Yamuna Farms

Yamuna Farms Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yamuna Farms, Solapur.

Health first.
24/01/2022

Health first.

Wild and organic honey.
17/07/2021

Wild and organic honey.

16/09/2020

नाचता हुआ अनाज कहा जानेवाला मड़ुआ सिंधु घाटी सभ्यता के लोगों के भी भोजन में शामिल था ।विदेशी हमेशा से यूगांडा और दक्षिणी सूडान के लोगों की मजबूत कद-काठी देख कर हैरान होते रहे हैं कि वे दिन में सिर्फ एक बार भोजन करके इतनी मेहनत कैसे कर लेते हैं। रागी या मड़ुआ का खान-पान में शामिल होना भी इसका एक कारण है ।यह हड्डियों को बहुत मजबुत बनाता है ।
एक बात और है,इनमें घुन नहीं लगता और ये कई सालों तक खराब नहीं होता ।

आज से सिर्फ 50 साल पहले हमारे खाने की परंपरा बिल्कुल अलग थी. हम मोटा अनाज (Coarse Grains) खाने वाले लोग थे. मोटा अनाज मतलब- ज्वार, बाजरा, रागी (मडुआ), सवां, कोदों और इसी तरह के मोटे अनाज. 60 के दशक में आई हरित क्रांति के दौरान हमने गेहूं और चावल को अपनी थाली में सजा लिया और मोटे अनाज को खुद से दूर कर दिया. जिस अनाज को हम साढ़े छह हजार साल से खा रहे थे, उससे हमने मुंह मोड़ लिया ।प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने 30 अगस्त को आयुष मंत्रालय के कार्यक्रम में यह कहा ।

इन्हें मोटा अनाज इसलिए कहा जाता है क्योंकि इनके उत्पादन में ज्यादा मशक्कत नहीं करनी पड़ती. ये अनाज कम पानी और कम उपजाऊ भूमि में भी उग जाते हैं. धान और गेहूं की तुलना में मोटे अनाज के उत्पादन में पानी की खपत बहुत कम होती है. इसकी खेती में यूरिया और दूसरे रसायनों की जरूरत भी नहीं पड़ती. इसलिए ये पर्यावरण के लिए भी बेहतर है.
ज्वार, बाजरा और रागी की खेती में धान के मुकाबले 30 फीसदी कम पानी की जरूरत होती है. एक किलो धान के उत्पादन में करीब 4 हजार लीटर पानी की खपत होती है, जबकि मोटे अनाजों के उत्पादन नाममात्र के पानी की खपत होती है. मोटे अनाज खराब मिट्टी में भी उग जाते हैं. ये अनाज जल्दी खराब भी नहीं होते. 10 से 12 साल बाद भी ये खाने लायक होते हैं. मोटे बारिश जलवायु परिवर्तन को भी सह जाती हैं. ये ज्यादा या कम बारिश से प्रभावित नहीं होती.

29/07/2020

*मधमाश्या नष्ट झाल्या कि चार वर्षात मानव नष्ट होईल.. हे वाक्य आहे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांचं*

ते सांगतात कि *मधमाशी विविध प्रकारचा वनस्पतीचे परागीभवन करीत असतात, बरीच फळझाड, फुलझाड, भाजीपाला, धान्य पिके याचं परागीभवन फक्त मधमाश्याच करू शकतात. जर याचं प्रमाण कमी होत गेल तर आपल्या खाद्यातील अनेक घटक नष्ट होतील आणि मग वनस्पतीच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन भूकबळी वाढतील आणि मग अन्नही मिळणार नाही.* अश्या अनेक बाबी त्यांनी जगासमोर मांडल्या आहेत. विशेष म्हणजे जे अन्न परागीभवन होऊन येत नाही ते खाण्यासाठी सुद्धा जास्त पौष्टिक नसते.

*हायब्रीड अन्न खाऊन आपल्या शाररीक क्षमतेचा विकास, मानसिक क्षमतेचा विकास होत नाही हे आता विज्ञानानं सिद्ध केले आहे.*
मात्र जगण्याच्या स्पर्धेत आपण हरवून बसलोय. मात्र पुढील पिढीला अतिशय कुमकुवत करीत आहोत. शाररीक क्षमता नसल्याने मानव आपली पुढील पिढी वाढवू सुद्धा शकणार नाही असे भाकीत होत आहेत. आपण बारकाईने पाहिल्यास अलीकडील काळात अनेक डाळिंब बागायतदार मधमाश्याच्या पेटांच्या शोधात असतात कारण कि *डाळींब असे झाड आहे कि याचे परागीभवन फक मधमाश्याच करू शकतात. जर मधमाश्या नसतील तर डाळिंब फुलांचे रुपांतर फळात होतच नाही कारण याची नर व मादी फुले वेगवेगळी असतात आणि मग मधमाश्या एका फुलामधील नर उचलून मादी फुलावर सोडण्याचे महत्वाचे काम करतात. आणि फक्त माधामाश्याच हे काम करू शकतात, हे आजच्या जगाला समजले आहे. मात्र *मधमाश्यांना काय आवडते हे आपण शिकत नाही, तिला पोळे करायला कुठली झाडे आवडतात, पराग व मकरंद गोळा करायला कुठली झाडे आवडतात.*

आपल्यापैकी बहुतेकजण
हिमालयात जातात मात्र हिमलायात मनालीच्या पायथ्याशी अनेक गावे आहेत कि जिथ अगदी २०० वर्षेपूर्वी पासून मधमाशी पालन करीत आहेत, मात्र हे कधीच पाहत नाहीत, खरतर आपल पर्यटन हे शाश्वत व ग्रामीण भागाला उर्जा देणार असले पाहिजे. मात्र असे होताना दिसत नाही. अर्थात मधमाशी पालन २०० वर्षपूर्वी ते पण शास्त्रीयदृष्ट्या पालन केल्याचे आढळून येते. आपल्या राहत्या घरात मधमाश्या पालन करीत आहेत आणि दरवर्षी १० किलो मध विकतात आणि ३ किलो मध स्वतःसाठी ठेवतात. मात्र खरतर हे करण्यापाठीमागे उद्धेश परागीभवन हा असून अनेक पिके यावर अवलंबून आहेत. आणि हे सगळ त्या मधमाश्यांनी सुद्धा स्वीकारले आहे. यात ही माणस त्यांना अति थंडीत गुळाचा व साखरेचा पाक करून ठेवतात काहीजण तर गोळा केलेला मधसुद्धा ठेवतात.

आपल्याला वाटत आपणच शेती करतो मात्र मुंग्या, मधमाश्या, कीटक, गांडुळे, साप, पक्षी असे सर्वच जीव शेतकऱ्याला शेती करण्यासाठी मदत करीत असतात. यात सर्वात आघाडीवर मधमाश्या आहेत हे विसरून चालणार नाही कारण फुलांचे फळात रुपांतर करण्यात मधमाश्या पटाईत असतात, त्यांच्याशिवाय दुसरे किटक हे काम करूच शकत नाहीत, अगदी डाळिंब, काकडी, सफरचंद अशी अतिशय महत्वाची फळे. आपण फक्त जगात मधमाश्या आहेत तोपर्यंतच करू शकतो हे वेळीच जगाने लक्षात घेणे गरजेचे आहे. मधमाश्याची बदलती जीवनशैली यावर अनेक बाबी समोर येत आहेत, यात १९९० मध्ये साध मधमाश्यांच पोळ हे फक्त काटेरी झाडावर बसायची यात *साधी बाभूळ, बोर* ही झाड महत्वाची होती, मात्र आजच्या काळात हीच पोळी काटेरी झाड सोडून जांभूळ, आंबा अश्या सहज शिकार होईल अश्या झाडांवर शिवाय घरात, भिंतीवर दिसू लागली, हा अतिशय महत्वाचा बदल दिसून येत आहे. हा बदल करण्यापाठीमागे कारण सुद्धा असेच आहे की, *आजकाल बोरी व बाभळी तोडण्याचे प्रमाण भयानक वाढत गेले आणि वास्तवात तर आता बोरी व बाभळी दुर्मिळ होत गेल्या, पर्यायाने त्यांनी आपल्या मूळ नैसर्गिक अधिवासात बदल करीत नवे पर्याय स्वीकारला केवळ माणसांच्या चुकामुळेच..*

आगी मधमाश्या तर जंगलातील उंच झाड कमी होत गेली शिवाय, नैसर्गिक पाणवठे कमी होत गेले, ज्यात या मधमाश्या सहज मातीत उतरून गाळात पाणी पिऊ शकत होत्या, आता हे पाणवठे नष्ट झालेत, यात काही वन अधिकाऱ्यांनी तर पर्यटकांना वाघ दिसावा म्हणून जंगलातील नैसर्गिक पाणवठे नष्ट केले आणि आता नवीन पाणवठे रोडलगत तयार करून वाघ दिसावा अशी व्यवस्था निर्माण केली. मात्र यात सिमेंटच्या टाक्या बांधल्याने त्यात मधमाश्या पाणी प्यायला उतरतात आणि बुडून मरतात. असे हे व्यवस्थापन कसे जंगल वाढविणार.
यात या माश्यांनी आपला नैसर्गिक अधिवास बदलून इमारती, मंदिरे अश्या जागा निवडून लोकवस्तीत प्रवेश केला. कारण पाणी सहज मिळू लागले शिवाय उसाची रसवंती हे सुद्धा महत्वाचे आहे कारण यात त्यांना उन्हाळ्यात गोड रस मिळत असतो.
आजकाल शिकलेल्या लोकांना मधमाशी काय करू शकते याच महत्त्व राहिलेले नाही. मात्र शेतीत अडचण आली की मग आपण सर्व पर्याय शोधत असतो.
मी पोस्ट ग्रॅज्युएशन करताना एकजण मित्र झाला होता, त्याने सध्या पॉली हाऊस करून आधुनिक शेती करण्यास सुरुवात केली. अर्थात शेती घेतली त्यावेळी शेतीच्या बांधावर बोर, बाभूळ, जांभूळ, आंबा, शेवगा, भोकर, रुई अशी विविध झाड बांधावर होती. मात्र इतरांचे ऐकून सर्व झाडे तोडली आणि जास्त पाणी पिणारी नारळाची झाडे बांधावर लावली, यात शेतीची जैव विविधता झपाट्याने कमी झाली हे लक्षात आलेच नाही.
आता खरी गंमत अशी आहे की, लॉकडाऊन मध्ये अनेक बिझी मित्र free झाले व त्यांचे फोन आले तसाच त्याचा पण फोन आला की, व तो सांगू लागला पॉली हाऊसमध्ये काकडी लावली आहे आणि खूप मोठी पिवळी फुल येत आहेत, आणि जळून जातायेत शिवाय काकडी अंगठ्या एवडीच राहतेय, काय कराव लागेल, म्हणून मी नैसर्गिक शास्वत शेतीचा अभ्यास केला तेव्हा लक्षात आले की या काकडीचे परागीभवन होत नाही कारण या फुलात आत शिरून परागीभवन कोणीही करत नाही, त्यामुळे त्याचे पराग फुटत नाहीत आणि मग फुल जळून जात आहेत, मग यावर उपाय म्हणजे मधमाश्याच जगात हे काम करू शकतात, खटपट करून मधमाश्यांच्या पेट्या आणल्या आणि त्याच रात्री दोन पेट्या पॉली हाऊसच्या तोंडाजवळ ठेवल्या. सकाळी लवकर मधमाश्यांनी आपले परागीभवनाचे काम सुरु केले. मग ७ दिवसांनी १ क्रेटऐवजी आता ६ क्रेट काकड्या तोडल्या आणि शिवाय टवटवीत माल सापडला, २० किलोची वाढ १५ पटीने उत्पन्न वाढले. याचा टक्केवारीत अर्थ काढायचा असेल तर १५०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सांगितले. माझा मित्र सहज म्हणाला शिक्षणात कधी अस शिकवलं जात नाही, यापुढे मात्र पर्यावरण पूरक वृक्षारोपण करणार असल्याचे स्पष्टपणे बोलून दाखविले. अगदी *शेतीच्या बांधावर बोरी, बाभळी, करंज, भोकर, उंबर, पिंपळ, कडुलिंब, जांभूळ* अशी जैव विविधता पूरक झाडे लावणार असे कबूल केले. अनेकजण सांगतात झाडांची सावलीमुळे पिकांना फटका बसतो मात्र हे खोटं असून आपली स्थानिक झाडांच्या पानांचे खतात लवकर रुपांतर होते, शिवाय सावलीमुळे काही फरक पडत नाही, मात्र यात परदेशी निलगिरी, गुलमोहर आणि नारळ झाडे बांधावर असल्यास भूजल पातळी झपाट्याने खोलवर जाते आणि यांची पाने जमिनीवर पडल्यास जमीन नापीक होत असते. त्यामुळे *फक्त स्थानिक झाडेच* शेतीच्या बांधावर लावली पाहिजेत. काकडीचे परागीभवन करताना मधमाशी फुलात शिरून परागीभवन करीत असते. आणि मग काकडीचे वेलींची वाढही झपाट्याने होत असते, याचा अर्थ वेलीची वाढ जोरात होते आणि उत्पादन क्षमता वाढते ती पण कित्येक पटीने...काहीजण दिवसा कीटकनाशक फवारतात आणि मग मधमाश्या मारतात. यावर उपाय म्हणजे रात्री मधमाश्यांनी आपले परागीभवन काम थांबविले की फवारणी करावी जर गरज असेल तरच.. अगदी ज्येष्ठ निसर्गतज्ञ मारुती चितमपल्ली यांनी नागझिरा येते सांगितले की, जंगलात अस्वले मधमाश्यांची पोळी व मध आवडीने खातात, त्याच्या भाकरी करतात त्या करताना झाडांची पाने टाकतात आणि मग त्या सर्व भाकरी गुहेत ठेवतात कारण त्यांच्या पिल्लांसाठी उपयोगी येतील, मात्र काहीवेळा या भाकरी चोरायला आदिवासी लोक येतात आणि मग अस्वले हल्ले करतात मात्र अस्वलाचा हल्ला म्हणजे जगात सर्वात वाईट चेहरा होतो, कारण त्याची एक चापट म्हणजे चेहरा विद्रुपीकरणच. मात्र एकदा त्यांनी एक अस्वल झाडावर चढत असल्याचे पहिले, ते झाडावर मधमाशी पोळे खाण्यासाठी झाडाच्या शेंड्यावर गेले आणि वरून खाली पडले आणि मेले याचा अर्थ असा आहे की , त्या मध्यामाश्याच्या पोळ्यावर अनेकदा अस्वल हल्ले झाले होते आणि मग त्या पोळ्यातील राणीने आपल्यात बदल करीत झाड फांदी ऐवजी अस्वल आल्यावर फांदी सहज तुटेल अश्या फांदीवर आपले पोळे केले आणि यावर कायमस्वरूपी आगी माश्यांनी उपयायोजना केली. ज्या प्रजाती बदलायला शिकतात त्याच निसर्गात टिकतात आता वेळ आहे मानवाला बदलायची, जर आपण आपल्या जीवनशैलीत बदल केला नाहीतर आपणसुद्धा संपणार यात शंकाच नाही, हे विशेष लक्षात घेणे आवश्यक आहे.
*आज कोरोना च्या रूपाने धोक्याची घंटी वाजली आहे वेळीच सुधारणा बदल नाही केला तर मानवी जीवन संपायला वेळ लागणार नाही.
FB..

22/06/2020

क्षमा करी हरी| चुकली पायी वारी
संकट आले भारी | करोना रूपे ||

काय पाप केले| संकट ओढावले
रस्ते बंद झाले| माहेराचे||

काय अपराध झाला| का कोणी शाप दिला
तेणे कोप ओढावला | करुणा रूपे ||

आगा विठुराया | येऊ दे गा दया
सोडवी महा भया | पासूनीया ||

देह असे घरी | मन करी वारी
सुनी ही पंढरी | दिसत असे ||

पंढरीची वाट | वैष्णवांचा थाट
दिसे दिवेघाट || सुनासुना ||

भजन कीर्तन| टाळ मृदुंगाची धून
दिसेना रिंगण | कोठे काही ||

पंढरी वैकुंठ | रिते वाळवंट
दाटला से कंठ| पांडुरंगा ||

आता घरीच बसुनी| करू तुझे ध्यान
लावूनिया मन| तुझे पायी ||

राम कृष्ण हरी

17/06/2020

कुठे हरवली ती चिमुकली चिमणी,
अंगणात गाणारी चिऊ चिऊ गाणी,
इवल्याश्या चीचीने वेचणारी दाणी,
थवा करून राहणारी चिमुकली चिमणी,
एकजुटीचा संदेश देणारी वाणी,

आम्ही म्हणत होतो तिला चिउताई,
तिच्या आवाजाने सुरू होई आमची घाई,
न चुकता टाकी दाणापाणी आई,
फस्त करी थव्याने लगेच आमुचि चिउताई,

चोचिने आणि काडी कचरा वेचूनी चिमणा चिमणी,
सुंदर असे घरटे बांधी घरात आणि,
इवलेसे पक्षी ठेवी घरट्यात चिमणा चिमणी,
भरवी त्यांना चोचिने दाणापाणी,

पंख फुटल्यावर पिल्लू घेई भरारी,
पारखे झाले हे सर्व आमुच्या दरी,
गवसेल का परत आम्हा चिउताई,
तिला शोधतो आम्ही दारोदारी..
(स्वाती वक्ते)

Courtesy to – SNGP

20/05/2020

Let's pledge to provide this wonderful creature ,who helps us a lot to survive ,its natural environment on this
!
#आंतरराष्ट्रीय_मधमाशी_दिन
Plant those trees which are the hosts for honeybees .
ID : #बेल #बील्व flower with a honeybee

Honeybees favourite Trees and crops
/ #शेवगा
All types of citrus trees लिंबूवर्गीय झाडे
Aegle mormelos bel बेल
All Terminalia sp #अर्जुन प्रकार सर्व झाडे
Mangifera indica #आंबा
Madhuca indica #मोह
Date palm #खजूर
Lagerstroemia sp #तामण व #बोंडारा
Lawsonia inermis etc #मेहंदी
Syzygium cumin #जांभूळ

Crops
Mustard #मोहरी
Safflower #करडई
Sunflower #सूर्यफूल
Linseed #जवस
Flaxseed #बडीशेप
Fenugreek #मेथी
ही काही महत्वाची नावे
ही यादी पूर्ण नाही इतर अनेक पिके व झाडे आहेत जी मधमाश्यांना आवडतात

वळणावळणाची वाट चालते,संथ वाहते भिमामाई,तिच्या जलाने समृध्द शिवार,तटाभोवती दाट फुलली वनराई।।भिमाशंकर चा जन्म तिचा,मार्ग भ...
16/05/2020

वळणावळणाची वाट चालते,
संथ वाहते भिमामाई,
तिच्या जलाने समृध्द शिवार,
तटाभोवती दाट फुलली वनराई।।
भिमाशंकर चा जन्म तिचा,
मार्ग भक्ती आणि शक्तीचा,
इंद्रायणी ला सोबत घेउनी,
चाले मार्ग विठ्ठलाच्या पंढरीचा।।
तृषा भागवी काळ्या आईची,
सदा दुथडी भरुन वाही,
तिच्या भरोस्यावर बळीराजा,
स्वप्न हरित क्रांतीचे पाही।।
साक्ष शिवबाच्या स्वराज्याची,
शंभुराज्याच्या शौर्यगाथेची,
तिच्या कुशीत समृध्द जाहलो,
लेकरे आम्ही सह्याद्रिची।।
भीमतटावर बसुन मंगेश,
लिहितो कवनरुपी तीची गाथा,
माय ती आपली बळीराज्याची,
तिच्या चरणी सदैव टेकवु माथा।।

08/05/2020

#वड - #उंबर - #पिंपळ - #नांद्रुक - #पिंपरण, जैवविविधता पूरक देशी झाड - डॉ महेश गायकवाड

वटवृक्षाप्रमाणे, पिंपळ, उंबर, पिंपळ, नांद्रुक, पिंपरन ही भारताची जैवविविधता सांभाळणारी देशी झाड. शिवाय वडाप्रमाणे विशाल असतात. फक्त वडासारख्या या वृक्षांना पारंब्या नसतात. मारुती चितमपल्ली यांच्या सोन्याचा पिंपळ या लेखात त्यांनी खूप सविस्तर वर्णन केले आहे, काक विष्टेचे झाले पिंपळ । कावळे उंचावर बसून जिथं विष्टा टाकतात, तिथं पिंपळाची लहान रोपे वाढताना दिसतात. शिवाय अनेक पक्षी जसे कोकिळा, तांबट, भोरड्या तसेच फलहारी वटवाघळे या झाडांच्या बिया निसर्गात पसरविण्याचे काम करीत असतात. ही रोप इमारती आणि मंदिर यांच्या भिंतीच्या फटीतून वाढतात.

जगभरात या कुळातील जवळपास ७०० पेक्षा जास्त प्रजाती ची झाड सापडतात. भारतभर सर्व प्रकारच्या जंगलात व जमिनीत ही सहजपणे आढळतात. जटाधारी वड म्हणून वडाची ख्याती आहे. वड, पिंपळ, नांद्रुक ही झाड लावायची असतील तर याची ३ फुटापेक्षा जास्त लांबीची फांदी घेऊन, पारीने जमिनीत भोक पाडावे व त्यात फूटभर खोल फांदी पुरावी. फांदी लावताना कधीही खड्डा करून फांदी लावू नये, अशी फांदी जळून जाते. म्हणून भोक पाडून त्याला दगड मातीचे आळ करवून पाणी द्यावे.

बोथे गावात ता. माण येथे उंबराची मूळ अर्थात उंबराच पाणी , याला स्थानिक भाषेत "शिंनकुल" असे या गावात याला नाव आहे. अगदी पूर्वी पासून लोक अनेक वेळा साथीचे आजार आले की पाणी प्यायला देत असत. गोवर, देवी, मोठीआई आली अर्थात याच पाणी घेऊन मुलांना आंघोळ घालत असत, अर्थातच गोवर आजार आला की परिसरात सर्वजण याच उंबराच पाणी देत असत. अहो सातारा पासून अनेक डॉक्टर सुद्धा अनेक वेळा पाणी घेऊन जात असत. मात्र पाणी इतकं थंड असते, माझे आजोबा डॉ मारुती गायकवाड यांनी मला एक भन्नाट किस्सा सांगितला की, एक शेतकरी दुपारचा पाणी प्यायला आला , पाणी पिताना त्याचा विळा त्या शिंनकुळात अर्थात छोट्यास्या कुंडात पडला, काहीवेळाने त्यान तो वर काढला, व काखेत अडकवला, आणि तंबाखू मळू लागला, मात्र अचानक विळा अडकवलेला हातच तुटून पडला, इतकी धार त्या पाण्यात पडलेल्या विल्याला धार आली. त्यानंतर दीड वर्षाने तो माणूस मेला, त्यांचं नाव नावडकर होत. ही बाब त्यांनी सांगीतली मात्र भविष्यात मी त्या माणसाच्या घरी जाऊन विचारपासू नक्कीच करेन....
अनेक गाव सुद्धा या झाडांच्या नावाने आहेत, त्यातील कथा सुद्धा भन्नाट आहेत, यात वडाचीवाडी, उंबरे, उंबरी, पिंपरी चिंच-वड अशी नाव प्रचलित आहेत.
शिवाय आदिवासी पाड्यात वडाचे पाणी, उंबराच पाणी, जळूच पाणी, करंजाच पाणी, अशी पाणथळ सुद्धा खूपच महत्वाची आहेत. आजही आदिवासी बांधव या पाण्याचा वापरून अनेक आजार बरे करतात. तसेच आजही खेडेगावात कांजण्या आजार आला की, लहान मुलांना उंबराच्या मुळांचे पाणी प्यायला देतात, अहो अगदी दोन तासात फरक पडतो. कांजण्या १०० टक्के बऱ्या होतात.

जैवविविधता पूरक म्हणण्याचा अर्थ असा आहे की , बहुतेक वन्यजीव अश्या झाडांभोवती आढळतात, अगदी रान लाल झालं की, अनेक भागात शिकारी माणस रान लाल झालं की, त्याखाली वन्यजीवांची शिकार करतात, कारण बहुतेक वन्यजीव याची लालसर गोडसर फळे खायला येतात. रान लाल होणे म्हणजे या झाडाची फळे जमिनीवर पडून लाल रंग तयार होतो.
खरतर प्रत्येक झाडावर एक पुस्तक तयार होईल एवढी माहिती आहे, मात्र अगदी मोजकीच माहिती देण्याचा विचार आहे. उंबर अर्थात औदुंबराच्या फळाचा वापर तर लोक मोठ्या प्रमाणात करतात, उंबराच्या दोड्या तर खूप रुचकर असतात, हिरवी उंबर तोडून शिजवून, मग धुवून चिरून, कांदा व तेलात परतायच्या, मग बघा स्वाद. आता आपण पर्यावरण संरक्षण करण्यासाठी उंबराचा मोठा वाटा आहे.
यात उंबर आणि दत्त देवाचे नात मात्र खूप घट्ट आहे, दत्तात्रेयला तीन तोंड तशी उंबराच्या फुलाला पण तीनच तोंड आहेत, हे विज्ञान लक्षात ठेवा. हे झाड सर्वात जास्त भूजल पातळी वाढविण्यासाठी मदत करते, काहीजण तर सांगतात, दररोज एक उंबराच झाड जवळपास १२०० लिटर पाणी भुजलात सोडत, आपल्या मुळामार्फत. याच्या मुळांची लांबी मोजली तर ४८ किमी लांब असते, जर सर्व मुळ्या कापून मोजल्या तर. एवढे महान जलसंधारण चे काम करीत असतो उंबर म्हणून त्याला दत्त गुरूंचे स्थान मिळाले आहे, त्याचे संवर्धनासाठी ही बाब पूर्वजांनी आपल्याला सांगितली आहे.
निसर्ग तज्ञ श्री मारुती चितमपल्ली, आवर्जून सांगतात प्रत्येक शेतकऱ्याने एक एकर शेतीमध्ये चारही बाजूला चार उंबराची झाडं लावली पाहिजेत जेणेकरून जवळपास पंचवीस ते पस्तीस टक्के पाणी बचत होईल. शिवाय जगातील सर्वात श्रीमंत म्हणजे सुपीक माती उंबराच्या झाडाखालीच असते, असंख्य जिवाणू नी तयार झालेली ही माती, आपण आजही घटस्थापना करताना घटात टाकून त्यावर अनेक प्रकारची बीजे लावतो, व तपासणी करतो, पेरणीपूर्वी ची, उगवण क्षमता योग्य की अयोग्य.
उंबराचे फूल अर्थात फळ याला तीन तोंडे असतात खरंतर इंग्रजी आठ आकाराचे त्याचे फळ असून नर आणि मादी, मध्येच कीटक असतात हा कीटकच् या नर आणि मादीचे मिलन घडवून फुलांचे रूपांतर फळात करतात, त्यामुळं यातील चिलटे अत्यंत महत्वाची आहेत. चिलटे नसतील तर उंबर झाड नाही. शिवाय पिकलेल्या उंबराची फळे खाल्ली तर आपल्याला डोळ्याचे आजार बरे होतात अशी जुनी माणसं आवर्जून सांगतात, या पिकलेल्या फळात अनेक चिलट असतात या चिलटासह फळे खावीत असेही पूर्वज आवर्जून सांगतात.

वडाची झाडं तर जगात सर्वात जास्त लांबवर पसरलेले झाड म्हणून ओळखतात, कलकत्ता येथील बॉटनिकल गार्डन मध्ये साधारणपणे साडेतीन एकरापेक्षा जास्त परिसरात एकच वडाचे झाड पसरलेले आहे, वटपौर्णिमा हा शब्द खरतर या झाडापासून निर्माण झाला, जगात वडलाच वटपौर्णिमेला महिला दोऱ्याने बांधतात. कारण त्यामुळे वडाच्या वरील फांद्या जोमाने वाढतात व पारंब्या ची वाढ खूप झपाट्याने होते या प्रक्रियेत झाड ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात सोडते आणि म्हणूनच जीवनदायी वृक्ष म्हणून याची नोंद आहे. जीवनदायी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात देते आणि स्वतःची वाढ ही जोमाने होते, पारंब्या म्हणजेच वडाची मुळच ही मूळ खूप वेगाने वाढतात. म्हणून जुन्या झाडांना दोर बांधायची प्रथा आहे, हे समजून घेतले पाहिजे. घरात वडाची फांदी आणून कधीही पूजा करू नये. हा पूर्वजांचा अभ्यास आहे बर, आजच्या थोतांड अभ्यास प्रणालीचा नाही.
भारताचे राष्ट्रीय झाड वड असून भारतभर सगळीकडे आढळणारे हे झाड बहुउपयोगी आणि जीवनदायी मानले जाते. याचे अनेक औषधी गुणधर्म आहेत शिवाय यावर अनेक पक्षी आपल्या वसाहती अर्थात सारंगगार निर्माण करतात. शिवाय वटवाघळे आपली वस्ती या झाडांवर मोठ्या प्रमाणात करतात, कारण याच्या फांद्या खूप मजबूत असतात, अगदी शेंड्या लगतच्या छोट्या फांद्या सुद्धा मजबूत असतात, त्यामुळे वटवाघळे यावर आपली वस्ती करतात. शिवाय थंडीच्या मोसमात अनेक पक्षी आपल्या वसाहती वडाच्या झाडांवरच मुद्दाम ठेवतात कारण यावर उबदारपणा इतर झाडांपेक्षा जास्त मिळतो, हेसुद्धा विसरून चालणार नाही. लहानपणी वडाच्या पारंब्या खेळणे हा तर प्रत्येकाचा छंदच असतो, या पारंब्यावर झोका घेणे अतिशय साहसी खेळ म्हणून लहानपणी आपण सगळे खेळलो आहोत. शिवाय उंदीर मोठ्या प्रमाणावर या झाडांभोवती असतात, त्यामुळे बहुतेक वेळा सापही झाडाच्या फांद्या वर दिसून येतात. अन्नसाखळी मजबूत ठेवण्यासाठी ही झाड महत्वाची मानली जातात.

नांद्रुकचे झाड हे तर घाटमाथ्यावरील अगदी सातारा जिल्ह्यातील माण व खटाव तालुक्यात हे वरदानच ठरले आहे. प्रत्येकाच्या घरी नांद्रुक पाहायला मिळते आणि नांदुरकीच्या खाली दोन बाजा टाकलेले असतात, शेजारी दहा बारा गुरांचा गोठा असतो, कोंबड्यांची डालगी असतात, शेळ्या बांधलेल्या असतात, कांदा सावलीत पोत्यात भरून टाकलेला असतो, दगडाच्या चुलीवर स्वयंपाक हि चाललेला असतो, हा सगळा संसार नांदुरकी चे झाड चालवत असतं. आपल्याला हे झाड मोठ्या प्रमाणात लावणं नितांत गरजेचे आहे. नांद्रुक म्हटलं की मला नेहमी एका ठिकाणी वीस-पंचवीस ac लावल्यासारखा वाटत, कारण सभोवताली असणाऱ्या तापमानापेक्षा जवळपास सात ते दहा अंश सेल्सिअस तापमान या झाडाखाली कमी असते हे विशेष नोंद घेण्यासारखे आहे. तसेच काहीजणांना तर या झाडाने हॉटेल व्यवसाय करणेसाठी खुप मोठे नैसर्गिक छत दिले आहे. याचा पाला गुरांना मोठ्या प्रमाणात दिला जातो. छोटी फळे आली की पक्षांना मेजवानी असते, ते नवलच.

पिंपळ, गौतम बुद्ध यांनी पहिल्यांदा बोधिसत्व प्राप्त केले ते पिंपळाच्या झाडाखाली आणि म्हणून पिंपळ जगासाठी शांतीचे प्रतीक म्हणून नोंदवलं गेलेल झाड आहे. पिंपळाच्या झाडाला बोधिवृक्ष असेही नाव आहे, जपानमधील लोक बुद्धांची पूजा करताना या झाडांच्या पानांची सळसळ ऐकायला एकत्रित येतात. पिंपळाची पाने खान हत्तीला खूप आवडते. भारतीय लोकही या झाडाची पूजा करतात. पिंपळ खरंतर याला मुंजा असंही गावाकडे म्हणतात. हे झाड शक्यतो कोणीही तोडत नाही सर्वांचे पुजनीय असे हे झाड मानले जाते.
पिंपरण अर्थात हे सुद्धा खूप मोठे वाढणारे झाड असून याच्या फांद्या शेळ्या मेंढ्यांसाठी खूप मोठ्या प्रमाणात तोडल्या जातात, पाने आकाराने लहान असेल खोडाचा पांढरा रंग असतो.

या कुळातील बहुतेक झाडांवर अनेकदा आगी मोहोळ ची पोळी दिसून येतात कारण याच्या फांद्या मजबूत असतात यामुळे आगीमाश्या आपली पोळी बांधतात. वानर, माकड या झाडांवर रात्रभर विश्रांती घेण्यासाठी आढळून येतात. या झाडांवर अनेक पक्षांची घरटी ही आढळून येतात, यात कावळा, घारी गरुड अशी मोठ्या पक्षांची घरटी असतात. वटवाघळे ही आपल्या वसाहती या कुळातील झाडांवर करताना दिसून येतात.
या कुळातील झाडांवर भोरड्या पक्षांचे थवे येत असतात. अहो अगदी सकाळी मोठी पार्टी असते अशा झाडांवर. शिवाय उंबराला उंबरे आल्यानंतर यावर मोठी पार्टी सगळे करताना दिसतात अगदी रात्रभर वटवाघुळ आपली पार्टी करतात. या कुळातील झाडांवर तांबट, धनेश, बुलबुल, पोपट, चष्मेवाला, सुभग, चष्मेवाला, भोरड्या, कोकिळा, शिकारी पक्षी असे नानाविध पक्षी आढळून येतात. शिवाय यावर बगळ्यांच्या वसाहती, पानकावळे, राखी बगळे, कावळे यांची घरटी आढळून येतात. परिसरात आढळणाऱ्या पक्षी, सस्तन प्राणी यांची भूक भागविण्यासाठी ही झाड मोलाची मदत करत असतात.

पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेता पिंपळ, वड, उंबर या झाडांची उपयुक्तता अतिशय महत्त्वाची असून अगदी त्याचे महत्त्व, धार्मिक भावना त्यामुळे या झाडांना मिळणार सामाजिक संरक्षण, याचा विचार करता, समाजात अनेक ठिकाणी ही झाडे लावणे अत्यंत महत्त्वाचं असेल कारण प्रत्येक धर्माला प्रिय असणारी या कुळातील झाड आहेत. या झाडांची सावली आपल्याला आयुष्य देते अर्थात हे सगळे जीवनदायी वृक्ष आहेत, यांचे वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात गाव व शहर पातळीवर झाले पाहिजे, तरच पर्यावरण संरक्षण चळवळ जागृत होईल. अलीकडे रोड शेजारी असणारी जुनी झाड तोडली जातायेत आणि छोटी परदेशी झाड लावण्याचा प्रयत्न आपलं सरकार करीत आहे. ही बाब चिंताजनक आहे. आपण सर्वांनी मिळून एकत्रित येऊन सरकारला देशी झाडे लावण्यासाठी दबाव गट निर्माण केले पाहिजेत.
डॉ महेश गायकवाड, M.Sc. Ph.D. ( Environment Science),
पर्यावरण तज्ञ, बारामती.

07/05/2020

ज्या गावच्या #बोरी त्या गावच्या #बाभळी – हि एक म्हण आहे, मात्र एक जैवविविधता पूरक संदेश आहे कसा, अनेकांना वाटत असेल कसा, समजून घेऊयात – डॉ महेश गायकवाड, पर्यावरण तज्ञ, बारामती.

आपल्याकडे जुन्या म्हणी आणि त्याचे अर्थ शाळेत मर्यादितच समजावले जातात. आज आपण जरा मोठा अर्थ घेऊन विचार करूयात. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी म्हणजे एकाच अधिवासात येणारी हि दोन काटेरी झाड. दक्षिणी काटेरी वने असलेल्या वनांना, म्हणजेच या म्हणीचा असा एक अर्थ होतोय की, बोरी आणि बाभळी यांनीच हे अधिवास आजपर्यंत मजबूत ठेवले आहेत. आपल्याला जर हि बाभळीची वने वाचवायची असतील तर अधिक
बोरी आणि बाभळी करतात काय नक्की, जैवविविधता वाचविण्यासाठी......म्हणजे काय तर एकाच गावात ठकास महाठक भांडणाराला मिळतोच. जिथं बोर तिथं बाभळी नक्कीच.
बोरी व बाभूळ यांच्याशिवाय गवताळातील जैवविविधता जिवंत राहू शकत नाही, कारण अन्नसाखळी मजबूत ठेवण्यासाठी बोरी व बाभळी सारखी काटेरी झाडे अत्यंत उपयुक्त असतात. भारताच्या दक्षिणी काटेरी वनात अगदी कर्नाटका, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान असा दक्खनच्या पठारावरील भागाला गवताळ काटेरी वने म्हणतात. याला सव्हाना सारखी काटेरी गवताळ वने असेही संबोधतात. यात गवताळ परिसरात काटेरी झाडे झुडपे असतात.
बाभळीचे उपयोग : अगदी छत्रपती संभाजी राजेंनी आपल्या ग्रंथात अनेकदा बाभळीच्या झाडांचे उंबरे प्रत्येक घराला वापरले जातात म्हणून बाभळीला सुद्धा अतिशय महत्व दिलेले आहे. घराचा उंबरा बाभळीचा असला म्हणजे घर अतिशय मजबूत समजले जाते. अलीकडे या झाडाचा वापर मानव जास्त प्रमाणात माणसे जाळण्यासाठी करीत आहे. परिणामी बाभळीची संख्या झपाट्याने कमी होत चालली आहे. शिवाय आजकालच्या नाटकी जगात तर माणसाला बाभूळ नकोशी झाली आहे. कारण तिला काटे असतात, मग काय, शिक्षित मुर्खांनी तिच्या ऐवजी परदेशी झाड लावली गावात, शहरात अगदी शेतीच्या बांधावर, परिणाम आपली स्थानिक जैवविविधता झपाट्याने नष्ट होत आहे. काहीजण तर म्हणतात शेती पडून राहतीय बांधावर झाड असली की, मग काय हो, आता निंब पेंड घालावी लागतेय शेतीला जिवंत ठेवण्यासाठी, खरतर बांधावरील आपली स्थानिक झाड म्हणजे जैवविविधतेचे भांडार आहे. सावली मूळे पिके वाढत नाहीत हे गैरसमज आहे, कारण देशी स्थानिक झाडांच्या सावली मुळे सुद्धा पिके वाढतात. मात्र परदेशी झाड अर्थात गुलमोहर, निलगिरी, उंदिरमारी अशी चुकीची झाडे लावल्या मुळे शेतात काय कडेला सुद्धा काहीच उगविणार नाही, हे 100 टक्के. त्यामुळे आपली बोरी बाभळी ची झाडे जास्तीत जास्त प्रमाणात लावली पाहिजेत. अहो या झाडांना पाणी दिल नाही तरी जोमाने वाढतात शिवाय जैवविविधता वाढवितात, हा काय गुन्हा आहे काय त्यांचा, की अज्ञान आहे आपलं, समजावून घ्या.
सर्व दातावरील उपाययोजना म्हणून आपल्यापेक्षा शेळ्या – मेंढ्या – हरणे बाभळीच्या शेंगा खातात. कारण त्यांना माहिती आहे कि बाभळीच्या शेंगा व फांद्या खाल्या मुळे आपले दात आयुष्यभर कधीही दात किडत नाहीत. हीच गोष्ट शिक्षित मानवाला मात्र अजिबात माहिती नाही हे नवल. मात्र अनेक दंतमंजन करणाऱ्या कंपन्या मात्र मोठ्या प्रमाणात या बाभळीच्या शेंगा गोरगरीब जनतेकडून गोळा करून घेतात, आणि बबुल पेस्ट तयार करतात. खरतर आपण अश्या बाभळीच्या शेंगा उन्हाळ्यात एकत्रित करून , सावलीत १० दिवस वाळवून, मग त्या सोलून त्यातील बिया पुन्हा निसर्गात टाकून द्याव्या, आणि सालीची कुटून पावडर करावी, हि जगातील उत्तम दंतमंजन आहे. हे मी, डॉ महेश गायकवाड १०० टक्के सांगतो कि, आपले दात कधीही कीडनार नाहीत शिवाय किडले असतील तरी सुद्धा बरे होतील. कीडनियंत्रण होऊन दात मजबूत होतील, हे नक्कीच.. अनेकजन तर हि शेंगाची पावडर कोमट पाण्यात टाकून पितात, शक्तिवर्धक आहे, त्यामुळे हाडे बळकट होतात. साधी बोर मोठ्या प्रमाणात खाल्ली तर पोटातील आजार कायमचे बरे होतात. आजही भोगी म्हणजे मकरसंक्रांतीच्या सनात बोर घालून खेगाट केले जाते. लोक खूप आवडीने खातात.
गावातील महिला तर बोरी बाभळीचे काटे आपल्या नाकात व कानात घालून , टोचलेले नाक व कानातील बिळ बुजु नये म्हणून आजही वापरतात. काट्यानेच काटा काढावा अशी म्हण सुद्धा प्रचलित आहे. हो साधी बोर आणि साधी बाभळी ची झाड वाचविणे गरजेचे आहे.
वन्यजीवांसाठी या बाभळी व बोरी अतिशय उपयुक्त आहेत, इथ मी लिहियला सुद्धा कमी पडेल इतकी हि दोन झाड किफायतशीर आहेत. निसर्गात अर्थात अन्नसाखळी मध्ये. माळरानात फिरताना रातकिडा किर्रर्र आवाज काढून आपल लक्ष वेधून घेत असतो. आपण जसजस बाभळी व बोरीचा जवळ जाऊ तसा अचानक आवाज बंद होतो, आपल्याला वाटत आपल्याला रातकिडे घाबरले पन विचार संपतोय तोपर्यंत पुन्हा किर्रर्र आवाज सुरूच. आपण अगदी त्या आवाजाच्या जवळ पोचलेलो असतो मात्र रातकिडा काही केल्याने दिसत नाही. अगदी १० लोकांमध्ये एकालाच दर्शन मिळते. खरतर इतक साधर्म्य असते कि बाभूळ त्याला आपल्या कुशीत लपवत असते कि काय. मात्र त्याचा बाह्य रंग व बाभळीची साल याचं रंगरूप जवळपास एकच झालेले दिसून येत. मोळीकिडा तर आपल्याला लहानपणापासून परिचित असतो. काटे एकत्रित करून गोल करतात मात्र हे कस, हे कोड लवकर सुटत नाही, मात्र हा किडा त्याची आळी अवस्था या गोल काटेरी झुंबरात पूर्ण करतात आणि मग हा कीटक आपले पुढील आयुष्य निसर्गात घालवतो. हा मोळीकिडा फक्त या बाभळीच्या काट्यानेच आपले घर तयार करू शकतो. अनेक कोळीकीटक आपल घर याच बाभळीच्या फांद्यावर बांधतात. आपल सार जीवन याच बाभळीवर पूर्ण करतात. बहुतांश माळरानातील कीटकांची दुनियादारी याच बाभळीवर आपला जीवनक्रम सुरु करतात व शेवटही...
बोरी- बाभळीची फौज : हो, हो, फौजफाटा अहो फक्त मानवाला अक्कल आहे अस आपल्याला वाटतय. मात्र निसर्गात अनेक झाड आपली फौज पाळतात. अनेक कीटकांना बदल्यात अनेक गोष्टी झाडांना मोफत द्याव्या सुद्धा लागतात बर का.
आपण बारकाईने हि झाड पहिली तर दिसेल कि, अनेक मुंग्या- मुंगळे अश्या झाडांवर गस्त घालत फिरत असतात. हि गस्त घालताना अगदी बाभळीच्या बुडक्यातून ते शेंड्यापर्यंत गस्त घालावी लागते. गस्त घालताना झाडवर एखाद्या प्राण्याने जर झाडाला घासायला सुरुवात केली तर हि फौज घासणार्या प्राण्यांच्या अंगावर तुटून पडते, तो प्राणी कितीहि मोठा असला तरी त्याला पळ काढण्याशिवाय पर्याय नसतो. कारण अनेक सैनिक चावे घेत असतात. या बदल्यात झाड त्यांना आपल्या शरिरातील गोडसर स्त्राव खाण्यासाठी देत असतात. मग काय फौज २४ तसं सावधान असते, झाडाच्या प्रत्येक फांदीवर, हे विशेष.
अहो जर अशी फौज वाढली तरी, झाड काळजी करीत नाही. कारण या फोजेला खायला सुद्धा सरडा तयार असतोच. इथ सुद्धा प्रत्येक सरड्याची एक बाभूळ असते, अगदी त्याचा मालकी हक्कच म्हणा कि. कारण प्रत्येक नर सरड्याला एक बाभूळ किंवा बोर नसेल तर मग मिलन करणे अवघड असते. कारण प्रत्येक नराला झाडावरून आपला सुंदर चेहरा जमिनीवरील मादीला दाखवायचा असतो. आणि यासाठी त्याला एक मजबूत घर असावे लागते, म्हणून नर आपल्या बाभळीकडे दुसर्या सरड्याला डोकवू सुद्धा देत नाहीत, हे साम्राज्य युद्ध आहे. मग सरडा जास्त झालेली फौज हळूहळू संपवत असतो. म्हणजे अन्नसाखळी मजबूत होताना आपल्याला दिसून येईल. आपण सहजपणे म्हणतो, काय सरड्यासारखा ताठू नकोस, मरशील लेका. अहो असेच सरडे मादीला आकर्षित करताना रोडजवळ येतात, बाभूळ नसेल तर मग हा संघर्ष जमिनीवर सुरु होतो, एकमेकांना धमकी देण्याचा, आणि मग भरधाव वेगाने आपली वाहन अश्या हजारो मिलनासाठी उस्तुक असणार्या सरड्याना वाहनाखाली चिरडतात. म्हणून परिसरात बाभळी बोरी असणे आवश्यक आहे.
सहजीवन ते पण चिंकारा हरीण व बोरी बाभळीचे.. आता आपण विचार करूयात की बोरी व बाभळी मुळे चिंकारा सारखी हरणे जिवंत आहेत, बर्याच लोकांना याबद्दल माहिती सुद्धा नसेल कि, जर बोरी व बाभळी नसतील तर चिंकारा हरणे सुद्धा जिवंत राहणार नाहीत. त्याच अस आहे कि, हि हरणे ७० टक्के झाडांचा पाला ओरबडून खातात. यात बोरी व बाभळीची पाने ओरबडून खातात, शिवाय शेंगा व बोर सुद्धा मोठ्या प्रमाणात खात असतात. आपण जर माळरानात भटकत असाल तर लगेच लक्षात येईल कि, सर्वच माळरानातील बोरी बाभळीची उंची हि चिंकारा हरणांच्या उंची पेक्षा फुटभर सुद्धा जास्त नसते, यालाच तर खुरटी बाभळीची वने म्हणतात. या भागात बोरी व बाभळी उंचीला खुरट्या असतात, कारण चिंकारा जेवढा उंच तेवढीच बाभळ बोर उंच. अहो उन्हाळ्यात तर चिंकारा बोर खूप आवडीने खातात, मग भराभर बोर खातात, न चावताच, नंतर रवंथ करताना पुन्हा पोटातून गिळलेलि बोर काढून त्यातील गर खाल्ला जातो आणि आटोळ्या एकत्रितपणे साठवल्या जातात, अर्थात त्याचे छोटे छोटे ढीग तयार होतात. याचा वापर पुन्हा खाद्य कमी पडू लागले कि खायला करतात. अश्यावेळी त्या आटोळ्यामधील आतला मऊ गर खातात. तसेच यातील काही आटोळ्याना केसाच्या आकाराचा तडा जातो, आणि अश्या आटोळ्या पावसाळ्यात रुजातात, आणि बोरीची झाडे निर्माण होतात. शिवाय बाभळीच्या शेंगा खाऊन त्यांच्या विष्टेतून खाली पडतात, आणि रुजतात. तसेच बाभळीचा पाला व शेंगा खाताना खाली पडतात त्याही रुजतात. अहो यालाच तर सहजीवन म्हणतात, बाकी काय. आणि उन्हाळ्यात चिंकारा पाणी म्हणून माकडशिंगी सारख्या छोट्या निवडुंग कुळातील वनस्पती खातात, आणि आपली तहान भागवितात. दररोज पाणी पिण्याची चिंकाराना गरज नसते. अगदी ४० दिवसापर्यंत सुद्धा.
आदरणीय मारुती चितमपल्ली यांनी तर बाभळी विषयी खूप माहिती जगाला दिली आहे. माझे गुरु असल्यामुळे तर माझा ( डॉ महेश गायकवाड) लेखच पूर्ण होऊ शकत नाही, कारण चितमपल्ली सर म्हणजे ‘’ असामान्य निसर्ग तज्ञ ’’. बाभळ व बोर यांची बारकाईने निरीक्षणे घेतल्यास लक्षात येईल कि, खालील फांद्यांना काटे खूप टोकदार असतात. कारण स्व स्वरक्षण करणेसाठी अत्यंत महत्वाचे. शिवाय खोडाचा रंग काळसर कारण उष्णतेमुळे जास्त बाष्पीभवन होऊ नये. अहो इथ अंगावर काटे आहेत ते संरक्षण करणेसाठी असे आपल्याला वाटत असेल, मात्र अजूनही बरेच काही यात लपले आहे. काटे अर्थात जल नियोजन, अहो पूर्व इतिहास पाहता, काटेरी वनामध्ये अगदी १० वर्षे सुद्धा सातत्याने दुष्काळ या बोरी बाभळीनि अनुभवला आहे. मग पाण्याचे नियोजन करायचे असल्यास हे काटे मदत करतात. काटे आतून पोकळ असतात, हे काटे रात्री – पहाटेच्यावेळी पडणारे दवबिंदू साठवून सर्व फांद्यांना पुरवितात. त्यामुळे कसल्याही दुष्काळाचा सामना सहजपणे बोरी बाभळी करतात. बोरी ला मोहोर येतो त्यावेळी तर तिच्या भोवती उभे राहण्याची हिम्मत होणार नाही, कारण एक उग्र ऍसिड सारखा वास त्या फुलाभोवती हे झाड निर्माण करते, अगदी एक रसायन तयार करून आपला मोहर सांभाळतात. बाभळीची फुले खूप सुंदर दिसतात, यावर अनेक मधमाश्या आपला मोर्चा वळवितात. बोरीच्या मोहरावर सुद्धा अनेक मधमाश्या व छोटे कीटक आपला मोर्चा वळवितात. बोरी बाभळी वर मधमाश्या मोठ्या प्रमाणात पोळी बांधतात. हे अतिशय महत्वाचे आहे. शेतीच्या दृष्टीने शेतीच्या बांधावर बोरी बाभळी असणे नितांत गरजेचे आहे. हि बाब जर वेळीच आपल्या सर्वांच्या लक्षात येणे गरजेचे आहे. अनेकजण बांधावरील बोरी बाभळी तोडून टाकतात आणि परदेशी झाड लावतात, मात्र असे करणे म्हणजे फक्त मूर्खपणाचा कळस, एवढेच मी म्हणेल. कारण गवताळ भागातील जीवसृष्टीच्या सुरुवातीपासून बोर बाभूळ हि झाड अत्यंत महत्वाची आहेत, हे विसरून चालणार नाही. डाळींब पिक करणार्यांनी तर शेतीच्या परिसरात स्वतच्या प्रति १ एकरात बांधावर अगदी १० बोरी व १० बाभळी झाडे लावली तरच डाळींब करावे नाहीतर काहीच उपयोग होणार नाही. आपल्याकडील छोटी मधमाश्यांची पोळी हि नेहमी अश्या काटेरी झाडांवर पोळी करतात. म्हणून नैसर्गिक झाडे ठेवणे आवश्यक आहे.
पक्षी जगासाठी तर हि बोर व बाभूळ झाड म्हणजे बहुगुणीच. अनेक पक्षी घरटी बांधण्यासाठी बोरी बाभळीचा मोठ्या प्रमाणात उपयोग करतात. अहो सुगरण पक्षी तर आपला खोपा अश्या झाडांवर बांधायला नेहमीच अग्रेसर असते. तिला बोरी बाभळीची झाडे खूप आवडतात, मात्र माणसाला नाही, बर का. सुगरण सर्वाना आवडते मग बाभळ का नको. आपल्या शेतीच्या कडेने पक्षी थांबे करणे नितांत आवश्यक आहे. अन्यथा कीडनियंत्रणासाठी फक्त विषारी रासायनिक औषध वापरली जातील आणि माणूस ही विषारी होऊन मृत्यू कडे वाटचाल करेल. आपल पर्यावरण प्रेम म्हणजे फक्त नाटक असेल तर आजचा कोरोना आजार तरी कुठ वाईट आहे मग. कारण जगात अधिवास नष्ट झाले कि तिथले जीव नष्ट होतात, आणि जिथ जैवविविधता जास्त असते तिथ रोगराई कमी असते. हे आता आपल्याला शिकायला हवे आहे. आज भूतान सारख्या देश्यात फक्त ५ लोकांना कोरोना झालेला असून, हा आजार तिथ जास्त पसरलेला नाही, कारण निसर्ग अर्थात जैवविविधता सर्व जगात जास्त आहे तिथ.
अहो कोतवाल, खाटिक, पावश्या, सातभाई, सूर्यपक्षी, मुनिया, चिमण्या असे नानविध पक्षी या बोरी बाभळी वर घरटी बांधतात. हि घरटी लांबून पाहताना खूप आंनद वाटतो. आता पावश्या ओरडत होता मी लेख लिहताना, अहो त्याच्या आवाजने मी चकित झालो, मला लक्षात आले कि, त्याचे काटेरी घरटे सुद्धा बाभळीच्या झाडावरच असते. हे यात नमूद करावे असे तर वाटले नसेल ना त्याला.
बाभळीच्या झाडावर खारुताई घरटे करीत असते. शिवाय तिला राह्नेसाठी बाभळी आवश्यक आहेत. शिकारी पक्षाकडून तिला बाभळी मुळे संरक्षण मिळत असते.
अहो कोल्हा व खोकड, बोर आणि बाभूळ झाडाखाली विश्राती घेत असतो. शिवाय बोरही मोठ्या प्रमाणात खात असतो. कोल्हा सुद्धा बोरीची झाड लावायला मदत करीत असतो.
सश्याच रिंगण तर बोरीच्या झाडाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, कारण गवताळ भागात ओढ्यालगत पसरी बोराची झाड असतात. अहो उंची फक्त ३ फुट एवढीच असते. ससा या बोरीच्या कडेने वाढणार्या गवतात आपले रिंगण तयार करतात आणि पिल्लांना जन्म देतात. काहीजण तर आजही म्हणतात भारतीय ससा बिळात राहतो. पण लक्षात घ्या कि, भारतीय ससा बिळात राहत नाही. ती बहुतांश बिळे घोरपडीने केलेली असतात. त्यामुळे गवताळ भागात जलसंधारण होते.
भविष्यात आपली पिढी टिकावी वाटत असेल तर स्थानिक पातळीवर जैवविविधता वाचली पाहिजे म्हणजेच दक्खनच्या पठारावर बोरी बाभळी वाचल्या पाहिजेत, नाहीतर विनाशाकडे वाटचाल सुरूच आहे आपली, फक्त कोरोना ने विचार करायला संधी दिली आहे एवढंच....लेख लिहण्याचा मूळ उद्देश आहे की आपल्या परिसरातील साधी बाभूळ व साधी बोरीची झाड वाचली पाहिजेत.
डॉ महेश गायकवाड,
M.Sc. Ph.D. ( Environment Science)
पर्यावरण तज्ञ, बारामti

Address

Solapur
413003

Opening Hours

Monday 8am - 5pm
Tuesday 8am - 5pm
Wednesday 8am - 5pm
Thursday 8am - 5pm
Friday 8am - 5pm
Saturday 7am - 5pm
Sunday 7am - 5pm

Telephone

+91 99201 91501

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yamuna Farms posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Yamuna Farms:

Share