25/07/2017
*एरोटेक एरियल सर्विसेस चे ओपरेशन सर्च दिलावरभाई शिकलगार, नागठाणे*
२४/०७/२०१७ सोमवार
आज सकाळी ११ च्या सुमारास असलम सुतार, राहणार नागठाणे, सातारा. यांचा फोन आला, त्यांचे जवळचे मित्र हे ऊरमोडी नदीच्या पात्रात वाहुन गेले आहेत अशी माहिती दिली.
व शोध मोहीम साठी ड्रोन यंञणा चि मदत मागितली. क्षणाचाही विलंब न करता मि होकार दिला व सर्व तयारीनिशी नागठाणे गाठले.
स्थानिक लोकांच्या माहिती नुसार, दिलावर भाई शिकलगार, वय ५५, राहणार नागठाणे, सातारा हे लाकडाचे व्यापारी होते. दिनांक २२/०७/२०१७ (शनिवार) रोजी नेहमी प्रमाणे सकाळी अंघोळीसाठी नागठाणे येथिल जुन्या पुला नजिक ऊरमोडी नदीपाञा जवळ गेले असता, अचानक नदिच्या प्रवाहात वाहून गेले.
हि माहिती समजताच नातेवाईक व गावकर्यांनी शोधमोहीम सुरु केली. २ दिवसाच्या मानवी शोधमोहीमेस काहिही हाती लागले नाही.
सतत पाऊस असल्याने नदीचा प्रवाह ही वेग वाढवत होता. या प्रवाहात पाण्यात पोहुन शोध घेणे अशक्य होते.
शेवटी दिनांक २४/०७/२०१७ (सोमवारी) रोजी सकाळी ११ च्या दरम्यान गावकऱ्यांनी असलम सुतार यांच्या मार्फत शोधमोहीमेच्या मदतीला ड्रोन यंत्रणे साठी एरोटेक एरियल सर्विसेस चे शैलेश रघुनाथ चव्हाण यांच्याशी संपर्क साधला. तसेच कराड नगर पालिके च्या आग्णिशामन दलाची मोटर बोट ही मागवली.
बोरगाव पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी आणि त्यांचे सोबती शोधकार्यात सामिल होते.
ड्रोन यंत्रणा व मोटर बोट च्या सहाय्याने शोधमोहीम दुपारी १२ च्या दरम्यान ऊरमोडी नदीच्या पात्रात सुरु झाली. स्थानिक गावकऱ्यांनी ड्रोन टिम व मोटर बोट टिम ला शोधमोहीमेस पुर्ण सहकार्य केले. वेगवान नदिच्या प्रवाहात मोटर बोट कंट्रोल करणे जिकरीचे होते तसेच खराब हवामान व अधुन मधुन येणार्या पाऊस ही ड्रोन यंत्रणेला आपले काम करण्यासाठी अडचण निर्माण करत होते. तरिही सय्यंम पाळुन व अथक परिश्रमाने शेवटी शोधमोहीमेस यश मिळाले.
शेवटी ड्रोन यंत्रणेला संध्याकाळी ५ च्या सुमारास नदीपात्रातिल डाट झाडी मधे बोडी चा अचूक शोध घेता आला. माजगाव हद्दीतील ऊरमोडी नदीच्या पात्रात बोडी मिळाली. बोडी च्या लोकेशन ची माहिती मोटर बोट टिम ला दिली. मोटर बोट टिम ने बोडी अलगत डाट झाडी मधून नदी किनारी आणली व अशाप्रकारे शोधमोहीमेस यश आले.
ही शोधमोहीम एरोटेक एरियल सर्विसेस साठी एक मोठा अनुभव व यश होते.
नोट :- एरोटेक एरियल सर्विसेस कधिही ड्रोन यंत्रणा च्या अशा आणिबाणी च्या वापरा साठी कोणतिही फी आकारत नाही. आम्हाला अशा वेळी हक्काने हाक मारा. आम्ही सदैव मदतीसाठी तयार आहोत.
मोबाईल नंबर:- ८९८३६५८०९९