CA. Waman Gore

CA. Waman Gore Investment & Finacial Advisory Services

10/07/2021

सध्या मॅक्रो लेव्हल इंडिकेटर्स जसे की NIFTY PE, MARKET CAP TO GDP RATIO, GLOBAL CRUDE PRICES, RUPEE AGAINST DOLLER इत्यादी पाहता शेअर मार्केट बऱ्यापैकी OVER VALUED आहे असे म्हणावे लागेल. अश्या मार्केट मध्ये गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ते थोडक्यात पाहू.

मागील काही वर्षांत म्युच्युअल फंड मधील गुंतवणूकदारांनी बऱ्यापैकी चांगले रिटर्न्स मिळविले आहेत. गुंतवणूकदारांनी सध्या काय पद्धतीचे असेट अलोकेशन करावे हे बऱ्यापैकी तुम्ही किती वर्षासाठी गुंतवणूक करीत आहात ह्यावर अवलंबून आहे.

समजा अजून 10 वर्षांपेक्षा जास्त कालावधीसाठी इक्विटी मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याची तुमची क्षमता असेल तर तुम्हांला मार्केट मधील करेक्शनची फार मोठी चिंता करण्याची आवश्यकता नाही, कारण इतिहास पाहता दीर्घ कालावधीत शेअर मार्केटने खूप चांगले रिटर्न्स दिले आहेत.

तुमचा गुंतवणूक कालावधी 4-5 वर्षे असेल तर तुम्ही स्मॉल कॅप अथवा मिड कॅप फंड मधील गुंतवणूक थोडी कमी करून लार्ज कॅप फंड मध्ये वाढवू शकता. कारण साधारणतः स्मॉल अथवा मिड कॅप फंडच्या रिटर्न्स मध्ये लार्ज कॅप फंडच्या तुलनेत जास्त व्होलॅटीलिटी असते. किंवा इक्विटी फंडमधील गुंतवणूक सिस्टीमॅटिकली डेट फंडमध्ये गुंतवू शकता.

जर तुमचा गुंतवणुकीचा कालावधी 2-3 वर्षे अथवा त्यापेक्षा कमी असेल तर शक्यतो डेट फंड अथवा बँकेच्या मुदत ठेवीत पैसे गुंतविलेले चांगले, कारण त्यामध्ये रिटर्न्स थोडे कमी मिळतील परंतु धोकाही अत्यंत कमी असतो व वेळेला पैसे नक्की उपलब्ध होऊ शकतात.

गुंतवणूक करण्याची एकच पद्धत सर्वांना लागू होईल असे नसते, त्यामुळे स्वतः अभ्यास करून योग्य ठिकाणी योग्य वेळी गुंतवणूक करा.

07/07/2021
30/06/2021

बरेचदा असे दिसून येते की, व्यावसायिकांना आर्थिक पाठबळ पुरविण्यासाठी सरकार विविध योजना जाहीर करते परंतु त्या सर्वांपर्यंत न पोहोचल्यामुळे सर्वसामान्य लोक त्याचा लाभ मिळण्यापासून वंचितच राहतात, त्याच उद्देशाने खालील माहिती देत आहे.

अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी काही दिवसांपूर्वीच आपल्या देशाच्या माननीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी Emergency Credit Line Guarantee Scheme (ECLGS) या योजने अंतर्गत हेल्थकेअर व इतर क्षेत्रातील व्यवसायांसाठी बँकेच्या माध्यमातून कमी व्याजदरामध्ये कर्ज उपलब्ध होण्यासंदर्भात घोषणा केली आहे. त्यानुसार हेल्थकेअर क्षेत्रासाठी 7.95% p.a. व इतर क्षेत्रासाठी 8.25% p.a. पर्यंत व्याज आकारले जाऊ शकते.

कोरोना महामारीमुळे जवळपास सर्वच व्यवसायिकांना कमी अधिक प्रमाणात आर्थिक नुकसान सोसावे लागले आहे, त्यामुळे ज्या व्यवसायिकांस आर्थिक पाठबळाची गरज आहे त्यांनी आपला व्यवसाय सदर योजनेस पात्र आहे का, पात्र असल्यास या योजनेअंतर्गत किती कर्ज मंजूर होऊ शकते व त्याचे नियम व अटी काय असतील याची माहिती घेण्यासाठी आपल्या बँकेशी जरूर संपर्क साधावा.

27/06/2021

इक्विटी शेअर्स
बॉण्ड्स, डिबेंचर्स ई. फिक्स्ड इनकम सिक्युरिटीज
रिअल इस्टेटमधील गुंतवणूक
कमॉडिटीमधील गुंतवणूक जसे की सोने व चांदीमधील गुंतवणूक
व लिक्विड गुंतवणूक जसे की सेव्हिंग खात्यातील रक्कम

असे विविध पर्याय गुंतवणुकीसाठी आपल्यासमोर असतात परंतु या विविध Asset Classes मधून मिळणारा परतावा व त्यामधील धोका वेगळा असतो. त्यापैकी इक्विटी शेअर्स व सोने यामधील तुलना थोडक्यात पाहूया.

समजा तुम्ही काही रक्कम शेअर्समध्ये व काही रक्कम सोन्यामध्ये गुंतवली आहे, तर काही कालावधीने इतर गुंतवणूकदारांनी शेअर्समधून मिळविलेल्या परताव्यामध्ये व तुम्ही मिळविलेल्या परताव्यात खूप फरक असू शकतो कारण शेअर्समधील गुंतवणुकीसाठी शेकडो कंपन्यांचा पर्याय आपल्यासमोर असतो. परंतु सोन्यामधील इतरांनी मिळविलेला परतावा तुम्ही मिळविलेला परतावा यामध्ये अगदी नगण्य फरक असेल कारण सर्व देशात सोन्याचा भाव हा केवळ काही रुपयेच कमी जास्त असतो.

"होम लोन" ही एखाद्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी व सर्वाधिक कालावधी असलेली लायबिलिटी असू शकते. त्यामुळे बहुतांश कर्जदार ह...
21/06/2021

"होम लोन" ही एखाद्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी व सर्वाधिक कालावधी असलेली लायबिलिटी असू शकते. त्यामुळे बहुतांश कर्जदार हे आपला EMI कसा कमी करता येईल ह्याचा प्रयत्न करीत असतात. त्याबाबद्दल थोडी माहिती पाहूया.

मागील काही वर्षात विविध बँक्स कोणत्या आधारावर व्याजाची आकारणी करतात हे बदलत गेले आहे. जसे की 1 जुलै, 2010 पूर्वी कर्जावरील व्याज हे BPLR (Benchmark Prime Lending Rates) वर आधारित असे. 1 एप्रिल, 2016 नंतर floating rate loans वरील व्याज MCLR (Marginal Cost of Fund Based Lending Rate) वर आधारित होते व 1 ऑक्टोबर, 2019 पासून EBR (External Benchmark Rate) वर आधारित आहे.

तुमच्या कर्ज वाटपाच्या वेळेनुसार अशी शक्यता आहे की, अजून तुमच्या कर्जावर जुन्या पद्धतीनुसारच व्याज आकारणी होत असेल व कदाचित नवीन पद्धतीशी तुलना करता तुमच्या व्याजाचा दर जास्त असेल. नवीन पद्धतीत तुमचे कर्ज परावर्तीत होण्यासाठी बँक्स काही नाममात्र फी आकारतात. त्यासंबंधीची माहिती घेण्याकरिता तुम्ही तुमच्या बँकेमध्ये चौकशी करू शकता.

तुमचे कर्ज तुम्ही दुसऱ्या कर्जदारकडे ट्रान्सफर करू शकता. सध्या गृहकर्ज देणाऱ्या असंख्य संस्था आहेत. विविध संस्थांच्या गृहकर्जावरील व्याजदराची व बाकीच्या अटींची तुलना करा. कदाचित केवळ दुसऱ्या संस्थेमध्ये तुमचे कर्ज ट्रान्सफर केल्याने तुमच्या EMI मध्ये भरपूर बचत होऊ शकते.

तुम्ही तुमचे कर्ज Fixed Rate कर्जामधून Floating Rate कर्जामध्ये परावर्तीत करू शकता. बँक्स साधारणतः Fixed Rate कर्जासाठी 1-2% जास्त व्याज आकारतात. त्यामुळे Floating Rate चा पर्याय स्विकारल्यास व्याजमध्ये भरपूर बचत होऊ शकते.

काही रक्कमेचे प्री-पेमेंट करून तुम्ही एक तर तुमचा EMI कमी करू शकता किंवा तुमच्या कर्जाचा कालावधी तरी कमी करू शकता.

सध्या तुम्ही आर्थिक अडचणीत असाल तर तुम्ही तुमच्या कर्जाचा कालावधी वाढवू शकता व आपला EMI कमी करू शकता परंतु त्यामुळे तुम्हांला जास्त व्याज भरावे लागू शकते. त्यामुळे तुमची आर्थिक चणचण कमी झाल्यावर वेळेत कर्जाची परतफेड करणेच हितावह ठरेल.

RBI च्या नियमानुसार तुम्ही लोन मोरॅटरीअम करिता अर्ज करू शकता. परंतु मोरॅटरीअमचा पर्याय स्विकारल्यास तुम्हांस जास्त व्याज भरावे लागू शकते.

वरील बाबी लक्षात घेतल्यास तुम्हांस तुमचा EMI कमी करण्यास नक्कीच मदत होऊ शकते.

तुम्ही गुंतवणुकीतून नक्की किती रिटर्न्स मिळवता?सर्वसाधारणपणे आपण सर्व जण आपली जास्तीतजास्त गुंतवणूक बँकेच्या Fixed Depos...
11/06/2021

तुम्ही गुंतवणुकीतून नक्की किती रिटर्न्स मिळवता?

सर्वसाधारणपणे आपण सर्व जण आपली जास्तीतजास्त गुंतवणूक बँकेच्या Fixed Deposit मध्ये करतो. चांगली पत असलेल्या कोणत्याही बँकेत सध्या डिपॉजीट वर वार्षिक 6% दराने व्याज दिले जाते.

जर तुम्ही वरच्या इनकम टॅक्स ब्रॅकेट मध्ये येत असाल तर, मिळालेल्या व्याजावर तुम्हांला कमीतकमी 30% तरी टॅक्स भरावा लागेल. म्हणजेच टॅक्स वजा जाता तुम्हांला 4.2% इतकाच व्याजाचा परतावा मिळेल.

गुंतवणूक करताना एक गोष्ट मात्र आपण कोणीच लक्षात घेत नाही ती म्हणजे दिवसेंदिवस वाढणारी महागाई. चालू आर्थिक वर्षासाठी RBI च्या "मॉनेटरी पॉलिसी कमिटीने" महागाई दराचा अंदाज 5.1% इतका वर्तविला आहे.

म्हणजेच तुम्ही तुमच्या गुंतवणुकीतून 4.2% रिटर्न्स मिळविता व महागाईचा दर जर 5.1% राहिला तर तुम्ही खरेतर काही परतावा तर मिळवत नाहीच उलट दर वर्षी तुम्ही तुमचे 0.9% (5.1% - 4.2%) इतके नुकसानच करीत आहात. म्हणजे आपल्याकडील पैशाची खरेदी करण्याची क्षमता महागाईमुळे कमी कमी होत असते, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

त्यामुळे गुंतवणुकीची सुरक्षितता पाहण्याबरोबरच आपल्याला महागाईशी सामना करू शकेल अश्या ठिकाणी गुंतवणूक करण्याच्या विविध पर्यायांचाही विचार करावा लागेल.

माहिती उपयुक्त वाटल्यास फेसबुक वरील आपल्या इतर मित्रांसोबत जरूर शेअर करा.

Address

Sangli

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when CA. Waman Gore posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to CA. Waman Gore:

Share