23/03/2021
Coming soon...
||जय जिजाऊ||
||जय शिवराय||
सालाबादप्रमाणे यंदाही खास तुमच्यासाठी घेऊन येत आहोत फळांचा राजा- हापूस आंबा...
खास खव्वैय्यांसाठी, अस्सल हापूस..
दरवर्षी आम्ही खास करून नाशिक शहरात विक्री करत होतो व बाहेर राज्यातील मोठ्या अॉर्डर्स घेत होतो.. पण यंदा आपल्या क्षेत्राचा विस्तार करत स्वत:चा ब्रॅण्ड घेऊन येत आहोत..
🎉🎉🎉|| आमरस ||🎉🎉🎉
व याच नावाने विविध शहरांमध्ये विक्री करण्यासाठी मोठी टिम उभी करण्याच्या प्रयत्नात आहोत.
ही झाली आमची थोडक्यात ओळख. आता हापूस आंबे विषयी थोडक्यात माहिती पाहूया.
#हापुसआंबा विकत घेण्याआधी याची अवश्य काळजी घ्या.
👇👇👇👇👇👇👇👇
🔴हापूस आंबा नेमका कोणता?
👉 महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी लगतच्या भागात हापूस आंब्याचे उत्पादन होते. येथे पिकणाऱ्या आंब्याला खास "GI" (Geographical Indication) नामांकन मिळाले आहे. या GI ऍक्ट नुसार फक्त कोकणातील हापूसच - हापूस म्हणून विकला जाऊ शकतो.
🔴हापूस आंब्याची उपलब्धता कशी होते?
👉 तुमच्यापर्यंत अस्सल हापूस आंबा पोहोचवण्यासाठी आम्ही थेट जाऊन पोहोचलो कोकणात. मध्यस्थी म्हणून व्यापारी आला की, व्यापारीकरण झालेच म्हणून समजा. मग त्यात भेसळ आलीच. पण खास तुमच्यासाठी आम्ही थेट कोकणातील शेतकर्यांशी संपर्क साधून त्यांच्यामार्फत सर्वोत्तम असा आंबा तुमच्या पर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्नशील असतो.
🔴 हापूस कशाप्रकारे पिकवला जातो?
👉 आंबा पिकवण्याच्या अनेक पद्धती आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाणारी पद्धत म्हणजे 'केमिकल चा वापर'. केमिकल चा वापर करून कच्ची कैरी ही अवघ्या दोन दिवसात पिकवली जाऊ शकते. हा आंबा वरून जरी पिवळाधमक दिसत असला तरी हापूसची नैसर्गिक चव याला नसते. असा केमिकलयुक्त आंबा आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असतो. तुमच्या आरोग्याची काळजी घेऊन आम्ही कुठल्याही प्रकारचे केमिकल न वापरता फक्त गवतातच आंबा पिकवतो.
केमिकलयुक्त आंब्यापासून वाचण्यासाठी तुम्ही शक्यतो कच्ची कैरी घेण्याला प्राधान्य द्या. कैरी पिकवण्यासाठी कृत्रिम कोणत्याही केमिकल अथवा पावडर ची आवश्यकता नसते. आंबा पिकण्यासाठी त्यामध्ये नैसर्गिकरित्या इथिलिन गॅस असतो. आंब्याची आढी लावून ठेवल्यास या नैसर्गिक इथिलिन गॅस मुळे च कैरी पिकते. आम्ही पिकवण्यासाठी याच पद्धतीचा वापर करत असल्यामुळे आमच्याकडे मिळणारा आंबा हा कृत्रिम केमिकल विरहित असल्याची १००%✅ हमी देतो.
🔴 हापुस कसा पिकवावा?
👉१) हापूसची पेटी घेतल्यानंतर घरी आल्यावर साधारण अर्धा तास आंबे पेटीतून मोकळे ठेवा. ते शक्य नसल्यास किमान हवेशीर जागेत पेटी उघडी करून ठेवा. कैऱ्या पिकायला ठेवण्याआधी त्यांच्यावरील चिक स्वच्छ कापडाने पुसून घ्यावा. त्यानंतर पेपर पसरवून त्यावर गवत पसरवावे. व त्यावर कैऱ्या रचाव्या. त्यावर पुन्हा गवत टाकून ते बेडशीट अथवा चादर झाकून हवा बंद करावे.
🔴 हापूस आंबा बाजारातील थोडी माहिती 👇👇👇
👉 उन्हाळा आला की आंबा आपल्या डोळ्यासमोर येतो.. व आंब्यामध्ये जर हापूस असेल तर मग "सोने पे सुहागाच".
👉 याच गोष्टीचा फायदा घेऊन हापूस आंब्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. यामध्ये प्रामुख्याने कर्नाटकी आंबा हा हापूस नावाने विकला जातो.
👉 कर्नाटकी आंबा व हापूस यांच्या दिसण्यामध्ये फार फरक नसल्यामुळे सामान्य ग्राहक लवकर फसतो.
👉 त्यामुळे शक्यतोवर हापूस खरेदी करताना विश्वासातील माणसाकडूनच खरेदी करणे कधीही चांगले.
👉 आंबे पिकवण्यासाठी व्यापारी लोक केमिकल चा सर्रास वापर करताना दिसतात. मात्र हे केमिकल आपल्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असते.
एका सर्वेनुसार, असा केमिकलयुक्त आंबा जर एखादा मनुष्य दोन महिने सलग खात असेल तर त्याला कॅन्सर होण्याची किंवा आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची दाट शक्यता असते.
👉 आंब्याच्या सीझनमध्ये आपल्याला परप्रांतीय लोक हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर करताना दिसतात. नाशिक मधील कॉलेज रोड, गंगापूर रोडवर या लोकांनी मोठा बाजार मांडलाय. काही लोकांनी तर मोठमोठ्या जागा/गाळे घेऊन आपला व्यापार थाटलेला दिसतो.
तेथे तुम्हाला अस्सल हापूस मिळण्याची शक्यता कमीच...
👉 *पाणीपुरी साठी भैया* ठीक आहे,
मात्र *हापूस घेताना भाऊ कडेच या...*🙏
👉 हापूस आंब्याची निगडित कोणतीही मदत लागल्यास अवश्य संपर्क साधा.
हापुसशी निगडीत अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा.👇
alphonso_hapus_suppliers
https://www.instagram.com/invites/contact/?i=upg2cnkcl7x1&utm_content=ldnb5cd
👉 आजच आपली पेटी बुक करा.
👉 संपूर्ण भारतात डिलिव्हरी उपलब्ध आहे.
👉 नाशिक, मालेगाव, धुळे, साक्री, शिरपूर, जळगाव, शहादा आदी ठिकाणी घरपोच डिलिव्हरी उपलब्ध.
🔴अस्सल हापूस आंबे होलसेल दरात मिळतील.🔴
📲☎️ संपर्क-
दयानंद बोरसे- 88888-13732 / 8668421688