18/08/2026
पैसा कमावणे महत्त्वाचे… पण पैसा कुठे आहे हे कुटुंबाला माहीत असणे त्याहून महत्त्वाचे! 👨❤️👨
प्रत्येक कुटुंबाकडे असावी एक ‘Family Financial File’
एक छोटीशी गोष्ट सांगतो…
नाशिकमधील एका कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे अचानक निधन झाले.
मुलगा परदेशात. पत्नी घर सांभाळणारी. मुलगी लग्न होऊन दुसऱ्या शहरात.
घरात सर्व काही होते—
घर होते,
बँकेत पैसे होते,
Mutual Funds होते,
LICच्या पॉलिसी होत्या,
FD होत्या,
शेअर्स होते,
एक-दोन प्लॉट होते,
आणि काही कर्जेही होती.
म्हणजे पैशाची कमतरता नव्हती.
पण एक मोठी अडचण होती…
"पैसा नेमका कुठे आहे?"
पत्नीला माहिती नव्हते.
मुलाला काही अंदाज होता, पण पूर्ण माहिती नव्हती.
काही कागदपत्रे कपाटात होती, काही बँकेत, काही ई-मेलमध्ये, काही जुन्या फाइलमध्ये आणि काहींची माहिती फक्त त्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये होती.
काही दिवसांनी एक प्रश्न समोर आला—
"त्यांनी कोणत्या-कोणत्या विमा पॉलिसी घेतल्या होत्या?"
उत्तर मिळाले नाही.
मग दुसरा प्रश्न—
"Mutual Fund कुठे आहेत?"
त्यासाठी शोध सुरू झाला.
तिसरा प्रश्न—
"घरावर किंवा व्यवसायावर काही कर्ज आहे का?"
त्याचेही स्पष्ट उत्तर नव्हते.
कुटुंबाकडे संपत्ती होती…
पण त्या संपत्तीचा नकाशा नव्हता.
आणि इथेच या संपूर्ण विषयाचा सर्वात मोठा धडा आहे—
«संपत्ती निर्माण करणे ही Financial Planning ची पहिली पायरी आहे;
पण ती संपत्ती पुढच्या व्यक्तीला सहज सापडेल अशी व्यवस्था करणे ही Financial Planning ची शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची पायरी आहे.»
आपण ‘Asset Creation’ करतो; पण ‘Asset Documentation’ करतो का?
आपण घर घेतो—कागदपत्रे ठेवतो.
FD करतो—रसीद ठेवतो.
Mutual Fund घेतो—Statement येते.
Insurance घेतो—Policy Bond मिळतो.
Shares घेतो—Demat Account असतो.
Bank Account उघडतो—Passbook किंवा Statement असते.
पण या सगळ्यांची एकत्रित माहिती कुठे आहे?
बहुतेक वेळा उत्तर असते—
"मला माहीत आहे."
पण Financial Planning मध्ये प्रश्न असा नसतो की—
तुम्हाला माहिती आहे का?
खरा प्रश्न आहे—
"उद्या तुम्ही उपलब्ध नसाल, तर तुमच्या कुटुंबाला माहिती मिळेल का?"
हा प्रश्न प्रत्येक कुटुंबाने स्वतःला विचारायला हवा.
१. Identity + Bank File — आर्थिक जीवनाचा ‘नकाशा’
एका ठिकाणी खालील माहिती व्यवस्थित ठेवावी:
- PAN
- Aadhaar
- Passport
- Voter ID इत्यादी महत्त्वाची ओळखपत्रे
- सर्व Bank Accounts ची यादी
- Account Number
- Bank आणि Branch
- Registered Mobile Number
- Demat Account ची माहिती
- Locker असल्यास त्याची माहिती
विशेषतः सर्व Bank Accounts ची एक Master List असावी.
याचा उद्देश कोणाला तुमचा पैसा वापरायला देणे नाही.
उद्देश एवढाच—
तुमच्या अनुपस्थितीत कुटुंबाला पैसा कुठे आहे हे शोधण्यासाठी धावपळ करावी लागू नये.
२. Insurance File — पॉलिसीपेक्षा ‘Claim’ महत्त्वाचा
अनेक कुटुंबांमध्ये विमा घेतलेला असतो.
पण कुटुंबातील इतर सदस्यांना त्याची माहिती नसते.
एका Master Insurance List मध्ये लिहा:
- Life Insurance
- Health Insurance
- Personal Accident Insurance
- Motor Insurance
- Home Insurance
- Policy Number
- Insurer
- Sum Assured
- Premium
- Renewal Date
- Nominee
- Claim Contact Details
पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा—
Nomination तपासा.
लग्न झाले, मुलगा/मुलगी झाली, घटस्फोट झाला, कुटुंबाच्या परिस्थितीत बदल झाला किंवा एखाद्या वारसाच्या परिस्थितीत बदल झाला तर nomination पुन्हा तपासणे आवश्यक आहे.
Policy घेणे म्हणजे Financial Planning नाही.
योग्य व्यक्तीला योग्य वेळी benefit मिळेल अशी व्यवस्था करणे म्हणजे Financial Planning.
३. Investment File — ‘माझी गुंतवणूक कुठे आहे?’ याचे एक पान
आज एका कुटुंबाची गुंतवणूक अनेक ठिकाणी असते.
- Mutual Funds
- Shares
- Fixed Deposits
- PPF
- EPF
- NPS
- Post Office Investments
- Bonds
- Gold
- अन्य financial assets
यासाठी एक साधी Investment Master Sheet तयार करा.
सर्वात महत्त्वाचे—
Password लिहून ठेवू नका; पण account कुठे आहे हे नक्की लिहा.
Digital assets साठी स्वतंत्र सुरक्षित व्यवस्था असावी.
कारण आजच्या काळात एक नवीन समस्या निर्माण झाली आहे—
Physical assets शोधणे सोपे आहे; Digital assets शोधणे कठीण आहे.
४. Property + Loan File — मालमत्ता आणि कर्ज दोन्ही एकत्र लिहा
घर, दुकान, जमीन, प्लॉट, शेती, commercial property…
प्रत्येक मालमत्तेसाठी कागदपत्रांची स्वतंत्र माहिती असावी:
- Sale Deed
- Registration Documents
- Possession Letter
- Property Tax Receipts
- Society Documents
- Loan Documents
- Latest Loan Statement
पण एक महत्त्वाची गोष्ट विसरू नका—
Asset List बरोबर Liability List देखील असली पाहिजे.
कारण कुटुंबाला फक्त—
"आपल्याकडे ₹1 कोटीची मालमत्ता आहे"
हे माहीत असणे पुरेसे नाही.
त्यांना हेही माहीत असले पाहिजे की—
"त्यावर कर्ज किती आहे."
Net Wealth = Assets – Liabilities
ही साधी गणिताची ओळ प्रत्येक कुटुंबाने समजून घ्यायला हवी.
५. Will + Nomination — संपत्तीची शेवटची दिशा
सर्वात दुर्लक्षित विषय म्हणजे
Will.
"माझ्याकडे एवढी संपत्तीच कुठे आहे?"
असे अनेक लोक म्हणतात.
पण Will ही फक्त करोडपतींसाठी नसते.
तुमच्याकडे घर, Bank Balance, FD, Insurance, Shares, Mutual Funds, Gold किंवा इतर मालमत्ता असेल तर तुमच्या इच्छेनुसार त्याचे नियोजन करण्यासाठी Will महत्त्वाची ठरू शकते.
आणि Will केली असेल तर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न
"Original Will कुठे आहे?"
कुटुंबातील विश्वासू व्यक्तीला त्याची माहिती असणे आवश्यक आहे.
तसेच:
Bank + Insurance + EPF + Mutual Funds + Demat + इतर गुंतवणुकीतील Nomination एकमेकांशी विसंगत तर नाही ना?
हे वेळोवेळी तपासले पाहिजे.
पण माझ्या मते या पाचही गोष्टींपेक्षा महत्त्वाची आहे सहावी गोष्ट!
प्रत्येक कुटुंबाने एक "Family Financial Map" तयार करावा.
तो 10-15 पानांचा असण्याची गरज नाही.
एक-दोन पानांतही तो तयार होऊ शकतो.
त्यात फक्त:
A. माझी ओळख
PAN, Aadhaar इ.
B. माझी बँक
सर्व Bank Accounts
C. माझा विमा
सर्व Insurance Policies
D. माझी गुंतवणूक
MF, FD, Shares, PPF, EPF, NPS इ.
E. माझी मालमत्ता
घर, जमीन, दुकान इ.
F. माझी कर्जे
Home Loan, Car Loan, Business Loan इ.
G. माझे Nominees
प्रत्येक महत्त्वाच्या Asset चा Nominee
H. माझी Will
Original कुठे आहे?
I. महत्त्वाचे संपर्क
CA, Lawyer, Financial Advisor, Banker, Insurance Advisor इ.
एक अत्यंत महत्त्वाचा नियम — ‘One Family, One Financial File’
प्रत्येक कुटुंबाने एक Family Financial File तयार करावी.
ती तीन स्वरूपात ठेवता येईल:
1. Physical File
सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांच्या copies.
2. Digital File
Encrypted/secure digital storage मध्ये.
3. Emergency Summary
फक्त 1-2 पानांचा सारांश.
आणि या तिन्हींचे location कुटुंबातील किमान एका विश्वासू व्यक्तीला माहिती असावे.
दरवर्षी एक तास — Family Financial Audit!
आपण व्यवसायाचे Audit करतो.
Income Tax Return भरतो.
Portfolio Review करतो.
Insurance Renewal करतो.
पण स्वतःच्या कुटुंबाच्या Financial Documentation चे Audit करतो का?
वर्षातून फक्त एक तास काढा.
स्वतःला 10 प्रश्न विचारा:
1. माझ्याकडे किती Bank Accounts आहेत?
2. माझ्याकडे किती Insurance Policies आहेत?
3. माझी सर्व गुंतवणूक कुठे आहे?
4. माझ्या सर्व Investments चे Nominees कोण आहेत?
5. माझ्याकडे किती मालमत्ता आहे?
6. माझ्यावर किती कर्ज आहे?
7. माझी Will कुठे आहे?
8. माझ्या कुटुंबाला हे सर्व कुठे आहे हे माहीत आहे का?
9. माझ्या कागदपत्रांमध्ये काही जुनी/बंद माहिती आहे का?
10. उद्या मी उपलब्ध नसलो तर माझे कुटुंब माझी Financial Life समजू शकेल का?
जर शेवटच्या प्रश्नाचे उत्तर "नाही" असेल तर तुमची Financial Planning अजून पूर्ण झालेली नाही.
शेवटी एक महत्वाचा विचार…
आपण मुलांसाठी पैसा जमा करतो.
त्यांच्यासाठी घर बांधतो.
Insurance घेतो.
Mutual Funds मध्ये गुंतवणूक करतो.
FD करतो.
मालमत्ता घेतो.
पण एक गोष्ट विसरतो—
आपण त्यांच्यासाठी पैसा ठेवतो; पण त्या पैशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग ठेवत नाही.
म्हणून Financial Planning म्हणजे फक्त—
"किती कमवायचे?"
नाही.
ती चार प्रश्नांची प्रक्रिया आहे:
«किती कमवायचे?
किती वाचवायचे?
कुठे गुंतवायचे?
आणि सर्वात महत्त्वाचे—
उद्या आपण नसताना आपल्या कुटुंबाला ते सर्व कुठे आहे हे कसे कळणार?»
कारण—
**संपत्ती निर्माण करणारा माणूस श्रीमंत असू शकतो;
पण संपत्तीची व्यवस्था पुढच्या पिढीसाठी स्पष्ट करून ठेवणारा माणूस खऱ्या अर्थाने Financially Responsible असतो.**
आज एक तास काढा.
एक फाइल तयार करा.
तिच्यावर एकच नाव लिहा—
“MY FAMILY FINANCIAL MAP”
कदाचित आज ती फाइल कोणालाही उपयोगी पडणार नाही.
पण आयुष्यातील एखाद्या अनपेक्षित दिवशी…
ती फाइल तुमच्या कुटुंबासाठी तुमच्यानंतरचा सर्वात मौल्यवान वारसा ठरू शकते .
ब्लॉग लेखन : CA राम डावरे यांच्या फेसबुक पोस्ट वरून साभार पुनर्रप्रक्षेपित