30/03/2021
आणि म्हणे WHO ने यांचे कौतुक केले होते......थापाडे कुठले !
१३९ करोड लोकसंख्येच्या या देशात ‘लोकांमुळे’ कोरोना पसरतो म्हणून लॅाकडाऊन/संचारबंदी हा उपाय होऊ शकतो का ? तेवढी यंत्रणा आपल्याकडे आहे का ? गेले वर्षभर सततचे लॅाकडाऊन घेऊन काय फरक पडला आहे ? लोकांच्या नोकऱ्या व व्यवसाय बुडाले, विजेची अव्वाच्या सव्वा बिलं भरून लोकं थकली आहेत.बरं जे आजारी पडत आहेत त्यांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे आर्थिक भुर्दंड पडतच आहे, फसव्या आरोग्य योजना त्यांच्या कामाला येत नाहीत. मग पुन्हा लॅाकडाऊन करून लोकांचे आर्थिक कंबरडे मोडायचे काम सरकार का करत आहे ? सध्या देशातील ६०% कोरोना रूग्ण फक्त महाराष्ट्र सापडत आहेत तरी लसीकरणावर अधिकचा भर दिला जात नाहीये,लसीकरणकेंद्र वाढवले जात नाहीत.एकीकडे वाजेसारख्या अनेक प्रकरणात संशयास्पद भूमिका घेऊन गोत्यात आलेले हे ठाकरे सरकार कोरोना नियंत्रणात आणण्यात सपशेल अयशस्वी ठरले आहे. एकीकडे एकदा कोरोना आटोक्यात येत असताना WHO ने दखल घेतल्याचे दाखले देऊन स्वत:ची पाठ थोपटून घेणारे ठाकरे सरकार महाराष्ट्राच्या आत्ताच्या परिस्थितीचे खापर लोकांवर कसे काय फोडू शकते ? तुम्ही सरकार आहात, चांगले व वाईट हे सर्व तुमचेच पाप-पुण्य !