Atul Jain Friends Circle

Atul Jain Friends Circle atul jain pune
social active person

आज झालेल्या टँकर अपघाताची ही घटना आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अशा टँकर वाहनांवर योग्य ती कारवाई...
05/02/2026

आज झालेल्या टँकर अपघाताची ही घटना आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अशा टँकर वाहनांवर योग्य ती कारवाई का केली जात नाही, हा मोठा प्रश्न आहे. वेगमर्यादा असलेल्या द्रुतगती महामार्गांवरसुद्धा या वाहनांचे नियंत्रण कसे सुटते? बहुतांश वेळा ही वाहने अतिशय बेदरकारपणे (रॅश ड्रायव्हिंग) चालवली जात असल्याचे दिसून येते.

अशा जड वाहनांवर काही तरी कडक निर्बंध असायला हवेत. हा अनुभव अत्यंत भयानक होता आणि या वाहतूक कोंडीत तासन्‌तास अडकलेल्या प्रत्येकासाठी आजचा दिवस खूपच वाईट ठरला. महामार्गांवरील वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करणे अत्यावश्यक आहे, तसेच अशा प्रसंगी तात्काळ आपत्कालीन मदत उपलब्ध झाली पाहिजे…

मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर अपघात झाला,
वाहतूक गेली 24 तासापेक्षा ठप्प…
नागरिक अन्न-पाण्यावाचून त्रस्त आहेत.
कुणाला परदेशी जायचे आहे,
कुणाला मेडिकल इमर्जन्सी आहे,
मुंबईला जाणाऱ्यांना प्रचंड मनस्ताप होत आहे.
कोणतीही पूर्वसूचना नाही,
कोणतीही पर्यायी व्यवस्था नाही.
परिणाम असा की अर्ध्या रस्त्यातून परत ?
अपघातानंतर निर्देश देणं सोपं आहे.
पण असा गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी
पूर्वनियोजन, आपत्कालीन मार्ग, तत्काळ मदत —
हे सगळं कुठे गायब आहे?
या संपूर्ण हलगर्जीपणाला कारणीभूत कोण?
नागरिकांनीच दरवेळी त्रास सहन करायचा का?




Address

309. Ekbote Colony
Pune
411042

Alerts

Be the first to know and let us send you an email when Atul Jain Friends Circle posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Atul Jain Friends Circle:

Share