Shubhamkaroti foundation Parbhani

Shubhamkaroti foundation Parbhani समाजसेवा

शुभंकरोती फाऊंडेशन व सामाजिक शास्त्रे संकुल च्या संयुक्त विद्यमाने पांगरी येथे महिला व मुलींसाठी Candle आणि Diya मेकिंग ...
13/04/2026

शुभंकरोती फाऊंडेशन व सामाजिक शास्त्रे संकुल च्या संयुक्त विद्यमाने पांगरी येथे महिला व मुलींसाठी Candle आणि Diya मेकिंग प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न.

या प्रशिक्षणाच्या माध्यमातून स्वयंरोजगाराच्या दृष्टीने महिला व मुलींना दैनंदिन वापरात येणाऱ्या व उच्च दर्जाच्या कँडल चे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले..

Shubhankaroti Foundation, in collaboration with the Faculty of Social Sciences, successfully conducted a Candle and Diya Making Training Program for women and girls at Pangari.

Through this training, participants were taught how to make high-quality candles used in daily life, with a focus on promoting self-employment opportunities for women and girls.

07/03/2026

मुंबई येथे शुभंकरोती फाउंडेशनला राज्यस्तरीय पुरस्कार

: महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शुभंकरोती फाउंडेशनच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा कार्यक्रम पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, आमदार मनीषा कायंदे, मुंबईच्या महापौर रितू तावडे तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महिलांच्या सक्षमीकरणासाठी व सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत शुभंकरोती फाउंडेशनचा हा गौरव करण्यात आला.

आमच्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण..महाराष्ट्र शासनाने शुभंकरोती फाऊंडेशनला "राज्यस्तरीय महिला गौरव पुरस्कार जाहीर". मह...
05/03/2026

आमच्यासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण..

महाराष्ट्र शासनाने शुभंकरोती फाऊंडेशनला "राज्यस्तरीय महिला गौरव पुरस्कार जाहीर". महिला क्षेत्रात केलेल्या सामाजिक कार्याची ही मोठी दखल आहे.

हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे. महाराष्ट्र शासनाचा "राज्यस्तरीय" हा सन्मान आणि यापूर्वी मिळालेले सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान आणि पुरस्कार मला सतत शिकत राहण्यासाठी, वाढत राहण्यासाठी आणि उत्कृष्टतेकडे प्रयत्न करत राहण्यासाठी प्रेरणा देतात.

हा पुरस्कार केवळ माझाच नाही, तर माझ्या या प्रवासात साथ देणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या आणि माझ्यावर विश्वास ठेऊन माझ्या सोबत काम करणाऱ्या आणि सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे.

हा महाराष्ट्र शासनाचा "राज्यस्तरीय" पुरस्कार मिळाल्याने माझे मन कृतज्ञतेने भरून आले आहे. माझ्या या प्रवासात माझ्या सोबत उभे राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीला मी हा सन्मान समर्पित करतो.

महिलांच्या स्वावलंबनासाठी शुभंकरोती फाउंडेशनचे उल्लेखनीय कार्य - श्री. उदय जाधव (गटविकास अधिकारी, पंचायत समिती सेलू)सेलू...
19/01/2026

महिलांच्या स्वावलंबनासाठी शुभंकरोती फाउंडेशनचे उल्लेखनीय कार्य - श्री. उदय जाधव (गटविकास अधिकारी, पंचायत समिती सेलू)

सेलू : महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणाच्या दृष्टीने कार्यरत असलेल्या शुभंकरोती फाउंडेशन, सेलू येथे महिलांसाठी सुरू असलेल्या ब्युटी पार्लर व शिलाई मशीन प्रशिक्षण केंद्रास आज श्री. उदय जाधव (गटविकास अधिकारी, पंचायत समिती सेलू) तसेच श्री. भाऊसाहेब खरात (बालविकास प्रकल्प अधिकारी, सेलू) यांनी सदिच्छा भेट दिली.
या वेळी शुभंकरोती फाउंडेशनमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण व सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. संस्थेने आजपर्यंत शिलाई मशीन, ब्युटी पार्लर व संगणक प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुमारे ३७५० महिलांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.
तसेच संस्थेमार्फत कॅण्डल मेकिंग, ज्वेलरी मेकिंग, चॉकलेट मेकिंग, मेहंदी प्रशिक्षण आदी विविध रोजगारनिर्मिती व सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे परभणी जिल्हा समन्वयक श्री. निशिकांत पाटील यांनी दिली.
महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी व समाजहितासाठी शुभंकरोती फाउंडेशनमार्फत सुरू असलेले हे निस्वार्थ व प्रेरणादायी कार्य पाहून उपस्थित अधिकाऱ्यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

16/10/2025
*शिलाई मशीन व ब्युटी पार्लर कोर्स**1 नोव्हेंबर 2025 पासून नवीन बॅच सुरू!* *शुभंकरोती फाउंडेशन तर्फे सुवर्णसंधी!*1)मोफत श...
14/10/2025

*शिलाई मशीन व ब्युटी पार्लर कोर्स*
*1 नोव्हेंबर 2025 पासून नवीन बॅच सुरू!*

*शुभंकरोती फाउंडेशन तर्फे सुवर्णसंधी!*

1)मोफत शिलाई मशीन प्रशिक्षण
2)मोफत ब्युटी पार्लर कोर्स

*कोर्स कालावधी:-* 45 दिवस
*अतिरिक्त प्रशिक्षण:* “स्वतःचा उद्योग कसा सुरू करावा?” या विषयावर विशेष मार्गदर्शन

*शुभंकरोती फाउंडेशन तर्फे आजपर्यंत वेगवेगळ्या प्रशिक्षणामार्फत 3250 महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन*
*त्यांना स्वावलंबी होण्याच्या दिशेने पुढे नेण्यात आले आहे.*
*महिलांच्या सबलीकरणाचा हा प्रवास आजही अखंड सुरू आहे!*

*मर्यादित जागा – आजच आपले नोंदणी करा!*
📞 संपर्क:- 9146532587/8378954111

पत्ता :- गुरुकृपा निवास पहिला मजला केशवराज नगर बाबासाहेब मंदिर च्या पाठीमागे डॉ. जवळेकर हॉस्पिटल समोर.सेलू 431503

नोट :- दिनांक 27 ऑक्टोबर 2025 पासून नाव नोंदणी सुरू

16/06/2025

🎓 शुभंकरोती फाउंडेशन 🎓
सक्षमीकरणाची दिशा – शिक्षणाच्या माध्यमातून
🌟 नाममात्र शुल्कात पुढील कोर्सेस उपलब्ध!
🔹 शिलाई मशीन कोर्स
🔹 कम्प्युटर कोर्स
🔹 ब्यूटी पार्लर कोर्स

🕒 कोर्स कालावधी – फक्त 2 महिने
📍 क्लासची वेळ:
▪️ बॅच 1: सकाळी 10.30 ते 12.00
▪️ बॅच 2: दुपारी 12.00 ते 1.30

प्रशिक्षण सुरू होण्याची तारीख – 01 जुलै 2025
📢 मर्यादित प्रवेश – आजच आपला प्रवेश निश्चित करा!
स्थळ :- गुरुकृपा निवास, केशवराज नगर बाबासाहेब मंदिर च्या पाठीमागे डॉ.जवळेकर हॉस्पिटल समोर सेलू 431503
📞 संपर्क: 86699 66044

 #अभिष्टचिंतन: शुभंकरोती फाउंडेशन  संस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा...
10/04/2025

#अभिष्टचिंतन: शुभंकरोती फाउंडेशन संस्थेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मा.ना.सौ मेघनादीदी साकोरे बोर्डीकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा....

https://youtu.be/ERZy3MD4vpY?feature=sharedशुभंकरोती फाउंडेशनचा आज वर्धापन दिन....२०१२ पासून  समाजाच्या सेवेत अखंड कार्य...
03/04/2025

https://youtu.be/ERZy3MD4vpY?feature=shared

शुभंकरोती फाउंडेशनचा आज वर्धापन दिन....

२०१२ पासून समाजाच्या सेवेत अखंड कार्यरत असलेल्या या संस्थेने आपल्या समर्पित सेवेतून अनगिनत लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत. महिलांच्या आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या क्षेत्रात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये केलेले कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.

संस्थेच्या या प्रेरणादायी प्रवासाची एक सुंदर चित्रफित आम्ही सादर करत आहोत. ही चित्रफित थोडी मोठी असली तरी, त्यात समाजसेवेचे सुवर्णक्षण अनुभवता येतील, म्हणून आवर्जून पाहावी.

https://youtu.be/ERZy3MD4vpY?feature=sharedशुभंकरोती फाउंडेशनचा आज वर्धापन दिन....२०१२ पासून  समाजाच्या सेवेत अखंड कार्य...
03/04/2025

https://youtu.be/ERZy3MD4vpY?feature=shared
शुभंकरोती फाउंडेशनचा आज वर्धापन दिन....

२०१२ पासून समाजाच्या सेवेत अखंड कार्यरत असलेल्या या संस्थेने आपल्या समर्पित सेवेतून अनगिनत लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत. महिलांच्या आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या क्षेत्रात मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमध्ये केलेले कार्य नक्कीच कौतुकास्पद आहे.

संस्थेच्या या प्रेरणादायी प्रवासाची एक सुंदर चित्रफित आम्ही सादर करत आहोत. ही चित्रफित थोडी मोठी असली तरी, त्यात समाजसेवेचे सुवर्णक्षण अनुभवता येतील, म्हणून आवर्जून पाहावी.

Address

Selu, Bharat
Sindi
442105

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shubhamkaroti foundation Parbhani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share