Irfan Jahangirkhan Pathan

Irfan Jahangirkhan Pathan A

आज दिनांक ३ मे २०२६माजी मंत्री तथा अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसप्राध्यापक वसंतराव पुरके सर यांना वाढदिवसा...
03/05/2026

आज दिनांक ३ मे २०२६
माजी मंत्री तथा अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस
प्राध्यापक वसंतराव पुरके सर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आपल्या नेतृत्वाखाली आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि विकासासाठी आपण केलेले कार्य प्रेरणादायी आहे. आपल्या उत्तम आरोग्याची, दीर्घायुष्याची आणि पुढील वाटचालीसाठी यशाची मनापासून शुभेच्छा.
आपण असेच समाजसेवेच्या कार्यात अग्रस्थानी राहून जनतेची सेवा करत राहा, हीच प्रार्थना.

हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा! 🎉मा. अजय छिकारा (राष्ट्रीय महासचिव, IYC व प्रभारी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस),मा. नवजो...
14/04/2026

हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा! 🎉
मा. अजय छिकारा (राष्ट्रीय महासचिव, IYC व प्रभारी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस),
मा. नवजोत सिंग संधू (राष्ट्रीय सचिव, IYC व सह-प्रभारी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस)
आणि मा. शांभवी शुक्ला (संयुक्त सचिव, IYC व सह-प्रभारी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस)
यांच्या आदेशानुसार Unit Management व IYC App या महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी
राज्य स्तरावर श्रेया ठाकरे, मंदार वाडेकर आणि फैसल पटेल यांची नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन! 💐
ही जबाबदारी निश्चितच संघटन बळकटीसाठी महत्त्वाची ठरेल आणि युवक काँग्रेसचे कार्य अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.

आज  NSUI स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आदरणीय दरने सर, आयुषी ताई आणि फैसल भाई यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसो...
09/04/2026

आज NSUI स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आदरणीय दरने सर, आयुषी ताई आणि फैसल भाई यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली.
आजचा विद्यार्थी जागरूक आहे, फक्त त्याला योग्य दिशा देण्याची गरज आहे. आजच्या काळात शिक्षण, बेरोजगारी, फी वाढ आणि विद्यार्थ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात असताना, NSUI ही विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढणारी एक मजबूत ताकद म्हणून उभी आहे.
आज संख्या जरी 12 असली, तरी हाच 12 चा आकडा उद्याचे 120 आणि पुढे 1200 कार्यकर्त्यांमध्ये रूपांतरित होणार — कारण ही लढाई केवळ संख्येची नाही, तर विचारांची आहे.
स्थापना दिनानिमित्त वृक्षारोपण करून एक संकल्प केला —
जसे जसे हे वृक्ष वाढतील, तसे तसे NSUI ची ताकदही वाढत जाईल आणि विद्यार्थ्यांचा आवाज अधिक बुलंद होईल.
विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या भविष्यासाठी —
NSUI सदैव संघर्षाच्या मार्गावर!

— *इरफान जहांगीरखान पठाण*
उपाध्यक्ष, यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेस

जिल्हा महासचिव, यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी (अल्पसंख्यक विभाग)

With Maharashtra Congress Minority Dept. – I just got recognized as one of their top fans! 🎉
16/02/2026

With Maharashtra Congress Minority Dept. – I just got recognized as one of their top fans! 🎉

यवतमाळ शहरातील पोस्टल ग्राउंड परिसर आज “चौपाटी” म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. येथे दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी ...
15/02/2026

यवतमाळ शहरातील पोस्टल ग्राउंड परिसर आज “चौपाटी” म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. येथे दररोज मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असते. विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, चहा पॉइंट, लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
परंतु अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे, या ठिकाणी दिवसेंदिवस अस्वच्छता वाढताना दिसत आहे. कचऱ्याचे ढीग, प्लास्टिकचा वाढता वापर आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
स्थानिक प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे. नियमित स्वच्छता मोहीम राबविणे, कचरापेट्यांची व्यवस्था करणे आणि अन्न विक्रेत्यांवर योग्य नियम लागू करणे आवश्यक आहे.
जनतेच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न असल्यामुळे प्रशासनाने विलंब न करता त्वरित निर्णय घेऊन पोस्टल ग्राउंड परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी ठोस पावले उचलावीत, ही जनतेची ठाम मागणी आहे.

14 फेब्रुवारी 2019 रोजी Pulwama येथे आपल्या देशाच्या CRPF जवानांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला. या अमानुष हल्ल्यात ...
14/02/2026

14 फेब्रुवारी 2019 रोजी Pulwama येथे आपल्या देशाच्या CRPF जवानांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला. या अमानुष हल्ल्यात 40 पेक्षा अधिक जवान शहीद झाले. या घटनेने संपूर्ण देश हादरला.
आज आपण त्या सर्व वीर शहीदांना विनम्र अभिवादन करतो, ज्यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांचे शौर्य, त्याग आणि देशप्रेम सदैव आपल्या स्मरणात राहील आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.

इमरान पठाण यांची उमरखेड विधानसभा अध्यक्ष म्हणून झालेली निवड ही केवळ संघटनात्मक बदल नसून युवक शक्तीला मिळालेली नवी दिशा आ...
11/02/2026

इमरान पठाण यांची उमरखेड विधानसभा अध्यक्ष म्हणून झालेली निवड ही केवळ संघटनात्मक बदल नसून युवक शक्तीला मिळालेली नवी दिशा आहे. *महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस (MPYC) चे अध्यक्ष माननीय शिवराज दादा यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान होणे, हा कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा आणि नेतृत्वावरील विश्वासाचा गौरव आहे.*

ही नियुक्ती म्हणजे तळागाळातील कार्यकर्त्यांच्या आवाजाला मिळालेली ताकद आहे. युवकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी आणि काँग्रेसची विचारधारा अधिक बळकट करण्यासाठी ही निवड निश्चितच महत्त्वाची ठरणार आहे.

दिलेला शब्द पाळत योग्य सन्मान आणि योग्य नेतृत्वासमोर नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करून दाखविल्याबद्दल कपिल भाऊ यांचे मनःपूर्वक आभार. त्यांच्या ठाम भूमिकेमुळे आणि संघटनात्मक बांधिलकीमुळेच आज युवकांना सक्षम व्यासपीठ मिळत आहे.
उमरखेड विधानसभा क्षेत्रात युवक काँग्रेस अधिक जोमाने कार्य करेल, संघटना मजबूत करेल आणि जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे लढेल, असा विश्वास आहे.

Address

Shop No 18, First Floor, Pawansoot Tower, Near Akola Urban Bank, Tawade Hospital Road, Godhani Road
Yavatmal
445001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Irfan Jahangirkhan Pathan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share