Mahendra Pandit Astro Vastu

Mahendra Pandit Astro Vastu We are more than happy to teach people the subjects like JYOTISH SHASTRA,VAASTU SHASTRA & MANTRA SHA

01/04/2026

प्रारब्धाचे कर्म जन्मकुंडलीत कोणत्या भावातून दिसते?

ज्योतिषशास्त्र सांगते की जीवनात घडणारी प्रत्येक घटना ही योगायोग नसते. प्रत्येक अनुभव, प्रत्येक अडथळा, प्रत्येक यश आणि प्रत्येक प्रतीक्षेमागे आपल्या पूर्वजन्मातील कर्मांची छाप असते. जन्मकुंडली म्हणजे त्या कर्मफळांचा एक सूक्ष्म आरसा आहे. या संदर्भात नवम भावाला विशेष महत्त्व दिले जाते. कारण हा भाव प्रारब्ध, भाग्य, धर्म, संस्कार आणि पूर्वजन्मातील पुण्याई यांचे संकेत देतो.
नवम भाव आपल्याला सांगतो की जीवनात मदत कोणत्या मार्गाने येईल, कोणत्या प्रकारचे गुरु किंवा मार्गदर्शक भेटतील आणि कोणत्या अनुभवांमधून आत्मविकास होईल.

🔸 प्रारब्ध अनुभवणारा कोण?
हे समजून घेण्यासाठी सर्वप्रथम लग्न आणि लग्नेश पाहिले जातात. लग्न जीवनाची दिशा दर्शवते, तर लग्नेश ही ती चेतना आहे जी कर्मांचे फळ अनुभवते. जर लग्नेश शुभ आणि मजबूत स्थितीत असेल, तर व्यक्ती संकटांमध्येही स्थिर राहते आणि परिस्थितीतून शिकते. परंतु लग्नेश दुर्बल किंवा पीडित असेल तर जीवनातील अनुभव अधिक संघर्षमय आणि अंतर्मुख करणारे असतात.

🔸 चंद्राची भूमिका
चंद्र मनाचा कारक ग्रह आहे. प्रारब्ध म्हणजे केवळ बाह्य घटना नव्हे, तर त्या घटनांना मन कशा प्रकारे स्वीकारते हेही तितकेच महत्त्वाचे असते. मजबूत चंद्र मनाला शांतता आणि स्थिरता देतो, तर दुर्बल चंद्र मनाला अस्थिर बनवतो.

🔸 नवम भाव – प्रारब्धाची मौन भाषा
नवम भावात असलेले ग्रह सांगतात की पूर्वजन्मातील कर्मे या जन्मात कोणत्या स्वरूपात फलित होतील.

▪ नवम भावात गुरु
जर गुरु बलवान असेल तर जीवनात योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळते. अशा व्यक्तींच्या जीवनात गुरु, संत किंवा मार्गदर्शक अवश्य भेटतात. त्यांचे भाग्य ज्ञान, धर्म आणि सदाचारातून जागृत होते.

▪ नवम भावात सूर्य
हे दर्शवते की पूर्वजन्मात नेतृत्व, जबाबदारी किंवा धर्मकार्याशी संबंधित कर्म केलेले असतात. अशा व्यक्तींसाठी सन्मान आणि स्वाभिमान अत्यंत महत्त्वाचा असतो.

▪ नवम भावात शनि
शनि नवम भावात असल्यास जीवनात प्रगती थोडी मंद असते, पण स्थिर असते. यश उशिरा मिळते, परंतु टिकाऊ असते. अशा व्यक्ती अनुभवातून गहन जीवनज्ञान मिळवतात.

▪ नवम भावात राहू
राहू नवम भावात असल्यास जीवनाचा मार्ग काहीसा वेगळा असतो. अशा व्यक्तींना परंपरेपेक्षा वेगळ्या मार्गाने चालावे लागते. पूर्वजन्मातील काही अधुरे प्रश्न या जन्मात पूर्ण होण्याचा प्रयत्न करतात.

🔸 नवम भाव शुभ किंवा पाप कर्तरीत असल्यास
जर नवम भाव शुभ ग्रहांच्या कर्तरीत असेल तर जीवनात अदृश्य संरक्षण मिळते. कठीण काळातही कोणीतरी मदतीला येते. परंतु पाप कर्तरी योगात असल्यास व्यक्तीला स्वतःच्या प्रयत्नातून शक्ती विकसित करावी लागते.

🔸 बृहस्पति – प्रारब्धाची गुरुकिल्ली
नवम भावाचा मुख्य कारक ग्रह बृहस्पति आहे. बलवान बृहस्पति व्यक्तीला धर्म, विवेक, मूल्ये आणि आस्था यांच्या मार्गाने पुढे नेतो. दुर्बल बृहस्पति जीवनात योग्य-अयोग्य यातील संतुलन शिकवतो.

🔸 एक छोट जीवनदर्शक उदाहरण
एक व्यक्ती नेहमी विचार करत असे की त्याचा मार्ग इतरांपेक्षा कठीण का आहे. त्याला यश मिळत असे, पण उशिरा. काळाच्या ओघात त्याला समजले की त्याची यात्रा स्पर्धेची नसून परिपक्वतेची आहे. जेव्हा त्याने संयम, आत्मविश्वास आणि कर्मावर विश्वास ठेवायला शिकले, तेव्हा जीवनाने त्याला स्थैर्य दिले.

🔸 अंतिम सत्य
प्रारब्ध हे ओझे नसते. ते आत्म्याच्या विकासाचा मार्ग असतो. जन्मकुंडली आपल्याला भीती दाखवत नाही, तर स्वतःला ओळखण्याची संधी देते. नवम भाव आपल्याला शिकवतो की जीवनातील प्रत्येक अनुभव आपल्या अंतर्मनातील शक्ती जागृत करण्यासाठीच येतो.

🌿 हेच नवम भावाचे खरे तत्त्व आणि प्रारब्धाचे गूढ आहे.

श्री महेंद्र पंडित
9967657121

02/01/2024

*लहान बाळाचे कान टोचणे*

बारशाच्या दिवशीच कान टोचण्याचा प्रघात आहे. कान न टोचलेल्या बालकाचे दर्शन झाले असता पुण्याचा नाश होतो असे मानतात.

बाराव्या अथवा सोळाव्या दिवशी कर्णवेध (कान टोचणे) करावा. (नामकरण संस्कार व कान टोचणे एकाच दिवशी करावे असे कुठेही म्हटलेले नाही.) या दिवशी जर कान टोचता आले नाहीत तर जन्म मासात अगर सहावा, सातवा, आठवा, दहावा, बारावा या महिन्यात कान टोचावे. दुसऱ्या वर्षी कान टोचू नयेत. पहिल्या वर्षी जर कान टोचता आले नाहीत तर जन्मवर्षापासून विषम वर्षी (३-५-७ या वर्षी) कान टोचावे. कन्या अथवा पुत्र यांचा कर्णवेध सम वर्षात करू नये.

तिसऱ्या वर्षापासून पुढे कर्णवेध करणे असल्यास पंचांग शुद्धी पुढीलप्रमाणे असावी.

१) महिने : कार्तिक, पौष, चैत्र व फाल्गुन या महिन्यातील शुक्ल पक्ष घ्यावा. त्यापैकी कार्तिकात शुक्ल द्वादशीनंतर, पौषात मकरेला सूर्य गेल्यानंतर, चैत्रात मेषेला सूर्य गेल्यानंतर असणारे दिवस प्रशस्त होत.

जन्ममास निषिद्ध जाणावा म्हणजे पहिल्या वर्षी कान टोचता आले नाहीत व तिसऱ्या किंवा पाचव्या वर्षी कान टोचावयाचे असतील तर ज्या महिन्यात जन्म झाला तो महिना जरी वर सांगितलेल्या प्रशस्त महिन्यापैकी असला तरी त्या महिन्यात कान टोचू नयेत.

२) तिथी : २, ३, ५, ६, ७, १०, १२, १३ या शुक्ल पक्षाती शुभ तिथी.

३) वार : सोमवार, बुधवार, गुरुवार व शुक्रवार शुभ.

४) नक्षत्रे : पुष्य, पुनर्वसु, मृग, उत्तरा, हस्त, चित्रा, अश्विनी, श्रवण, रेवती, धनिष्ठा ही नक्षत्रे कर्ण वेधाला शुभ.

५) वेळ : वृषभ, मिथुन, मीन, कर्क, कन्या, तुला व धनु ही लग्ने प्रशस्त मानावी. मेष व मकर ही मध्यम, सिंह, वृश्चिक व कुंभ ही लग्ने अधम म्हणून वर्ज्य करावी. लग्नकुंडलीत अष्टमस्थानी एकही ग्रह नसावा व इतर ग्रहशुद्धी असावी

*साडेतीन मुहूर्त :*
चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा), वैशाख शुद्ध तृतीया (अक्षय्यतृतीया) आणि आश्विन शुद्ध दशमी (विजयादशमी) हे तीन मुहूर्त व कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त आहे. असे साडेतीन मुहूर्त 'स्वयंभू' म्हणून प्रसिद्ध आहेत. या दिवशी कोणत्याही कार्यास पंचांगशुद्धी वगैरे पाहण्याचे कारण नाही.

संकलन
श्री महेंद्र पंडित
9967657121

11/04/2022

अग्निहोत्र

प्रसंग 1:
भोपाळमध्ये गॅस दुर्घटना झाली. प्रचंड लोक मृत्युमुखी पडले. अनेक घरे उद्ध्वस्त झाली. पण काही घरे अशी होती ज्यांच्या आजूबाजूला प्रचंड मनुष्यहानी झालेली होती पण त्या घरांना धक्का देखील लागलेला नव्हता. ना त्या घरातील लोकांना त्रास झाला.

या घटनेनंतर लवकरच
प्रणग 2:
रशियामधील चरनोबिल येथे अनुभट्टी चा स्फोट झाला व त्याचे रेडिएशन अगदी पोलांड पर्यंत येऊन पोहोचले. परंतु पोलंडमध्ये काही अत्यंत छोटी गावे अशी सापडली ज्यामध्ये आश्चर्यकारकरीत्या कोणत्याही किरणोत्सर्गाचा टच देखील झालेला नव्हता. ना तेथील गवतामध्ये किरणोत्सर्ग आढळून आले शेतामध्ये ना पशूंमध्ये.

वरील दोन्ही घटनांमध्ये जी घरे नित्यनेमाने अग्निहोत्र करीत होते त्यांची घरे या हल्ल्यापासून वाचलेली होती. हो, पोलंडमध्ये देखील त्या गावांमध्ये काही घरांमध्ये नियमित अग्निहोत्र चालू होते.

या घटनेनंतर काही काळाने रशियाचे लष्कर प्रमुख भारतात आले होते. ज्यांनी स्वतः पंधरा दिवस अग्निहोत्र कसे करायचे याबद्दल प्रशिक्षण घेतले. त्यानंतर रशिया व जर्मनीमध्ये अग्निहोत्र या गोष्टीबाबत प्रचंड संशोधन झाले आहे.

अत्यंत जालीम परंतु आपल्याच देशात उपेक्षित असलेला सर्वश्रेष्ठ उपाय. आपल्याकडे लगेच सेक्युलर समजले जाणारे लोक धावून येतील हे सर्व थोतांड आहे. कारण भारताची संस्कृती इतकी महान होती हे मुळात त्यांना मान्य होत नाही. परंतु गेल्या दोन आठवड्यांमध्ये अग्निहोत्र या गोष्टीचे पेटंट भारतातील शास्त्रज्ञाने घेतलेले आहे. श्रीयुत प्रमोद मोघे हे एन सी एल या भारतातील एका नामवंत रासायनिक संस्थेमधील निवृत्त शास्त्रज्ञ आहेत ज्यांनी हे पेटंट मिळवले आहे.

तर काय आहे अग्निहोत्र?
प्रचंड मोठा विषय आहे हा परंतु तुम्ही थोडक्यात सांगायचा प्रयत्न करेन.
यामध्ये ज्या काही गोष्टी पाळायचे असतात त्या खालील प्रमाणे

1. Exact सूर्योदय व सूर्यास्ताच्या टाइमिंग. ज्यामध्ये अर्ध्या मिनिटाचा देखील फरक पडून न देणे गरजेचे आहे.

2. तांब्याचे पिरॅमिड सारखे असलेले पात्र. ( खरे सोन्याचे पात्र वेदांमध्ये सांगितलेले आहे. परंतु ते शक्य नसण्याने आणि तांबे या धातूच्या बऱ्याच गुणधर्म हे सोन्यासारखे असतात त्यामुळे तांबे)

3. देशी गाईच्या शेणाच्या गोवऱ्या व देशी गाईचे तूप.

4. पॉलिश न केलेले तांदूळ.

कृती:

1. सूर्योदयाची एक्झॅक्ट वेळ बघणे व त्या आधी पाच ते दहा मिनिटे घरांमध्ये कोणत्याही ठिकाणी तांब्याचा पिर्यामिड ठेवणे. त्यामध्ये शेण्या आणि थोडे गाईचे तूप टाकून अग्नी प्रज्वलित करणे.

2. पॉलिश न केलेले तांदूळ 2 चिमुट घेणे. त्याचे दोन भाग करणे त्यात गाईचे तूप टाकणे.

3. एक्झॅक्ट सूर्योदयाची वेळ झाली त्यानंतर दोन मंत्र आहेत एकेका ओळीचे ते म्हणून दोन वेळा ते गाईच्या तुपमधील तांदूळ अग्निला वाहणे.

सकाळच्या वेळी म्हणजे सूर्योदयाच्या वेलिनासलेला मंत्र
सूर्याय स्वाहा l ( स्वाहा म्हणून झाल्यावर तांदूळ अग्निला वाहणे)
सूर्याय इदं न मम l

प्रजपतये स्वाहा l( स्वाहा म्हणून झाल्यावर तांदूळ अग्निला वाहणे)
प्रजापतये इदम् न मम l

बास झालं काम.
यानंतर साधारण दहा मिनिटे नुसते अग्नी समोर बसले तरी चालते कारण त्या अग्नी पासून तयार होणाऱ्या गोष्टी आजूबाजूला सर्वकाही परिषद शुद्ध व स्वच्छ करणारे असतात.

आता या पासून काय होत असेल बरे असा प्रश्न बऱ्याच जणांच्या डोक्यात येईल.
तर याच या संशोधनात असे नजरेत आले आहे की मुळात तांबे, अग्नी, देशी गाईचे तूप, गायीच्या गोवऱ्या, तांदूळ हे सर्व मिळून 32 प्रकारची मूलद्रव्ये आहेत. परंतु या पासून जे राखी तयार होते तिच्या मात्र 92 मूलद्रव्ये आढळतात. हे प्रचंड आश्चर्य कारक आहे व या मागचे कारण कोणालाही माहीत नाही. म्हणजे जवळपास 70 मूलद्रव्ये कशी काय वाढतात याचे ज्ञान अजूनही विज्ञानाला झालेले नाही.

या पासून तयार झालेली राग अनेक प्रकारच्या पाण्यात टाकून बघण्यात आली आहे व त्याचे आश्चर्यकारक इफेक्ट दिसून आले आहे. पाणी जवळपास पूर्णतः शुद्ध होते. मायक्रो ऑरगॅनिझम या गोष्टीला ही राख पूर्ण मारून टाकते. त्यामुळे पाण्यातील सर्वसाधारण सर्व जीवजंतू मरतात. एका घरामध्ये या प्रकारे केलेले रोजच्या अग्निहोत्रा मुळे आजूबाजूला जवळपास दहा ते पंधरा घरांपर्यंत त्याचा इफेक्ट पोहोचतो. हवेचे नैसर्गिक शुद्धीकरण होते.

आता काही गोष्ट जाळल्यामुळे खरेतर कार्बन डायऑक्साइड व कार्बन मोनॉक्साईड या गोष्टी निर्माण झाल्या पाहिजेत असे देखील काहींचे म्हणणे असेल. परंतु पहिली दहा मिनिटे यामध्ये कार्बन डायऑक्साइड व कार्बन मोनॉक्साईड हे तयार होत असतात परंतु दहा मिनिटानंतर पूर्ण चित्र पालटून जाते. त्यामुळे अग्नी प्रज्वलित केल्यानंतर खरा इफेक्ट दहा मिनिटानंतर चालू होतो जो आपल्या शरीरावर आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर त्याचप्रमाणे प्राणी पक्षी झाडे या सर्वांवर व्हायला सुरुवात होतो. यामध्ये धूर होऊ द्यायचा नाही तर प्रखर अग्नीने जळत राहिला पाहिजे याची दक्षता घ्यायची. त्याप्रमाणे आधीच गोवर यांचे तुकडे लावून ठेवायचे जेणेकरून आत मधून हवा व्यवस्थित खेळती राहील. एकदा तांदूळ वाहून झाले की त्यानंतर जे जळत आहे त्या पद्धतीने जळत राहून द्यायचे आहेत त्यात हस्तक्षेप करायचा नाही. पूर्णपणे जळून देणे महत्त्वाचे असते स्वतःहून विझवायचे नाही.

तयार झालेली राख काचेच्या भांड्यात किंवा तांब्याच्या भांड्यात ठेवावे प्लास्टिक मध्ये ठेवू नये. रोजच्या जेवणात व पाण्यात ही राख चिमूटभर टाकल्याने त्याचे प्रचंड चांगले इफेक्ट दिसून येतात. त्याचप्रमाणे कुंडलीतील झाडांना वगैरे देखील टाकावे कारण जास्तीची राख जमा झालेली असते. खूपच जास्त राख साठली तर ती नदी किंवा जलाशयात सोडावी. त्याने नदीचे व जलाशयाचे पाणी देखील काही प्रमाणात स्वच्छ होण्यास मदत होते.

अग्निहोत्रा च्या धर्तीवर जर्मनी पोलंड या ठिकाणी शेतीदेखील केली जाते. यामध्ये कोणत्याही प्रकारचे कीटक नाशक वापरावे लागत नाही. आपल्या भारतातच आपल्या या अत्यंत उच्च संस्कारा बाबत माहिती खूप कमी आहे. यु ट्यूब वरती किंवा गूगल वरती सर्च करून बघा तुम्हाला आढळून येईल की आपल्यापेक्षा बाहेरच्या देशात याबद्दल किती जास्त जागरूकता आहे.
तर अग्निहोत्रा मुळे होणारे फायदे कोणकोणते आहेत?
1. आपल्या आजूबाजूच्या हवेची शुद्ध होण्यास मदत होते
2. सूर्योदय व सूर्यास्त या वेळा प्रचंड महत्त्वाच्या आहेत ज्यामध्ये एकूणच निसर्गामध्ये एका प्रकारे मोठा बदल होत असतो. बरोबर सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळेला आपल्या इडा व पिंगला नाडी या बॅलन्स असतात व त्या वेळेला सुषुम्ना ही आध्यात्मिक प्रगतीसाठी सर्वात महत्वाची मानलेली असते ती जागृत अवस्थेमध्ये असते काही काळासाठी. त्यामुळे अग्निहोत्र मुळे एकंदरीतच अशा वेळेला आपल्या भोवती असलेला ऑरा शक्तिशाली बनतो. आपले चक्रे म्हणजेच शरीरामधील चक्रांच्या जागा आहेत त्यांना यातून प्रचंड एनर्जी मिळते व एकंदरीतच शरीर आणि मन या दोन्ही गोष्टी ताकदवान होण्यास मदत मिळते.
3. आजूबाजूचे जीवजंतू व प्रदूषण कमी होण्यास याची मदत होते.
4. घरामधील वातावरण प्रचंड निरोगी व उत्साहवर्धक आणि पॉझिटिव्ह बनते.
5. याच्या राखेचे गुणधर्म तर वर सांगितलेले आहेतच.
6. अनेक असाध्य रोगांसाठी अत्यंत नॅचरल गुणधर्म देणारी गोष्ट आहे अग्निहोत्र मध्ये.

अजून माहितीसाठी गुगल किंवा युट्युब वर तुम्ही सर्च करू शकता व तुम्हाला याबद्दल प्रचंड माहिती मिळेल सायंटिफिक दृष्ट्या देखील.

केवळ 10 ते 15 मिनिटे लागतात या गोष्टीला. करून तर बघूया. रोजचा सकाळ संध्याकाळ 15 मिनिट देऊ शकतो की आपण. 21 दिवस रोज करून बघू. फायदा झाला तर फक्त आपल्याला नाही तर सर्व राज्याला देशाला एकत्रित फायदाच होईल.

नमस्कार श्री महेंद्र पंडित सरांचा *संपूर्ण वास्तुशात्र या विषयावर मोफत वेबिनार* यशस्वी आनंदी जीवनाची वास्तू रहस्यं वेबिन...
30/03/2022

नमस्कार

श्री महेंद्र पंडित सरांचा
*संपूर्ण वास्तुशात्र या विषयावर मोफत वेबिनार*
यशस्वी आनंदी जीवनाची वास्तू रहस्यं

वेबिनार
दिनांक - १ एप्रिल २०२२
वेळ - रात्री ८ वाजता

ऑनलाईन झूम वर

वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवरून रजिस्टर करा

https://mahendrapandit.knorish.com/page/vastu-programming-gq789z?edit=true

26/03/2022

जन्मलग्न कुंडलीतील भावेश आणि भावाचा उपनक्षत्रस्वामी हे भावातील घटनांना परिणाम देत
असतात म्हणून भावेशाचा आणि भावाच्या उपनक्षत्रस्वामीचा खालील ४ गुणांच्या आधारे बलवत्तेचा विचार जरूर करावा ,मात्र हा विचार करताना कुंडलीच्या नवतारा चक्राच्या नक्षत्रांना विचाराधीन ठेवावे

नवतारा चक्राप्रमाणे
३-१२ -२१ वे नक्षत्र विपत (अशुभ)
५-१४ -२३ वे नक्षत्र प्रत्यर (अशुभ )
७-१६ -२५ वे नक्षत्र वध (अशुभ )
बाकी सर्व नक्षत्रे शुभ असतात

भावेशाचे आणि उपनक्षत्र स्वामींची भावाची फळ
देण्याची क्षमता तपासण्यासाठी खालील प्रकारे
गुणांकन करावे लागते

ग्रह -२५ टक्के
राशी - २५ टक्के
नक्षत्र - २५ टक्के
नक्षत्र चरण -२५ टक्के

या प्रकारे गुणांकन केल्यास भावाचे फळ ग्रह किती
देईल? याबाबत निश्चितता सहज मिळते

धन्यवाद
श्री महेंद्र पंडित
9967657121

26/03/2022

पितृदोषाविषयी माहिती

सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च |
पतन्ति पितरो ह्यषां लुप्तपिण्डोदकक्रियाः || ( भगद्भागवद्गीता)

ज्या ज्या परिवारात पिण्ड प्रदान व तर्पण विधी म्हणजे श्राद्ध विधी लुप्त होतात त्या मुळे त्या कुळाचा नाश होतो
नम:पितृभ्य:प्रेतेभ्यो नमो धर्माय विष्णवे |
नमो यमाय रुद्राय कान्तारपतये नम: ॥

पितरांना नमस्कार असो प्रेतांना नमस्कार असो धर्मस्वरूप विष्णुला नमस्कार असो यमराजाला नमस्कार असो सर्व परिस्थितीत सदैव रक्षा करणाऱ्या रुद्र देवाला नमस्कार असो

यस्य जन्म सहस्त्राणां पुण्यं भवति संचितम्|
तस्यैव त्र्यंबके गन्तुं बुध्दिर्भवति नान्यथा ॥

ज्यांचा सहस्त्रावधी जन्मांचा पुण्य संचय झाला आहे त्यांनाच त्र्यंबकेश्र्वर क्षेत्री येण्याची बुध्दी होते अन्यथा नाही.

आजकाल बहूतांशी लोकांच्या पत्रिकेत पितृदोष असतो. याला कारण घरात होणाऱ्या श्राद्ध कर्माचा लोप हे आहे . गरूड पुराणा नुसार , अंत्यकर्मा नंतर करावयाचा विधी हा सर्वांना एकसारखाच असतो. तो म्हणजे दहनापासून दहावे दिनी दशक्रिया विधी , नंतर ११ वा व १२ वा करतात आजकल वेगवेगळा न करता एकाच दिवशी करतात , या बाराव्यात सपींडी म्हणून विधी असतो जो हल्ली केलाच जात नाही. यावर उत्तर मिळते आमच्यात करत नाही .परंतू या वेळी कोणताही भेद न करता सर्व वर्णांना एकाच प्रकारचे विधी शास्त्रात दिले आहेत.या नंतर करतात तेरावा व चौदावा नंतर उदकशांती करून वर्षभराने प्रथमाब्दिक करतात. या वेळीही अब्दपूर्ती व प्रथमाब्दिक अशी दोन श्राद्धे करावयाची असतात जी कोणी हल्ली करतात कोणी करीत नाहीत.तसेच घरात कोणी पुर्वी बाहेर गेला तिर्थ यात्रेस गेला तर तो परत येईलच याची शाश्वती नसायची व तो तिकडे जिवंत आहे वा मृत याचाही पत्ता नसायचा ! अशावेळी बारा वर्षे वाट पाहून तो मृत आहे असे समजून पळसाच्या काड्यांचा पुतळा बनवून त्याचे दहन करून मग पुढील विधी करावे असे शास्त्र सांगते ( पालाश किंवा पर्णशर विधी) . परंतु हे कोणी पूर्वी केले होते वा नाही हे समजण्यास मार्गच नसतो कारण , पिढ्या विभक्त झाल्या व वृद्ध लोक जे मार्गदर्शक असतात त्यांना हवा तसा सन्मान दिला जात नाही.

तर वरील सर्व गोष्टी पितृदोषास कारणी भूत ठरतात. आता आपण अंत्य संस्कार विधी जाणून घेऊन व नंतर क्रमाने पितरांचा त्रास नेमका कसा ओळखावा व त्यावरील उपाय काय ते जाणून घेऊ.

मनुष्य मृत झाला की सर्व संपले असा अनेकांचा समज असतो . परंतू मेल्यावरही वासना न संपल्याने ती व्यक्ती अतीसूक्ष्म देहाने ती वासना पूर्ण होईल यासाठी झटत असते . देह जो प्रत्यक्ष दिसतो तो यानंतर कारण देह , महाकारण देह व सूक्ष्मदेह या रूपात ती व्यक्ती असते यातील सूक्ष्म देह तो पुढील मार्गक्रमणेस निघतो परंतु जोवर और्ध्वदैहीक होत नाही तोवर कारण व महाकारण देह तिष्ठत रहातात . आपण म्हणतो की कणखर मनाने केलेला संकल्प वातावरणात मिसळून तो पूर्णत्वासच जातो अगदी याच प्रमाणे जाणाऱ्या जिवाच्या जर इच्छा खूपच बाकी असतील व संसारात जिव गुंतला असेल तर मृत्यूच्या समयाय ईश्वर मनात न येता पाळीव प्राणी , आवडत्या व्यक्ती , जेवण बाकी असेल तर जेवण असे दिसत रहाते व तेच चिंतन करत ती व्यक्ती मृत होते .मनूष्य गेला तरी त्याचे डोळे चार तास , किडन्या चार तास , त्वचा वगैरे जिवंत असतात इतकेच काय तर चक्क रक्त प्रवाहही दोन तास सुरू असतो यातच वासना काय ते लक्षात घ्या तर अश्या या वासनांची पूर्ती करण्यासाठी लागलेली तगमग त्या जीवास मुक्ती मिळू देत नाही व ती सतत घरातील व्यक्तींस येनकेन प्रकारे अडचणी उत्पन्न करत असते अगदी तशीच जसे एखाद्या संकटातून एखादे पूण्य आपली सुटका करते तसेच ख्रीस्ती बांधव,पारशी लोक,इस्लामीक लोक इत्यादी लोकही पितृ कार्य करतात फक्त त्यांची पद्धत वेगळी असते .ख्रीस्ती बांधव हे मृताच्या कबरीवर फुले , वाईन , केक ठेवतात व त्याच्या स्मृतीसाठी वाटतातही .
अगदि प्राणीही आपल्या पूर्वजांस वंदन करतात . यात हत्ती हा प्राणी अत्यंत पुढे आहे . हा हत्तीचा कळप एका मादीच्या नेतृत्वाखाली अन्न व पाणी यांच्या शोधात स्थलांतर करीत असतो . वाटेत अनेक बांधव ( हत्तींचे ) मृत होतात . अशावेळी तेथे थांबून घोळक्याने श्रद्धांजली वाहून पुढे निघतात यावेळी गेलेला हत्ती ज्याच्या जवळचा असतो तो जरा रेंगाळतो परंतू त्याला काहीजण आधार देऊन बाहेर आणतात . हा प्रकार इथेच थांबत नाही तर ज्या तारखेस तो हत्ती/हत्तीण गेला होता त्याच दिवशी आठवणीने त्याच जागी सर्व कळप त्या मृतास मानवंदना देण्यास उपस्थित रहातो . यावेळी मृताच्या अस्थी तेथे असतात . कळपातील प्रत्येक सदस्य त्या उचलून आपल्या कपाळी लावतात . तेथे जरावेळ थांबतात व पुन्हा आपल्या मार्गाने जातात .

( हे_सर्व संशोधकांनी_सिद्ध_केले_आहे ज्यावर डीस्कव्हरी या चॅनेलवर कार्यक्रम प्रदर्शीत केला गेला होता ) यावेळी कळपातील सदस्य काही खाण्याच्या वस्तूही नेतात ज्या त्या अस्थींजवळ अर्पीत करतात.या सर्वात मानव अत्यंत प्रगत म्हणून त्याने आपल्या पूर्वजांस श्रद्धांजली देणे किती गरजेचे असते ते पहा.
आपण पिंडदानच का व दहावा बारावा म्हणजे नेमके काय ते पाहूत .

प्रथम दिनी गेलेल्या व्यक्तीचा दाह संस्कार होतो यावेळी मृतस्थानी , द्वारस्थानी , विश्रांती स्थानी काष्ठ रचनेवेळी आणि चौकात पिंड देतात यामुळे भुमीवरील , गृहवास्तु , प्रेतास वाईट शक्तींनी अपवित्र करूनये यासाठी केले जाते . पुढे नवद्वारांवर पिंड ढेवून क्रव्याद नावाच्या मांस भक्षक अग्निस आवाहन करून बोलावले जाते . स्मशानात पिंडदान करताना प्रेतसखा म्हणजे त्या मृतात्य्माचे मृत स्नेही त्यासाठीही पिंडदान केले जाते .

नंतर प्रत्येक दिवशी स्मशानात जाऊन दहा दिवसांपर्यं पिंड द्यावेत . नंतर दहाव्या दिवशी दशक्रिया विधी होते . जर दररोज पिंडदान केले असेल तर दहाव्या दिनी केवळ एक पिंड देऊन काक बली द्यावा लागतो अन्यथा एकाचवेळी दशपिंड द्यावे लागतात . ही दशक्रिया विधीची संकल्पना मानवी जन्मावर अधारीत आहे . जसे प्रथम मातेच्या गर्भात छोटासा पिंडच असतो तशीच कल्पना करून पहिला पिंड देतात . यात सम व विषम श्राद्ध अशी संकल्पना असते . विषमदिनी अवयव पिंडही देतात . पहिला पिंड मस्तक , दुसरा पिंड कान , नेत्र , आणि नाक , तीसरा पिंड गळा , खांदे , भुजा व वक्ष:स्थल , चौथा पिंड नाभी , लिंग /योनि व गुदा , पाचवा पिंड जानु , जंघा , पाय , सहावा पिंड सगळी मर्म स्थाने , सातवा पिंड सगळ्या नाड्या , आठवा पिंड दात केस वगैरे , नववा पिंड विर्य व रज , दहावा पिंड संपूर्ण शरीर . अगदी हेच आईच्या पोटातही घडत असते व दहाव्या महिन्यात बाळाचा जन्म होतो . याच संकल्पनेवर देह जळाला मग पुढे गर्भात जाताना त्या जिवास सगळे शरीर अवयव मिळावे हि संकल्पना असते . त्यामुळे दहावा हा दहाव्या दिवशीच करावा . तीसऱ्या , पाचव्या दिवशी नाही कारण यात वेळ किंवा कोणी नातेवाईक यावेत म्हणून दिला जाणारा ही वेळ नाही . पाच बोळकी घेऊन त्यावर पाच पिंड सोबत पाच काड्यांवर पिवळ वस्त्र जे ध्वजे सारखे दिसते ते असते छत्री म्हणून . पाच पोळी पादूका जोड वगैरे असतात . पाच पिंड पहिला गेलेल्या व्यक्तीचा , दुसरा प्रेतसखा , तीसरा वैवस्वत यम , चौथा वायस म्हणजे कावळा व पाचवा प्रेताधिपती रूद्राच्या नावे द्यावा . यानंतर वायसबली म्हणजे कावळा शिवणे होते . व कावळा शिवला नाही तर दर्भाचा कावळा करतात . यात दर्भ , काळे तीळ , जव व पांढरी फुले , माका , तुलसीपत्र अत्यंत महत्वाचे असते .

अकरावे दिनी सर्व घरातील कपडे वगैरे स्वच्छता केली जाते . यानंतर पंचगव्य वगैरे प्राशन करून विष्णु पुजन, विष्णु तर्पण , विष्णु बलि विधि केला जातो वृषोत्सर्ग पुर्वी करीत असत . याच दिवशी महिकोद्दिष्ट ( म्हणजे फक्त एकास उद्देशून केलेले ) श्राद्ध केले जाते . यापाठोपाठ रूद्रगण श्राद्ध , वसुगण श्राद्ध व यानंतर मासिक श्राद्ध केले जाते . यावेळी दशदाने करून समाप्ती केली जाते .बारावे दिवशी सपिंडी श्राद्ध केले जाते . यात चार पिंड बनवून त्यातील गेलेल्या व्यक्तीच्या नावाच्या पिंडाचे तीन भाग करून बाकीच्या तीन पिंडात मिसळले जातात . चार पिंडात पहिला पिंड मृत व्यक्तीचा , दुसरा पिंड प्रेताचे वडिल , तीसरा आजोबा , व चौथा पणजोबांचा असतो . यातील पहिल्या पिंडाचे तीन भाग उरलेल्या तीन पिंडात मिसळल्यावर गत व्यक्ती पितृलोकी जाते व पणजोबांस मुक्ती मिळते . हा विधी केल्या शिवाय सुतकातून सुटकाच होत नाही व पुढे कोणतेही शुभ कर्म करू शकत नाहीत हा नियम सर्व वर्णांस लागू आहे . नंतर पाथेय श्राद्ध करून विधी संपतो .

तेरावे दिनी प्रथम निधनशांती करतात . यात गणेशपुजन पुण्याहवाचन रूद्र पुजन करतात व विप्रांकडून विविध सुक्ताचे पठण करतात . नंतर सुतकात गंध , कुंकू वगैरे लावलेले नसते ते लावून घरातील देवपूजा केली जाते . या विधीसाठी चार गुरूजी लागतात . यात उंबऱ्यावर सुपारी फोडली जाते .यानंतर तेराव्याचे श्राद्ध केले जाते . यासोबतच शुद्ध सोळा मासिक श्राद्धे केली जातात . यात तेरा ब्राह्मण भोजनास सांगतात . परंतू अभावी किमान पाच म्हणजे दोन देवा कडील व तीन पितरांचे असे भाेजन करतात . यास मासिक निवृत्ती असेही म्हणतात . आलेल्या गुरूजींस व चालवणाऱ्या गुरूजींस दशदाने पददानादी सह उदककुंभ व दक्षिणा दिली जाते . दुपारी आहेर करून यजमानांचे मामा यजमानास मारूतीच्या मंदिरात नेतात . तेथे नवीन निरांजनात दिवा लावून नमन करून बाहेर पडताना देवळाची घंटी वाजवतात . यादिवसापासून रोजची कर्मे करण्यास सुरूवात केली जाते . जर कोणाचा विवाह ठरला असेल तरच तो विनायक शांती करून करावा अन्यथा पुढे तीन वर्षे विवाह करता येत नाही हा समज अत्यंत चुकीचा आहे त्यामुळे असे करू नये .

तेरावे आटोपल्यावर चौदावे दिवशी वातावरण शुद्धी साठी उदकशांती नावाचा विधी करतात . उदकशांती अर्थात जलाची शुद्धी असा सरळ अर्थ होतो परंतु प्रत्यक्षात जर पाहीले तर जल हे अत्यंत पवित्र मानून त्याद्वारे समंत्रक केलेली पंचतत्वांची शुद्धी म्हणजे उदकशांती होय . जर आपण मृत झालेल्या व्यक्तीच्या घरात गेलात तर सहज लक्षात येते की तिथे संपूर्ण भागात उदासी पसरली आहे . मग अशावेळी हे शोकमग्न वातावरण सारून पुढे चालणे व दैनंदिन कामे करणे ही निकड असते . यासाठी ही उदकशांती करतात .काही लोकांचा गैरसमज असतो की उदकशांती हा विधी फक्त यावेळीच केला जातो परंतु , तसे नसून हा विधी घरातील कलह , आजारपण , काही विशीष्ट होणारे त्रास , सतत मानसिक तणाव व त्यामुळे सर्व घर डीस्ट्रब होऊन सतत भांडणे , नुकसान व याने झालेली पंचतत्वांची हानी भरून काढण्यासाठीही हा विधी दर सहा महिन्याने आपल्या घरी करावा असे शास्त्र सांगते . तसेच नारायणबली , व नागबली करून आल्यावरही काही लोक ही उदकशांती करतात . स्थानिक गुरूजी ज्यांनी नारायण बली केलेला असतो ते याबद्दल कल्पना देतात किंवा ज्या गुरूजींनी हा विधी करण्यास पाठवले ते याबद्दल सांगून हा विधी करवून घेतात .या विधीत चार गुरूजी असतात . प्रथम गणेशपुजन व पंचवाक्यीय पुण्याहवाचन करून मग एका नवीन कलशास धुपवून त्यात पाणी घातले जाते . येथे हवन करीत आहोत अशी संकल्पना करून हवनाचे वेळी हवनपात्रासाठी करण्याचे स्थंडील कर्म करतात . नंतर चारही दिशेस दर्भ मांडून ब्रह्मदेवांचे पूजन केलेल्या कलशावर शंभर ते हजार अश्या प्रकारे दर्भाचे अच्छादन करतात . हे अच्छादन एखाद्या झोपडी सारखे दिसते .

चारही दिशांस बसून चारही गुरूजी चतुर्वेदातील ऋचांचे स्वर व सुरात पठण करतात . नंतर यजमानासह सर्व कुटूंबीयावर आंब्याच्या डहाळीने ब्रह्मकलशातील पाण्याने गुरूजी अभिषेक करतात ! यानंतर दहीभाताचा नैवेद्य दाखवून विसर्जन होते . मग यजमानास आशिर्वाद मंत्राने नारळ देऊन तो नारळ यजमानांनी पत्नीच्या ओटीत द्यायचा असतो व या नारळाचे गोड पदार्थच बनवतात .

मागे दिलेले चौदावे पर्यंतचे विधी यथासांग पार पडले की मग येते ऊनाब्दीक श्राद्ध .व आब्दिक म्हणजे त्यादिवशी वर्षपूर्ती झाली त्याचे श्राद्ध ! जसे रेल्वेच्या पासवर सत्तावीस तारखेचा पास सव्वीसला संपते त्यानुसार ज्या तिथिस मृत्यू झाला त्याची आदली तिथि ही उनाब्दिकसाठी घेतात . उदा. मृत्यू माघ कृष्ण दशमी असेल तर पुढील वर्षी माघ कृष्ण नवमीस अब्दपूर्ति व दशमीस प्रथमाब्दिक म्हणजे पहिले वर्ष श्राद्ध होय . हे खरे तर कायम करावे असे शास्त्र सांगते परंतू किमान पहिले तीन वर्ष तरी पिंडदाना सह गुरूजी बोलावून करावे .

आपण जी दीपावली करतो ती देखील पितरांसाठीच असते.नुकतेच महालय व पितृपंधरवडा आटोपलेला असतो.यानंतर कोजागीरीस आकाश दीपदान करतात अर्थात आकाश कंदील लावतात.मग सुरू होते दीपावलीची धामधूम.यात पितरांस आम्ही खूप सुखी आहोत हे दाखवणे हा हेतू असतो.याचवेळी दक्षिणेकडे दीपदान करतात यमतर्पण करतात

आता आपण वळूयात मूळ विषयाकडे पितृदोष वरील सर्व कर्मे करताना यत्किंचीतही तृटी चालत नाही जसे पुजेत एखादी वस्तू नसेल तर एेवजी अक्षता वाहतात तसे इथे चालत नाही . त्यामुळे वा गुरूजींनी दिलेली माहिती नीट न समजणे , कधी कधी गुरूजी जे सांगतात ते व घरातील काही मंडळी हे आमच्यात नसते म्हणतात त्यामुळे तो विधी केलाच जात नाही याने पत्रिकेत पितृदोष येत असतो . हे अनेक पिढ्या मागे चालत आलेले असते . जसा एखादा आजार एकदम उद्भवत नाही त्याची लक्षणे आधी दिसतात व नंतर तो आजार जोर करतो अगदी तसेच हे असते !

१ ) घरातील कर्ता पुरूष अचानक मृत्यू पावणे .
२ ) घरातील तरूण मुलाचा अचानक काहीही न घडता साध्या कोणत्याही कारणाने अचानक मृत्यू होणे .
३ ) ऐन जेवणाचे वेळी घरात भांडणे होणे व त्यामुळे अन्न वाया जाणे .
४ ) घरात चांगली केलेली पुण्यकृत्ये लागू न पडणे व आणखी वाईट होणे त्यामूळे श्रद्धा डळमळीत होणे .
५ ) दोन सख्ये असलेले भाऊ (लग्नांनंतरही सख्य कायम ) अचानक वितूष्ट येऊन वेगळे होणे व अगदी हा मरावा इतका द्वेष वाढणे .
६ ) दोन भाऊ असता एकाचे खूप चांगले होणे व दुसरा अगदी दरीद्री बनणे व योग्य असूनही नोकरी , विवाहात नाकारले जाणे .
७ ) घरात अनेक जण किंवा काही जण अविवाहित असणे व घराण्यात संतती नसणे .
८ ) पैसा योग्य कारणासाठी खर्च न होता तो अचानक उद्भवलेल्या आजारपण अॅक्सीडेंन्ट यावर खर्च होणे व कर्ज काढावे लागणे .
९ ) विविध प्रकारची भितीदायक स्वप्ने पडणे ज्यात घरातील वडिलमंडळी खायला मागत आहेत असे दिसणे .
१० ) तिर्थयात्रा , तेथे केलेली श्राद्धे लागू न पडणे .
११) घरात पुरेसे अन्नधान्य भरूनही ते न पुरणे वा बनवलेले वाया जाणे . ( हे अन्न बाहेर टाकल्यावर कोणताही प्राणी खात नाही ).
१२) घरात काही देवाचे कार्य वा शुभकार्य ठरले की नेमक्या अडचणी उभ्या रहाणे वा ऐनवेळी भांडणे होणे व केलेल्या कार्याचे समाधान साध्य न होणे .
१३) घराण्यात कुटूंब विभक्त होणे व होणारी कार्ये बंद पडणे .
१४) घरात वडिलधारी मंडळी काहीही मार्गदर्शन करण्यासाठी शिल्लक न रहाणे .
१५) हाती घेतलेले काम यशस्वीरीत्या सुरू होणे पण मध्येच खीळ बसणे.
१६) घरातील मुलगा / मुलगी सर्व काही योग्य असूनही विवाह न होणे .
१७) जोडप्यात कोणताही दोष नसताना व डाॅ. इलाज सुरू असूनही संतती न होणे / संतती न वाचणे / वारंवार गर्भपात होणे / संततीत व्यंग असणे / मतीमंद संतती जन्माला येणे.
१८) क्षय रोगांसारखे आजार उद्भवणे किंवा विविध प्रकारे सतत कष्ट मय परिस्थीती निर्माण होणे

नसनित पितरश्रेती कृत्वामनी यो नर: |
श्राद्धंनकुरूते तत्र तस्य रक्तं पिबंन्तिते॥

श्राद्ध न करणऱ्यांना पावलो पावली दुख: कष्ट अपयश यांचा सामना करावा लागतो मृत व्यक्ती बाध्य होउन कुटुंबातील सदस्यांचे अति सुक्ष्म रूपाने रक्त पिउ लागतात. आपल्याला होणारी संतती ही फक्त देवांच्याच नव्हे तर पितरांच्या पण आशिर्वादाने होते . जर संतती होत नसेल तर जेव्हा श्राद्ध करतो तेव्हा तीन पिंड असतात त्यातील दोन नंबरचा ( मधला) पिंड संतती न होणाऱ्या स्त्रीस खाण्यास देतात .

आपण नारायणनागबली म्हणजे नेमके काय व काय विधी होतात ते समजुन घेऊ.

॥धनलोभात_मृतायेच_सर्प_योनिर्व्यवस्थिता॥

आपल्या चौदा पिढ्यांमध्ये जे जे कोणी धनलोभात गेले आहे त्या सर्वांना सर्प योनी प्राप्त होते. किंवा धनाच्या वासनेने आपल्या घरात किंवा आसपास आपल्या दृष्टीस पडला असता , आपल्या हातून त्याची हत्या झाली असता त्याचा अपमृत्यु होतो त्याच्या निवारणासाठी नागबली ही पूजा केली जाते.

पुत्रस्थानगते_राहौ_कुजेनापि_निरीक्षते |
कुजक्षेत्रगते_वापि_सर्प_शापानसुतक्षय:||

जर कुंडलीमध्ये पंचम स्थानात राहू मंगळाने दृष्ट अथवा मंगळाच्या राशीत असेल तर सर्प शाप योग होतो व त्यामुळे संततीची हानी होऊ शकते.त्याच्या निवारणा करता नागबली हा विधी केला जातो
.
या पितृदोषासाठी त्रीपिंडी,नारायण बली,नागबली,केला जातो.नारायण बली व नागबली हे दोन स्वतंत्र विधी आहेत.तीन दिवसात पहिले नारायण बली , दुसरे दिवशी नागबली व तिसरे दिनी गणेशपुजन पुण्याह वाचनादी कर्म केले जाते.

* त्रिपिंडी हा विधी एक दिवसाचा असतो.

आयुःप्रजां_धनं_विद्यां_स्वर्ग_मोक्षंसुखानि_च ।
प्रयच्छन्ति_यथाराज्य_नृणां_प्रीताः_पितामहा ॥

ऐहिक व पारलौकिक सुख देण्यास पितर कारणीभूत आहेत ही गोष्ट लक्षात येईलच.

"अंतीसागती" या शास्त्राच्या उक्तीप्रमाणे अंत:काळी माणसाची इच्छा आकांशा जशी असते तशीच त्याला गती प्राप्त होते.आता यात आणखी एक गोष्ट विचारणीय आहे. ती म्हणजे आपणास आपले पितरांपैकी कोणास योग्य गति मिळाली व कोणास कोणत्या कारणाने मिळाली नाही हे समजण्यास काहीच मार्ग नाही.त्यासाठी हा विधी योग्य ठरेल.

नारायण बली . हा विधी घरात कोणाचा अपमृत्यू , अपघाती , आत्महत्या , खून , दिर्घ आजार , पाण्यात बुडून , भाजून , चोरांनी मारून इत्यादी प्रकारे मृत्यू झाला असल्यास त्याचा दोष जाऊन आत्म्यास गती मिळावी यासाठी केला जातो. तसेच घरातील मागील पिढीत दशक्रियादी कार्ये नीट झालेली नसतील त्या सर्वांचा , घरातील न केल्या गेलेल्या श्राद्धांचा सर्व प्रकारचे सात पिढीतील दोष पित्या कडून व माते कडून आलेले नाहीसे होतात .

संततीदायक व पीडानिवारक नारायणबली व नागबली विधी हे दोन विधीचे नांव आहे. या दोन्ही विधीस धर्मशास्त्रात
प्रेतोपद्रव्यादि संतंतीप्रतिबंध शरीरपीडानाशकत्वात सकामश्राद्ध भण्यते ।
सकाम श्राद्ध असे संबोधले आहे.

शास्त्रकारांनी

कृते गर्भाधानेयदि गर्भोत्पत्यभावो मृतापत्या_वातदा
प्रतिबंधक प्रेतोपद्रवनिवृत्यर्थ नारायणबलीर्नांगबलिश्च कार्य॥

पुत्रप्राप्ती, संततीस सौख्य, दुर्धर शरीर पीडा व योगक्षेमात वारंवार व्यत्यय येणे ह्या ज्या मानवी जीवनात येणाऱ्या अपरिहार्य अडचणी आहेत यांचा परिहार होण्यासाठी हा विधी प्रामुख्याने करावा असे सांगितले आहे.

देशनिर्णय
हा विधी देवशिरो राष्ट्रातील श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे केला जातो. आज हजारो वर्षांची परंपरा व शास्त्रप्रामाण्य या दोन्ही गोष्टी मुळेच येथे हा विधी करतात.

कुरूक्षेत्राच्छ तगुणं गंगायाश्र्च सहस्त्रकम् ।
वाराणस्या दशगुणं गौतमीस्नानमीरितम् ॥

कुरूक्षेत्रा पेक्षा शंभर पट गंगेपेक्षा हजार पट आणि वाराणसी (काशी) पेक्षा दहा पटीने उत्तम असे गौतमी स्नान पुण्यदाई आहे
आणि मुख्य कारण म्हणजे ब्रम्हांडात तीन महास्मशान आहेत काशि , ऊज्जैनी व त्र्यंबकेश्र्वर म्हणजेच उत्पत्ती , स्थिती आणि #लय त्र्यंबकेश्र्वर हे लय तत्वा चे स्मशान क्षेत्र आहे ईथे पाप आणि पुण्यांचा क्षय होतो

पितुराज्ञापुरोधाय कृते धर्मेण_वै पुरा । त्रिशंकुस्वर्गंकामेन हरिश्चन्द्रेण वैकृतः ।
विधीत्रयप्रसंगेण मया संप्राथितः शिवः ।
सार्धं सुदर्शनैस्सांभ पुत्ररत्नमवाप्तये ॥

निर्णयसिंधु'' या ग्रंथात नारायण नागबली हे सकाम श्राद्ध त्र्यंबकेश्वराच्या पावन भूमीत करावा असे #स्पष्ट सांगितले आहे. ( नि. सिं. पान ४१४ पहा) याचे कारण शास्त्रकारांनी असे सांगितले आहे की

सह्यस्यचो_द्र्वो_यत्र_यत्र_गोदावरी_नदी ।
पृथिव्यमपि_कृत्स्नायांस_प्रदेशोऽति_पावन ।

ब्रम्हगिरीपर्वत हे पृथ्वीतलावर शंकराचे आद्य स्वरुप आहे. त्या ब्रम्हगिरीपासूनच पतितपावनी गौतमी ,गोदावरी व गंगेचा उगम झाला आहे. भूतनाथ महामृत्युंजय श्री त्र्यंबकेश्वर महाराजांचे ज्या भूमीत कायम वास्तव्य आहे अशी श्रीत्र्यंबकेश्वर येथील भूमी सर्व पृथ्वीतलावर अत्यंत पवित्र आहे. म्हणूनच हा विधी येथे करावा. येथे केल्याने तो सद्यः फलदायी होतो, त्र्यंबकेश्वर येथे "लय तत्व स्मशान" आहे काशी, उज्जेन नंतर म्हणजे उत्पत्ती व स्थिती नंतर लय महास्मशान त्र्यंबकेश्वर ला आहे . याच ठिकाणी पाप पुण्याचा क्षय होतो तसेच पितरांना आवाहन केले असता ते सद्गती घेण्यासाठी उपस्थित होतात या क्षेत्राच हे वैशिष्ट्य आहे
त्र्यंबकेश्र्वर श्रेत्र हे महास्मशान असुन हे सती चे महास्मशान सुद्धा आहे अहिल्या व गोदावरी या दोन नद्यांच्या संगमावर हे पवित्र स्थान आहे.

गोदावरी_नदी

अंबत्वम्दर्शनान्_मुर्क्ति_नजाने_स्नानजं_फल्ं

नुसते डोळ्याने दर्शन घेतले तरी मुक्ति मिळते तर स्नानाचे फळ काय आहे हे माहीतीच नाही अशा पवित्र गंगामाई मधे स्नान करून सर्व प्रकारचे पुजा विधी आरंभ केले जातात.अशी ही दक्षिण भारतातील सर्वात मोठी नदी (महानदी) जिला आपण गोदावरी असे म्हणतो त्या नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर आहे तिला दक्षिण वाहिनी असे म्हणतात. जीला सर्व नद्यांना मधे वृध्द म्हणजे मोठी असे संबोधले जाते

गोदावर्यास्तटे श्रांद्धं य: करोति नरोत्तम: |
सक्त्तौ सक्त्तौ लभेद्देवि शतगोदानिकं फलम् ॥

गोदावरी तिरावर जो कोणि श्राद्ध करतो हे देवि तो त्यास सेंकडो गाय दान केल्याचे पुण्य मिळते

घोरे कलियुगे देवि सर्वे वै पापबुद्धयः ।
"परदारपरप्राणाः परनिन्दात्मसंस्तुवः ।
परापकारिणो देवि परद्रव्यापहारिणः ।
तेषामुद्धरणार्थाय नदी गोदावरी स्मृता ॥

हे देवि घोर कलियुग मधे जो र्सर्व पापबुद्धि,परदारपरप्राण, परनिन्दा आणि स्व: स्तुति करणाऱ्यावर उपकार करनारे परधन चे अपहरण करना जे आहेत त्यांच्या उद्धारा साठी गोदावरी नदी सांगितली आहे

संगम -: गोदावरी व अहिल्या या दोन्ही नद्यां चा संगम इथे आहे याचं ठिकाणी पवित्र अशा सती ची मंदिर आहे की ज्या ठिकाणी दोन दिवस ही पूजा केली आहे

उपायांची यथार्तता -: हा विधी प्रामुख्याने अनपत्यता दूर होऊन संतति सौख्य लाभावे म्हणुन केला जातो. या करिता पतिपत्नी यांच्या शरीरातील दोष हे संतती न होण्यास एक दुष्ट कारण आहे.आता शरीरात बिघाडही बाह्य करणाने घडू शकतात. बाह्य शितोष्णादी विकारांनी शरीरात शीतोष्ण बाधा होतात. असा अनुभव आहे. त्याचप्रमाणे अनपत्यतेंसहि दोन कारणे असू शकतात. एक इन्द्रियजन्य कारण, दुसरे इन्द्रियातील कारण असू शकते. जी गोष्ट बुद्धिगम्य होत नाही, येथे बुद्धिचीगति कुंठित होते, अशा वेळी मानवाने वेदशास्त्रांचाच आधार घेतला पाहिजे कारण आमचे वैदिक तत्त्वज्ञान अदृष्ट कारणांचा निर्णय करुन त्यावर

॥ प्रत्यक्षेणानुमित्या वा यस्तूपायो नबुद्धते ।
एनं विन्दति वेदेन तस्माद्वेदस्य वेदता ॥

उपाय सांगणारे आहे. थोडक्यांत मानवी शक्तीच्या आटोक्याबाहेरचे परंतु मनुष्य प्रयत्न साध्य, अखिल साध्य साधनांचा अविष्कार वेदांत सांगितला आहे. ते वेद ज्या ऋषींनी पाहिले त्यास मंत्रदृष्टे म्हणतात. त्या मंत्रदृष्ट ऋषींनी मानवाचे कल्याणाकरिता जी जी कर्मे सांगितली आहेत, त्यातीलच हा एक भाग आहे. ज्यावेळी शरीरांतील दोष हे कारण नसतांही संतति प्राप्त होत नाही असे अनुभवास येते ; त्यावेळी त्यास अदृष्ट कारण परंपरा असलीच पाहिजे. त्या अदृष्ट कारण परंपरेचा समन्वय करूनच वेदाने हे अनुष्ठान करण्यास सांगितले आहे.

अपत्यांचे_महत्त्व
मानवांचा गृहस्थाश्रम संततिशिवाय सफल होत नाही. गृहस्थाश्रमांतील सौख्याचा ठेवा ``कुलदीपक पुत्र'' मानला जातो. म्हणूनच महाकवी भवभूतीने म्हंटले आहे की,

अंतःकरण_तत्त्वस्य दंपत्योः_स्नेहसंस्त्रवात |आनंदग्रंथीरेकोंय अपत्यमिति_पठ्यते ॥
यस्य वै मृत्युकाले तु व्युच्छिन्ना_संततिर्भवेत ।
स वसेन्नरके नित्यं पंकमग्ना करी_यथा ॥

ऐहिक सुख व पारलौकिक गति ह्या दोन्ही गोष्टी अपत्य लाभानेच मिळतात. या लोकी नानाविध दुःखानी मनुष्य पोळला जातो. मागे वर्णन केल्याप्रमाणे अजिबात संतति नसणे, जीवित संततीस आरोग्य नसणे, शरीरास कायम रोगपीडा असणे, योगक्षेम व्यवस्थित न चालणे, यास दृष्टा कारण पंरपरा असलीच पाहिजे. याचा विचार त्यांनी प्रथम करून ती कारणे प्रथम नमूद केली आहेत -

१) पूर्वजन्मी केलेले विशिष्ट कृत्य द्रव्यापहरनादि,
२) या जन्मी केलेले विशिष्ट कृत्य,
३) वामकर्मी अभिचारयोग, (मंत्र-तंत्रादि)
४) पितर, आप्त अगर इतर संबंधित यांस गति नसणे,
५) प्रेत लोकांतील पैशाचादिकांची पीडा असणे,
६) नागवध करणे .

या सहा कारणांनी विशेषेकरून अनपत्यादि दुःखे प्राप्त होतात, असे त्यास आढळून आले. आता वरील कारणांचा खुलासेवार विचार करू. पितरांस गति नसणे. म्हणजे सृष्टिकर्माप्रमाणे त्यास पितृलोक न मिळणे, म्हणजे त्यांची तृप्ती नसणे यामध्ये पुष्कळशा गोष्टी अंतर्भूत आहेत.
शास्त्रकारांनी असे ठरविले आहे की ज्ञानराज्याचे संचालक ऋषी आहेत. आधिदेव कर्म राज्यांचे संचालक देवतागण आहेत व अधिभूत अधिभौतिक स्थूल राज्याचे संचालक नित्य पितर आहेत. अर्थात पितरांचे तृप्तीने ऐहिक सुखाचा लाभ होतो त्यांची तृप्ति म्हणजे त्यांना उद्देशून श्राद्ध करणे. आता श्राद्ध म्हणजे काय याचाही विचार क्रमप्राप्तच आहे. श्राद्ध या शब्दांत श्रद्धा हा मुख्य शब्द आहे. आपला जन्म ज्या कुळात झालेला असतो त्या कुळातील तसेच मातामहादि कुलातील मृत पूर्वाजांच्या (प्रेत व पितर ) तृप्तीकरिता तसेच त्यांच्या तृप्तीने लाभणारी सत्‌संतति व चिरसंपत्ती याकरिता तिलदर्भादिकांनी सविधी दिलेल्या अन्नादिकरूप पितृयज्ञाला श्राद्ध असे म्हणतात . श्राद्धावाचून कितीही पवित्र व कितीहि मूल्यवान पदार्थ पितर ग्रहण करू शकत नाहीत श्रद्धापूर्वक असूनही बिनां मंत्राने दिलेले अन्नोदक पितरांना मिळत नाही असे पद्म पुराण,विष्णु पुराण,स्कंद पुराण, माहेश्वर खंड, कुमारिका खंड अध्याय ३५-३६ या मध्ये सांगितले आहे.हे पितर कर्माधीन नाहीत. या नित्य पितरांचे २१ गण आहेत ते श्राद्ध भाग पोहोचविण्याचे काम करतात. श्राद्धादि पितृकार्ये करणारा निरोगी, दीर्घायु, सुपुत्रवान, श्रीमान, धनोपार्जक असा होतो व परलोकी त्यास तृप्ती मिळते.या विधीची सुरूवात गंगा स्नानाने होते . तेथे गंगेची पुजा वगैरे करून त्या जलस्त्रोतास वंदन करून हे कर्म आज सुरू करीत आहोत हे सिद्धीस जावो असे आशिर्वाद मागून भस्म स्नान व मृत्तीका स्नान तसेच औषधि स्नान व पुन्हा गंगा स्नान केले जाते.यावेळी सफेद वस्त्र नेसायचे असते . एकट्या पुरूषानेही हा विधी केला तरी चालतो तसे समस्त कुटूंबीय तेथे हवेतच असेही काही नसते यासाठी एकटा माणूसही हा विधी जाऊन करून येऊ शकतो .

यानंतर ओलेल्याने शिव मंदिरास प्रदक्षिणा घालून कुशावर्त कुंडावरून स्नान करून पाणी भरून सती महास्मशानात जातात . येथे . ब्रह्मा , विष्णू , महेश , यम व प्रेत या पंच प्रतिमांचे ( या प्रतिमा अनुक्रमे सोने , चांदी , ताम्र , लोह व शिसे यांच्या असतात ) पंचकलशांवर स्थापना करून षोडषोपचारे पुजन, तर्पण केले जाते .प्रेताचे पुजन करून यथाविधीत त्याचे दहनादी कर्म केले जाते . त्या अनुषंगाने येणारे दशक्रियादी विधी केले जातात . नंतर त्या दहन केलेल्या पुतळ्याची रक्षा सावरून पाण्यात विसर्जीत करतात या दिवशी व पुढील पुर्ण दोन दिवस सुतक पाळतात . दुसऱ्या दिवशी सपिंडी श्राद्ध व नागबली करतात म्हणजेच सर्पाचे दहनादी विधी होऊन अष्डपींड दान केले जाते . पुन्हा रक्षा सावरून पाण्यात विसर्जीत करतात . हा विधी घराण्यात कोणी सर्प मारला असेल मारतांना पाहीला असेल मारण्यास सांगितलं असेल मारण्यास मदत केली असेल किंवा चुकून अपघाताने मारला गेला असेल तर त्याचे दोष जाण्याकरीता करतात
याचे दोन दिवसांचे सुतक संपले की तिसर्‍या दिवशी आंघोळ वगैरे उरकून गुरूजींच्या घरी गणेशपुजन , पुण्याहवाचन , पुजन केले जाते याचे वैशीष्ट्य असे की जर तुमची जन्मनक्षत्र शांती झाली नसेल तर ती ही करून घेता येते इतके हे पुजन महत्वाचे असते . यानंतर भोजन वगैरे झाले की ईच्छे प्रमाणे दाने किंवा त्या ऐवजी यथाशक्ती दक्षिणा देतात. त्यांनंतर गुरुजींचा निरोप घेउन थेट आपल्या घरी जायचे असते व योग्य मुहूर्त बघुन उदक शांत करून घ्यायची असते. ४० दिवस मांसाहार भक्षण व मंदिरा पान वर्ज असते

हा विधि पितृपक्षात करण्याचे अति महत्व आहे कारण पितृपक्षामध्ये सर्व पितृगण हे पितृ लोकातुन मृत्युलोकात येऊन वास करित असतात त्या वेळेस केलेले श्राद्ध हे पितृमोक्षासाठी अति लाभदायक ठरते व पितरांना लवकरात लवकर सद्गती मिळण्यास त्याचा लाभ होतो म्हणुन ह्या विधिसाठी पितृपक्ष उत्तम काल मानला जातो

अशी ही भौगोलिक परिस्थिती हा विशेष गुण आहे म्हणून या क्षेत्राला जास्त महत्व आहे या क्षेत्रात जो जातक येऊन पूजा करतो त्याला त्या कर्माचा फळ लवकरात लवकर प्राप्त होते.

धन्यवाद
संकलन
श्री महेंद्र पंडित
९९६७६५७१२१

Address

Office No F37 , Cinewonder Mall , Ghodbunder Road
Thane West
400610

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahendra Pandit Astro Vastu posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Mahendra Pandit Astro Vastu:

Share