25/01/2018
ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर SATARA
January 24, 2018 Satara, Top News
सातारा : मार्च ते मे 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापीत ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच पदांसह सर्व सदस्य पदांसाठी तसेच रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केलेला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी दिली आहे.
ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे :- तहसीलदार यांनी निवडणुकीसाठी नोटीस प्रसिद्ध करण्याचा दिनांक 25 जानेवारी, 2018, नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक 5 ते 10 फेब्रुवारी 2018, नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी) 12 फेब्रुवारी रोजी 11 वाल्यापासून, नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याचा अंतिम दिनांक 15 फेब्रुवारी दुपारी 3 वाजेपर्यंत, निवडणूक चिन्हे नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक 15 फेब्रुवारी दुपारी 3 वाजल्या नंतर, मतदानाचा दिनांक 25 फेब्रुवारी, मतमोजणीचा दिनांक 26 फेब्रुवारी व निवडणुकांचा निकाल प्रसिद्ध करण्याचा अंतिम दिनांक 27 फेब्रुवारी असा राहील.
ग्रामपंचायत निवडणुक ऑनलाईन अर्ज खात्रीशीर भरून मिळतील
*महा ई सेवा केंद्र*, *समर्थ मंदिर, सातारा*
संपर्क 9096611899