Mauli Agro Services and consultancy

Mauli Agro Services and consultancy WE ARE ONE OF THE TRUSTED FIRM OF AGRICULTURE CONSULTANCY SERVICES. IN THIS WE CONSULT FARMERS RIGHT

29/04/2024
Mauli Agro
21/06/2023

Mauli Agro

Mauli Agro Consultancy services
07/06/2023

Mauli Agro Consultancy services

02/02/2022
☘️☘️✅✅✅☘️☘️दि २५ एप्रिल *माऊली कृषी सल्ला*         महाअँग्रोwww.mahagro.in   *रासायनिक खतांचा समतोल वापर*       हि काळाच...
25/04/2021

☘️☘️✅✅✅☘️☘️

दि २५ एप्रिल

*माऊली कृषी सल्ला*
महाअँग्रो
www.mahagro.in

*रासायनिक खतांचा समतोल वापर*
हि काळाची गरज आहे......

शेतीमध्ये पिकास उपयुक्त अशी १६ अन्नद्रव्ये आपण कधी balance अन्नद्रव्ये म्हणून दिली आहेत का? नाही ना..

सध्याच्या रासायनिक खतांच्या वाढत्या किमती लक्षात घेता शेतकर्यांना पर्यायी खताचा वापर करणे काळाची गरज आहे.

आपल्या इथे शेतकरी वर्गातून फक्त NPK खताचाच वापर प्रामुख्याने केला जातो. या कारणास्तव पिकास उपयुक्त असणारे इतर अन्नद्रव्ये न दिली गेल्यामुळे सरासरी उत्पादन कमी येणे, पिकाची प्रत न होणे, पिक रोगास बळी पडणे, त्याचबरोबर उत्पादन कमी येणे हि तोट्याचे गणित काही वर्षे झाली आपणास पाहायला मिळतात

आज आपण समजून घेऊ कि पिकास कोणती कोणती खते व अन्न द्रव्ये लागतात

टोटल १६ प्रकराची मूलद्रव्ये जमीन व हवामानात उपलब्ध आहेत, जि पिकांसाठी अति महत्वाची आहेत
पैकी कार्बन, ऑक्सिजन आणि H2O हवामानातून मिळत असतात

१. N P K – प्राथमिक अन्नद्रव्ये (PRIMARY NUTRIENTS)

२. Ca, Mg, S दुय्यम अन्नद्रव्ये (SECONDARY NUTRIENTS)

3. Zn, Fe, Bo, Cu, Mn, MB, Cl सूक्ष्मअन्नद्रव्ये ( MICRONUTRIENTS)

4. Silicon – Sio2 (सिलिकॉन)

NPK खतामध्ये बर्यापैकी युरिया, DAP, १०-२६-२६ , १२-३२-१६, २४:२४:०० या खतांचा प्रामुख्याने शेतकरी वर्गातून याचा वापर किंवा अति वापर केला जातो.

परंतु आपणास माहित आहे का प्रत्येक अन्नद्रव्यांचे एकमेकांशी संयुगे असतात जसे कि पोटाश च्या वहनाकरीता माग्नेसिअम चि गरज असते त्याचबरोबर नत्र देताना गंधक दिले तर त्याचे वाहन फास्ट होण्यास मदत होते.

परिपूर्ण अन्नद्रव्ये नियोजन हा नगदी पिकांचा उत्पादन जास्तीत जास्त काढण्याचा पर्यायी मार्ग आहे.

तर मग आपण आज पासूनच परिपूर्ण अन्नद्रव्यांचा वापर आपल्या शेतीमध्ये आज पासूनच सुरुवात करू व आपले भरगोस उत्पादन वाढवू.

*जमिनीची सुपीकता टिकविण्याचे महत्त्व*

पूर्वीच्या काळात शेती पद्धतीला नैसर्गिक मोकळीक वाव होती. पण आता सध्याच्या शेतीपद्धतीमुळे जमिनीचे भौतिक, जैविक गुणधर्म वापरा मुळे खूप जास्त बिघडले आहे. रासायनिक खताच्या कमी आणि जास्त वापरामुळे पिकांची अनैसर्गिक वाढ होताना दिसते. यामुळे रोग राई, किडीचे चे प्रमाण वाढताना जाणवते. नियंत्रण करण्यासाठी मग रासायनिक किटकनासकांचा व बुरशीनाशकांचा वापर खूप प्रमाणात होऊ लागला. या सर्व बाबींमुळे पिकाच्या रचनेत बदल होऊन अनेक समस्या निर्माण झाल्या. पिकाची खूप वाढ, पाने फुले कमी येणे, गळ होणे, फुले, फळे न येणे या समस्या निर्माण होऊ लागल्या. पुन्हा या समस्या सोडवण्यासाठी संजीवकाचा वापर होऊ लागला. पाणी व्यवस्थापन चूकिचे पद्धतीने होऊ लागले.
ज्या जमिनीमध्ये २५% हवा, २५% पाणी, २५% खनिज पदार्थ, ५% सेंद्रिय पदार्थ त्याच जमिनी पोथ व पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी योग्य आहे. परंतु, जास्त रासायनिक खत व पाणी व्यस्थापनामुळे जमिनीचा पोथ खराब झाली. सेंद्रिय खताचा कमी वापर आपण कमी प्रमणात करत असतो, आणि रासयनिक खताचा जास्त वापर झाल्यामुळे जिवाणूंची संख्या कमी होऊ व जमिनी नापीक होऊ लागल्या. जमिनीतील सेंद्रिय कर्ब, सेंद्रिय आम्ल कमी झाल्यामुळे जमिनीचा सामू बिघडत आहे.
एकात्मिक अन्नद्रव्ये पद्धतीचा वापर .

१) या पद्धतीमध्ये निरनिराळ्या निविष्ठांचा वेगवेगळ्या पिकांना,विविध अवस्थांमध्ये अन्नद्रव्यांचा पुरवठा करतानाअचूक, आणि काटेकोर पद्धतीने वापर करीत असताना माती आणि पाणी परीक्षण तंत्रज्ञानाचा वापर करणे खूप महत्त्वाचे आहे. उपलब्ध अन्नद्रव्यांचे प्रमाण, कमतरता असलेली अन्नद्रव्ये इत्यादींचे योग्य निदान करूनच खतांचा वापर फायदेशीर ठरतो.

२) ठिबक सिंचनाच्या माध्यमातून विद्राव्य स्वरूपाची खते पिकाच्या गरजेनुसार दिल्यामुळे अन्नद्रव्यांची कार्यक्षमता खूप मोठ्या पटीने वाढविता येते,…

अन्नद्रव्य व्यवस्थापन...
जमीनीत जर नायट्रोजन जास्त झाल्यास बोरॉन , कॉपर , पोटॅश
हे घटक उचलले जात नाही.. आणि
जमीनीत नायट्रोजन वाढल्यास "मॅग्नेशियम" उचलले जाते.
फॉस्फरस
जमीनीत फॉस्फरस वाढल्यास कॉपर , कॅल्शियम , पोटॅश , फेरस , झिंक हे घटक उचलले जात नाही.
आणि जमीनीत फॉस्फरस वाढल्यास "मॅग्नेशियम" उचलले जाते
पोटॅश 🍇🍁🍇
जमीनीत पोटॅश जास्त झाल्यास "बोरॉन , मॅग्नेशियम" हे घटक उचलले जात नाही.
आणि जमीनीत पोटॅश जास्त झाल्यास "मॅंगनीज , फेरस" उचललेली जाते.

अधिक माहिती साठी संपर्क करा..
महेश जाधव
Consultant
www.mahagro.in
09011117844

धन्यवाद🙏

महाराष्ट्राच्या आधुनिक कृषीतंत्रज्ञानाचं दर्जेदार व्यासपीठ..!

MAULI KRUSHI SEVA KENDRA AND AGRO CONSULTANCY SERVICES.... WE PROVIDE  CONSULTANCY FOR ALL TYPES OF AGRICULTURAL CROPS. ...
24/08/2020

MAULI KRUSHI SEVA KENDRA AND AGRO CONSULTANCY SERVICES....
WE PROVIDE CONSULTANCY FOR ALL TYPES OF AGRICULTURAL CROPS.
PRE SOWING TO POST HARVEST MANAGEMENT

contact us - 75885 88885

Address

Main Road, At/Malwadi, Tal/Palus, Dist/Sangli
Sangli
416303

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mauli Agro Services and consultancy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mauli Agro Services and consultancy:

Share