28/03/2021
आता कॉमेंट्स मध्ये मला ट्रोल करू नका म्हणजे झाल
MLM : Direct sell: Referral : Promotion : काय खरंय काय खोटं ?
19- 08- 2018 .......... खूप दिवसाचं लिहायचय याबद्दल .
अशी एक गोष्ट जिने सर्वात जास्त नुकसान केलय .
जिने हजारो लोक भूगा केलेत
हजारो लोकांना बिनाकामाचे , बनवून टाकलय !
ही बाब समाजात प्लेग सारखी पसरत आहे .. तर आज पद्धतशीर पणे याचं आतलं खोटारडं सत्य बाहेर काढू .
मला याची चांगलीच कल्पना आहे , कि खूप लोकांना आवडणार नाही . लोक कॉमेंट मधे शिव्या श्राप देतील , अक्कल काढतील , यांना काहीच कळत नाही म्हणतील . But I Dont' Care .
कुणी बोलणारच नाही असं कसं होईल .
टप्प्या टप्प्याने बघू .
शेवटचा पॉइंट सर्वात महत्वाचा !.....
MLM किंवा त्याच्या सारख्याच बाबीत काय करायचं असतं ?
1) Product Sell : तुम्हाला सो कॉल्ड सिस्टीम मध्ये जॉईन करण्यासाठी कोणीतरी जवळचा माणूस गळ घालतो .. तुमच्या कडून जॉयनींग फिस घेऊन तुम्हाला काही वस्तूच किट देतो . आणि तुम्हाला त्या वस्तू विकायच्या किंवा वापरायच्या असतात .
खूपदा या वस्तूंची किंमत अवाजवी असते ( जसं पेस्टची किंमत 500 )किंवा काहीतरी भलत्याच वस्तू जसं ज्युस किंवा विटामिन सारख्या वस्तू विकायच्या असतात .
बरं हे विकता येईल पण यांना फक्त वस्तु विकायच्या नसतात तर खेळ दुसराच असतो .
2) खोटारडेपणा : तुम्हाला वाटतं असेल कि , हा बिझनेस आहे आणि तुम्ही स्वतंत्र बिझनेस चे मालक झाला त ...... झुठ .. साफ झुठ .
तुम्ही उद्योजक बनत नाहीत तर विनामोबदला काम करणारे सेल्समन बनता .
फक्त आणि फक्त वेठबिगार !
3) HYPE : सुरुवातीलाच तुम्हाला भंपकपणा दाखवला जातो ,, नुसता भंपकपणा ...
सेमीनारला नेऊन कोटा मध्ये असणारे , सुटा बुटातले लोक काय _ काय सांगतात हे ऐकणं खरच मजेशीर .
असं वाटायला लागतं कि आजपर्यंतची आपली जिंदगी बरबाद झाली उगाचच .
4) पोकळ ट्रेनींग : ट्रेनींग च्या नावाखाली फक्त आणि फक्त आपला विश्वास पक्का करण्याचं काम करतात हे जेणेकरून तुम्ही लवकर सोडून जाऊ नये , बाकी उद्योजकतेचा एकही धडा कुणीच शिकवत नाही , कारण त्यांना ते शिकवायचच नसतं . त्यांना प्रोडक्ट पण विकायचे नसतात जास्त .... मुख्य उद्देश तुम्ही जास्तीत जास्त लोकांना यात जॉईन करून घ्यावं .
5) पिचिंग : ही एक टर्म आहे ... MLM वाला जे काही ज्ञान देतो ( म्हणजे मेन बिझनेस सांगण्याअगोदर ) याला पिचिंग म्हणतात .. म्हणजे जसं तुमचे सर्व स्वप्न पूर्ण करा , आपल्या स्वप्नातील आयुष्य जगा वगैरे वगैरे . यापासून दूर रहा ! अजून तुमच्या पर्यंत कोणी पोहचलं नसेल तर अभिनंदन पण अचानक कोणी दुरचा नातेवाईक किंवा बरेच दिवस न भेटलेला मित्र फारच आस्थेवाईक पणे तुमची खुशाली जाणून घेण्याचा प्रयत्न करत असेल आणि शेवटी म्हणेल कि माझ्याकडे एक जबरदस्त प्लान आहे तर समजा कि त्यानं पिचिंग चालु करतोय .... अशांना लगेचच दुर झटका !
6) अॅव्हरेज .: हे लोक स्वतः मान्य करतात कि हजारातील एक व्यक्ती करोडपती होतो . लक्षात घ्या हजारातील एक म्हणजे उरलेल्या 999 लोकांचं काय ? हे तर दबूनच मरतात .
मग कुठे आहे इंडस्ट्रीचं यश ?
कारण या इंडस्ट्रीत वस्तु विकून पैशे मिळत नाहीत तर माणसं जोडून पैसे मिळतात ,
7) Life Loss : हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा .
नेटवर्क मार्केटींगवाल्यांना काय पाहिजे असतं ??? तर तुमचं नेटवर्क ... तुमचे पाहुणे , तुमचे मित्र , तुमचे स्नेही ... एक असं नेटवर्क जे तुमच्या सुखा दुःखात तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू शकतं .
हा सर्वात मोठा लॉस आहे .
लोक तुमचे नंबर ब्लॉक करतात , तुम्हाला टाळतात , तुमच्या करिता दरवाजे बंद होतात .
तुम्ही तरूण असाल तर तुमचे कित्येक सिरीयस पार्टनर , फायनान्सर गेलेच म्हणून समजा , आणि तुम्ही वयस्कर असाल तर जिंदगी भर कमावलेली इज्जत घालवून बसता ( माझ्या वैयक्तीक एका नातेवाईकाने घालवून बसला ज्याला मी फार मानायचो ) .
हा तुमच्यावर प्रेम करणाऱ्या , मैत्री असणाऱ्या नेटवर्क चा लॉस म्हणजे आयुष्याचे नुकसान असते .
तेंव्हा नावं बदलून , वस्तू बदलुन फिरणाऱ्या या दैत्यापासून चार हात दूरच रहा !
स्वतःचे नेटवर्क विकू नका , बरबाद ,अपमानीत होऊ नका ! ............
हे वरचं सगळं तुम्हाला कोणी मोटीवेशनल स्पीकर सांगणार नाही , त्याचं कारण असं आहे कि , हे स्पीकर या कंपन्यांसाठीच काम करतात पैसे घेऊन , त्यामुळे त्यांच्याकडून काही पॉजीटीव ज्ञान मिळेल याची आशाच नाही ................
तेंव्हा हेच सांगणं आहे कि या भंपक so called ...Govt. Approved लबाड लांडग्याच्या नादी लागून स्वतःचे माणसं गमावू नका ! .....
पूर्ण जिम्मेदारी सहित केलेलं हे लिखाण .. शेअर करत चला .........
© निलेश काळे .
किल्ले धारूर , जि. बीड .
whatsapp : 9860555247
facebook / Nilesh kale's Udyogniti ....
महत्वाचे : बऱ्याच नेटवर्कर लोकांना हे लिखाण आवडणार नाही .
पण त्याला इलाज नाही , त्यांना पण हेच सांगणे .. " मित्रांनो वेळीच सावध व्हा "..
धन्यवाद .
लेख निलेश काळे यांचा आहे