाहिक जीवनातील सुवार्तातून थक्क करणारा. काहींना सप्ताहात विशिष्ट भेटवस्तूंतून चकित व्हायला होईल. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुवारची नारळी पौर्णिमा नोकरी-व्यावसायिक भाग्योदयातून उसळी घेणारी. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात वाहनांवर सांभाळण्याची. आई-वडिलांशी वाद टाळा.

सकाळ वृत्तपत्रामध्ये मध्ये आलेले प्रा. रमणलाल शहा यांचे दैनंदिन भविष्य.
21/08/2026

सकाळ वृत्तपत्रामध्ये मध्ये आलेले प्रा. रमणलाल शहा यांचे दैनंदिन भविष्य.

Address

B 3 Sona Building Lakshmi Nagar Old Sangavi
Pune
411027

Opening Hours

Monday 5pm - 10pm
Tuesday 5pm - 10pm
Wednesday 5pm - 10pm
Thursday 5pm - 10pm
Friday 5pm - 10pm
Saturday 9am - 5pm
Sunday 4pm - 10pm

Telephone

+918975312059

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhagyank Jyotish V Vastushastra Salla Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhagyank Jyotish V Vastushastra Salla Kendra:

Shortcuts

Share