Surabhi Spiritual Vastu Consultant

Surabhi Spiritual Vastu Consultant VASTU CONSULTANT

06/07/2020
18/06/2020

वास्तू शास्त्र बेसिक कोर्स
फक्त ५ विद्यार्थी
२८ जून स.११ ते १
सं.९८३४८९५४३५

14/06/2020

वास्तू शास्त्र *कालचे आणि आजचे
वास्तुशास्त्र हे कुटुंबाला केंद्र मानून निर्माण केले.पण कोण्या एका व्यक्तीला त्याच्या साठी दिला गेलेला सल्ला आणि त्याचा त्याला उपयोग झाला म्हणून तोच सल्ला सर्वांसाठी उपयोगी पडेल हे शक्य नाही.
त्यामुळे सर्वांच्या घराची रचना सारखीच असू शकत नाही, किंबहूना ती व्यक्ती परत्वे वेगळीच असावी हे मझेमत आहे .
पूर्वीची घरे पाहिल्यास हे आपल्या लक्षात येईल की त्यांची रचना सारखीच नाही. परंतु सध्या मात्र रचना ,दिशा ई दाखवून भीती पोटी हे शास्त्र पाळले जाते,90% घरांची रचना ही चुकीची आहे त्यामुळे त्याचा व्यवसाय करता येतो.असो
माझी पद्धत वेगळी आहे मी घराची अंतर्गत रचना पाहतो, व त्यात बदल सुचवतो जे सहज शक्य असतात आणि बिनखरचिक कीवा कमी खर्चाचे असतात.
आता एक उदा.बघू बेडरूम नैऋत्य दिशेला असावी,किचन आग्नेय दिशेला असावी असे सांगितले जाते,पण माझी पद्धत वेगळी आहे आग्नेय दिशेला अस काय आहे जे माझ्या किचन ला आवश्यक आहे आणि ते मी माझ्या किचन मध्ये आणू शकतो का? मग ते कोणतयाही दिशेला असुदे (आता गल्लत कुठे झाली बघा आग्नेय दिशा लक्ष्मी ची आहे असे सांगितले आहे आणि पूर्वी लोग घरातील स्त्री ल लक्ष्मी मानत,त्यावेळी स्त्रियांचा पूर्ण वेळ स्वयंपाक घरात जात म्हणून त्यांनी आग्नेय दिशेला स्वयंपाक घर बांधले,आणि आता काळ बदलला तरी हेच नियम आपण धरून बसलो आहोत, )त्यासाठी खूप काही करावे लागत नाही आणि ते बुध्दीच्या तर्कात बसते.
माझ्या उपाया मधे तन,मन,आणि धन या तीनही गोष्टी लागतात त्यामुळे इतरांपेक्षा खर्च खूपच कमी होतो आणि जोतो आपले घर आपल्या आवडी निवडी नुसार सजवून खुश राहू शकतो
सुरभी वास्तू १६ दिशा,५तत्व,आणि महत्वाचं म्हणजे त्या घरात राहणाऱ्या माणसांचा परस्पसंबंध अभ्यासून त्यानुसार मार्ग दर्शन करते,
वास्तू शास्त्र बद्दल अधिक माहिती साठी संपर्क
सुरभी वास्तू
श्री विजय कुलकर्णी
मो न ९८३४८९५४३५
व्हॉट्सअँप ७०८३३७५३४९

All JITEN PYRAMIDS AT YOUR DOOR STEPS CALL 9834895435/WHATSAPP 7083375349
11/06/2020

All JITEN PYRAMIDS AT YOUR DOOR STEPS CALL 9834895435/WHATSAPP 7083375349

01/06/2020

वास्तुशास्त्र माझ्या नजरेतून

वास्तुशास्त्र म्हणजे घर आणि दुकान एवढयापुरतच मर्यादित आहे, असं वाटत.परंतु वास्तुशास्त्र जगण्याचं कला शिकवत. जीवनात घडणाऱ्या घटनांवर प्रभाव टाकणारं शास्त्र आहे. आपल्या आंतरमनाशी जोडणारा पूल आहे. खरी शक्ती ही आंतरमनातच असते. आपल्या जीवनाचा उद्देश सफल करून सुख- दुःखाच्या पलीकडचा आनंद देणारं, स्थुलातून सुक्ष्माकडे नेणार शास्त्र आहे.
वास्तूच काय, कुठलंही ज्ञान मिळवण्यासाठी भाव जागृत असणं महत्वाचं आहे. आता भाव म्हणजे काय हे समजण्यासाठी एक गोष्ट सांगतो.
एका गावात एक पुजारी राहत असतो. त्या गावाजवळच एक टेकडी असते. त्या टेकडीवर शंकराच मंदिर असतं. पुजारी रोज सकाळी नदीवरून हंडाभर पाणी,बेलाची पाने घेऊन शंकराची पूजा करीत असे. भस्म लावून,बेलाच पाने वाहत असे.आणि प्रार्थना करीत असे.
एक दिवस डोंगराच्या पलीकडील जंगलातील एक भिल्ल पुजारी पूजा करताना पाहतो. पुढे रोज तो हे पाहू लागतो, आणि त्याला वाटतं की असे केल्याने आपल्याही इच्छा पूर्ण होतील. एक दिवस हा पुजारी पूजा करून गेल्यावर तो भिल्ल पाणी, चिक्खल आणि जंगलातील कोणतीही पाने घेऊन घेऊन येतो. आणि पिंडीला चीक्खल लावून , पाने पाहून निघून जातो. दुसऱ्या दिवशी पुजारी वैतागतो आणि तो पूजा करून निघेन जातो. असे बरेच दिवस चालू राहते.
एकदा शंकर पार्वती आकाश मार्गाने जात असताना पार्वती भिल्लाने केलेली पूजा पाहून भगवान शंकरांना म्हणते, ' स्वामी, तो पुजारी येऊन इतकी छान पूजा करून जातो आणि हा भिल्ल मात्र कूठलेसे पाणी आणतो , चिखल लावतो, कसलीही पाने वाहतो आणि तुम्हाला हे कसं सहन होत , तुम्ही त्याला शासन का करत नाही. त्यावर शंकर म्हणतात,' थांब, तुला एक गम्मत दाखवतो.तू कर्म पाहतेस त्यापाठीमागे तू भाव पाहत नाहीस.'
दुसऱ्या दिवशी पुजारी पूजेला येत असताना अर्ध्या वाटेतच धरणी कंप होऊ लागतो. पुजारी मागे वळून गावाकडे पाहतो तर गावातील घरे, झाडे उन्मळून पडली दिसतात. आपल्या बायको मुलांच्या काळजीपोटी पूजेचे साहित्य तसेच ठेऊन घराकडे धावतो.
इकडे भिल्लही झाडे पडताना पाहतो आणि धावत मंदिरात येतो. शंकराच्या पिंडीला घट्ट मिठी मारतो. आणि म्हणतो देवा तू काळजी करू नकोस आता मी आलो आहे ही भिंत तुझ्या आंगवर पडणार नाही.लागलं तर मला लागेल. त्याक्षणी भूकंप व्हायचा थांबतो. नंतर शंकर पार्वतीला म्हणतात," असा भाव असणाऱ्यांनी माझी पूजा कशीही केली तरीही ती माझ्यापर्यंत पोहोचते."
असा भाव ठेवून शास्त्र शिकल्यास आपल्याला त्याचा पूर्ण अनुभव येतो.
शास्त्र म्हणजे नियम आणि सिद्धांत. हे पाळले तर त्याचा अनुभव येतोच. आपला सुख मोजण्याचा दृष्टिकोनच चुकीचा आहे. आपल्या जीवनात येणारे सुख दुःख हे ग्रह , नक्षत्र, वास्तू, ई अवलंबुन नसून ते आपल्या कर्मावर अवलंबून असतात आणि कर्मात बदल करण्याचं तंत्र म्हणजे वास्तू शास्त्र
नवग्रह हे आपले मित्र आहेत हितचिंतक आहेत,त्यांच्या सुरात सूर मिसळून आपण आपले जीवन आनंदमय करू शकतो,आणि हेच वास्तू शास्त्र शिकवत.

वास्तू शास्त्र बद्दल अधिक माहिती साठी संपर्क
श्री विजय कुलकर्णी
९८३४८९५४३५
व्हॉट्सअँप वर मोफत मार्गदर्शन न ७०८३३७५३४९

01/06/2020

वास्तुशास्त्र माझ्या नजरेतून -१

31/10/2019

💫 *तुमच्या वास्तूला म्हणू द्या `तथास्तू' अन आयुष्याला मिळू द्या समृद्धी!*

✨ *सुरभी वास्तू*
_मिळवा वास्तूशास्त्रानुसार शास्त्रशुद्ध आणि फलदायी सल्ला_

🥺 मंडळी, आपण आयुष्यात अनेक स्वप्ने पाहतो. त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी दिवस-रात्र एक करून प्रचंड कष्ट करतो. पण तरीही अनेकदा अपेक्षित यश मिळत नाही. याशिवाय आपल्याला अनेकदा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. मुला-मुलींचा उत्कर्ष थांबतो. नोकरीत कटकटी वाढतात. प्रगती होत नाही. या अपयशामागे अनेक घटक असतात. त्यातील प्रमुख घटक म्हणजे आपण जेथे राहतो ती वास्तू म्हणजेच आपला फ्लॅट, बंगला, बैठे घर किंवा अन्य काहीही. जोपर्यंत आपली वास्तू आपल्या प्रयत्नांना `तथास्तू' म्हणून आशीर्वाद देत नाही, तोपर्यंत यश आपल्याला हुलकावणी देत राहतं. आणि वास्तू तेव्हाच तथास्तू म्हणते जेव्हा तिची रचना वास्तूशास्त्राप्रमाणे असते किंवा तिच्यातील दोष अर्थात वास्तूदोषांचे निराकरण केले जाते. म्हणजे बघा माणूस आजारी पडल्यावर त्याला जशी उपचारांची गरज असते अगदी तसेच वास्तूलाही उपायांची गरज असते. म्हणूनच तर *सुरभी वास्तू* आपणास वास्तू दोषांचे निराकरण कसे करावे याबाबत अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने अध्यात्मिक सल्ला देतो. तसेच आम्ही वास्तू प्रशिक्षण कार्यक्रमही राबवितो.

🏠 *वास्तूशास्त्राबद्दल...*
स्थापत्य रचनेची भारतीय परंपरा म्हणजे वास्तूशास्त्र. यालाच स्थापत्याचे विज्ञान असेही म्हटले जाते. वास्तूशास्त्राद्वारे वास्तूची संरचना, लेआऊट, स्थानिक भूमिती, दिशा, दिशांचा परिणाम, घरात पडणारा प्रकाश आणि सकारात्मक ऊर्जा स्रोत या आणि अन्य बारीकसारीक बाबींचा वास्तूशास्त्रात बारकाईने अभ्यास केला जातो.

🤔 *सुरभी वास्तू कोण?*
*`सुरभी वास्तू'* मागील दहा वर्षांपासून वास्तूदोष निवारण सल्ला क्षेत्रात कार्यरत आहे. आम्ही सांगितलेल्या वास्तूदोष निवारणासाठीच्या अध्यात्मिक उपायांचा आमच्या ग्राहकांना लाभ होतो. त्यामुळेच आमचे बहुतेक ग्राहक समाधानी असतात. अत्यंत प्रामाणिक, नम्र आणि सविस्तर माहिती देऊन सेवा देणे, हे आमचे वैशिष्ट्य असल्याचे आमचे ग्राहक म्हणतात.

*आम्ही काय करतो?*
✔ *वास्तू दोषमुक्तीसाठी अध्यत्मिक सल्ला*
आम्ही आपल्या वास्तूस भेट देऊन कोणत्याही तोडफोडीशिवाय योग्य तो सहज करता येण्याजोगा सल्ला देतो. त्यासाठी अध्यात्मिक उपासनेचे मार्ग सुचवून दोषांपासून मुक्ती मिळविण्याचे फलदायी मार्ग सुचवितो. आम्ही सुचविलेले मार्ग कोणत्याही त्रासाविना, अत्यंत साधे, सुलभ, सहज करता येण्याजोगे असतात.

✔ *वास्तू आणि अंतर्मनाला समृद्ध करणारा वैयक्तिक अभ्यासक्रम*
वास्तू आणि अंतर्मनाच्या एकत्रित शक्तीद्वारे आपले जीवन अधिक आनंदी, शक्तिशाली, समृद्ध करण्यासाठी एक अभिनव वैयक्तिक अभ्यासक्रमही राबवितो.

✔ *सुरभी वास्तू - रेमेडियल (वास्तूदोष प्रतिबंधात्मक उपाय) अभ्यासक्रम*
वास्तूशास्त्राचा प्रचार-प्रसार व्हावा. नव्या पिढीने या क्षेत्रात यावे यासाठी आम्ही खास रेमेडियल अभ्यासक्रम विकसित केला आहे. या माध्यमातून नव्या पिढीसह, नोकरदार, गृहिणी, विद्यार्थी आदींना वास्तूदोष निवारण सल्ला क्षेत्रात उत्पन्नाची साधनेही उपलब्ध होणार. प्रत्यक्ष प्रशिक्षणासह आम्ही या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना व्यवसाय वृद्धीसाठीही आवश्यक ती मदत करतो. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.

📞 *आम्हाला येथे संपर्क साधा*
*सुरभी वास्तू*
फ्लॅट नं. १४, चिंतामणी अपार्टमेंट, माणिक चौक, राजगुरूनगर,
ता. खेड जि. पुणे ४१०५०५
*मो.* : +91 98348 95435

Address

Manik Chowk
Rajgurunagar

Telephone

+919834895435

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Surabhi Spiritual Vastu Consultant posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Surabhi Spiritual Vastu Consultant:

Share