Vivek Investment

Vivek Investment Vivek Investment is an investment advisory firm. We, as a group of experienced professionals, provid

19/03/2026
19/09/2025

*These Stocks are likely to increase by 10% to 20% due to Dussehra & Diwali.* *And GST has also been reduced*

Eicher Motors
Tata Motors
M&M
ITC
Nestle
Bajaj Finance
HDFC Bank
SBI Cards
ETERNAL (Zomato).

23/06/2025

*ऑप्शन ट्रेडिंगचे तुमच्याकडे जर बेसिक पासून एडव्हान्स पर्यंत ज्ञान असेल तर त्याचा काय फायदा होऊ शकतो??*

ऑप्शन ट्रेडिंग (Option Trading) हे शेअर मार्केटमधील एक प्रगत आणि गुंतागुंतीचा प्रकार आहे. जिथे तुम्हाला चांगल्या नफ्याची संधी मिळते, पण त्याचबरोबर मोठा धोकाही असतो. जर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगचि भरपूर माहिती असेल तर तुम्हाला खालील प्रकारे मोठे फायदे होऊ शकतात.

*1. मर्यादित जोखीम आणि अमर्याद नफ्याची शक्यता.*
*(Limited Risk, Unlimited Profit Potential)* :-
ऑप्शन विकत घेणारा (As an Option Buyer) जेव्हा तुम्ही ऑप्शन खरेदी करता (उदा. Call Option किंवा Put Option) तेव्हा तुमचे जास्तीत जास्त नुकसान तुम्ही भरलेल्या प्रीमियम पुरते मर्यादित असते. पण जर बाजारातील किमती तुमच्या अपेक्षेप्रमाणे खूप वाढल्या किंवा कमी झाल्या तर तुम्हाला अमर्याद नफा मिळू शकतो. संपूर्ण माहिती असल्याने तुम्ही योग्य वेळी योग्य प्रीमियम खरेदी करू शकता.

*2. कमी भंडावल जास्त नियंत्रण (High Leverage with Less Capital)*:- ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तुम्हाला कमी भांडवल गुंतवून मोठ्या प्रमाणात शेअर्स (Future Contracts) नियंत्रित करण्याची संधी मिळते. म्हणजेच तुम्ही कमी पैशात मोठ्या प्रमाणावर ट्रेड करू शकता. पण ईथे जर तुम्हाला पूर्ण ज्ञान नसेल तर हेच Leverage तुमच्यासाठी मोठे नुकसानकारक ठरू शकते. ज्ञानामुळे तुम्ही या Leverage चा योग्य वापर करू शकता.

*3. विविध बाजारांच्या परिस्थितीमध्ये नफा मिळवण्याची क्षमता (Profitability in all Market Conditions):-*
शेअर बाजार वाढत असो (Bullish), खाली पडत असो (Bearish) किंवा स्थिर असो (Sideway) Option Trading मध्ये प्रत्येक परिस्थितीत नफा कमावण्याची रणनीती उपलब्ध आहे. बाजार वाढताना Call Option खरेदी करू शकता.
बाजार घटताना Put Option खरेदी करू शकता.

*4. पोर्टफोलीयो संरक्षण (Hedging and Portfolio Protection):-*
तुमच्याकडे असलेल्या शेअर्सच्या पोर्टफोलीयोचे संरक्षण करण्यासाठी ऑप्शन ट्रेडिंग एक उत्तम साधन आहे. उदा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्याकडे असलेल्या शेअर्सची किम्मत तात्पुरती कमी होऊ शकते तर तुम्ही पुट ऑप्शन (Put Option) खरेदी करून तुमच्या संभाव्य नुकसानीला मर्यादित करू शकता. हे तुमच्या पोर्टफोलिओसाठी विमा (Insurance) म्हणुन काम करते.

*5. उत्पन्नाचा अतिरिक्त स्त्रोत (Generating Additional Income):-*
तुमचा आहे तो बिझनेस किंवा जॉब सांभाळत तुम्ही कमी वेळेमध्ये देखील यातून उत्पन्न निर्माण करू शकता.

*6. बाजारातील अस्थिरतेचा (Volatility) फायदा घेणे:-*
ऑप्शनच्या किमती बाजारातील अस्थिरतेवर (Volatility) खूप अवलंबून असतात. अस्थिरता वाढल्यावर किंवा कमी झाल्यावर ऑप्शनच्या किमतीवर परिणाम होतो. तुम्हाला संपूर्ण माहिती असल्यास, तुम्ही अस्थिरतेचा योग्य अंदाज घेऊन नफा मिळवू शकता.

*7. लवचिकता (Flexibility):-*
Options contract मध्ये Strike Price आणि Expiry Date निवडण्याची लवचिकता असते. याचा अर्थ तुमच्या विश्लेषणानुसार आणि जोखीम सहन करण्याच्या क्षमतेनुसार योग्य Contract निवडू शकतात.

थोडक्यात काय तर ऑप्शन ट्रेडिंग हे शक्तिशाली साधन आहे, पण ते दोन धारि तलवारीसारखे आहे. जर तुम्हाला त्याची संपूर्ण माहिती आणि सखोल ज्ञान नसेल तर ते तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते आणि तुमचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. पण जर तुम्ही याचे प्रशिक्षण घेऊन रणनीती आणि जोखीम व्यवस्थापन समजून घेतले तर ऑप्शन ट्रेडिंग तुमच्यासाठी एक अत्यंत फायदेशीर आणि प्रभावी आर्थिक साधन ठरू शकते. म्हणुनच अगदी बेसिक पासून एडव्हान्स लेवल पर्यंत संपूर्ण शेअर मार्केटची माहिती असणे हे ऑप्शन ट्रेडिंगमधील यशाची गुरुकिल्ली आहे.

Follow the VIVEKINVESTMENT channel on WhatsApp:

2016 पासून परदेशात वास्तव्य करत असलेल्या विजय मल्ल्याने 9 वर्षानी पहिल्यांदाच आपली कहानी जगासमोर मांडली.एकटेपणाचा क्षण य...
08/06/2025

2016 पासून परदेशात वास्तव्य करत असलेल्या विजय मल्ल्याने 9 वर्षानी पहिल्यांदाच आपली कहानी जगासमोर मांडली.

एकटेपणाचा क्षण या प्रश्नावर थोडा थांबून खोल श्वास घेत म्हणाले, *"मी नेहमीच काही ना काही करत असतो शांत बसुन राहिलो नाही माझ्या आवडीनिवडीच्या गोष्टी मला सतत व्यस्त ठेवतात आत्ताच आयुष्य निवृत्तीनंतरच वाटतय"*. त्याच्या या शांत स्वरात वेदना लपलेली होती.

त्यांनी स्पष्ट केल की किंगफिशर एअरलाईन्स बंद पडली ते त्यांच्या आयुष्यातलं सर्वात मोठ दुःख होत. *"कर्मचाऱ्यांची पगार थकली, मी त्यांची माफी मागतो ते माझ एक कुटुंब होत"*. त्यांच हे कबुलीजबाब अनेकांचे मन हेलावून गेले (पण आता त्याला काहीच अर्थ नाही.)

मल्ल्या म्हणतात *"मी भारतातून पळून गेलो नाही मी न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवतो, पण मला खात्री हवी की मला योग्य न्याय मिळेल"*. त्यांचे हे बोलणे एक वेगळाच पैलू उलगडतात. एका माणसाचा जो कधी काळी शाही जिवन जगत होता आज आत्मपरीक्षण करत जगतोय.

ही मुलाखत ऐकणाऱ्यांसाठी एक धक्कादायक होती. कारण ईथे तो विजय मल्ल्या दिसत नव्हता जो पार्ट्यांमधे नाचायचा, तर तो माणूस दिसतोय जो आयुष्याकडे आता दुसर्‍या नजरेन पाहतोय.

ही संपूर्ण मुलाखत YouTube वर पाहायला मिळेल.
*एकेकाळचा "king of Good Times" आता एका वेगळ्याच टप्प्यावर आहे जिथे frenzied संपलाय आणि आत्मपरीक्षण सुरू झालंय*.

(या लेखात विजय मल्ल्या विषयी सहानुभूती दर्शविली नाही आणि त्यांचे पळून जाण्याचे समर्थन करत नाही.)

भारतीय अर्थव्यवस्था 1991 च्या अगोदर एका डबक्यात रुतून बसली होती. त्या अर्थव्यवस्थेला मनमोहन सिंह यांनी अर्थमंत्री पदाची ...
27/12/2024

भारतीय अर्थव्यवस्था 1991 च्या अगोदर एका डबक्यात रुतून बसली होती. त्या अर्थव्यवस्थेला मनमोहन सिंह यांनी अर्थमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्या नंतर मोठी गती दिली. किंबहुना भारतीय समाजाला प्रगतीची दिशा मनमोहन सिंह यांनीच दिली. ज्या समाजाला अर्थकारण कळत नव्हत, त्या मध्यमवर्गीय लोकांचे भले करण्याचे काम मनमोहन साहेबानी केले. राजकारणाला तत्त्वज्ञानाची जोड देणारे आज हरपले आहे.

2008 साली अमेरिकेतील मंदी मुळे जगभरात मंदी निर्माण झाली होती, पण मनमोहन सिंह यांच्या धोरणामुळे भारताला याचा कोणताही फटका बसला नव्हता त्या नंतर 2009 साली ते दुसर्‍यांदा पंतप्रधान झाले.

"विद्वान, सौम्य, संयमी आणि संवेदनशील नेता म्हणुन त्यांची ओळख आहे".

27/04/2024

Motilal Oswal

*🚩"रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्। नरो न लिप्यते पापै: भुक्तिं मुक्तिं च विंदति राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजनन...
22/01/2024

*🚩"रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्। नरो न लिप्यते पापै: भुक्तिं मुक्तिं च विंदति राम मंदिर प्राण-प्रतिष्ठापूजननिमित्त हार्दिक शुभेच्छा..!🚩*
*शुभेच्छुक😊*
*विवेक विलास गडदे*

Address

Shop No 1, New Rose Villa Co-op HSC LTD, D. R. Road, Charai Thane(w)
Thane
400601

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6am
Wednesday 9am - 6am
Thursday 9am - 6am
Friday 9am - 6am
Saturday 9am - 6am

Telephone

+919664337836

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vivek Investment posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vivek Investment:

Share